Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी चुकलेल्या पाळीची कारणे आणि नकारात्मक गरोदर चाचणी

चुकलेल्या पाळीची कारणे आणि नकारात्मक गरोदर चाचणी

चुकलेल्या पाळीची कारणे आणि नकारात्मक गरोदर चाचणी

घरी करता येण्याजोगी गरोदर चाचणी बाजारात येण्याआधी स्त्रियांना आपण गरोदर आहोत किंवा नाही हे अगदी विश्वासार्हरित्या सांगता यायचे नाही. आत्ता सुद्धा, घरी करता येण्याजोग्या चाचणीमुळे स्त्रियांना खूप प्रश्न पडतात, जसे की: ” माझ्या मासिक पाळीस उशीर झाला आहे किंवा चुकली आहे पण तरीसुद्धा गरोदर चाचणी नकारात्मक आहे, असे का?”

ह्या प्रश्नांमुळे स्त्रियांना काळजी वाटते, इथे आम्ही पाळीला उशीर होण्याची काही कारणे सांगणार आहोत, परंतु पाळी चुकण्यामागे ही कारणे असतीलच असे नाही. सामान्यपणे, पाळीला उशीर होण्याचे कारण गर्भधारणेपेक्षा काहीतरी वेगळे असू शकते. बऱ्याच गरोदर चाचण्या ह्या खूप अचूक असतात.

मासिक पाळीची तारीख उलटून गेली असेल परंतु गर्भधारणा चाचणी नकारात्मक असेल तर गर्भधारणेची शक्यता असते का?

जर तुमची पाळी लांबली असेल आणि तुमची गर्भधारणा चाचणी नकारात्मक येत असेल, अर्थात असे होण्याची शक्यता खूप कमी आहे, तरी तुम्ही गरोदर असण्याची शक्यता असते. सर्वसामान्यपणे गर्भधारणेव्यतिरिक्त पाळीला उशीर होण्याचे दुसरे काही कारण असू शकते. बऱ्याचशा गर्भधारणा चाचण्या खूप विश्वासार्ह असतात.

पाळी चुकली आहे पण गरोदर चाचणी नकारात्मक असण्यामागची कारणे

पाळी चुकली आहे आणि गरोदर चाचणी नकारात्मक आली आहे ह्याचा अर्थ दोन प्रकारे काढता येऊ शकतो एक म्हणजे तुम्ही गरोदर आहात आणि दुसरे म्हणजे तुम्ही गरोदर नाही. असे होण्यामागच्या कारणांची यादी खाली दिली आहे.

१. जर तुम्ही गरोदर असाल तर

जर तुम्ही गरोदर असाल तर त्यामागे खालील कारणे आहेत.

  • कमी संवेदनशीलता असलेली गर्भधारणा चाचणी:

ह्याचा अर्थ असा की तुम्ही दुकानातून आणलेली गरोदर चाचणी ही hCG पातळी जास्त असेल तरच कार्यक्षम असू शकते. त्यामुळे अशा गरोदर चाचण्या गर्भारपणाच्या प्राथमिक अवस्थेत नीट कार्यरत नसतात.

  • चाचणीच्या आधी खूप जास्त पाणी पिणे:

खूप जास्त पाणी प्यायल्यामुळे लघवीमधील hCG सौम्य होते. ह्या परिस्थितीमध्ये चाचणीच्या आधी खूप जास्त पाणी पिणे टाळा.चाचणीसाठी नमुना गोळा करण्याआधी बरेच तास लघवीला जाणे टाळल्याने  किंवा सकाळच्या पहिल्या लघवीच्या  नमुन्याची चाचणी केल्याने गर्भधारणा झाली आहे किंवा नाही ह्याची खात्री होते.

  • जुळे किंवा तिळे असणे:

काही केसेस मध्ये, जुळे किंवा तिळे असेल तर hCGची निर्मिती खूप जास्त पातळीवर होते आणि त्यामुळे घरी करता येणाऱ्या गरोदर चाचण्या नीट काम करत नाहीत. ह्याला इंग्रजीमध्ये ‘High-dose hook effect’ असे म्हणतात.

  • गरोदर चाचणी चुकीच्या पद्धतीने वापरणे:

तुम्ही गरोदर चाचणी नीट वाचत आहात  आणि सूचना योग्य प्रकारे पाळत आहात ह्याची खात्री करा, विशेषतः “क्रियेसाठी लागणारा वेळ” नीट पहा.

  • बीजवाहिनीमध्ये गर्भाची वाढ (Ectopic Pregnancy):

हे खूप दुर्मिळ आहे, जेव्हा फलित बीजाचे रोपण गर्भाशयाशिवाय इतर ठिकाणी (म्हणजेच बीजवाहिनी) होते. त्यामुळे hcg ह्या संप्रेरकाच्या निर्मितीस उशीर होतो आणि त्यामुळे पोटदुखी होते.

  • चुकीची चाचणी:

चाचणीच्या रसायनांमध्ये प्रति – hcg अँटीबॉडीज असतात जे स्त्रीच्या hcg संप्रेरकाला नीट बांधले जात नाही, त्यामुळे सकारात्मक निकाल मिळत नाही.

  • खूप लवकर चाचणी करणे:

जर तुम्ही खूप लवकर चाचणी केलीत तर तुमच्या शरीरात अजून पुरेसे hCG संप्रेरक तयार झालेले नसते त्यामुळे ते नीट शोधले जात नाही, गर्भधारणेनंतर लघवीमध्ये hCG सापडते.

  • गर्भारणेच्या प्रक्रियेस अजून वेळ असणे:

घरी करता येणाऱ्या गरोदर चाचण्या ह्या hCG चे सूक्ष्म रेणू शोधून काढण्यासाठी तयार केलेल्या असतात. जर गर्भधारणेला अजून थोडा वेळ असेल तर काही वेळा hCG शोधण्याची प्रक्रिया नीट होत नाही.

  • गॅस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज (GTD):

हा खूप दुर्मिळ रोग आहे ज्यामध्ये भ्रूणाभोवतीच्या पेशींच्या थरामध्ये ट्युमर आढळतो (त्यास ट्रोफोब्लास्ट असे म्हणतात)

२. जर तुम्ही गरोदर नसाल तर

जर तुम्ही गर्भवती असाल तर तुमच्या नकारात्मक गर्भवती चाचणीचे निकाल खालीलप्रमाणे

  • थायरॉईड:

थायरॉईड असेल तर स्त्रियांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो जसे की पाळी चुकणे किंवा उशिरा येणे. हायपरथायरॉईडीझममुळे पाळी अनियमित होणे किंवा अंगावरून कमी जाणे अथवा वारंवार पाळी येणे आणि खूप जास्त रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे आढळतात.

  • खूप जास्त प्रोलॅक्टिन:

स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये असे होते. प्रोलॅक्टिनमुळे स्तनपान निर्मिती प्रेरित होते आणि मासिक पाळीशी निगडित संप्रेरके दाबली जातात.

  • औषधे:

डिप्रेशन, थायरॉईड, केमोथेरपी इत्यादींवरच्या औषधांमुळे उशिरा पाळी येते तसेच मासिक पाळी अनियमित होते.

  • ताण आणि चिंता:

दैनंदिन आयुष्यातील खूप ताण आणि चिंता ह्या मुळे पाळी चुकते आणि उशिरा येते.

  • गर्भाशयातील असामान्यता:

गर्भाशयातील दोष जसे की सिस्ट, फायब्रॉइड्स किंवा पॉलीप्स ह्यामुळे पाळी उशिरा येते किंवा इतर पाळीविषयक प्रश्न निर्माण होतात.

  • खूप जास्त व्यायाम करणे:

खूप जास्त व्यायाम केल्याने प्रजनन यंत्रणेवर ताण येतो त्यामुळे पाळी उशिरा येते आणि त्यामुळे गर्भधारणेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच, जर तुम्ही IVF, IUI आणि अशा प्रकारच्या ट्रीटमेंट घेत असाल तर तुमची मासिक पाळी अपेक्षित तारखेला येत नाही.

  • संप्रेरकांचे असंतुलन:

संप्रेरकांच्या असंतुलनामुळे उशिरा पाळी येते. उदा: पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOS), स्त्रियांना अनियमित ओव्यूलेशन होते आणि पाळी उशिरा येते किंवा चुकते.

  • गर्भधारणेसाठी उपचार:

जर तुमचे मासिक पाळी चक्र कमी दिवसांचे असेल तर गर्भधारणेसाठी clomid सारखी औषधे देतात त्याने मासिक पाळी चक्र जास्त दिवसांचे होऊ शकते आणि मासिक पाळी लांबते. त्यामुळे अपेक्षित तारखेला पाळी येत नाही.

जर पाळी आली नाही आणि गरोदर चाचणी सुद्धा नकारात्मक आली तर ही बाब केव्हा गंभीरपणे घेतली पाहिजे?

पाळी उशिरा आली आणि गर्भधारणा चाचणी सुद्धा नकारात्मक आली तर लक्ष दिले पाहिजे कारण त्याचे कारण थायरॉईड असू शकते किंवा मेंदूकडून खूप जास्त प्रमाणात प्रोलॅक्टिनची निर्मिती होते. दोन्ही प्रकरणांमध्ये, डॉक्टर्स तुम्हाला औषधे लिहून देऊ शकतात त्यामुळे ही लक्षणे कमी होण्यास मदत होईल.

जर तुम्हाला पाळी उशिरा आली आणि त्यासोबत खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी ताबडतोब संपर्क साधा किंवा इस्पितळाच्या तात्काळ विभागास भेट द्या.

  • पोटात/ ओटीपोटात दुखणे
  • मळमळ किंवा उलट्या होणे
  • बेशुद्ध पडणे
  • खांदा दुखणे
  • चक्कर येणे

जर तुमची पाळी चुकली आहे परंतु गर्भधारणा चाचणी नकारात्मक आली आहे अशावेळी काय कराल?

जर तुमची पाळी वारंवार एक किंवा दोन आठवडे उशिरा येऊ लागली किंवा तुम्हाला सलग तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस पाळी आली नाही आणि चाचणीचा निकाल नकारात्मक आला, तर तपासणीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. बऱ्याच प्रकरणांमध्ये गरोदर चाचणी नकारात्मक आली आणि पाळी आली नाही तर त्याचे कारण खूप साधे असू शकते.

बऱ्याच वेळेला पाळी चुकली असेल आणि गरोदर चाचणी नकारात्मक आली असेल तर डॉक्टरांकडे सुद्धा जाण्याची गरज नसते. तथापि, त्याचे कारण काही वेळा तुमच्या दैनंदिन व्यस्त वेळापत्रकात सापडत नाही आणि त्यासाठी डॉक्टरांना भेटण्याचा फायदा होतो.

बऱ्याच वेळा गरोदर चाचणी नकारात्मक असते तेव्हा त्याचे कारण चुकलेली पाळी हे असते. म्हणजेच चुकलेली पाळी आणि गरोदर चाचणीचा नकारात्मक निकाल म्हणजे गर्भधारणा झालेली नाही, परंतु हे नेहमीच खरे असते असे नाही.

सामान्यपणे पाळी चुकण्यामागे अन्य काही लक्षणे असतात जसे की चिंता, ताण, गर्भधारणेसाठी उपचार, संप्रेरकांचे असंतुलन, औषधे तसेच थायरॉईडचा त्रास इत्यादी. काही वेळा चाचणी करताना पुरेसा वेळ न घेणे, चाचणी चुकीची असणे, चाचणीची संवेदनशीलता कमी असणे किंवा अन्य काही कारणे सुद्धा असू शकतात, जसे की तुमची गर्भधारणा झालेली असणे किंवा चाचणी चुकीची असणे. जर तुमच्या पाळीला एक किंवा दोन आठवडे उशीर झाला तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article