Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ आरोग्य बाळाचे पादणे – कारणे आणि उपाय

बाळाचे पादणे – कारणे आणि उपाय

बाळाचे पादणे – कारणे आणि उपाय

शरीराच्या इतर क्रियांप्रमाणेच पादणे ही एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक कृती आहे. त्यामागची कारणे अनेक असू शकतात. बाळ सारखे पादत असेल तर बाळ आजारी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाळाच्या पोटात गॅस झाला असून, बाळ तो बाहेर टाकत आहे एवढाच त्याचा अर्थ होतो. बाळाच्या पादण्यामागची कारणे आपण ह्या लेखामध्ये बघणार आहोत आणि बाळाच्या पोटातील वायू कसा कमी होईल ह्यावरील उपाय सुद्धा जाणून घेणार आहोत.

बाळे का पादतात?

बाळाला गॅस होतो तेव्हा त्याचे पालक खूप घाबरतात. काही वैद्यकीय समस्येमुळे तर बाळ पादत नाही ना ह्याची भीती पालकांना वाटू लागते. परंतु शरीरातील वायू बाहेर पडणे ही चांगली गोष्ट आहे. कारण पोटामध्ये गॅस राहिल्यास बाळाला पोटदुखी किंवा पोटशूळ होऊ शकतो. बाळ पादण्यामागची कारणे खाली दिलेली आहेत.

. एरोफॅगिया

हवा गिळणे किंवा एरोफॅगिया हे पोटात वायू होण्यामागचे एक सामान्य कारण आहे. लहान मुले खाताना, पिताना, हसताना, रडताना जो गॅस आतमध्ये घेतात त्यामुळे पोटात गॅस होतो.

. न पचलेले अन्न

न पचलेल्या अन्नामुळे गॅस जमा होऊ शकतो. स्तनपान करणा या माता जेव्हा त्यांच्या आहाराकडे लक्ष देत नाहीत आणि गॅस होईल असे अन्नपदार्थ खातात तेव्हा बाळांना गॅस होतो.

. हायपरलॅक्टेशन सिंड्रोम

आईच्या पहिल्या दुधात पाण्याचे आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने लहान मुलांच्या पोटात पेटके येतात. शिवाय, वेगाने वाहणारे दूध घेताना बाळ खूप प्रमाणात हवा गिळते आणि त्यामुळे बाळाला गॅस होतो. जेव्हा बाळाला हिंदमिल्क मिळत नाही तेव्हा जास्त पाजले जाते. यामुळे बाळाचे वजन वाढते आणि त्यामुळे गॅस होतो.

. अतिउत्तेजन

जेव्हा संवेदनशील बाळांना मोठा आवाज, दिवे, स्पर्श, अनोळखी व्यक्तींमुळे तणाव होतो, तेव्हा त्याचा परिणाम अतिउत्तेजने मध्ये होतो. त्यामुळे बाळाच्या पोटात वायू होऊन बाळ चिडचिडे होते. त्यांना दिवसा किंवा रात्री झोपायला त्रास होऊ शकतो. काही मुलांच्या मेंदू आणि आतड्यांमध्ये तीव्र कनेक्शन असते त्यामुळे पोट खराब होण्याची अधिक शक्यता असते.

. घन पदार्थांचा परिचय

लहान मुलांना आईच्या दुधाची सवय असते त्यामुळे घनपदार्थांची सुरुवात होताना त्यांना त्रास होऊ शकतो. पचनासाठी आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी जी विविध प्रोबायोटिक्स आणि एंझाइम आवश्यक असतात त्यांना तयार होण्यास वेळ लागू शकतो. अशाप्रकारे जेव्हा लहान मुलांना घन पदार्थांची ओळख करून दिली जाते तेव्हा त्यांच्या पोटात गॅस जमा होतो आणि ते पादतात.

घन पदार्थांचा परिचय

. अति खाणे

जेव्हा मुले जास्त खातात, तेव्हा त्यांच्या शरीराच्या गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्सवर अधिक परिणाम होतो. त्यामुळे त्याच्या पचनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि काहीही खाल्ले तरी बाळाचे पोट बिघडते. न पचलेल्या प्रथिनांचे आणि चरबीचे तसेच अन्नपदार्थांचे विघटन करणाऱ्या एंझाइमचे उत्पादन जास्त खाल्ल्यामुळे कमी प्रमाणात होते. त्यामुळे शरीराची पोषक तत्वांवर प्रक्रिया करण्याची क्रिया थांबते तसेच शरीरातील कचरा काढून टाकण्याची प्रक्रिया सुद्धा मंदावते आणि वायूची निर्मिती होते.

. लॅक्टोज असहिष्णुता

बाळामध्ये लैक्टोज असहिष्णुता असल्यास गॅस होऊ शकतो. बाळाचे शरीर गॅलेक्टोज आणि ग्लूकोज सारख्या साखरेचे विघटन करण्यासाठी पुरेसे लैक्टेस तयार करण्यास असमर्थ होते तेव्हा गॅस तयार होतो. अशाप्रकारे, अखंड दुग्धशर्करा मोठ्या आतड्यात साठून राहते आणि त्याचे वायूमध्ये रूपांतर होते.

. स्तनपान करताना चुकीच्या स्थिती

जेव्हा बाळ योग्यरित्या स्तनाग्रांना लॅच होत नाही, तेव्हा बाळ भरपूर प्रमाणात हवा गिळते. ही हवा आतड्यांमध्ये बुडबुडे तयार करते आणि जास्त वायू होतो. बाळाला या स्थितीतून बाहेर येण्यास मदत करण्यासाठी, आई स्तनपान करताना स्तन बदलू शकते किंवा बाळाला थोडे उभे घेऊ शकते.

बाळाच्या पादण्याचे परिणाम काय आहेत?

बाळाला गॅस होणे ह्यात काहीही असामान्य नाही. बाळाची पचन संस्था अद्यापही पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे बाळाला गॅस होतो. गॅस होणे म्हणजे ते वैद्यकीय समस्येचे लक्षण नाही. तथापि, जर बाळाचे पोट फुगले असेल आणि बाळ सतत रडत असेल तर ते वेदनांमुळे होऊ शकते. जर बाळाला त्यासोबत ताप, अस्वस्थता आणि लघवीच्या समस्या असतील तर हे काही आरोग्याच्या समस्येचे लक्षण असू शकते. या लक्षणांव्यतिरिक्त, जर तुमच्या बाळाला गॅस होण्यासोबत बद्धकोष्ठता असेल, त्याच्या शौचामध्ये रक्त असेल, सतत उलट्या होत असतील आणि १०१ अंश किंवा त्यापेक्षा जास्त ताप किंवा गुदाशय तापमान असेल तर तुम्ही बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा.

तुमच्या बाळाचे पादणे कमी करण्यासाठी काही टिप्स

तुमचे बाळ सारखेच पादत असेल तर त्याला गॅस झाला असण्याची शक्यता आहे. गॅस होण्याचा त्रास सगळ्यांना कधी ना कधी होऊ शकतो. तथापि, काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्ही पाळू शकता जेणेकरून तुमच्या बाळाचा हा त्रास कमी होईल.

. बाळाच्या पोटावर चोळणे

आपल्या बाळाच्या पोटावर उजवीकडून डावीकडे घड्याळाच्या दिशेने हलक्या हाताने मालिश करा. असे केल्याने गॅसचे बुडबुडे खाली सरकतात.

. ढेकर

प्रत्येक वेळेला बाळाला पाजल्यानंतर त्याच्या पाठीवर थोपटून ढेकर काढा. पुन्हा स्तन बदलण्यापूर्वी किंवा बाटलीने दूध पाजताना मध्येच बाळाच्या पाठीवर हळूवारपणे थोपटा असे केल्याने गॅस बाहेर पडण्यास मदत होते.

. पेडलिंग

सायकल चालवताना पायाच्या जश्या हालचाली होतात, तशाच पद्धतीच्या बाळाच्या पायाच्या हालचाली केल्यास वायू निघून जाण्यास मदत होते. प्रथम, आपल्या बाळाला एका मजबूत पृष्ठभागावर ठेवा. मग बाळाचे पाय धरा आणि हळू हळू त्यांना पेडलिंग मोशनमध्ये पुढे आणि मागे करा. मग आपल्या बाळाचे पाय त्याच्या छातीकडे वाकवा. दिवसभरात आणखी काही वेळा ही कृती करा, बाळाला पाजल्यानंतर ही कृती कधीही करू नका.

. फ्रॉग किक

आपल्या बाळाला जमिनीवर ठेवा. मग त्याच्या पायाचा खालचा भाग धरून, हलकेच घड्याळाच्या दिशेने हलवा, छातीपासून उजव्या कुल्याकडे, मग गुडघे, नंतर डाव्या कुल्याकडे आणि परत छातीकडे हलवा. हालचाल सौम्य आहे याची खात्री करा आणि बाळाचे पाय ओढू नका. मग हळू हळू पाय सरळ करा आणि बाळाचा कुल्ल्यांकडील भाग जमिनीपासून सुमारे एक इंच वर घ्या. शेवटी, त्याचे गुडघे वाकवून आणि त्याच्या छातीकडे आणा आणि ही क्रिया समाप्त करा.

. इतर व्यायाम

जर पेडलिंगआणि फ्रॉग किकमदत करत नसेल, तर तुम्ही खाली दिलेले आणखी काही व्यायाम करून पाहू शकता

  • पायाचे बोट ते नाक स्ट्रेच

आपल्या बाळाच्या घोट्यांना धरून त्याचे पाय सरळ करा. मग, हळूवारपणे त्याच्या पायाच्या बोटानी नाकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ह्या स्ट्रेचमुळे बाळाच्या पोटावर ताण पडतो आणि साचलेल्या वायू निघून जाण्यास मदत होते.

  • पायाचे बोट ते खांदा

जर तुम्ही तुमच्या बाळाच्या पायाच्या बोटानी नाकाला स्पर्श करू शकत नसाल तर तुम्ही त्याऐवजी पुढील तंत्र वापरून पाहू शकता. गुडघे धरून बाळाचे पाय हळूवारपणे ताणून घ्या. मग त्यांना वर नेऊन बाळाच्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. बाळाच्या डाव्या पायाच्या बोटानी जव्या बाजूच्या खांद्याला आणि उजव्या पायाच्या बोटानी डाव्या खांद्याला स्पर्श करून क्रिसक्रॉस स्ट्रेचिंग सुद्धा तुम्ही करून पाहू शकता.

  • पायाचे बोट ते कुल्ले

या व्यायामासाठी देखील, बाळाचे पाय हळूवारपणे ताणून घ्या. मग हळू हळू दोन्ही पायांना कुल्ल्याच्या एका बाजूला आणा आणि नंतर त्यांना दुसऱ्या बाजूला घ्या.

  • बाळाचे कपडे

जेव्हा बाळ त्याच्या पाठीवर झोपते तेव्हा गॅसमुळे बाळाला वेदना अधिक तीव्र होतात. ते टाळण्यासाठी, बेबी रॅप्स वापरून पहा. ह्या रॅप मध्ये गुंडाळल्यानंतर बाळ सरळ राहते आणि गॅस खाली सरकून बाहेर पडतो.

बाळाचे कपडे

  • पोटावर झोपवा (टमी टाईम)

बाळाला पोटावर झोपवल्याने बाळाच्या शरीराचा वरचा भाग बळकट होतो आणि पोटातील गॅस बाहेर पडण्यास मदत होते. आपल्या बाळाला दररोज किमान २० मिनिटे त्याच्या पोटावर झोपवण्याची गरज आहे. जर तुम्ही त्याला जमिनीवर ठेवत असाल तर तुम्ही मऊ चटई वापरू शकता किंवा त्याऐवजी त्याला बेड वर ठेऊ शकता. कोणत्याही परिस्थितीत, बाळाला एकटे सोडू नका आणि २० मिनिटांनी त्याला पुन्हा त्याच्या पाठीवर झोपवा. हा व्यायाम तुम्ही बाळाकडून दिवसभरात आणखी दोन वेळा करून घेऊ शकता

पोटावर झोपवा (टमी टाईम)

  • रॉकिंग आणि बाऊंसिंग

रॉकिंग आणि बाऊंसिंगमुळे तुमच्या बाळाच्या पोटातील गॅस काढून टाकण्यास मदत होऊ शकते. ज्या बाळांना मानेला आधार देण्याची गरज नाही आणि ज्यांनी आधीच उसळी मारणे सुरु केले आहे अशा बाळांकडून हा व्यायाम करून घेतला जाऊ शकतो. आपल्या बाळाला पलंगावर किंवा मऊ पृष्ठभागावर बाउंस करून पुन्हा हळुवारपणे घ्या. जर बाळ हा व्यायाम करू शकत नसेल, तर तुम्ही त्याला आपल्या हातात धरून त्याला झुलवू शकता. बाळाला झुलवण्यासाठी रॉकिंग चेअर देखील वापरू शकता. तुम्ही खुर्चीवर बसतांना, बाळाला आपल्या छातीजवळ, उभ्या स्थितीत धरून ठेवा आणि हळूवारपणे पुढे आणि मागे हलवा. तुमच्या बाळाच्या पोटात जमा होणारा गॅस दूर करण्यासाठी तुम्ही त्याच्या पाठीवर चोळू शकता किंवा थोपटू शकता.

  • प्रोबायोटिक्स

घनपदार्थ घेणाऱ्या थोड्या मोठ्या बाळांना तुम्ही प्रोबायोटिक्स देण्याचा विचार करू शकता. जर तुम्ही ओव्हरकाउंटर प्रोबायोटिक्स घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही बाळाला थोडे दही देऊ शकता. प्रोबायोटिक्स गॅसपासून मुक्त करते आणि बाळाच्या पचन संस्थेमध्ये चांगले जिवाणू राखण्यास मदत करून पोटशूळ बरे करू शकते.

काही घरगुती उपचारांमुळे लहान मुलांच्या पोटात गॅस होण्याच्या समस्येवर उपचार करण्यास मदत होऊ शकते. आपण वर दिलेल्या व्यायामासोबत हे उपचार करू शकता. चला तर मग एक नजर टाकूया.

लहान मुलांमध्ये होणाऱ्या गॅसवर उपचार करण्यासाठी घरगुती उपचार

तुम्ही तुमच्या बाळाची गॅस पासून मुक्तता होण्यासाठी यापैकी काही घरगुती उपाय देखील वापरू शकता

. पोटावर हिंग चोळणे

बाळाच्या पोटावर हिंगाने मालिश करणे याबद्दल आपल्याला आधीच माहिती आहे. परंतु बाळाच्या पोटावर मालिश करण्यासाठी तुम्ही एक चमचा हिंग कोमट पाण्यात मिसळून वापरू शकता. ही पेस्ट बाळाच्या पोटाच्या बेंबीवर सुद्धा लावता येते. फक्त काही मिनिटांसाठी ते तसेच राहूद्या आणि नंतर कापडाने पुसून टाका.

. कोमट पाणी पाजा

जर तुमचे बाळ पाणी पिण्याइतके मोठे असेल, तर तुम्ही त्याला प्रत्येक जेवणानंतर थोडे कोमट पाणी देऊ शकता. कोमट पाण्यामुळे पोट, आतडे शांत होते आणि पचन सोपे करते.

. कोमट पाण्याने अंघोळ

कोमट पाण्याने अंघोळ घातल्यास बाळाच्या पोटाला आराम पडण्यास मदत होते. आपल्या बाळाच्या बाथटबमध्ये थोडे गरम पाणी घ्या आणि त्याच्या शरीराचा खालचा भाग त्यामध्ये बुडवा. हा उपाय मुलांमधील बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यास मदत करू शकतो आणि पोटात गॅस जमा झाल्यामुळे होणारी अस्वस्थता दूर करू शकतो.

कोमट पाण्याने अंघोळ

ह्या सगळ्या उपायांनी तुम्ही बाळाला पोटात गॅस झाल्यामुळे येणारी अस्वस्थता कमी करू शकता. प्रत्येक बाळ वेगळे आहे हे पालक म्हणून तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एका बाळाला लागू झालेला एखादा उपाय दुसऱ्या बाळाला उपयोगी होईलच असे नाही. वर दिलेले व्यायाम जेवणानंतर काही तासांनी करणे चांगले. सर्व हालचाली सौम्यपणे करा आणि बाळाचे व्यायाम करून घेताना आनंद घ्या. तुमच्या बाळाशी बंध घट्ट होण्याचा हा आणखी एक मार्ग आहे.

आणखी वाचा:

बाळांना होणाऱ्या बद्धकोष्ठतेवर १२ घरगुती उपाय
बाळाचे शौच: काय सामान्य आहे आणि काय नाही

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article