दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

४३ आठवड्यांचे बाळ – विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ आता ४३ आठवड्यांचे झाले आहे. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाळाला व्यस्त ठेवतात. सर्वात आधी, आपण स्वतः काय करू शकतो आणि आपले पालक आपल्याला काय करू देणार आहेत हे शिकण्याचा बाळ प्रयत्न करते. बाळाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या अन्नाच्या वेगवेगळ्या चवी बाळ ओळखण्याचा प्रयत्न करत आहे. बाळ बोलून आणि न बोलता संवाद साधण्याचे वेगवेगळे मार्ग शिकत आहे. तुमचे बाळ संवेदी विकासाच्या टप्प्यात आहे आणि बाळाचा मेंदू त्यावर प्रक्रिया करून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.

४३ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या वयात, तुमच्या लक्षात येईल की तुमचे बाळ तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे अनुकरण करते. तुम्ही त्याला खाऊ घालत असताना तो चमच्याने तुम्हाला काहीतरी खायला देण्याचा प्रयत्न करू लागतो किंवा तुम्ही ईमेल लिहिताना संगणकाचा की बोर्ड बाळ वाजवू लागते किंवा तुम्ही बाळाला अंघोळ घालत असताना बाळ तुम्हाला साबण लावण्याचा प्रयत्न करू शकते. लहान मुले तुम्हाला पाहून बरेच काही शिकतात परंतु त्यांना ओरडू नका. तुमच्याकडून नकारात्मक वर्तन दाखवले जाणार नाही ह्याची काळजी घ्या कारण ते देखील त्याचे अनुकरण करतात. तुमचे बाळ आता आपलेपणाची भावना समजून घेण्यास सक्षम असेल. बाळ आता त्याची खेळणी उचलण्यास सुरुवात करेल. हे सर्व असताना तुम्ही बाळाला त्याच्या शरीराच्या अवयवांची नावे सांगत असाल तर ह्या टप्प्यावर, बाळ त्याचे डोळे, नाक, कान आणि इतर अवयव बरोबर दाखवेल. ४३ आठवड्यांची काही बाळे हा टप्पा गाठण्याआधीच आधीच चालू शकतात आणि कदाचित उश्या लावलेल्या असल्यास किंवा पायाने अडवण्याचा प्रयत्न केल्यास बाळ त्याला ओलांडून रांगू लागेल. त्यामुळे सुरक्षिततेसाठी तुमचे घर बेबी प्रूफ असल्याची खात्री करा.

आणखी वाचा: तुमच्या १० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

४३ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

ह्या टप्प्यावर तुम्ही तुमच्या ४३ -आठवड्याच्या बाळाचे टप्पे खालीलप्रमाणे असल्याची अपेक्षा करू शकता:

आणखी वाचा: १० महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

आहार देणे

ह्या वयापर्यंत तुमच्या बाळाने घनपदार्थ खाण्यास सुरुवात केलेली आहे आणि तुमचे बाळ कपमधून पाणी पित असेल. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर तुम्ही थोड्या कालावधीसाठी बाहेर असताना तुमच्या बाळासाठी प्रत्येक वेळी दूध पंप करण्याची गरज नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बाळापासून दूर असाल तर दिवसभरात त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पुरेसे आईचे दूध पंप करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. जर तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी केअर टेकर ठेवलेल्या असतील, तर काळजी करू नका कारण त्या तुमच्या बाळाला शांत करू शकतील. तुम्ही दूर असतानाही दर ३-४ तासांनी आईचे दूध पंप करत राहणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे तुमचे स्तन भरलेले राहणार नाहीत आणि तुम्हाला वेदना होणार नाहीत. त्यानंतर जेव्हा तुम्ही दूर असला तेव्हा बाळाला देण्यासाठी हे दूध तुमच्या बाळाची काळजी घेण्याऱ्या व्यक्तीकडे देऊ शकता. तुमच्या बाळाच्या गरजेनुसार दुधाचे प्रमाण मोजा. दररोज सुमारे ७० -८० मिली दूध लागेल असे लक्षात घ्या. तुम्ही दूर असताना जर बाळाची काळजी घेणारी व्यक्ती बाळाला झोपवताना थोपटत असेल, थोडे झुलवत असेल तर हे दूध बाळाला जेवणासोबत कप मधून देण्यास सांगा.

आणखी वाचा: १० महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

तुमचे बाळ ४३ आठवड्यांचे झालेले असताना ह्या वयात त्याचे शरीर मानसिक, विकासात्मक आणि शारीरिकदृष्ट्या प्रक्रिया करत असल्याने, बाळ रात्रीचे नीट झोपण्याची शक्यता कमी होईल. बाळाची झोप खूप विस्कळीत होईल आणि पालक या नात्याने तुम्हाला तुमच्या बाळाला पुन्हा झोपवणे कठीण जाईल. ह्या काळात, तुम्ही बाळासोबत झोपण्याचा प्रयत्न करू शकता - म्हणजे तुमच्या बाळाला तुमच्या सोबतच पलंगावर घेऊन झोपा जेणेकरून बाळ मध्येच उठल्यास बाळाला पुन्हा झोपवण्यासाठी तुम्ही बाळाजवळच असाल. रात्री पालकत्व निभावण्यासाठी हा एक मार्ग आहे परंतु आपल्या बाळाच्या सुरक्षित झोपेसाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुद्धा करा.

४३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

तुमच्या ४३ आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ १० महिन्यांचे झाल्यावर डॉक्टर त्याची कोणतीही तपासणी करणार नाहीत.

. चाचण्या

तुमच्या बाळामध्ये अशक्तपणाची लक्षणे दिसल्यास बाळाचे हिमोग्लोबिन, लोह आणि शिशाची पातळी तपासण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणीचा सल्ला देतील.

. लसीकरण

तुमच्या बाळाला ह्या वयात आयपीव्ही (पोलिओ) लसीचा तिसरा डोस आणि हिपॅटायटीस बी लसीचा अंतिम डोस (दोन्ही ६ ते १८ महिन्यांच्या दरम्यान घ्यायचा) ची गरज भासू शकते. तुमच्या डॉक्टरांच्या शिफारशीनुसार, तुमच्या बाळाला इन्फ्लूएंझा लसीची देखील आवश्यकता असू शकते.

खेळ आणि उपक्रम

येथे काही खेळ आहेत जे तुम्ही तुमच्या ४३-आठवड्याच्या बाळासोबत खेळू शकता:

. पॅटी केक

तुम्ही तुमच्या बाळाला शब्द आणि हावभावांसह पॅटी केक खेळायला शिकवू शकता जेणेकरून बाळ त्याच्या हाताच्या हालचालीचा सराव करू शकेल.

. तुमचे खांदे पकडण्यास सांगा

तुमच्या बाळाला कपडे घालताना तुम्ही हा खेळ खेळू शकता. बाळाला कपडे घालताना, डोक्यातून घातलेला ड्रेस खाली खेचताना बाळाला तुमचे खांदे पकडण्यास तुम्ही सांगू शकता.

. लपवा आणि शोधा

तुम्ही घरात तुमच्या बाळासोबत लपाछपी खेळू शकता. बाळ कधीही जास्त वेळ लपून राहणार नाही ह्याची खात्री करा. ह्यासाठी घर बेबी प्रूफ करा.

. शर्यत

तुम्ही तुमच्या बाळासोबत शर्यत लावू शकता. खोलीमध्ये सर्वात पुढे आणि मागे जो वेगाने रांगत जाईल तो शर्यत जिंकेल. ह्यामुळे बाळाला अंतर आणि गतीची संकल्पना समजण्यास मदत होईल.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ४३ -आठवड्याच्या बाळाच्या विकासादरम्यान तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा लागेल ते खाली दिलेले आहे -

४३ आठवड्यात, बाळे खेळकर असतात आणि त्यांना नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. परंतु बाळाला भांड्यांचा आवाज किंवा व्हॅक्यूम क्लिनरसारख्या अनेक गोष्टींबद्दल भीती वाटू शकते. ह्याचे कारण म्हणजे जसजशी बाळांची वाढ होते तसतसे ते आपल्या जगातील धोकादायक गोष्टींबद्दल अधिकाधिक जागरूक होतात. तुमच्या बाळाला ह्या भीतीवर मात करण्यास मदत करण्यासाठी, बाळ जेव्हा जागे असते तेव्हा अशा क्रिया करून तुम्ही बाळाला आवाजाची सवय लावू शकता. किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुमच्या बाळासाठी खेळण्यातला व्हॅक्यूम क्लिनर विकत घेऊन द्या आणि बाळाला तुमच्यासोबत घर स्वच्छ करायला सांगा. तुमचे लहान मूल तुमच्यासोबत तुमच्या कृतीची नक्कल करताना पाहणे खूप गोंडस असेल. ह्यामुळे बाळाची भीती दूर होईल तसेच मोटार कौशल्य विकसित होईल आणि बाळाची हालचाल वाढेल.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved