टॉडलर (१-३ वर्षे)

१४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे बाळ लहान असताना काळ भराभर पुढे सरकत असतो. बाळाची वेगाने आता वाढ होते आहे. बाळाला आता सतत सक्रिय राहायचे आहे मग ते रांगणे असो व चालणे असो, वेगवेगळ्या मार्गाने बाळ सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असते. बाळासाठी हे जग खूप मोठे आहे आणि त्याच्यासाठी नवीन शिकण्यासारख्या खूप गोष्टी ह्या जगामध्ये आहेत. बाळाला नवीन गोष्टी एक्सप्लोर करायच्या आहेत आणि बाळाला त्याची विकसित झालेली नवीन मोटार कौशल्ये सुद्धा आत्मसात करायची आहेत.

बाळ आता हात हलवून "बाय-बाय" म्हणायला शिकले आहे. "मामा" आणि "दादा" मधील फरक सुद्धा त्याला समजू लागला आहे. तरीसुद्धा , बाळाला आणखी खूप गोष्टी समजून घ्यायच्या आहेत.

व्हिडिओ: १४ महिन्यांचे बाळ - वाढ, विकास, क्रियाकलाप आणि काळजीविषयक टिप्स

https://youtu.be/kctcIVMLYUg

१४ महिन्याच्या लहान बाळाचा विकास

तुमचे बाळ जेव्हा दररोज चालत असते तेव्हा बाळाचा आत्मविश्वास वाढतो. बाळ अधिक सहजतेने चालण्यास सुरुवात करते आणि स्वतःचे स्वतः उठून उभे राहते. ह्या चिमुकल्यांना वस्तू हाताळण्याची प्रचंड आवड असते. तुम्हाला कदाचित बाळाची सततची हालचाल दिसत असेल. बाळ आता अथकपणे गोष्टी एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवत असेल.

१४ महिन्यांच्या वयापर्यंत तुमच्या बाळाचा विकास होत आहे. बाळाची बरीच शारीरिक वाढ होत आहे आणि तसेच बाळाची मोटर कौशल्ये विकसित होत आहेत, आणि त्यामुळे बाळ सतत नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त होत असते. ह्या वयात, खूप सामाजिक, भावनिक, मानसिक आणि संप्रेषणात्मक विकास देखील होत असतो.

येथे १४ महिन्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे आहेत. तुमच्या बाळाने साधारणपणे ह्या टप्प्यांपर्यंत पोहोचले पाहिजे.

. शारीरिक विकास

. सामाजिक आणि भावनिक विकास

. संज्ञानात्मक आणि भाषा विकास

वागणूक

ह्या वयात तुमच्या बाळाच्या तोंडात "नाही" हा शब्द खूप असतो आणि तो ऐकण्यासाठी तयार व्हा. आपल्या इच्छा खूप कमी शब्दात आणि हावभावांद्वारे व्यक्त करणे बाळासाठी निराशाजनक असू शकते. आणि त्यामुळे लहान मुले संवादाचा मार्ग म्हणून नकारात्मक वर्तन वापरतात. त्यांना त्यांच्या नवीन स्वातंत्र्याची चाचणी घेणे आवडते आणि तुम्ही तुमच्या बाळासाठी काही मर्यादा निश्चित करण्याचा विचार करू शकता. तुम्ही आणि तुमचे पती दोघांचे सुद्धा ह्यावर एकमत असणे गरजेचे आहे.

तुमचे बाळ अचानक खूप हट्टी होऊ शकते आणि त्याला हव्या असणाऱ्या गोष्टींची मागणी करू शकते. त्याला स्वतःचे स्वतः शूज घालणे किंवा आपला ज्यूस ओतून घेणे अश्या गोष्टी करायच्या असतात . जरी अद्याप ह्या गोष्टी करण्यास बाळ सक्षम नसले तरीसुद्धा बाळाला ह्या गोष्टी करून बघायच्या असतात. काहीवेळा तुम्हाला तुमचे बाळ खूप उर्मट झाल्यासारखे वाटू शकेल परंतु लक्षात ठेवा कि बाळ फक्त भोवतालच्या जगाबद्दल अधिक जाणून घेत आहे आणि संवाद कसा साधायचा हे शिकत आहे आणि त्यासाठी बाळ हे सर्व करत आहे.

या वयातील मुले खरोखरच इतरांच्या भावना समजून घेण्यास सक्षम नाहीत. जर तुमच्या मुलाने खेळताना त्याच्या मित्राला मारले आणि प्रतिसादात त्याचा मित्र ओरडून रडू लागला, तर तुमचे मूल थांबून फक्त प्रतिक्रिया पाहू शकते, परंतु त्याला वेदना होत आहेत हे त्याला समजत नाही. अशा वेळेला, तुम्ही तुमच्या मुलाला जवळ घेऊन मारल्याने वेदना होतात हे ठामपणे सांगितले पाहिजे आणि जर तरीही बाळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नसेल, तर बाळाला तिथून बाहेर काढा. लहान मुलेही अनेकदा निराश होऊन वागतात.

अन्न आणि पोषण

ह्या वयात, तुमचे बाळ तुलनेने कमी खाईल. त्याची वाढ मंदावली आहे, आणि म्हणूनच बाळ असताना जितकी भूक लागायची तितकी त्याला आता लागत नाही. यामुळे काहीवेळा बाळाला सर्व योग्य पोषक द्रव्ये मिळत असल्याची खात्री करणे खरोखर कठीण होऊ शकते. तुमच्या बाळाला योग्य मार्गाने वाढण्यासाठी आणि विकसित होण्यासाठी आवश्यक ते सर्व तुम्ही देत आहात ह्याची खात्री करण्यासाठी येथे १४ महिन्यांच्या बाळाच्या आहाराचा तक्ता दिलेला आहे त्याचा तुम्ही संदर्भासाठी वापर करू शकता.

1. दुग्धजन्य पदार्थ:

या वयात तुमच्या मुलाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ सर्वात महत्वाचे आहेत कारण ते कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे समृद्ध स्त्रोत आहेत. हे दुग्धजन्य पदार्थ तुमच्या बाळाच्या हाडे आणि दातांच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

2. मांस आणि बीन्स:

१४-महिन्याच्या मुलांना खेळण्यासाठी आणि एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते आणि त्यामुळे प्रथिनेयुक्त आहार घेणे महत्वाचे आहे. मांस आणि बीन्स हे प्रोटीनचे दोन निरोगी स्रोत आहेत. अंडी देखील प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे आणि स्क्रॅम्बल्ड अंड्यांसारखी एक साधी डिश सुद्धा तुमच्या बाळासाठी एक मजेदार जेवण असू शकते.

3. धान्य:

तुमच्या बाळाला शुद्ध धान्याऐवजी संपूर्ण धान्य खायला देणे अधिक श्रेयस्कर आहे कारण त्यामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात तसेच साखरेचे प्रमाण कमी असते.

4. फळे आणि भाज्या:

दिवसातून एक कप फळे आणि एक कप भाज्या खाल्ल्यास ते डॉक्टरांना दूर ठेवतात कारण त्याद्वारे तुमच्या बाळाला सर्व पौष्टिक पदार्थ मिळतात. हे पदार्थ तुमच्या बाळाला विकसित होण्यासाठी त्याला आवश्यक असलेली बहुतेक खनिजे आणि जीवनसत्त्वे देतात.

झोप

तुमचे लहान मूल दररोज किमान १३ ते १४ तास झोपण्यात घालवेल. रात्रीच्या वेळी बाळ सुमारे ११ तास झोपेल, तर उरलेल्या दिवसात थोडी थोडी डुलकी घेत राहील. तथापि, प्रत्येक लहान मूल सारखे नसते आणि काहींना इतरांपेक्षा जास्त झोपायला आवडते. जर तुमच्या बाळाला रात्री उशिरा झोपायला आवडत असेल, तर तिला झोपायला मदत करण्यासाठी रात्रीचा निवांत नित्यक्रम करून पहा. गरम पाण्याने आंघोळ आणि नंतर बाळाला त्याचे आवडते पुस्तक वाचून दाखवल्यास बाळ छान झोपू शकेल.

काहीवेळा, बाळ दिवसा खूप झोपल्यावर त्याला रात्रीची नीट झोप लागत नाही. त्यामुळे बाळ दिवसा सक्रिय आणि व्यस्त राहील ह्याची खात्री करा.

खेळ आणि उपक्रम

ब्लॉक्स खेळणे, खेळणी खेळणे, कागदावर क्रेयॉनने चित्र काढणे इत्यादी मजेदार क्रियाकलापांद्वारे तुमचे लहान मूल बऱ्याच गोष्टी शिकू शकेल.

तुम्ही एकत्र वेळ घालवत असताना एकत्र वाचन केल्यास शिकण्यासाठी तो आणखी एक मजेदार मार्ग आहे. चमकदार रंगीत चित्रे असलेली पुस्तके निवडा जेणेकरून तुमचे बाळही पुस्तकाचा आनंद घेऊ शकेल. लहानपणापासूनच वाचनाच्या चांगल्या सवयींना प्रोत्साहन द्या. तुम्ही वाचत असताना बघून तुमच्या मुलाला सुद्धा वाचनाची सवय लागेल आणि ती त्याला पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. बाळाला भाषा आणि संभाषण कौशल्ये विकसित करण्यास देखील त्याची मदत होईल.

पालकांसाठी टिप्स

आनंदी आणि निरोगी मुलाचे संगोपन करण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिप्स दिलेल्या आहेत

खालील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

जर तुमच्या बाळाला आजूबाजूला काय चालले आहे हे समजत नसेल तर त्याला समस्या असू शकते. प्रत्येक बाळाच्या विकासाचे टप्पे गाठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतात, परंतु जर १४ महिन्यांचे बाळ आजूबाजूच्या गोष्टी एक्सप्लोर करत नसेल आणि संवाद साधण्याचा आणि बोलण्याचा प्रयत्न करत नसेल तर ती समस्या असू शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना त्याविषयी भेटणे जरुरीचे आहे.

आता तुमचे मूल इकडे तिकडे फिरू शकत असल्यामुळे त्याला तो आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये सहभाग घेत आहे असे वाटेल. आतापर्यंत तो फक्त सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करत होता. आता आपल्या बाळाच्या मागे धावणे आणि त्याला जगाशी संवाद कसा साधायचा हे शिकवण्याचा प्रयत्न करणे आपल्यासाठी सोपे नसेल परंतु त्यासाठी बाळाला मदत करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमचे लहान मूल तुमच्या आसपास असताना तुम्ही कोणते शब्द वापरता ह्यावर लक्ष ठेवा. तुमच्या बाळाने शिकू नयेत किंवा करू नयेत अशा गोष्टी तुम्ही बाळासमोर करणे टाळा.

मागील आठवडा: १३ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास पुढील आठवडा: १५ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved