गर्भधारणा होताना

गर्भधारणा होण्यासाठी किती कालावधी लागतो?

दोघांच्या नात्यावर वंध्यत्वाचा खूप ताण येतो. तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तुमची गर्भधारणा झाली आहे की नाही किंवा होणार आहे कि नाही ह्या विचाराने मोठे मानसिक आणि भावनिक प्रश्न निर्माण होतात. गर्भधारणेविषयी जाणून घेतल्याने, तसेच गर्भधारणेसाठी किती वेळ लागू शकतो आणि वंध्यत्वाची कोणती लक्षणे आहेत हे माहित असल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी त्यावर वेळीच उपचार घेऊ शकता. तसेच कायम लक्षात ठेवा की गर्भधारणा झाली नाही म्हणून ताण घेण्याचे कारण नाही त्याऐवजी इतर अनेक पर्याय आहेत जसे की मूल दत्तक घेणे, सरोगसी किंवा IVF इत्यादी सारख्या उपचारांनी सुद्धा गर्भधारणा होऊ शकते.

गर्भधारणेचा प्रश्न किती प्रमाणात आढळतो?

जगातील बऱ्याच जोडप्यांमध्ये वंध्यत्व हा प्रश्न खूप सामान्यपणे आढळतो. त्याला कारणीभूत बरेच घटक आहेत जसे की जन्मतःच काही व्यंग असणे, फायब्रॉइड्स, पॉलीप्स इत्यादी. CDC च्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेत ६% -१२% महिलांना वंध्यत्वाचा त्रास आहे. काही अभ्यासाद्वारे असे दिसून आले आहे की १५% जोडपी वंध्यत्वाचा सामना करत आहेत.

गर्भधारणेसाठी खरंच किती वेळ लागतो?

लोक नेहमी विचारतात की गर्भधारणेला सरासरी किती वेळ लागतो? एखाद्या जोडप्याला बाळाची चाहूल लागण्यासाठीचा  काळ बऱ्याच घटकांवर अवलंबून असतो जसे की वजन, भावनिक आरोग्य, आहार, शारीरिक संबंधांची वारंवारिता आणि असे अनेक घटक. त्यामुळे काही जोडप्यांना पहिल्या प्रयत्नात यश मिळते तर काहींना २ वर्षे सुद्धा लागू शकतात.

१. शारीरिक संबंधांनंतर गर्भधारणेस किती वेळ लागू शकतो?

बऱयाच जोडप्यांना प्रयत्नांनंतर एका वर्षभरात यश येते परंतु गर्भधारणेसाठी प्रयत्न सुरु केल्यावर दोन वर्षे सुद्धा लागणे हे अगदी सर्रास पाहायला मिळते. त्यासाठी खूप घटक कारणीभूत असतात आणि त्यामध्ये तुमचे वय आणि शुक्राणूंचे आरोग्य ह्यांचाही समावेश होतो. काही जोडप्यांची प्रजननक्षमता जास्त असते आणि त्यामुळे त्यांच्यात लवकर गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते.

२. 'डेपो' नंतर गर्भधारणेसाठी किती वेळ लागतो?

डेपो म्हणजे महिलांमध्ये वापरले जाणारे एक प्रकारचे इनजेक्टेबल गर्भनिरोधक असून ते वापरल्याने ९९% यश मिळते. प्रत्येक ३ महिन्यांनी त्याची आवश्यकता असते आणि त्याचा परिणाम तेवढ्याच कालावधी साठी राहतो. तथापि, महिला १ वर्ष गर्भधारणेस अक्षम असल्याचे दिसून आले आहे त्यामागील कारण अज्ञात आहे.

सर्वेक्षणानुसार काय दिसून आले आहे?

प्रजननक्षमता आणि गर्भधारणेविषयी खूप सर्वेक्षणे इंटरनेट वर आढळतात. त्यापैकी महत्वाची काही खालीलप्रमाणे

गर्भधारणेस इतका वेळ का लागतो?

जोडप्यांमध्ये गर्भधारणेस उशीर होण्याची बरीच कारणे आहेत. त्याचे कारण स्त्री किंवा पुरुष असू शकतो. स्त्रीविषयक कारणांमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो: गर्भधारणेला उशीर होण्यासाठी पुरुषांमध्ये खालील दोष आढळतात.

गर्भधारणेवर वयाचा कसा परिणाम होतो?

खूपशा स्त्रिया हल्ली उशिरा मुले होण्याला प्राधान्य देतात कारण त्यांना यशस्वी करियर करायचे असते तसेच काही वेळा आर्थिक कारण असू शकते. तसेच जोडप्याना एकमेकांना जाणून घेण्यासही वेळ हवा असतो. परंतु वयाच्या ३५ नंतर मुले होण्याची शक्यता कमी होते त्याची कारणे खालीलप्रमाणे:

वंध्यत्वावर उपचार

वेगवेगळ्या मार्गानी तुमचे डॉक्टर्स दोघांवर वंध्यत्वसाठी उपचार करतील. संप्रेरके नियंत्रित राहण्यासाठी औषधे, तसेच काही आधीचे आजार असतील तर त्यावर उपचार आणि गर्भधारणेसाठी जीवनशैलीतील बदल इत्यादी गोष्टींवर तुमचे डॉक्टर भर देतील.
तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी ह्याविषयी चर्चा केली पाहिजे आणि वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला पाहिजे. तुमच्या दोघांसाठी जो उपाय उत्तम असेल तो निवडा. जीवनशैलीतील बदल अमलात आणणे हे तुमच्यासाठी तुम्ही विचार केला त्यापेक्षा कठीण जाऊ शकते

गर्भधारणेची शक्यता वाढण्यासाठी काही टिप्स

जर तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर तेव्हा वंध्यत्व उपचारतज्ञांची मान्यता असलेल्या काही टिप्स खालील प्रमाणे: गर्भधारणा होण्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत. परंतु थोडा धीर धरणे आणि ताणविरहित राहणे हा सर्वात सोपा उपाय आहे. ह्या प्रश्नावर मार्गदर्शनासाठी चांगल्या तज्ञांचा सल्ला घेत आहात ना ह्याची खात्री करा. तसेच आता उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घ्या.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved