Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल?

बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल?

बाळासाठी गाजराच्या प्युरीची पाककृती – प्युरी कशी कराल?

अनेक लोक बाळाला घनपदार्थांची ओळख करून देताना भाताची निवड करतात, परंतु त्यासाठी गाजर हा पर्याय सुद्धा उपयोगी ठरू शकतो. गाजराचे पोषणमूल्य जास्त आहे, तसेच गाजराची चव नैसर्गिक आहे आणि गाजराची ऍलर्जी होण्याची शक्यता सुद्धा खूप कमी असते. शिवाय, गाजर वापरून बाळासाठी कुठलाही पदार्थ करणे खूप सोपे आणि पटकन करता येण्याजोगे आहे

विकत घेताना गाजराची निवड कशी करावी?

विकत घेताना गाजराची निवड कशी करावी?

बाळासाठी गाजराची निवड करताना ती टणक आणि स्वच्छ आहेत ह्याची खात्री करा sito web dell’aziendaगाजराचा रंग एकसारखा  केशरी  असावाकोंब किंवा छिद्रे असलेली द्राक्षे घेऊ नका कारण त्याला कीड लागलेली असू शकते

गाजराची प्युरी करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • माध्यम आकाराचे गाजर 
  • स्तनपान किंवा फॉर्मुला दूध 
  • पाणी 

बाळांसाठी गाजराची प्युरी कशी कराल?

बाळांसाठी गाजराची प्युरी कशी कराल?

गाजराच्या प्युरीची कृती खूप साधी असून, ती खालीलप्रमाणे 

. गाजर विकत आणा: गडद रंग असलेली घट्ट आणि टणक गाजरे आणाएक मध्यम आकाराचे गाजर बाळासाठी प्युरी करण्यासाठी पुरेसे आहे

. गाजर प्युरीसाठी तयार करा: गार पाण्याखाली गाजर स्वच्छ धुवा, जेणेकरून त्यावरील माती आणि घाण स्वच्छ होईल. गाजराचे साल काढा आणि गाजराच्या मुळाशी असलेली हिरवी पाने काढून टाका. आणि त्याचे पुन्हा छोटे तुकडे करा

. गाजर शिजवून घ्या: एक भांडे घेऊन त्यात थोडे पाणी घाला, उकळल्यानंतर गॅस कमी करा आणि गाजराचे तुकडे त्यात घाला enlignepharmacie.com. गाजर मऊ होईपर्यंत शिजू द्यागाजर बाजूला काढून घ्या आणि गार पाण्याखाली स्वछ धुवा. असे केल्याने गाजर शिजण्याची प्रक्रिया लगेच थांबेल

. गाजर मॅश करा: गाजराची प्युरी करण्यासाठी ब्लेंडर वापरा. उकडलेल्या गाजराचे तुकडे ब्लेंडर मध्ये घाला आणि चांगले फिरवा. ती  बाळाला नीट खाता यावी असा प्युरीचा पोत  व्हावा म्हणून पाणी घाला. जर तुमचे बाळ अजून १० महिन्यांचे झालेले नसेल तर प्युरी करताना त्यामध्ये गाजराचे तुकडे राहू देऊ नका. कारण बाळाला ते नीट चावता येणार नाहीत आणि त्याचे पचनही नीट होणार नाही

. गाजराला चव आणा: गाजराची प्युरी ही चविष्टच असते, परंतु त्यात ब्रोकोली, रताळे आणि इतर बरेच काही घातल्याने चव वाढते

. प्युरी साठवून ठेवा: राहिलेली प्युरी फ्रिज मध्ये ठेवा. दिवस ती सहज चांगली राहू शकते. जास्त काळ प्युरी  साठवायची असेल तर गोठवून ठेवा

लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी 

  • जर तुमच्या बाळाला काही अन्नपदार्थांची ऍलर्जी असेल, तर सुरुवातीला अगदी थोडी प्युरी खाऊन पाहणे उत्तम किंवा ती खायच्या आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • काही डॉक्टर्स तुमची तुम्ही प्युरी करू नका असे सांगतील कारण बाजारात मिळणाऱ्या गाजरांमध्ये नायट्रेट्स खूप जास्त आहेत, त्यामुळे बाळाला हानी पोहचू शकते apothekefurmanner.de

बाळाला घनपदार्थांची ओळख करून देण्यासाठी गाजर उत्तम आहेत. महिन्यांच्या बाळासाठी गाजराची प्युरी सहज तयार करता येऊ शकते आणि बाळाला भरवता येऊ शकते. बाळाला गाजराची प्युरी दिल्याने कुठल्याही गुंतागुंतीची शक्यता तर नाही ना ह्या विषयी तुमच्या डॉक्टरांशी बोलून खात्री करून घ्या तसे त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहता

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article