अन्न आणि पोषण

बाळाच्या दुधाच्या बाटलीत राईस सिरिअल घालून देणे योग्य आहे का?

तुम्ही पहिल्यांदाच बाळाचे आई बाबा झालेले असाल तर, बाळाच्या जन्मानंतर काही महिने किंवा बाळाच्या झोपेच्या योग्य वेळा ठरेपर्यंत तुम्हाला झोपेचा त्रास होऊ शकतो. परंतु, तुमच्या बाळाला रात्री चांगली झोप येण्यासाठी लोक तुम्हाला विविध मार्ग सुचवतील आणि त्यातील एक उपाय म्हणजे तुमच्या बाळाच्या फॉर्म्युला दुधात राईस सीरिअल घालून देणे हा असू शकतो. तर हे खरे आहे का? तुमच्या बाळाच्या बाटलीत फॉर्म्युला दुधामध्ये राईस सीरिअल घालणे हा सुरक्षित पर्याय आहे का? तसे केल्यास काय होते हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे आणि त्याबद्दलची सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

तुम्ही तुमच्या बाळाच्या बाटलीत राईस सीरिअल घालू शकता का?

तुम्ही तुमच्या बाळाच्या बाटलीत दुधातून राईस सीरिअल घालून बाळाला देऊ शकता का असा प्रश्न तुम्हाला पडेल. उत्तर इतके सोपे नाही कारण, काहीवेळा, डॉक्टर वेगवेगळ्या कारणांमुळे बाळाच्या बाटलीत राईस सीरिअल घालण्याची शिफारस करू शकतात आणि काहीजण तसे करण्याची शिफारस करत नाहीत. अनेक लोक जरी हा उपाय लागू होतो असे ठामपणे सांगत असले तरी सुद्धा त्याबाबतचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. बाळांमध्ये भूक आणि झोपेचा फारच कमी संबंध आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे. ह्याचे कारण म्हणजे बाळाला कितीही भरपूर पाजले तरीसुद्धा रात्री उठून तो दूध पिऊ शकतो किंवा आई बाबा सोबत आहेत ना हे चाचपडून बघतो. कारण काहीही असो, लहान मुलांची मज्जासंस्था अपरिपक्व असते. त्यामुळे लहान बाळांना सलग पाच किंवा अधिक तास झोपणे ही संकल्पना समजत नाही. म्हणून, दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, बाळांची मज्जासंस्था पूर्णतः परिपक्व होईपर्यंत, बाळाला कितीही चांगले पोषण दिले असले तरीही बाळ जास्त वेळ झोपेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे.

राईस सीरिअल लहान बाळांना कधी द्यावे?

तुमचे बाळ सहा महिने किंवा त्याहून मोठे होईपर्यंत बहुतेक डॉक्टर तुमच्या बाळाच्या आहारात राईस सिरियलची शिफारस करत नाहीत. तसेच, जोपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत बाटलीमध्ये राईस सीरिअल घालून बाळाला देऊ नये.

. तुमचे बाळ राईस सीरिअल खाण्यास कधी सुरुवात करू शकते?

कदाचित तुम्ही खात असलेले अन्न तुम्हाला बाळाला चाटवण्याचा किंवा अन्नाचा एखादा तुकडा देण्याचा मोह होऊ शकतो. असे करत असताना बाळाला त्याने फार काही नुकसान होणार नाही असे तुम्हाला वाटू शकते. परंतु, वस्तुस्थिती अशी आहे की, जर तुमचे बाळ सहा महिन्यांचे होण्याआधीच त्याला कोणतेही घनपदार्थ दिले तर त्यामुळे बाळाला खूप हानी पोहोचू शकते. ह्याचे कारण म्हणजे लहान मुलांची पचनसंस्था अपरिपक्व असते आणि त्यांना घन आहार दिल्याने विविध प्रकारच्या ऍलर्जी आणि इतर आरोग्यविषयक आजार होऊ शकतात. अशा प्रकारे, तुम्ही वयाच्या सहा महिन्यांनंतरच बाळाला घन आहार देऊ शकता.

. बाळाला राईस सीरिअलची ओळख कशी करून द्याल?

तुम्ही तुमच्या बाळाला फॉर्म्युला दुधात किंवा आईच्या दुधात राईस सीरिअल घालून देऊ शकता. बाळ सहा महिन्यांचे झाल्यावर त्याला तुम्ही घनपदार्थांची ओळख करून देऊ शकता. सुरुवातीला बाळाला एक चमचा राईस सीरिअल देऊन तुम्ही हळूहळू सुरुवात करू शकता आणि नंतर तुमच्या बाळाला तुम्ही घन पदार्थांची ओळख करून द्यावी. परंतु, तुमच्या बाळाला राईस सीरिअल देण्यासाठी बाटलीचा वापर टाळा. त्याऐवजी तुम्ही तुमच्या बाळाला चमच्याने राईस सीरिअल भरवा.

. खबरदारी

" मी बाटलीतून बाळाला राईस सीरिअल देऊ शकते का?" असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर तुमचे डॉक्टर सांगत नाहीत तोपर्यंत राईस सीरिअल बाळाला बाटलीतून देऊ नका. तसेच, जेव्हा तुम्ही तुमच्या बाळाला कोणत्याही प्रकारचे घन पदार्थ देता तेव्हा ते सावकाश द्या. म्हणजे एकावेळी एकच अन्नधान्य द्या. अतिसार, उलट्या किंवा खोकल्याची कोणतीही चिन्हे नाहीत ना हे पहा, कारण ही ऍलर्जीची संभाव्य चिन्हे असू शकतात.

तुमच्या बाळाला बाटलीने राईस सीरिअल दिल्यास निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्या

तुमच्या बाळाच्या आहारात राईस सीरिअलचा समावेश केल्याने उद्भवू शकणारे काही आरोग्यविषयक धोके इथे दिलेले आहेत

आरोग्याला निर्माण होणारा धोका वर्णन
१. ऍलर्जीक प्रतिक्रिया
बहुतेक लहान बाळांच्या सीरिअल्स मध्ये मोठ्या प्रमाणात ग्लूटेन असते, त्यामुळे ते सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळाच्या आहारात समाविष्ट केल्यास एलर्जीची प्रतिक्रिया येऊ शकते.
२. लठ्ठपणा
राईस सीरियलमध्ये स्टार्च आणि कॅलरीज जास्त असतात आणि तुमच्या बाळाच्या आहारात याचा समावेश केल्यास लठ्ठपणाची शक्यता वाढू शकते.
३. गुदमरणे
राईस सीरिअल दुधाच्या तुलनेत घट्ट असते आणि अशा प्रकारे, राईस सीरिअल बाटलीमध्ये भरल्यास बाळांना गुदमरण्याचा धोका जास्त असतो. तसेच, जेव्हा तुम्ही बाळांना बाटलीतून दूध आणि अर्ध-घन पदार्थ देता तेव्हा बाळांचा गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे नंतरच्या टप्प्यात घन पदार्थांचा परिचय करून देणे अधिक मोठे काम होऊ शकते.
४. पचन समस्या
सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बाळांची पचनसंस्था राईस सीरिअल पचवण्याइतकी मजबूत नसते. आणि म्हणूनच जर त्याआधी तुम्ही तुमच्या बाळाला राईस सीरिअल दिले तर तुमच्या बाळाला पुढील आयुष्यात पचनाच्या समस्या होण्याचा धोका वाढतो.

राईस सीरिअल मुळे तुमच्या बाळाला जास्त वेळ झोप लागण्यास मदत होते का?

बाळाला राईस सीरिअल खायला घालणे आणि बाळांना जास्त वेळ झोप लागणे ह्याचा काही संबंध नाही असे अनेक अभ्यासाद्वारे निदर्शनास आलेले आहे.

तुमच्या बाळाला बाटलीतून राईस सीरिअल दिल्याने फक्त बाळ तृप्त होऊ शकते आणि ते नेहमीपेक्षा अर्धा तास जास्त झोपू शकते, परंतु निश्चितपणे खूप जास्त कालावधीसाठी असे होत नाही.

राईस सीरिअलसाठी पर्याय

बाळासाठी आणि पालकांसाठी झोप खूप महत्त्वाची असते हे नाकारता येणार नाही. राईस सीरिअल ऐवजी बाळाला काय देता येईल जेणेकरून तुमच्या बाळाला चांगली झोप लागू शकते ते खाली दिलेले आहे.

. झोपेची दिनचर्या

जरी सुरुवातीला हे जरा अवघड वाटत असले तरीसुद्धा झोपेचे वेळापत्रक किंवा दिनचर्या तयार केल्याने मदत होते. तुम्ही तुमच्या बाळाला रोज रात्री झोपवण्याची एकाच वेळ ठेऊ शकता. तसेच, तुम्ही तुमच्या बाळाला लवकर झोपायला लावा आणि जेव्हाही तुमचे बाळ झोपेल तेव्हा झोपण्याचा प्रयत्न करा.

. कोमट पाण्याचे स्नान

झोपण्यापूर्वी बाळाला कोमट पाण्याने आंघोळ घालण्याचा प्रयत्न करा. कोमट पाण्याने आंघोळ घालणे हा बाळाला आरामदायक ठेवण्याचा आणि शांत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. म्हणजेच बाळाला चांगली आणि अधिक तासांची अखंड झोप झोप लागते.

. खोलीत अंधार ठेवा

बहुतेक लोकांना असे वाटते की त्यांच्या बाळाला संपूर्ण अंधारात झोपताना भीती वाटेल आणि त्यामुळे दिवसा पडदे उघडे ठेवणे किंवा अंधारात दिवा लावला जाईल. तथापि, अनेक वेळा उजेडामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. जर तुमच्या बाळाला अंधाराची भीती वाटत असेल तर तुम्ही रात्रीचा दिवा लावण्याचा पर्याय निवडू शकता, जेणेकरून बाळाला शांत झोप लागेल, परंतु तरीही तो जागा झाल्यास तो आजूबाजूचा ओळखीचा परिसर पाहू शकतो. त्यामुळे त्याला स्वत: ला शांत करण्यास आणि परत झोप लागण्यास मदत होईल.

. बाळाला आरामदायी ठेवा

अत्यंत गरम किंवा थंड खोलीमुळे तुमच्या बाळाला मध्यरात्री जाग येऊ शकते किंवा झोपेचा त्रास होऊ शकतो. तुमच्या बाळाला पातळ ब्लँकेटने झाकण्यासाठी खोली पुरेशी थंड असल्याची खात्री करा. तुम्ही पंखा देखील चालू ठेवू शकता, त्यामुळे मंद वाऱ्याची झुळूक येईल आणि बाळाला झोप लागण्यास मदत होईल. तसेच, झोपण्याआधी तुमच्या बाळाचा डायपर बदला. ओलेपणामुळे बाळाला आराम वाटणार नाही. तुमच्या बाळाला मऊ, श्वास घेण्यायोग्य, सुती कपडे घाला. झोपेच्या वेळी तुमच्या लहान बाळाला आरामदायी वाटणे हे चांगल्या झोपेसाठी अनुकूल आहे.

जेव्हा तुम्हाला अखंड झोप मिळण्यासाठी कुठलाही उपाय सुचवला जातो, तेव्हा तुम्हाला तो करून पाहण्याचा मोह वाटू शकतो. परंतु, जेव्हा बाटलीतून बाळाला राईस सीरिअल देण्याचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय बाळाला काहीही देऊ नका.

आणखी वाचा:

बाळाला बाटलीने दूध कसे पाजावे? बाळाच्या बाटल्या निर्जंतुक कशा कराव्यात: पद्धती आणि सुरक्षिततेच्या काही टिप्स

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved