Close
App logo

ऍप युजर्स साठी शॉपिंग ऑफर्स आणि पेरेंटिंग बदद्ल माहिती

Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home अन्य गणेश चतुर्थी २०२३- शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस

गणेश चतुर्थी २०२३- शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस

गणेश चतुर्थी २०२३- शुभेच्छासंदेश आणि मेसेजेस

आपल्या घरी आपला लाडका गणपती बाप्पा येत्या मंगळवार म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ रोजी येणार आहे. आपण सगळेच गणपतीच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात असतो. सगळीकडे आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत असतो. ह्या सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, ओळखीचे लोक एकमेकांकडे जात असतात. त्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटी गाठी होतात. आता कोरोनाचे सावट थोडे कमी झाले आहे. आता आपण प्रत्यक्ष भेटून किंवा व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छासंदेश देऊ शकतो. म्हणूनच ह्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी गणेशोत्सवानिमित्त काही शुभेच्छा संदेश संकलित केलेले आहेत.

तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसाठी गणेशचतुर्थीनिमित्त शुभेच्छासंदेश

1. तुम्हाला सुख, समृद्धी , समाधान आणि आरोग्य लाभो तुमच्या मनातील सर्व ईच्छा पूर्ण होवोत ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना!
    गणपती बाप्पा मोरया!!

2. आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येणाऱ्या ह्या गणोशत्सवाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

3. गजानना तू गणराया आधी वंदू तुज मोरया गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

4. तू सुखकर्ता तू दुःखहर्ता आणि तूचि विघ्नहर्ता तुम्हाला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा

5. गणपती बाप्पा तुमची सगळी संकटे दूर करून आनंदाचा वर्षाव करो हीच शुभेच्छा गणेशोत्सवाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!

6. बाप्पा चरणी कर माझे जुळती दर्शनाने सुख शांती समाधानाची होई प्राप्ती
    कृपा तुझी सदैव अशीच राहूदे चैतन्याची ज्योत अशीच उजळुदे
    गणोशत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा

7. पानाफुलांची आरास झाली, रांगोळ्यांनी धरा नटली, आनंद उल्हास आसमंती,
    बाप्पाच्या आगमनाने सर्वजण समाधानी असती सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा!

8. दहा दिवस आनंदोल्हास, घरात असता तुझा निवास,
    गणेशचतुर्थीचा हा दिवस म्हणजे आनंदाची बरसात.
    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

9. तुझे रूप मनात, तुझे नाम मुखात, भेटीची आस तुझ्या, सदैव असे हृदयात. गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा

10. वर्ष सारले तुझी वाट पाहता, आला आला माझा विघ्नहर्ता! गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा

11. विघ्नहर्ता, मंगलकर्ता तुमच्या जीवनात नवीन उत्साह घेऊन येवो!
      सर्व संकटांपासून तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण करो हीच प्रार्थना गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

12. बाप्पा कोरोनाचे संकट लवकर दूर कर तुझ्या चरणी ठेवितो माथा आम्ही आमुचे रक्षण कर..गणपती बाप्पा मोरया!

13. प्रथम तुला वंदितो कृपाळा सुखी ठेव साऱ्या भक्तजना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

14. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु में देव, कार्येषु सर्वदा! गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा!

15. गजानना करितो स्वागत तुझे, तूच विघ्नहर्ता लाभुदे आशीर्वाद तुझे गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

16. बाप्पा आला घरी, घेऊन आनंदाच्या सरी! गणेशचतुर्थीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा

17. तूच कर्ता तूच करविता, संकटमोचन तूच विघ्नहर्ता
      गणेश चतुर्थीच्या आपणास अनेक शुभेच्छा

18. बाप्पाला आवाडे मोदक, आली मूषकारून स्वारी
      आनंद, चैतन्य, उत्साह उदंड अंतरी
      गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

19. नमस्कार माझा असो तुज गणराया, लाभो आम्हा तुझे कृपाछत्र छाया
      गणेशचतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

20. सुखी ठेव सगळ्यांना असो तुझी छाया
       तुझ्या नामाचा जयघोष, गणपती बाप्पा मोरया
       गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

21. अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वरा बा तू घाल पोटी…गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा

22. सरला श्रावण, आला सण भाग्याचा, आनंदाची उधळण, आशीर्वाद बाप्पाचागणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

23. तुझे नाम घेण्या शब्द जुळूनि आले, गणराया तुझ्या आगमनाने सारे आनंदित झाले
       गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

24. तुझे मोहक रूप हृदयी, तुझे गोड नाम मुखी
       तूच असतोस सदा मनात, तुझ्या आशीर्वादाचा हात असो माथी
       गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

25. ढोलताशांच्या गजराने आसमंत निनादला, आला आला माझा लाडका बाप्पा आला. गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

26. दारी रांगोळी आणिक तोरण, स्वागता उत्सुक तुझ्या सारे, मुखी नाम गजानन. गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा!

27. वाजत गाजत आले गणपती, दूर झाली विघ्ने
       मनो भावे जोडूया हात होतील साकार स्वप्ने
       गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

28. भक्तांचे ठायी भक्ती अपार, बाप्पाच्या कृपेने होईल कोरोना हद्दपार. गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

29. बाप्पा आला माझ्या घरी, संकटे सारी दूर करी. गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा!

30. तुमच्या जीवनप्रवासातील सर्व अडथळे दूर होवोत आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत हीच श्रीगणेशाचरणी प्रार्थना.
       गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा!

31. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हा गणेशोस्तव खूप आनंदात जावो.
      हा उत्सव आपण सगळे जण आनंदात साजरा करूयात!
      गणपती बाप्पा मोरया!

32. मोरया मोरया मी बाळ तान्हे,
      तुझीच सेवा करू काय जाणे,
      अन्याय माझे कोट्यान कोटी,
      मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
      गणेश चतुर्थीच्या खूप हार्दिक शुभेच्छा!

33. घरी गजानन आले, सगळीकडे चैतन्य पसरले गणपती बाप्पा मोरया!
       तुम्हा सर्वांना हा गणेशोत्सव आनंदात जावो तसेच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!

तुम्हा सर्वांना हा गणेशोत्सव आनंदात जावो तसेच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना!

आणखी वाचा:

गणेश चतुर्थीसाठी तुमच्या घराची सजावट कशी कराल?
ह्या गणेश चतुर्थीला तुम्ही करून पहिले पाहिजेत असे मोदकांचे वेगवेगळे प्रकार

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article