Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home प्रीस्कूलर (३-५ वर्षे) अन्न आणि पोषण तुमच्या मुलांकरिता होळीच्या दिवशी खाण्यासाठी विशेष अन्नपदार्थांच्या पाककृती

तुमच्या मुलांकरिता होळीच्या दिवशी खाण्यासाठी विशेष अन्नपदार्थांच्या पाककृती

तुमच्या मुलांकरिता होळीच्या दिवशी खाण्यासाठी विशेष अन्नपदार्थांच्या पाककृती

रंगांचा सण!  म्हणजेच लोकप्रिय भारतीय सण रंगपंचमी येत्या ६ मार्च रोजी आहे. मुलांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे – मुले आईला रंगांची खरेदी करण्यास सांगतील तसेच मित्रांना भिजवण्यासाठी पिचकारण्यांची सुद्धा मागणी करतील. परंतु सर्व मजा आणि खेळ बाजूला ठेवून, रंगपंचमी आणखी एका कारणास्तव आवडते – आणि ते म्हणजे वेगवेगळे खाद्यपदार्थ!

जेव्हा आपण आपल्या मुलांसाठी होळी-रंगपंचमी साठी विशेष पदार्थ करणार असाल तर लक्षात घेतली पाहिजेत अशी काही मार्गदर्शक तत्वे आहेत. आपण बनवणार असलेले पदार्थ हे पारंपारिक तसेच आधुनिक असावेत. दिसायला रंगीबेरंगी, चविष्ट तसेच ते करायला फारसा वेळ लागू नये असे असावेत. कारण तुम्हाला सुद्धा मुलांसोबत खेळायचे असते नाहीतर तुमचा सगळा वेळ स्वयंपाकघरात जाऊ शकतो.

आम्ही तुमच्यासाठी होळीच्या खास फूड रेसिपीचा एक सेट घेऊन आलो आहोत ज्यामुळे तुमचे मूल आनंदी होईल. तुम्ही खास उत्सवासाठी ‘मम्मी शेफ’ होण्याची वेळ आली आहे!

होळी निमित्त मुलांसाठी स्नॅक्स आणि गोड पदार्थ तसेच इतर काही पाककृती:

१. बदाम फिरनी

बदाम पेस्ट आणि तांदळाची पेस्ट बनवलेले हे मिष्टान्न आहे, जास्तीत जास्त चवीसाठी ते चिकणमातीच्या  भांड्यामध्ये दिले जाते.

साहित्य

  • ४ चमचे बासमती तांदूळ
  • ३ कप दूध
  • १० बदाम
  • १/३ कप साखर
  • १/४ टीस्पून वेलची पूड
  • ४-५ केशराच्या काड्या, दुधात विरघळवलेल्या
  • २ बदाम, गार्निशिंगसाठी कापलेले
  • २- ३ पिस्ता, गार्निशिंगसाठी चिरलेले
  • गार्निश करण्यासाठी १ टीस्पून मनुका

पद्धत:

  • भिजवलेले बदाम एका ग्राइंडरमध्ये घ्या आणि त्याची गुळगुळीत पेस्ट करून बाजूला ठेवा
  • पाण्यात बासमती तांदूळ स्वच्छ धुवा आणि अर्धा तास भिजवा
  • पाण्यातून तांदूळ काढून मिक्सरमध्ये घालून बारीक करून घ्या. थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये १/२ कप दूध मिसळा आणि बाजूला ठेवा
  • उरलेले दूध एका जाड बुडाच्या भांड्यात गरम करा. मंद आचेवर उकळण्यासाठी ठेवा
  • दूध उकळण्यास सुरुवात झाली की त्यात तांदळाची पेस्ट घाला. सतत ढवळत राहा आणि घट्ट होईस्तोवर मंद आचेवर शिजू द्या. यास सुमारे ५ ते ६ मिनिटे लागू शकतात
  • त्यात साखर, वेलची पूड आणि केशर घाला. साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत ढवळत रहा.
  • आधी तयार केलेली बदाम पेस्ट घाला. चांगले मिक्स करा. आणखी १-२ मिनिटे शिजवा
  • गॅस बंद करा आणि एका भांड्यात काढून घ्या
  • बदाम, पिस्ता आणि मनुका घालून ते सजवा. थंड होऊ द्या आणि नंतर ते रेफ्रिजरेटरमध्ये १-२ तासांसाठी ठेवा. थंडगार सर्व्ह करा

२. मावा कुल्फी

मुलांना कुल्फी आवडते. मुलांना मावा आवडतो. देशाच्या बऱ्याचशा भागात आता उन्हाळा सुरु झालेला आहे.

साहित्य

  • ३ कप दूध
  • १/४ कप मावा, कुस्करलेला
  • २ – ३ टेस्पून साखर
  • १५ बदाम पावडर
  • १५ पिस्ता पावडर
  • १/२ टीस्पून वेलची पावडर
  • १ टीस्पून गुलाब पाणी किंवा केवडा इसेन्स
  • १/४ टीस्पून केशर

पद्धत

  • जाड तळाच्या पॅनमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवा. दुधात केशर घाला आणि विरघळू द्या
  • १५ – २० मिनिटे मंद आचेवर दूध गरम करणे सुरू ठेवा. साखर घाला आणि ती पूर्णपणे विरघळू द्या. सुमारे ४-५ मिनिटे सतत ढवळत रहा
  • आता त्यात मावा, वेलची पूड, बदाम आणि पिस्ता घालून मिक्स करा
  • मिश्रण पूर्णपणे एकत्र होऊ द्या आणि तोपर्यंत ते ढवळत रहा. यास सुमारे २ ते ३ मिनिटे लागू शकतात
  • गॅस बंद करा
  • गुलाब पाणी घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या
  • मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये घाला
  • हे मोल्ड्स फ्रीजरमध्ये ठेवा
  • कुल्फी सेट झाल्यावर फ्रिजरमधून साचे काढा आणि ते पाण्यात बुडवा. असे केल्याने कुल्फी सहजपणे खाली पाडण्यास मदत होईल
  • त्वरित सर्व्ह करा

३. गुलाब जाम

आपल्याला आणि मुलांना गुलाबजाम खाण्यासाठी एखादे कारणच हवे असते नाही का? चला तर मग होळीनिमित्त गुलाबजाम करूयात.

साहित्य

  • २०० ग्रॅम खवा
  • ३ चमचे परिष्कृत पीठ/मैदा
  • १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  • २ कप साखर
  • २ कप पाणी
  • २ चमचे दूध
  • हिरव्या वेलची, किंचित बारीक केलेल्या
  • तळण्यासाठी तेल

पद्धत

  • जाड तळ असलेल्या एका भांड्यात साखर आणि पाणी मिसळा. त्यात चिरलेली वेलची घाला. ते व्यवस्थित मिक्स करा आणि मंद आचेवर ठेवा
  • हा पाक मोठ्या आचेवर उकळू देऊ नये. पाक उकळत असताना ज्योत मंद ठेवा
  • पाकामध्ये २ टेबल स्पून दूध घाला आणि नीट ढवळून घ्या
  • १५-२० मिनिटे उकळत ठेवा आणि गॅस बंद करा
  • पाक थंड झाल्यानंतर, आपल्या बोटावर एक थेंब घेऊन पाकाची सुसंगतता तपासा. दोन बोटांच्या दरम्यान चाचणी केली असता त्यात एक धागा सुसंगतता असावी
  • पुढे गुलाबजाम साठी एका भांड्यात खवा घ्या आणि मॅश करा म्हणजे त्यात गाठी शिल्लक राहणार नाही
  • मैदा, बेकिंग सोडा घाला आणि घट्ट मळून घ्या
  • मळून घेतलेला खवा पुरेसा लवचिक आहे आणि कोरडा वाटत नाही याची खात्री करा
  • लिंबाच्या आकाराचे भाग काढा आणि गोल गोळे बनवा
  • कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यावर, गुलाबजाम एकमेकांना स्पर्श न करता बसतील असे ठेऊन तळून घ्या
  • गॅस मंद आचेवर ठेवा आणि गुलाबजाम सोनेरी-तपकिरी रंग येईपर्यंत तळा
  • साखरेच्या पाकात तळलेले गुलाबजाम काढून टाका. सर्व्ह करण्यापूर्वी त्यांना कमीतकमी ३० मिनिटे पाकात ठेवा
  • तुम्हाला वाटल्यास, सर्व्ह करण्यापूर्वी तुम्ही गुलाबजाम १५ मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता

४. दही वडा

तिखट, मलईयुक्त, चटकदार असा दहीवडा मुलांना रंग आणि पाणी खेळून झाल्यावर खायला आवडेल.

साहित्य

वड्यासाठी

  • १/२ कप उडीद डाळ, २ तास भिजवलेले
  • २ टीस्पून हिरवी मिरची, चिरलेली
  • २ टीस्पून आले, चिरलेले
  • चवीनुसार मीठ

टॉपिंगसाठी

  • १ १/२ वाटी दही (दही)
  • १/२ टीस्पून पिठी साखर
  • मिर पूड
  • २ टेस्पून चिंचेची चटणी
  • भाजलेली जिरे पूड वरून शिंपडण्यासाठी
  • गार्निश करण्यासाठी काळे मीठ

गार्निशिंगसाठी

१ टेस्पून कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी

पद्धत

  • उडीद डाळ, हिरव्या मिरच्या, आले आणि मीठ एकत्र करा आणि साधारण १/४ कप पाण्याचा वापर करून गुळगुळीत पेस्ट करा. हे तयार झालेले पीठ काढून बाजूला ठेवा
  • एका खोल नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि एकावेळी ३-४ वडे घाला. सर्व बाजूंनी हलके सोनेरी तपकिरी होईपर्यंत ते तळून घ्या
  • रुमाल पेपर वर काढून बाजूला ठेवा
  • एका भांड्यात दही आणि साखर एकत्र करून मिक्स करून बाजूला ठेवा
  • एका खोल भांड्यात पुरेसे पाणी घ्या आणि त्यात वडे घाला. ते १०-१५ मिनिटे पाण्यात भिजवा. वडे पाण्यातून काढा आणि सर्व जादा पाणी पिळून घ्या. तळव्यांवर दाबून थोडे चपटे करा.
  • सर्व्हिंग डिशवर वडा ठेऊन वरून गोड दही घाला
  • थोडी मिरची पावडर, एक चमचा चिंच खजुराची चटणी, थोडी जिरेपूड आणि थोडा काळे मीठ शिंपडा
  • त्वरित सर्व्ह करावे किंवा सर्व्ह करण्यापूर्वी १५ -२० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा

५. पाणीपुरी/गोल गप्पे

आनंद नेहमी छोट्या गोष्टींमध्ये असतो, तसेच तो आंबट, गोडसर आणि तिखट पाणीपुरीमध्ये देखील असतो.

साहित्य

२५-३० पुऱ्या (घरगुती किंवा स्टोअर-खरेदी केलेले)

स्टफिंगसाठी साहित्य

  • ४ बटाटे, उकडलेले आणि मॅश केलेले
  • १ कांदा, बारीक चिरून
  • ३ चमचे कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी
  • २ चमचे चाट मसाला पावडर
  • १ चमचा जिरेपूड, भाजलेली
  • १/२ टीस्पून लाल तिखट(पर्यायी)
  • चवीनुसार काळे मीठ (उपलब्ध नसल्यास सामान्य मीठ वापरा)

तिखट गोड पाण्यासाठी साहित्य

  • १/२ कप कोथिंबीर, चिरलेली
  • १/२ कप पुदीना पाने, चिरलेली
  • १ इंच आले पेस्ट
  • १ टेस्पून चिंच पाण्यात भिजवलेली
  • ४ चमचे चिरलेला किंवा बारीक केलेला गूळ/साखर किंवा २ चमचे बारीक केलेले खजूर
  • १ हिरवी मिरची, चिरलेली
  • १ चमचा चाट मसाला पावडर
  • ५ टीस्पून जिरे पूड, भाजलेले
  • २ चमचे बूंदी
  • चवीनुसार काळे मीठ (उपलब्ध नसल्यास सामान्य मीठ वापरा)
  • बटाटे पूर्णपणे उकडून घ्या, साल काढून बारीक करा
  • कांदा बारीक चिरून घ्या. बाजूला ठेवा
  • मोठ्या भांड्यात वर नमूद केलेले सर्व ‘स्टफिंगसाठी’ घटक मिसळा. एकत्रित प्रमाणात घटकांचा विचार करता काळ्या मीठ (किंवा मीठ) घाला
  • चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा

तिखट गोड पाण्यासाठी कृती

  • तिखट गोड पाण्यासाठी वरील सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये मिसळा. पाणी घालून बारीक वाटून घ्या (आता ह्याला हिरवी चटणी म्हणतात)
  • मोठ्या भांड्यात हिरवी चटणी घ्या. २ कप पाणी घालून मिक्स करा. चाट मसाला, जिरा पूड आणि चवीनुसार मीठ घाला
  • बहुतेक पातळ पाणी बर्‍याचजणांना आवडते, म्हणून जास्त पाणी घालून पातळपणा समायोजित करा, परंतु मसाला आणि चव तपासून पहा
  • आता या पाण्यामध्ये बूंदी घाला आणि पाण्यात भिजवून बुंदी मऊ होऊ द्या
  • उन्हाळ्याच्या हंगामात आपण हे पाणी रेफ्रिजरेटरमध्ये थंड करू शकता किंवा त्यात बर्फाचे तुकडे घालू शकता. (लक्षात ठेवा की बर्फाचे तुकडे जोडल्याने पाणी पातळ होईल, म्हणून आपल्याला पुन्हा चवीनुसार ते समायोजित करावे लागेल)

            पाणी पुरी बनवण्याची कृती

  • पुरी हातात धरा आणि ती नखाने फोडा
  • पुरीच्या आकारानुसार पुरीमध्ये उकडलेले बटाटा-कांदा भरा
  • आधी हिरवे पाणी  पुरीमध्ये घाला. पुढे आपल्या आवडीनुसार गोड चटणी घाला
  • सर्व तयारी सुलभ ठेवा. पाणीपुरी ताबडतोब खायला द्यावी कारण ती मऊ पडते

टीप – शिजवलेले वाफवलेले मूग, मोड आलेली वाफवलेले मटकी, मऊ उकडलेले पांढरे चणे, बारीक चिरलेला कांदा , चिरलेली कोथिंबीर, चिरलेली पुदिन्याची पाने इत्यादी पुरीमध्ये भरण्यासाठी तुम्ही वापरू शकता.

असे वेगवेगळे चविष्ट आणि रंगतदार पदार्थ तुमच्या मुलांसाठी तुम्हाला करता येतील. तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा!

आणखी वाचा:

लहान मुलांसाठी होळीच्या सणाविषयीची मनोरंजक तथ्ये
होळीचा सण साजरा करताना तुमच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी टिप्स

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article