Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण प्रसूतीनंतर घ्यायची काळजी सिझेरिअन प्रसूतीनंतर वजन कसे कमी करावे?

सिझेरिअन प्रसूतीनंतर वजन कसे कमी करावे?

सिझेरिअन प्रसूतीनंतर वजन कसे कमी करावे?

तुम्ही आतापर्यंत गरोदरपणाचा प्रवास यशस्वीरीत्या पार केलेला आहे आणि तुमच्या बाळाचा जन्म झालेला आहे. मातृत्वाचा आनंद घेत असताना तुम्हाला गरोदरपणात वाढलेल्या वजनाविषयी चिंता जाणवू लागेल. तुमचे जर सी सेक्शन झालेले असेल तर तुम्हाला आणखी काळजी वाटू शकते, कारण तुमच्या शरीराला आणि जखमांना बरे होण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागेल. हालचाली करताना सुद्धा तुम्हाला सावध राहण्याची गरज असेल.

व्हिडिओ: सीसेक्शन नंतर वजन कसे कमी करावे (८ प्रभावी टिप्स)

तुम्‍ही आशा सोडण्यापूर्वी, आम्‍ही तुम्‍हाला ह्या लेखाद्वारे सांगणार आहोत की सीसेक्‍शननंतरही तुम्‍ही प्रभावीपणे वजन कमी करू शकता:-

सिझेरियन प्रसूतीनंतर वजन कमी करण्याचे ४ मार्ग

सीसेक्शन प्रसूतीनंतर व्यायामाची आवश्यकता असलेली काही महत्त्वाची क्षेत्रे म्हणजे कॉर्सेटसारखे स्नायू होय. ह्या स्नायूंना ट्रान्सव्हर्स एबडोमिनल स्नायू म्हणतात. हे स्नायू मणक्याभोवती, पेल्विक फ्लोअरचे स्नायू तसेच ओटीपोटाच्या व पाठीच्या स्नायूंना वेढतात.

सीसेक्शन नंतर वजन कमी करण्यासाठी या सोप्या स्टेप्स द्वारे गरोदरपणाच्या आधीचे वजन प्राप्त करा:

. स्तनपान

स्तनपान हा तुमच्या नवजात बाळाला पोषक तत्वांचा पुरवठा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु, बहुतेकांना माहित नाही की स्तनपान वजन कमी करण्यासाठी देखील एक प्रभावी उपाय असू शकतो. स्तनपानामुळे दररोज सुमारे 300 ते 500 कॅलरीज बर्न होऊ शकतात. पोटावरील अतिरिक्त वजन कमी करण्याचा हा आदर्श मार्ग असू शकतो

स्तनपान

. तुमच्या कॅलरीज मोजा

स्तनपान केल्याने दररोज भरपूर कॅलरी बर्न होत असतात, त्यामुळे तुम्हाला खूप भूक देखील लागू शकते. तुमचे पोट भरण्यासाठी आणि तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे तुम्ही वापरत असलेल्या कॅलरी मोजणे.

आरोग्यदायी स्नॅकची निवड करा. साधे दही, नट्स, फ्लेक्ससीड्स, फळे, सॅलड्स आणि मांस यासारख्या गोष्टी तुमची भूक भागवू शकतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. तुमच्या कॅलरी १२०० च्या खाली येऊ देऊ नका. कारण यामुळे चयापचय कमी होऊ शकते आणि वजन कमी करण्याच्या तुमच्या उद्दिष्टासाठी ते योग्य नाही.

. पोस्टप्रेग्नन्सी बेल्ट वापरा

जखमांपासून संरक्षण करण्यासाठी डॉक्टर सहसा सीसेक्शन नंतर कंबरेचा किंवा पोटाचा पट्टा वापरण्याची शिफारस करतात. संरक्षण देण्यापेक्षा ह्या पट्ट्याचे इतर अधिक उपयोग आहेत. हा पट्टा तुम्हाला पोट आत घेण्यासाठी मदत करू शकतो आणि पोटावर अतिरिक्त चरबी पेशी तयार होण्यास त्यामुळे प्रतिबंध होतो. चरबी कमी करणे हा पट्ट्याचा खरा उद्देश नसला तरी काही प्रमाणात मदत होऊ शकते.

तुम्ही हा बेल्ट जेवताना, झोपताना किंवा वॉशरूम वापरताना फक्त वापरू नका. इतर वेळी तुम्ही हा बेल्ट वापरू शकता.

. भरपूर पाणी प्या

दररोज सुमारे ८१० ग्लास पाणी पिण्याने तुम्ही केवळ सजलीत होत नाही तर स्तनपान अधिक चांगले होण्यास मदत होते. तुमचे स्तनपानाचे वेळापत्रक जितके चांगले असेल तितके वजन कमी होण्याची शक्यता जास्त असते.

सीसेक्शन नंतर वजन कमी करण्यासाठी ४ घरगुती उपाय

. लिपिड बर्स्टिंग मसाज

हालचाल पुन्हा सुरु करण्याइतपत जर तुम्ही बऱ्या झालेल्या नसाल किंवा व्यायाम सुरु करण्याइतकी ऊर्जा तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही लिपिड बर्स्टिंग मसाज निवडू शकता. हा मसाज तुमचे स्नायू आणि हाडे मजबूत करतील आणि स्नायूंना टोन करतील आणि वजन कमी करण्यास मदत करतील. हा मसाज तुम्हाला नंतरच्या वर्कआउटसाठी तुमच्या शरीराची ताकद सुधारण्यास मदत करू शकेल.

लिपिड बर्स्टिंग मसाज

. चालणे सुरू करा

वेगाने चालल्यास बरे होण्याच्या प्रक्रियेस गती येते आणि रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. बरे होताना शरीरावर ताण येत नाही आणि चांगला कार्डिओ व्यायाम होतो.

. योग

तुमच्या सीसेक्शन प्रसूतीनंतर सहा ते आठ आठवड्यांनंतर तुम्ही योगाभ्यास सुरू करू शकता. योगासने सुरू करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि पुढे जाणे महत्त्वाचे आहे. योगासने करून योग्य आहार घेतल्यास केवळ वजन कमी करण्यातच मदत होत नाही तर स्नायूंची ताकद आणि लवचिकता देखील सुधारू शकते.

. व्यायाम

एकदा तुमच्या जखमा बऱ्या झाल्या की, तुम्ही काही सोप्या व्यायामाने सुरुवात करू शकता. सुरुवातीला ते जास्त होणार नाही याची काळजी घ्या. हळूहळू सुरुवात करणे आणि जसजसा वेळ जातो तसे व्यायाम करणे चांगले असते.

येथे काही व्यायाम प्रकार आहेत जे तुम्ही करून पाहू शकता:

1. पेल्विक टिल्ट्स

ताकद परत मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या पोटाभोवतीच्या स्नायूंना बळकट करणे अत्यावश्यक आहे. पेल्विक टिल्ट हा यासाठी योग्य व्यायाम आहे. तुमच्या ओटीपोटातील स्नायू संकुचित करा आणि श्रोणि पुढे झुकण्यासाठी त्यांचा वापर करा. तुम्ही बसलेले, उभे असताना किंवा पडून असताना हे करता येते.

पेल्विक टिल्ट्स

2. प्लँक्स

आपले शरीर पुशअप स्थितीत धरून ठेवा आणि हाताची कोपरे जमिनीवर ठेवा. पाठ सरळ ठेवा. तुमचे ओटीपोट आकुंचन पावले आहे ह्याची खात्री करा. ही स्थिती ३० सेकंद धरून सुरुवात करा आणि हळूहळू या स्थितीत जास्त काळ रहा.

प्लँक्स

3. कोब्रा पोझ

आपल्या ओटीपोटावर झोपा आणि आपले तळवे खांद्याच्या बाजूला ठेवा. तुमची कोपर तुमच्या बरगड्यांमध्ये टेकतील असे ठेवा आणि ओटीपोट हळूहळू आत घेऊन तुमचे डोके हळू हळू वर घ्या.

कोब्रा पोझ

4. ब्रिज स्थिती

तुमचे पाय जमिनीवर सपाट ठेवून तुमच्या पाठीवर झोपा. तुमचे पाय तुमच्या कूल्ह्यांच्या रुंदीनुसार ठेवावेत. हळूहळू तुमचे पोट आणि पाठ वर करा आणि खांदे जमिनीवर सोडा. जखमांवर कोणताही ताण न ठेवता तुमच्या मूळ स्नायूंवर हे आसन काम करेल.

ब्रिज स्थिती

5. वॉटर वर्कआउट्स

पोहणे आणि पाण्यातील एरोबिक्समुळे तुमच्या स्नायूंवर जास्त ताण न पडता काही कॅलरीज कमी होण्यास मदत होऊ शकते.

वॉटर वर्कआउट्स

6. बेली ब्रीदिंग

हा व्यायाम सोपा आहे, परंतु तुमच्या फिटनेसच्या प्रवासात ह्या व्यायामाची तुम्हाला मदत होऊ शकते. तुम्हाला फक्त पोटावर हात ठेवून पाठीवर झोपायचे असते. नंतर, एक दीर्घ श्वास घ्या (नाकातून) आणि तुमच्या वाढलेल्या पोटाच्या आकाराकडे लक्ष द्या. श्वास सोडा (तोंडातून) आणि पोट आत खेचा. प्रत्येकी ५ सेकंद श्वास घ्या, धरून ठेवा आणि श्वास सोडा. दिवसातून सुमारे 3 वेळा पुन्हा करा. हा व्यायाम तुम्हाला जितका आराम देईल तितकाच वजन कमी करण्यास मदत करेल!

दुखापत किंवा अस्वस्थता टाळण्यासाठी कठोर व्यायाम करण्याआधी नेहमी तुमच्या डॉक्टरांची परवानगी घ्या. जोपर्यंत तुमचे डॉक्टर परवानगी देत नाहीत तोपर्यंत सिटअप आणि क्रंचपासून दूर राहा, कारण या व्यायामांमुळे पोटाचे स्नायू वेगळे होऊ शकतात. एक चांगला आहार, व्यायामाची सोपी पथ्ये आणि पाणी पिण्यासारख्या सोप्या पद्धतींमुळे तुमचे वजन गर्भधारणा होण्याआधीच्या वजनाइतके होऊ शकते.

आणखी वाचा:

सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार
सिझेरीयन प्रसूतीनंतरचे लैंगिक संबंध – किती काळ वाट पहावी?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article