In this Article
बाळ झाल्यानंतर स्वतःसाठी काही वेळ काढणे जवळजवळ अशक्य आहे असे तुम्हाला वाटत असेल. परंतु तसे वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात. नुकत्याच आई झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात हीच भावना असते. बाळाची चांगली काळजी घेता यावी म्हणून त्याग करणे सोपे आहे. परंतु, केवळ स्वतःची काळजी घेऊनच तुम्ही तुमच्या बाळाला तुमचे सर्वोत्तम देऊ शकता अन्यथा, ते पायाला ओझे बांधून मॅरेथॉन धावण्यासारखे असेल.
प्रसूतीनंतर स्वतःची काळजी कशी घ्यावी?
स्वत: ची काळजी घेण्यासाठी दररोज थोडा वेळ काढा, त्यामुळे तुम्हाला आराम मिळतो. चिडचिड कमी होते. बाळाची चांगली काळजी घेता येते तसेच तुम्हाला त्याला चांगला प्रतिसाद देता येतो. असे केल्याने प्रसूतीनंतरच्या नैराश्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. गरोदरपणानंतर काळजी कशी घ्यावी ह्याविषयीच्या १० टिप्स इथे दिलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला उपयुक्त वाटतील.
१. स्वतःची शारीरिक काळजी घेऊन सुरुवात करा
गरोदरपणामुळे शरीरातील महत्वाच्या पौष्टिक मूल्यांचा साठा संपला असेल आणि तुम्हाला पुन्हा हा साठा तयार करावा लागेल. फळे, भाज्या, धान्ये, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रथिने यांनी भरलेले पौष्टिक अन्न दररोज खा. केवळ चालण्याचा व्यायाम करा. काहीही कठीण नाही. जमेल तेव्हा विश्रांती घ्या.
२. तुमच्या नकारात्मक किंवा सकारात्मक भावना व्यक्त करा
प्रसूतीनंतर संप्रेरकांमध्ये होणारे बदल हे रोलरकोस्टर राईडचे एक महत्त्वाचे कारण असू शकते, त्यामुळे, तुम्हाला अनेकदा तणाव वाटत असल्यास किंवा नकारात्मक भावना येत असल्यास तुम्ही काळजी करू नये. काही आठवड्यांत ही लक्षणे नाहीशी होतील. तुमच्या पतीसोबत किंवा पालकांसोबत बोलून भावना व्यक्त करा.
३. शक्य तितके सकारात्मक विचार करण्यावर लक्ष केंद्रित करा
तुमच्या सभोवतालच्या गोष्टींबद्दल आनंदी वाटण्याचे मार्ग शोधा आणि दररोज तुमचे आशीर्वाद मोजा. तुमच्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा विचार केल्याने तुम्ही आनंदी रहाल.
४. विश्रांती घ्या
तुम्ही तुमच्या बाळाची काळजी कुटुंबातील जवळच्या सदस्याकडे सोपवून विश्रांती घ्या. आराम करण्यासाठी आपल्या जोडीदारासोबत किंवा एकट्याने वेळ काढा. ब्रेकशिवाय कोणतेही काम सतत करता येत नाही.
५. स्वतःकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका
लक्षात ठेवा की कोणीही सर्व गोष्टी एकट्याने करू शकत नाही. तुम्हाला तुमच्या मर्यादा समजतील. त्यामुळे साध्य करता येण्यासारखी वास्तववादी उद्दिष्टे सेट करा. मग ते उद्दिष्ट, सर्व गोष्टी सुरळीत करणे , भावनांना सामोरे जाणे किंवा गरोदरपणात वाढलेले वजन कमी करणे ह्यापैकी कुठलेही असू शकते.
६. विनोदाची भावना निर्माण करा
प्रयत्न करा आणि गोष्टींची मजेदार बाजू पहा आणि त्याबद्दल हसा. विशेषतः स्वतःच्या बाबतीत विनोद निर्मिती करा. अतिरंजित भावनिक प्रतिक्रियेशिवाय प्रत्येक गोष्टीकडे पाहणे हे एक कौशल्य आहे. आणि हे कौशल्य तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक आहे.
७. दिनक्रम ठरवून घ्या
तुमचे दिवसभराचे वेळापत्रक लवचिक ठेवा. तुम्ही प्रत्येक कामात किती वेळ घालवता ह्याचा अंदाज घ्या. तुम्ही तुमच्या योजनेवर टिकून राहू शकत नसाल आणि अनपेक्षित गोष्टी बदल घडवून आणू शकत नसाल तर घाबरू नका. दिवसभराच्या कामांची रचना करणे ही त्यामागची कल्पना आहे.
८. जीवनाचे मोठे निर्णय घेऊ नका
नवीन ठिकाणी जाणे, नवीन नोकरी घेणे किंवा दुसर्या बाळाचा विचार करणे ह्यासारखे कोणतेही निर्णय आत्ता घेऊ नका. यासारखे जीवनात मोठे बदल घडवून आणणारे निर्णय आत्ता घेऊ नका. आई म्हणून तुमची भूमिका साकारण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल.
९. पालक गटात सामील व्हा
इतर नवीन पालकांसह नेटवर्क तयार करा आणि तुमच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी तुम्ही त्यांना नियमितपणे भेटा. त्यांना सुद्धा तुमच्यासारखेच अनुभव आले असतील हे तुमच्या लक्षात येईल आणि कदाचित तुम्हाला त्यांना वेगवेगळ्या कल्पना सुचवाव्या लागतील.
१०. बाळाच्या जन्मानंतर लगेचच तुम्हाला मदत करण्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम ठेवा
तुम्ही तुमच्या आईला काही काळ तुमच्यासोबत येण्यास सांगू शकता किंवा एखादी मदतनीस नियुक्त करू शकता. ती तुम्हाला दररोज प्रसूतीनंतरची काळजी घेण्यासाठी मदत करेल. बाळाला मसाज देण्यासाठी आणि अंघोळ घालण्यासाठी तिची मदत घ्या, त्यामुळे तुम्हाला लवकर बरे वाटण्यास मदत होईल.
स्वतःला प्राधान्य देणे सहसा इतके कठीण का असते?
जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपल्याला स्वत: ची काळजी घेण्याविषयी क्वचितच शिकवली जाते आणि आपल्या स्वतःच्या भावनांना प्राधान्य दिल्याने आपल्या कुटुंबाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांमध्ये अडथळा येईल असे आपण समजतो. सामान्यपणे केले जाणारे काही विचार खाली देत आहोत. त्यामुळे स्वतःची काळजी घेण्यात अडथळा निर्माण होतो.
- माझ्या गरजांपेक्षा इतर लोकांच्या मागण्यांना प्राधान्य दिले जाते.
- इतरांची काळजी घेणे ही कुटुंबातील ही घरातल्या स्त्रीची भूमिका आहे आणि मी ते सर्व केलेच पाहिजे.
- माझ्या बाळाची आणि कुटुंबाची काळजी घेण्याशिवाय माझ्याकडे इतर कामांसाठी वेळ नाही.
- स्वतःवर लक्ष केंद्रित करणे आणि मला जे आवडते ते करणे म्हणजे मी स्वार्थी आहे.
- मला आनंद देणाऱ्या क्रियाकलापांमध्ये गुंतण्यासाठी मी वेळ देऊ शकत नाही.
- मला भीती वाटते की मी पुरेशी चांगली नाही आणि इतर लोकांना मी आवडणार नाही किंवा इतर लोक माझ्यावर नाराज होतील.
- मी माझ्या आईला स्वतःसाठी काहीही करताना पाहिले नाही आणि त्यामुळे मीही स्वतःसाठी काही करू नये.
- चांगल्या स्त्रिया नेहमी इतर लोकांना प्राधान्य देतात.
- जरी माझा सगळं वेळ खर्च झाला तरी सुद्धा सगळ्या गोष्टी योग्य मार्गाने केल्या पाहिजेत.
- निरोगी राहण्यासाठी मला हे करण्याची गरज नाही.
तुमचा स्वतःशी संवाद सुधारण्यासाठी काही टिप्स:
स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. स्वत: ची काळजी घेण्यास मदत करण्यासाठी तुमच्या मनाला सकारात्मक सूचना देण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत:
- दिवसातून दोनदा, शांत ठिकाणी झोपा. तुमचे शरीर आणि मनाला पूर्णपणे आराम द्या. तुमचे डोळे बंद करून आराम करण्याचा सराव करा, खोल श्वास घ्या. असे केल्याने तुमचे मन आणि शरीर शांत आणि आरामशीर स्थितीत येण्यास मदत होईल. प्रत्येक संथ श्वास घेताना, “मी स्वतःची काळजी घेल्याने माझ्या बाळाला फायदा होतो” असे म्हणत रहा.
- ही कल्पना तुमच्या मनात रुजण्यास मदत करण्यासाठी, तुमच्या मनात एक शक्तिशाली प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न करा. स्वत: ची काळजी घेण्याच्या तुमच्या कल्पनेचा विचार करा. उदा: पाण्याने घागर भरते आहे किंवा बॅटरी रिचार्ज होते आहे. तुम्ही तुमच्या वाक्यांची पुनरावृत्ती करत असताना अशी कल्पना करा.
- स्वतःची काळजी महत्वाची नाही आणि बाकी सर्व कामे आधी केली पाहिजेत असा जेव्हा तुमच्या मनात विचार येतो तेव्हा वर दिलेल्या टिप्स वापरून पहा. सुरुवातीला ते विचित्र वाटेल परंतु सरावाने ते आश्चर्यकारकपणे काम करते.
प्रसूतीनंतर काळजी घेणे आईला एक कठीण काम वाटत असले तरी, योग्य मदत आणि पाठबळ मिळाल्याने बाळाची आई प्रसूतीनंतर लवकर बरी होऊ शकते. प्रसूतीनंतर आपल्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा: