काळानुरूप संतती नियमनाच्या साधनांमध्ये सुद्धा खूप बदल झाला आहे. आय.यु.डी.(अंतर्गर्भीय गर्भनिरोधक साधन) म्हणजे संततिनियमनाची एक परिणामकारक पद्धती आहे आणि ती स्त्रियांसाठी वापरली जाते. आय.यु.डी. म्हणजे काय? आय.यु.डी. किंवा इन्ट्रायुटेरिन डिवाइस म्हणजेच गर्भनिरोधक साधने ही स्त्रियांमधील संततिनियमनाची एक पद्धती आहे.T ह्या इंग्रजी अक्षराच्या आकाराचे हे साधन असून ते स्त्रीच्या गर्भाशयात बसवले जाते त्यामुळे गर्भधारणेस प्रतिबंध होतो. […]