गरोदरपणात, गर्भाची वाढ आणि विकास होत असताना स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात. ह्या बदलांमधील मुख्य बदल म्हणजे संप्रेरकांच्या पातळीत वाढ होणे हा होय. गरोदरपणात महत्त्वाची भूमिका असणारे एक संप्रेरक म्हणजे प्रोजेस्टेरॉन. गर्भवती स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्यासाठी हे संप्रेरक खूप मह्त्वाचे कार्य करते. प्रोजेस्टेरॉन म्हणजे काय? प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांच्या शरीरात (अंडाशयात) तयार होणारे एक संप्रेरक आहे. […]