अन्य

बाळांना होणारा ‘एक्झिमा’ – कारणे, लक्षणे आणि उपचार

बाळाची त्वचा खूप नाजूक असते आणि त्यामुळे बाळाच्या त्वचेला लवकर संसर्ग होऊन नुकसान पोहोचते. सर्वात प्रामुख्याने आढळणारी बाळाच्या त्वचेची स्थिती म्हणजे 'एक्झिमा' होय. बाळाला खूप लहान वयात तो होतो. तथापि, ह्या विषयवार अधिक चर्चा करण्यापेक्षा, हे जाणून घेऊया की एक्झिमा म्हणजे नक्की काय? एक्झिमा म्हणजे थोडक्यात त्वचा कोरडी होऊन त्यावर रॅशेस येतात आणि त्यामुळे त्वचेला खूप खाज सुटते. अगदी सोप्पं सांगायचे तर एक्झिमा म्हणजे त्वचेवर आलेली रॅश होय. एक्झिमा नक्की कशामुळे होतो ह्या बाबतीत वेगवेगळी मते आहेत, एका बाजूला एक्झिमा ही ऍलर्जी आहे असे काहींचे मत आहे आणि दुसरीकडे त्यामागे जनुकीय कारण सुद्धा आहे असे काहींचे मत आहे. एक्झिमाला डरमॅटिटिस, ऍटॉपिक एक्झिमा किंवा आटोपीक डरमॅटिटिस असे म्हणतात. खूप अभ्यासाद्वारे असे लक्षात आले आहे की पाच वर्षांखालील मुलांमध्ये एक्झिमा होण्याची शक्यता जास्त असते. परंतु, जनुकीय करण्याव्यतिरिक्त एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जीमुळे जास्त होतो.

बाळाला होणारा एक्झिमा म्हणजे नक्की काय?

बाळाला एक्झिमा कशामुळे होतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे. बऱ्याच बाळांना ही त्वचेची समस्या येते आणि त्यास वैद्यकीय भाषेत 'ऍटॉपिक डरमॅटिटिस' असे म्हणतात. ऍटॉपिक म्हणजे बाळाची एक्झिमा, अस्थमा किंवा हे फिवर होण्याची प्रवृत्ती होय आणि ड्रामॅटीटीस म्हणजे सूज येणे. पहिल्या वर्षात बाळांना ही त्वचेची समस्या होण्याची शक्यता जास्त असते परंतु, नंतरही ती वाढण्याची शक्यता असते. या रोगाचा मूळ घटक म्हणजे त्वचेच्या छिद्रांमध्ये त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्याची क्षमता कमकुवत असते. त्यामुळे त्वचेच्या संसर्ग होण्याची शक्यता असते. हा संसर्ग टाळू, चेहरा, पाय किंवा हाताच्या मागील भागावर लक्षात येण्यासारख्या चट्ट्यांच्या स्वरूपात दिसतो. एक्झामा बरा होऊ शकत नाही परंतु उपचाराद्वारे त्यावर नियंत्रण ठेवता येते.

बेबी एक्झिमाची कारणे

एक्झिमाचे नक्की कारण काय आहे ह्या बाबत संशोधक अजूनही चर्चा करीत आहे. परंतु इथे काही त्यामागची कारणे दिली आहेत.

. जनुकीय कारण

अनुवंशिकता आणि प्रतिकार प्रणाली कमकुवत असणे ही बाळाला एक्झिमा होण्यामागची काही कारणे आहेत. वातावरणातील संसर्ग आणि त्वचेतील पारगम्यता ह्यामुळे त्वचेची जळजळ होते.

. संबंधित रोग

जर कुटुंबामध्ये अस्थमा किंवा हे फिवर चा इतिहास असेल तर हा धोका जास्त असतो. त्यामुळे असे इतर काही रोग जर बाळास असतील तर त्यामुळे एक्झिमा होण्याची शक्यता वाढते.

. ऍलर्जी

हे सर्वज्ञात आहे की एक्झिमा कोरडी त्वचा आणि ऍलर्जी ह्याचे संयोजन आहे. एक्झिमाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे कोरडी त्वचा आणि रॅशेस ही आहेत. त्वचेवरील रॅश प्रामुख्याने तोंड, पाय आणि हातावर आढळते. ह्या सर्व ऍलर्जी ह्या स्तनपानातून पसरतात. ह्यामध्ये आईच्या आहाराच्या सवयी त्यास जबाबदार आहेत. एक्झिमा मध्ये बाळाच्या त्वचेचा दाह होतो आणि त्वचा कोरडी पडून खाज सुटते. काही ऍलर्जीना बाळाची प्रतिकार प्रणाली प्रतिक्रिया देते. ह्या कालावधीत, लक्षणांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

बाळांमध्ये होणाऱ्या एक्झिमाची लक्षणे

सुरुवातीची लक्षणे बाळाच्या वयावर अवलंबून असतात. सुरुवातीची लक्षणे म्हणजे त्वचेवर कोरडे पट्टे तयार होतात आणि त्यामुळे बाळ अस्वस्थ होते. त्वचेचा दाह होतो. त्वचेच्या पुटकुळ्यांमधून स्त्राव येतो आणि सूज येते. कोरडी त्वचा किंवा खूप खाजवल्यामुळे त्वचा जाड होणे ही सुद्धा एक्झिमाची कारणे असू शकतात. जर ह्या भागातून रक्तस्त्राव सुरु झाला तर ह्या रॅशेसची तीव्रता वाढते. चाचण्यांद्वारे हे लक्षात येईल की एक्झिमाचे मूळ कारण अनुवंशिकता आहे की ऍलर्जी. मुले जेव्हा पौगंडावस्थेत पोहोचतात तेव्हा एक्झिमा वाढतो. बाळामध्ये एक्झिमाची काही लक्षणे लगेच ओळखता येतात.
बाळाला एक्झिमा झाला आहे त्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे

. बाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या

बाळाच्या त्वचेवर बारीक पुटकुळ्या दिसू लागतात आणि त्या उग्र व खरबरीत असतात.

. त्वचेतून पिवळा स्त्राव येऊ लागतो

कोरड्या त्वचेखालून पिवळा स्त्राव जमा होतो आणि स्थिती उग्र झाल्यावर हा स्त्राव बाहेर येऊ लागतो.

. त्वचा लाल होऊन खाज सुटते

सतत त्वचा खाजवल्याने त्वचा लालसर होते.

. त्वचेच्या काही भागात पू होणे

रक्ताचा प्रवाह नीट न होऊ शकल्यामुळे त्वचेच्या काही भागात पू होतो आणि त्यामुळे बाळाला वेदना होतात.

. फ्लू सारखी लक्षणे

एक्झिमा मुळे तुमच्या प्रतिकार प्रणालीवर काही प्रमाणात परिणाम होतो आणि बाळाला फ्लू सारखी लक्षणे दिसू लागतात त्यामध्ये खोकला, शिंका आणि शरीराचे वाढलेले तापमान ह्यांचा समावेश होतो. जर ह्यापैकी कुठलीही लक्षणे दिसली तर लागलीच उपचार करा. काही तीव्र प्रकरणांमध्ये डॉक्टरांशी संपर्क साधवा.

बेबी एक्झिमावर उपचार

घरगुती उपचार

वर दिलेल्या उपचारांव्यतिरिक्त बेबी एक्झिमासाठी घरगुती उपचार सुद्धा केले जाऊ शकतात

कायम होणाऱ्या एक्झिमा रॅशवर उपचार

रॅशची तीव्रता किती आहे ह्यावर एक्झिमाची तीव्रता अवलंबून असते. जर रॅशेसची अगदी सुरुवातीची लक्षणे दिसली तर लोशन लावल्यास खाज कमी होते. लोशन लावल्याने रॅश झालेला भाग कोरडा पडत नाही, नाहीतर कोरडी त्वचा खाजवल्यावर घर्षणामुळे रॅश वाढते.

अटॉपिक डरमॅटीटीस आणि ऍलर्जिक अन्नपदार्थ

अन्नपदार्थांच्या प्रतिक्रियांमुळे एक्झिमा होतो ह्याबाबत वेगवेगळी मते आहेत.मते वादविवादास्पद आहेत परंतु संशोधकांनी सहा महिन्यांपर्यंत स्तनपान दिले पाहिजे ह्याचे समर्थन केले पाहिजे, कारण त्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून आलेले आहेत. छोट्या मुलांमध्ये अन्नपदार्थांच्या ऍलर्जीमुळे ही लक्षणे वाढतात आणि पर्यावरणीय धोक्यांमुळे मोठ्या माणसांमध्ये लक्षणे दिसून येतात. अन्नपदार्थांची ऍलर्जी आणि अटॉपिक डरमॅटीटीस एकमेकांशी संबंधित आहेत याबद्दल देखील एकमत आहे. केलेल्या अनेक अभ्यासानुसार असे सिद्ध झाले आहे की मुलांद्वारे खाण्यात आलेल्या विशिष्ट अन्नामुळे सूज येते ज्यामध्ये प्रक्रिया केलेले आणि फास्ट फूडचा समावेश असतो. अल्पवयीन मुलांमध्ये संसर्ग वाढण्यामागे जरी काळानुसार ऍलर्जी वाढण्याची प्रवृत्ती असते तरीसुद्धा खाण्याच्या काही वस्तू जबाबदार असतात. खबरदारी म्हणून ऍलर्जी मूल्यांकन चाचणी करून घेण्याचा सल्ला नेहमीच सल्ला दिला जातो. वैद्यकीय निदान आणि पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स द्वारे अन्नपदार्थ आणि लक्षणे ह्यातील नाते लक्षात येते. अधिक अचूकतेने सांगायचे झाल्यास, एखादा अन्नपदार्थ घेतल्यावर लक्षणे दिसू लागतात आणि त्यावर तुम्ही लक्ष ठेवले पाहिजे. ज्या पदार्थांमुळे ऍलर्जी होते असे पदार्थ परीक्षण आणि त्रुटी ह्या पद्धतीने ओळखले पाहिजेत.

बाळांना होणारा एक्झिमा कसा टाळावा?

बाळाची कोरडी त्वचा आणि सूज ह्यांच्यावर उपचार केले पाहिजेत. आधी सांगितल्याप्रमाणे, जर त्याचे कारण आनुवंशिक असेल तर तुम्ही ते टाळू शकत नाही. बाळाच्या जन्मानंतर एक वर्षाने लक्षणे दिसू लागतात. तंज्ञांच्या मतानुसार जर योग्य उपचार घेतले तर एक्झिमा टाळता येऊ शकतो. तसेच बाळाला ह्या ऍलर्जी कशामुळे होतात ह्याची नोंद ठेवणे तुमच्यासाठी (आणि तुमच्या डॉक्टरांसाठी) फायद्याचे आहे.
एक्झिमा टाळण्यासाठी इथे काही मार्ग आहेत:

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

एक्झिमा विषयी नेहमी विचारले जाणारे काही प्रश्न खालीलप्रमाणे:

. मुलींना एक्झिमा होण्याचा धोका जास्त असतो का?

कॅरोलिन्स्का इन्स्टिटयूट इन स्टोकहोम च्या अभ्यासाद्वारे असे निदर्शनास आले आहे की पौगंडावस्थापूर्व कालावधीतील मुलींना मुलांच्या तुलनेत एक्झिमा होण्याचा जास्त धोका असतो.

. एक्झिमा होण्याचे कारण काय?

एक्झिमा होण्याचे नक्की कारण काय ह्यावर बरीच वेगवेगळी मते आहेत. बऱ्याच लोकांच्या मते हे कारण आनुवंशिक असते तर काहींच्या मते ऍलर्जी आणि वातावरणातील काही घटकांमुळे एक्झिमा होतो.

. एक्झिमा संसर्गजन्य आहे का?

नाही, स्पर्शाद्वारे किंवा इतर माध्यमातून तो पसरत नाही.

. एक्झिमचे रूपांतर संसर्गात झाले तर काय?

रॅश आणि संसर्गजन्य एक्झिमा ह्यातील फरक लक्षात घेणे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा नुकसान पोहोचलेल्या त्वचेला संसर्ग होतो तेव्हा एक्झिमा संसर्गजन्य होतो. तिथे खाजवल्यावर संसर्गाची तीव्रता वाढते. त्यामुळे रॅश आणखी तीव्र होते आणि संसर्ग वाढतो. एक्झिमा झाल्यास त्याकडे ताबडतोब लक्ष दिले पाहिजे. संसर्ग किती प्रमाणात झाला आहे हे बघितले पाहिजे. त्वचारोगतज्ञ संसर्गाची तीव्रता आणि काळ कमी करण्यास मदत करू शकतात. ते तुम्हाला औषधें आणि उपचार देतील त्यामुळे शरीराच्या इतर भागात संसर्ग पसरणार नाही. निरीक्षणाद्वारे असे लक्षात आले आहे की स्टॅफायलोकोकस ऑरिअस हा जिवाणू एक्झिमा होण्यास कारणीभूत असतो. हा जिवाणू जखमेच्या भोवती असतो आणि जेव्हा रुग्ण तो संसर्गजन्य भाग खाजवतो तेव्हा रॅशच्या भागात प्रवेश करतो. अशावेळी स्टिरॉइड्स आणि प्रतिजिवाणू क्रीम्स लिहून दिली जातात. एक्झिमच्या तीव्रतेनुसार काहीवेळा पोटातून घेण्याची स्टिरॉइड्स सुद्धा लिहून दिली जातात.

. स्ट्रोइड्सचा वापर बाळासाठी हानिकारक असतो का?

औषधोपचार निर्धारित मर्यादेत असले पाहिजेत. पॅरासिटामोलने काय बरे करता येते ते प्रतिजैविकांनी बरे केले जाऊ नये आणि जिथे अँटीबायोटिक्स काम करू शकतात तेथे स्टिरॉइड्स कधीही दिले जाऊ नयेत. तथापि, तोंडी स्टिरॉइड उपचारांचा वापर आपल्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार केला जावा. योग्य प्रमाणातील स्टिरॉइड्स दिल्यास ते निरुपद्रवी असतात. कुणीही संदर्भ दिलेली किंवा स्वतःच्या मनाने बाळाला औषधे देऊ नका कारण त्यामुळे बाळाच्या कोमल त्वचेला न भरून येणारे नुकसान होऊ शकते . हे हानिकारक असू शकते कारण आवश्यक असताना स्टिरॉइड इच्छित परिणाम देत नाही. एक्झिमाचे नेमके कारण माहित नसले तरी अशा काही सोप्या पद्धती आहेत ज्याद्वारे ही त्वचेची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते. एक्झिमा शरीराच्या इतर भागात सुद्धा पसरू शकतो त्यामुळे त्यावर लवकर उपचार केल्यास बाळाची अस्वस्थता कमी होईल. आणखी वाचा: बाळांना उष्णतेमुळे उठणारे पुरळ – कारणे, उपचार आणि घरगुती उपाय डायपर रॅश – ओळख, कारणे आणि उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved