Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे टप्पे गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यातील लक्षणे, शारीरिक बदल, आहार आणि काळजी

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यातील लक्षणे, शारीरिक बदल, आहार आणि काळजी

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यातील लक्षणे, शारीरिक बदल, आहार आणि काळजी

आई होणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा आनंद! पालक म्हणून तुम्ही ह्या प्रवासात खूप चढ उतार आणि टप्पे अनुभवालवाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी शरीरात खूप बदल होतील आणि खूप वेगवेगळी लक्षणे तुमच्या लक्षात येऊ लागतील

पालक म्हणून तुम्हाला पुढची तयारी करावी लागेल आणि तसेच निरोगी आणि आनंदी बाळ ह्या जगात आणण्यासाठी तुम्ही योग्य ती काळजी सुद्धा घेतली पाहिजे

पालकत्व सोपे जावे म्हणून इथे काही लक्षणे आणि टिप्स दिल्या आहेत 

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्याची लक्षणे 

असं म्हणतात की गर्भधारणेच्या कालावधीत पहिले तीन महिने हे सर्वात कठीण असतात आणि तुम्ही मातृत्वाच्या प्रवासातील पहिले महिने यशस्वीरीत्या पार केले आहेत

तुमच्या लक्षात येण्याजोगी काही लक्षणे खालीलप्रमाणे:

  • वाढणाऱ्या बाळामुळे गुदद्वारावरील रक्तवाहिन्यांवर दाब पडल्यामुळे काही स्त्रियांना मूळव्याधीचा त्रास होतो, आणि हा त्रास खूप वेदनादायी असू शकतो. हा त्रास सर्व स्त्रियांना होईलच असे नाही परंतु काही स्त्रियांना ह्याचा अनुभव येतो
  • गर्भारपणात संप्रेरकांच्या पातळीत वाढ झाल्यामुळे तुमच्या हिरड्या खूप मऊ आणि संवेदनशील होतात त्यामुळे बऱ्याच स्त्रियांच्या हिरडीमधून रक्त येते. ह्याच कारणामुळे तुम्ही ब्रश करताना थोडे रक्त येते. गर्भधारणेचा कालावधी संपल्यावर हे लक्षण नाहीसे होते
  • तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागेल कारण मूत्राशयावर दाब पडल्याने वारंवर लघवीला होते
  • पोटात महिन्यांचे बाळ असल्यामुळे काही स्त्रियांना श्वसनाचा त्रास होतो. ह्याचे कारण म्हणजे वाढणाऱ्या बाळाला सामावून घेण्यासाठी गर्भाशय ताणले जाते आणि त्यामुळे आजूबाजूच्या अवयवांवर दाब पडतो.
  • जळजळ हे गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारे सामान्य लक्षण आहे. ह्याचे मुख्य कारण म्हणजे गर्भधारणेदरम्यान पचनाची क्रिया मंदावते आणि त्यामुळे जळजळ होतेहे टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पचनास जड असलेले अन्नपदार्थ खाऊ नका जेणेकरून शरीरास ते अन्न पचनास सोपे जाईल.
  • गर्भधारणेच्या काळात तुमच्या त्वचेमध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होतात. काही स्त्रियांमध्ये गर्भधारणेच्या संप्रेरकांची पातळी वाढल्यामुळे त्वचेवर डाग पडतात. ह्या टप्प्यावर सौम्य मॉइश्चरायझर किंवा लोशन वापरून त्वचेची काळजी घेणे चांगले
  • स्तनाग्रे आणि त्यांच्या भोवतीचा वर्तुळाकार भागाला गडद रंग येईल आणि गर्भधारणेदरम्यान स्तनांच्या रक्तवाहिन्या सुद्धा गडद होतील
  • महिन्यांच्या पोटातील बाळामुळे आईच्या शरीरात खूप बदल होतात. नाकातून रक्त येणे हा त्यापैकीच एक बदल आहे. गर्भधारणेदरम्यान रक्त येणे हे चांगले लक्षण नाही, काही स्त्रियांना नाकातून सौम्य प्रमाणात रक्तस्त्राव होतो. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात गर्भधारणेसाठी खूप जास्त प्रमाणात रक्तप्रवाह होतो. आणि खूप जास्त प्रमाणात झाले तर डॉक्टरांशी संपर्क साधा

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात काय अपेक्षित आहे

गर्भधारणेचा रा महिना संपल्यावर तुमच्या भावनिक, शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये खूप बदल होतील. गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात जसजसे दिवस पुढे जातील तसे वैद्यकीय मदतीची गरज भासणार आहे

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात तुम्ही खालील गोष्टींची अपेक्षा करू शकता 

  • तुमचे डॉक्टर तुम्हाला बाळाची वाढ कशी होते आहे हे जाणून घेण्यासाठी अल्ट्रासाऊंड करायला सांगतील. 
  • काही स्त्रियांना मांडीवर पातळ, लालसर रेषा म्हणजेच व्हेरिकोज व्हेन्स दिसतील. बाळाच्या जन्मानंतर ह्या रेषा फिकट होतील आणि कालांतराने नाहीशा होतील
  • तुमच्या पोटाचा आकार हा खरबुजाच्या आकाराचा दिसेल. 
  • मॉर्निंग सिकनेस नाहीसा होईल आणि तुम्हाला अस्वस्थ आणि थकल्यासारखे वाटेल
  • तुमची भूक बदलेल आणि पोषक चविष्ट अन्न घेणे महत्वाचे आहे कारण तुम्ही दोघांसाठी खात नाही आहात

तुम्ही महिन्यांचे असताना तुमच्या शरीरात कुठले बदल होतात?

तुम्ही ४ महिन्यांचे असताना तुमच्या शरीरात कुठले बदल होतात?

गर्भधारणेच्या थ्या महिन्यात तुमच्या लक्षात येणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पोटाचा आकार. परंतु तुमच्या शरीरात बाह्य बदलांबरोबरच अंतर्गत सुद्धा खूप बदल होत असतात

  • जसजसे गर्भाशय विकसित होते तसे तुम्हाला पाठ, मांड्या, पोट आणि गुह्यभागात दुखू लागेल. पुढचे ५ महिने हे दुखणे तसेच सुरु राहील
  • संप्रेरकांमधील बदलांमुळे स्त्रियांच्या स्तनांचा आकार वाढतो आणि गर्भधारणेदरम्यान ते भरीव होतात
  • शरीरात संप्रेरकांच्या वाढलेल्या पातळीमुळे बद्धकोष्ठता होते आणि त्यामुळे पचन मंदावते
  • बाळाची जसजशी वाढ होते तसे लघवीला जाण्याची वारंवारिता आणि लघवी गळणे हे मूत्राशयावर पडणाऱ्या दाबामुळे खूप सामान्य आहे
  • काही स्त्रियांमध्ये कार्पेल टनेल सिंड्रोम दिसून येतो आणि हे प्रामुख्याने मनगटाजवळील स्नायूंना सूज आल्यामुळे होते
  • शरीरातील रक्ताच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे, पायावरील रक्तवाहिन्या मोठ्या होतात आणि ह्या स्थितीला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतातप्रसूतीनंतर त्या नाहीशा होतात
  • जळजळ हा सुद्धा हे सामान्यपणे आढळणारा बदल आहे कारण गर्भधारणेनंतर पचन मंदावते
  • शरीरातील संप्रेरकांमधील बदलांमुळे बऱ्याच स्त्रियांमध्ये  योनीमार्गातील स्त्राव वाढतो

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या 

जेव्हा तुम्ही गरोदर असता तेव्हा तुम्हाला काही चिंता आणि समस्या असतात ज्याचा तुम्हाला दोघांना त्रास होऊ शकतोजेव्हा तुम्ही तुमच्या स्त्रीरोगतज्ञांना भेटता तेव्हा तुम्हाला ज्याची काळजी वाटते त्याची जरूर चर्चा करा

इथे काही सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या आहेत 

  • गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात खूप भूक लागणे किंवा वजन वाढणे हे खूप सामान्य आहे. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे आई दोघांसाठी खात असते आणि स्वतःचे आणि बाळाचे पोषण करीत असते. ४थ्या महिन्याचा आहार हा खूप वेगळा आहे कारण तुम्हाला त्यातील काही पदार्थ आवडतील किंवा तुम्ही त्यांचा तिरस्कार कराल
  • ह्या काळात जळजळ आणि बद्धकोष्ठता हे खूप कॉमन आहे. जर तुम्हाला ह्या बाबत काही वैद्यकीय सल्ला हवा असल्यास तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा
  • गर्भधारणेच्या काळात डॉक्टर्स तुम्हाला धनुर्वाताचे इंजेकशन घेण्यास सांगतील पहिले इंजेकशन हे पहिल्या महिन्यांमध्ये आणि दुसरे प्रसूती नंतर एक महिन्यांनी घेण्यास सांगितले जाते
  • डॉक्टर्स सांगत नाहीत तोपर्यंत गर्भधारणेदरम्यान संभोग सुरक्षित आहे. गर्भपात होण्याचा इतिहास असेल किंवा गर्भधारणेदरम्यान खूप धोका असेल तर संभोग टाळा. जोडप्यांनी संभोग करण्याआधी डॉक्टरांशी चर्चा करणे चांगले.

जेव्हा तुमच्या शरीरात बदल होत असतात तेव्हा बाळाचा विकास होत असतो आणि बाळामध्ये सुद्धा बदल होत असतात

प्रामुख्याने खालील बदल होत असतात

  • भ्रूण आता मनुष्य प्राण्यांसारखे दिसू लागेल म्हणजे कान, डोळे, नाक, केस आणि चेहऱ्यावरची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसू लागतात
  • डोळ्यांच्या पापण्या, भुवया सुद्धा महिन्यांचा बाळामध्ये विकसित होतात
  • १७व्या आठवड्यात डोक्यापासून पायापर्यंत बाळाची उंची की जवळजवळ १३. सेंमी इतकी होते
  • बाळाचे म्हणजेच तिचे/ त्याचे स्वतःचे बोटांचे ठसे असतात
  • बाळाची थोडीशी हालचाल सुरु होते आणि बाळ पाय मारू लागते
  • बाळाची त्वचा नाजूक केसानी आच्छादलेली असते ज्यास इंग्रजीमध्ये lanugo असे म्हणतात
  • कान विकसित होऊ लागतात, त्यामुळे बाळ बाहेरचे आवाज ऐकू लागतात
  • भ्रूणाची शेपटी आता नाहीशी होते.  

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी 

जेव्हा तुम्ही गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच  गर्भारपणाच्या ४थ्या महिन्यात प्रवेश करता तेव्हा निरोगी आणि आनंदी बाळ जन्माला येण्यासाठी काळजी घेतली पाहिजे 

काय करावे आणि काय करू नये ह्याविषयी इथे दिले आहे 

  • वाढणाऱ्या बाळाला खूप पोषणाची गरज असते. म्हणून आपण पुरेशी व्हिटॅमिन्स घेत आहोत किंवा कसे ह्याची खात्री केली पाहिजे. जर तुम्हाला पुरेसे पोषण मिळत नसेल तर पूरक औषधांसाठी तुमच्या डॉक्टरांना विचारा
  • नियमित व्यायाम करा. तुमचे दैनंदिन रुटीन सुरु ठेवणे महत्वाचे आहे.गर्भवती असताना योग आणि चालणे सुरु ठेवा कारण सुलभ प्रसूतीसाठी त्याची मदत होते
  • भरपूर झोप घ्या. तुमचे शरीर दोन लोकांसाठी सतत कार्यरत असते त्यामुळे तासांची झोप घेणे महत्वाचे आहे 
  • भरपूर समुद्री अन्न खा. मासे ओमेगा आणि इतर खनिजद्रव्यांनी समृद्ध असतात त्यामुळे चांगल्या शिजवलेल्या माशाचा तुकडा माशाचा तुकडा खाणे जरुरीचे आहेमासे स्वच्छ आणि ताजे असल्याची खात्री करा आणि कच्चे मासे खाऊ नका
  • शारीरिक संबंध ठेवा. तुमच्या दोघांमधली जवळीक ठेवणे खूप महत्वाचे आहे कारण तुमचे शरीर एका साहसासाठी तयार होत असते. परंतु त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या
  • फ्लूची लस घ्या त्यामुळे तुम्ही गर्भवती असताना आजारी पडणार नाही
  • वजन वाढणे हे नैसर्गिक आहे, परंतु पोषक अन्न खाऊन वजन वाढेल ह्याची काळजी घ्या 
  • तुम्ही तुमच्या दंतवैद्यांकडे नियमित चेक अप साठी जात आहात ना ह्याची खात्री करा त्यामुळे हिरडीतून रक्त येणे किंवा दातांच्या इतर समस्यांची गुंतागुंत टाळता येऊ शकते

हे करू नका 

  • खूप जास्त प्रमाणात कॅफेन घेऊ नका कारण त्यामुळे तुमच्या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढेल
  • जर तुमच्याकडे मांजरीसारखे पाळीव प्राणी असतील तर तिची घाण साफ करू नका तुम्हाला संसर्ग होऊ शकतो 
  • गरम पाण्याच्या टब मध्ये बसू नका किंवा सोना बाथ घेऊ नका कारण गरम वातावरण चांगले नसते
  • बाहेरचे मांसाहारी पदार्थ खाऊ नका कारण ते नीट स्वच्छ केले आहेत किंवा नीट शिजवलेले आहेत ना हे  माहित नसते 
  • मद्यपान करू नका कारण त्यामुळे बाळाला फेटल अल्कोहोल सिंड्रोम होऊ शकतो (FAS)
  • धूम्रपान करू नका कारण ज्या माता धूम्रपान करतात त्यांना कमी वजनाची बाळे होतात आणि त्यांना अपंगत्वाचा धोका असतो

आहार 

लोह, कॅल्शिअम आणि फॉलिक ऍसिड हे गर्भवती स्त्रीसाठी अत्यंत महत्वाचे असते. आई दोघांसाठी खात असल्याने वजनाविषयी चिंता करू नका फक्त अन्न पोषक असल्याची खात्री करा. तुमच्या स्त्रीरोगतज्ञांशी बोलणे अतिशय महत्वाचे आहे कारण व्हिटॅमिन डी सारखी पूरक औषधे घेणे अतिशय गरजेचे आहे. स्वच्छता पाळण्यासाठी अन्न घरी शिजवणे महत्वाचे आहे आणि त्यामध्ये धान्य, फळे आणि भाज्यांचा समावेश असला पाहिजेप्रथिनांनी समृद्ध असलेले अन्न म्हणजेच मासे आणि चिकन सुद्धा घेतले पाहिजे. प्रत्येक जेवणामध्ये वर सांगितलेले तिन्ही घटक असले पाहिजेत ज्यामुळे बाळाचा सर्वोत्तम विकास होतो

गर्भधारणेच्या ४थ्या महिन्यात कराव्यात अशा चाचण्या आणि तपासण्या 

४थ्या महिन्यापासून पुढे तुम्ही आणि तुमचे बाळ निरोगी आहे ना ह्याची खात्री होण्यासाठी  तुमच्या डॉक्टरांची आणि तुमची वारंवार भेट होईल. त्यासाठी लागणाऱ्या काही चाचण्या आणि तपासण्या खालील प्रमाणे 

  • शारीरिक तपासणी तुमचे स्त्रीरोगतज्ञ तुमचे स्तन, योनी आणि पोटाची तपासणी करतील 
  • ४थ्या महिन्यातील गर्भधारणा स्कॅन बाळाचा विकास तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड केला जाईल 
  • बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा दर बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांचा दर खूप कमी किंवा खूप जास्त आहे का हे डॉप्लर अल्ट्रासाऊंड वरून कळेल
  • एडिमा चाचणी तुमचे डॉक्टर्स तुमच्या पायांची, घोट्यांची आणि पावलांची सूज तपासून पाहतील. असामान्य सूज असेल तर ते preelampsia, मधुमेह किंवा रक्ताच्या गाठीचे लक्षण असू शकते

गंभीर लक्षणे ज्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे 

गर्भवती स्त्री साठी काही लक्षणे असामान्य असतात आणि अशावेळी स्त्रीला त्यावर योग्य वेळी योग्य उपचार करण्यासाठी सावध राहिले पाहिजे.

खालील लक्षणांवर लक्ष ठेवा

  • जर तुम्ही डॉक्टरांना विचारून शारीरिक संबंध ठेवले असतील आणि तरीसुद्धा रक्तस्त्राव झाला तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधला पाहिजे 
  • जर मासिक पाळी सारखा रक्तस्त्राव होत असेल तर गर्भपाताचा धोका असू शकतो किंवा एकटोपिक प्रेग्नन्सी असू शकते 
  • खूप जास्त मळमळ किंवा उलट्या होत असतील, विशेष करून जर तुम्ही काहीही खाल्लं तरी उलटी होत असेल तर ते धोकादायक असू शकते 
  • जर तुमचे बाळ सक्रिय असेल आणि ती सक्रियता कमी झाली तर ते काळजीचे कारण असू शकते 
  • तिसऱ्या महिन्यात खूप लवकर कळा येणे 
  • जर गर्भजल पिशवी खूप लवकर फुटली तर ते काळजीचे कारण असू शकते 
  • जर तुम्हाला सतत पोटदुखी होत असेल आणि डोके दुखत असेल तर तपासणी करून घेणे आवश्यक आहे
  • जर तुम्हाला सतत फ्लू किंवा सर्दी खोकला होत असेल आणि तो लवकर जात नसेल तर ते काळजीचे कारण आहे

होणाऱ्या बाबांसाठी काही टिप्स 

होणारी आई वेगवेगळ्या बदलांना सामोरी जात असते पण होणाऱ्या बाबांना सुद्धा खूप गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पितृत्व हे सुद्धा ह्या प्रवासात तितकेच महत्वाचे आहे आणि त्यासाठी काही टिप्स मनात ठेवल्या पाहिजेत

  • योग्य संतुलन 

जेव्हा घर आणि ऑफिस तसेच नवीन बाळासाठी तयारी करणे ह्या सगळ्याचे योग्य संतुलन राखले जात नसेल तर ब्रेक घ्या. आणि ते अगदी योग्य आहेती सगळी ऊर्जा एकत्र करून आराम करणे हे अतिशय महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही थोडी विश्रांती घ्याल तेव्हा योग्य संतुलन राखले जाईल

  • कुटुंब सर्वात आधी 

ऑफिस मध्ये काहीही होत असले तरी कुटूंब सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे. तुमच्या पत्नीसोबत आणि (होणाऱ्या) बाळासोबत चांगला वेळ घालवा. त्यामुळे तुम्ही काही मिस केले असे तुम्हाला नंतर वाटणार नाही. पुन्हा मागे वळून पाहताना तुम्हाला आपण असे केले असते तर अशी हळहळ नंतर वाटता कामा नये

  • संवाद 

बाळ आल्यानंतर बरेचसे बदल होतात. म्हणून जेव्हा तुमची पत्नी गरोदर असते तेव्हा तिच्याशी मोकळा आणि प्रामाणिक संवाद ठेवा, म्हणजे बाळ आल्यावर दोघांचे समक्रमण होईलखूप संयम राखा आणि ह्या महत्वाच्या महिन्यांमध्ये काळजी घ्या. दोघे फिरायला जा

  • दुसऱ्या नुकत्याच वडील झालेल्या लोकांशी संवाद साधा 

ऑनलाईन किंवा ऑफलाईन असे संपर्काचे जाळे तयार करा आणि बाळाची काळजी कशी चांगली घेता येईल ह्याविषयी चर्चा करा. तुमची भीती, काळजी आणि भावना ह्या विषयी चर्चा करा आणि टिप्स घ्या 

तुमच्या डोहाळेजेवणाची तयारी करण्याची ही वेळ आहे कारण बऱ्याच स्त्रिया सांगतात की हा त्यांच्या गर्भारपणाच्या प्रवासातील आनंदी काळ आहे. था महिना झाल्यावर आपण बाळाच्या जन्माच्या एक पायरी पुढे सरकतो

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article