Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भारपण गर्भधारणेचे टप्पे गर्भधारणेचा ७वा महिना – लक्षणे, शारीरिक बदल आणि काळजी

गर्भधारणेचा ७वा महिना – लक्षणे, शारीरिक बदल आणि काळजी

गर्भधारणेचा ७वा महिना – लक्षणे, शारीरिक बदल आणि काळजी

गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात किंवा तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक सरणाऱ्या दिवसासोबत अस्वस्थता जाणवेल. ह्या काळातील अजून एक विशेष भावना म्हणजे तुम्हाला जवळच्या प्रिय व्यक्तींकडून खूप काळजी आणि प्रेम मिळेल. आता डोहाळेजेवणासारख्या विशेष समारंभाचा आनंद घेण्याची वेळ आहे आणि ह्या अविश्वसनीय प्रवासातील प्रत्येक मौल्यवान क्षण जपून ठेवण्याची ही वेळ आहे.

गर्भधारणेच्या ७व्या महिन्यात सामान्यपणे आढळणारी लक्षणे

बऱ्याच गर्भवती स्त्रियांमध्ये आढळणारी सामान्य लक्षणे म्हणजे

  • तुम्हाला चालताना थोडे अवघड वाटेल कारण तुमच्या पायांवर आणि मूत्राशयावर वाढणाऱ्या पोटामुळे दाब पडेल
  • तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाकडे लक्ष दिले पाहजे कारण तुमच्या पाठदुखीचे ते मुख्य कारण आहे.
  • एकाच वेळेला रडू येऊ शकते तसेच हसू सुद्धा येऊ शकते कारण तुम्हाला वारंवार मनस्थितीत बदल जाणवतील परंतु त्यामध्ये काळजी करण्याचे काही कारण नाही कारण ते नॉर्मल आहे आणि प्रत्येक स्त्री ह्यामधून जात असते.
  • तुमच्या वाढणाऱ्या पोटाला आधार देण्यासाठी तुम्ही आतापासून गर्भवती स्त्री सारख्या चालू लागाल.
  • पोटामुळे अस्वस्थता आणि सतत येणाऱ्या कळांमुळे हा तुमच्या दिनचर्येचा भाग बनतो, आणि तुम्हाला ह्या काळात त्याची सवय होऊन जाते.

७व्या महिन्यात तुमच्या शरीरात कोणते बदल होतात?

गर्भारपणाच्या ७व्या महिन्यात जसजसे तुमचे शरीर प्रसूतीसाठी तयार होत असते तसतसे तुमच्या शरीरात खूप बदल होत असतात.

  • पोटाचा आकार वाढल्यामुळे तुम्ही वाकू शकणार नाही
  • वाढलेल्या रक्ताभिसरणामुळे तुम्हाला शरीराची गोलाई वाढल्यासारखे वाटेल. तुमचा चेहरा हात आणि पाय सुजल्यासारखे वाटतील.
  • तुम्हाला सर्व हवामानामध्ये खूप गरम होईल
  • बाळाची वाढ होत असल्यामुळे बाळ खाली सरकेल आणि तुम्हाला सतत लघवीला जाण्याची भावना होईल.
  • तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटेल
  • तुमची स्तनाग्रे गडद होतील आणि तुमचे स्तन जड होतील
  • बऱ्याच स्त्रियांना ह्या महिन्यापासून वजनात वाढ झालेली जाणवेल त्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराबाबत जागरूक राहिले पाहिजे.
  • काही स्त्रियांना ह्या काळात व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होईल
  • पोटाचा आकार वाढल्यामुळे तुम्हाला भरभर चालता येणार नाही
  • तुमची हिमोग्लोबिनची पातळी तपासून पहा आणि लोह समृद्ध पदार्थ खा तसेच व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात घ्या
  • चिंता आणि मनःस्थितील बदल हे तर तुमचे इथून पुढे परम मित्र बनतील. त्यामुळे तुम्ही स्वतःला ह्या भावनांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे दोषी ठरवू नका.
  • तुम्हाला ह्या काळात खात्रीपूर्वक सरावकळा जाणवू लागतील आणि त्या सराव कळा आहेत हे तुम्हाला आता ओळखता येऊ लागेल.
  • ह्या काळात तुमचा तुमच्या बाळाशी घट्ट बंध जाणवेल.
  • ह्या दिवसांमध्ये श्वास रोखला जाण्याचा अनुभव तुम्हाला खूप वेळा येईल.
  • तुमच्या स्तनांमधून दुधाची निर्मिती होईल आणि त्यामुळे त्यामुळे व्हिटॅमिन्स आणि नुट्रीएंट्सने युक्त पिवळ्या दुधाच्या निर्मितीस सुरुवात होईल जे बाळासाठी अतिशय गरजेचे आहे.
  • तुमचे स्तन हळुवार होतील. ते टाळण्यासाठी आरामदायक आणि अंगाला नीट बसणारी ब्रा वापरा. तुम्ही झोपताना सुद्धा ब्रा वापरू शकता कारण त्यामुळे जड आणि हळुवार स्तनांना आधार मिळतो.
  • गर्भाशयाची वाढ आणि बाळाच्या वाढत्या वजनामुळे तुमची पाठ दुखेल.
  • रात्रीची झोप कमी होईल. श्वसनाचे व्यायाम करून आणि रेलॅक्सशेषन थेरपीने तुम्ही त्यांचा सामना करू शकता.

गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यात सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या

तुमच्या शरीरात वर सांगितलेले बदल होतातच परंतु तुम्हाला खालील समस्या सुद्धा येऊ शकतात:

  • हिरडीतून रक्त येणे
  • लाळ स्त्रवणे आणि चिकट स्त्राव तयार होणे
  • थकवा आणि डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • योनीमार्गातून वाढलेला स्त्राव
  • बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्या
  • तुम्हाला वारंवार विसरभोळेपणाचा अनुभव येईल परंतु काळजी करू नका ते काही काळापुरतेच राहणार आहे
  • तुम्हाला जळजळ आणि मूळव्याधीचा त्रास होईल

गर्भारपणाच्या ७व्या महिन्यात बाळाचा विकास

तुमच्या बाळाची दिवसागणिक वाढ होत आहे आणि ते मोठे होत असल्याचे बघून तुम्हाला आनंद होईल.

  • तुमच्या बाळाची उंची ही साधारणपणे ४६ सेंमी इतकी असून डॉक्टरांच्या प्रत्येक भेटीत बाळाच्या वजनावर लक्ष ठेवले जाते.
  • ह्या काळात बाळाच्या मेंदूचा विकास खूप होत असतो. त्यामुळे तुम्हाला असे लक्षात येईल की बाळ आवाज, संगीत आणि वासाला अतिशय संवेदनशील असते.
  • ह्या काळात तुम्हाला वारंवार बाळाच्या हालचाली जाणवतील. आणि ह्याच वेळेला तुम्ही आणि तुमचे पती बाळासोबत स्पर्श आणि आवाजाच्या माध्यमाने कनेक्ट होऊ शकता.
  • तुमच्या बाळाचे शरीर आता पूर्णतः विकसित झालेले असेल. व्या महिन्याच्या सुरुवातीपासून चरबी साठण्यास सुरुवात होईल.
  • बाळाच्या शरीरात श्वसन प्रणाली ही संपूर्णतः विकसित होईल. त्यामुळे जरी बाळाचा जन्म ७व्या महिन्यांनंतर झाला तरी काहीही धोका नसतो.
  • बाळाची पोटातील स्थिती ही बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर अवलंबून असते आणि बाळ आता खूप झोपू लागेल.
  • गर्भधारणेच्या ७व्या महिन्यात बाळाचे वजन हे ९००१००० ग्रॅम्स किंवा किलो पेक्षा थोडे जास्त वाढलेले असू शकते.

महिन्यांचे गर्भवती असताना काय करावे आणि काय करू नये

तुम्ही तिसऱ्या तिमाहीच्या जवळ असताना तुम्हाला तुमच्या आहाराच्या आणि इतर बाबतीत जास्त जागरूक राहावे लागते. व्या महिन्यात घ्यायच्या काळजीबाबतची यादी खाली दिली आहे.

हे करा

  1. नियमित चालायला जा. मध्येच थोडी विश्रान्ती घेऊन लहान अंतर चालणे हे तब्येतीसाठी चांगले असते. एकाच जागेवर खूप वेळ बसणे टाळा. तुमचे शरीर जितके सक्रिय आणि लवचिक असेल तितके चांगले.
  2. छंद जोपासा. त्यामुळे तुम्हाला आनंदी आणि आरामदायक वाटेल. तुमच्या मनावर नको असलेला ताण आणि विचार घेऊ नका. छंद म्हणजे पुस्तक वाचणे, झाडांना पाणी घालणे, पेंटिंग आणि गाणे म्हणणे ह्यापैकी कुठलाही असू शकतो. त्यामुळे तुम्ही शांत रहाल, तसेच लक्ष एकाग्र होईल.
  3. मेडिटेशन आणि श्वासाचे व्यायाम करा. त्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि तुम्ही आरामदायक रहाल. दिवसातील १०१५ मिनिटे एका लयीत श्वास घ्या.
  4. गर्भधारणेदरम्यान नियमित व्यायाम केल्याने तुम्ही सक्रिय राहून तुमची तब्येत चांगली राहील. तसेच प्रसूतीनंतर तुम्ही लवकर रिकव्हर व्हाल. तुमच्या ट्रेनरने शिकवलेले बेसिक स्ट्रेचेस नियमित करा.
  5. लोह समृद्ध अन्नपदार्थ खा उदा: अंडी, फळे, सीरिअल्स, हिरव्या पालेभाज्या, लाल मांस तसेच व्हिटॅमिन सी. डॉक्टरांनी दिलेल्या पूरक औषधांबरोबरच लोहाचे हे नैसर्गिक स्रोत हे महत्वाचे आहेत.
  6. नियमित रक्ताच्या चाचणीनुसार तुमच्या हिमोग्लोबिन च्या पातळीवर लक्ष ठेवा. विशेषकरून ज्यांचा रक्तगट नेगेटिव्ह आहे त्यांनी रक्ताच्या चाचणीच्या निकालावर लक्ष दिले पाहिजे.

हे करू नका

  1. तुमच्या बाळासाठी तुमची झोपण्याची योग्य स्थिती ही अतिशय महत्वाची आहे. डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या मूत्रपिंडाचे आणि यकृताचे कार्य नियमित राहील.
  2. धूम्रपान आणि अल्कोहोल घेणे टाळा. तसेच तुम्ही धूम्रपान करणाऱ्यांच्या सानिध्यात नाही ना ह्याची खात्री करा कारण धूर जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास ते हानिकारक ठरू शकते.
  3. ७व्या महिन्यानंतर तुम्ही वाकू शकणार नाही तसेच जास्त खाली मान घालून बसू नका. कायम शरीराची स्थिती योग्य ठेवा.
  4. काळजी घ्या आणि आतापासून वजन उचलणे टाळा. जड वस्तू उचलण्याचे काम आता काही महिन्यांसाठी तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडे द्या.

अन्नपदार्थ

गर्भधारणेच्या ७व्या महिन्याच्या आहार खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सूचना काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत.

ह्या काळात तुमच्या बाळाची दृष्टी विकसित होते असते त्यामुळे तुम्ही ओमेगा फॅटी ऍसिड्स घेतले पाहिजेत. ह्यामुळे तुमच्या बाळाच्या वाढीची प्रक्रिया वाढेल. तुम्ही मासे, अंडी आणि समुद्री मासे खाऊ शकता, ते ओमेगा फॅटी ऍसिड्स चे समृद्ध स्रोत आहेत.

तसेच, लोह आणि व्हिटॅमिन सी ने समृद्ध फळे आणि भाज्या खा. ह्या काळात लोह घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही मासे, अंडी आणि सी फूड खाऊ शकता आणि ते ओमेगा फॅटी ऍसिड्स चे समृद्ध स्रोत आहेत.

तसेच, व्हिटॅमिन सी आणि लोहाने समृद्ध फळे आणि भाज्या खा. लोहाचे योग्य प्रमाण हे अतिशय गरजेचे आहे. तुम्ही पालक, मांस, अंडी वगैरेंचा तुमच्या आहारात समावेश केला पाहिजे ज्यामध्ये लोहाचा नैसर्गिक स्रोत असतो.

गर्भारपणाच्या सातव्या महिन्यात घ्यावयाची काळजी

तिसऱ्या तिमाही साठी काही टिप्स इथे देत आहोत:

  1. गर्भारपणात संप्रेरकांमधील बदलांमुळे काही वेळा मनःस्थितील बदलांमुळे भावनिक होणे किंवा चिंता वाटणे हे नॉर्मल आहे. जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल तर मन शांत राहणे कठीण आहे. आरामदायक राहण्याचा प्रयत्न करा आणि तिसऱ्या तिमाहीत उग्र भावनांसाठी तयार रहा.
  2. प्रसूती विषयी आणि बाळाच्या जन्माविषयी वाचा. तुम्हाला त्याविषयी जास्त माहिती मिळेल. त्यामुळे तुम्ही प्रसूती साठी तयार व्हाल.
  3. आठवड्याच्या शेवटी सुट्टी घ्या, तुमच्या पतीबरोबर जवळच्या रिसॉर्ट वर जा त्यामुळे तुम्हाला स्पेशल वाटेल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल.
  4. तुमच्या चिंता आणि भीती विषयी तुमच्या साथीदारासोबत बोला. त्यामुळे तुमचा ताण कमी होईल आणि तुमचा त्यांच्याबरोबरच बंध भक्कम होईल. तसेच, ते तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतील.
  5. बाळाच्या आगमनाची तयारी करा. बाळाची खोली चांगली सजवा कारण ते बाळ लवकरच तुमच्या कुटुंबाचा एक भाग होणार आहे. असामान्य नावे शोधा. तुम्ही दोघे काही पॅरेंटिंग सेमिनार्सना सुद्धा जाऊ शकता.
  6. जर तुम्ही नोकरी करत असाल तर ही वेळ बाळंतपणाच्या रजेची आहे. ऑफिसच्या ताणातून थोडा ब्रेक घ्या आणि घरात आराम करा आणि तुमच्या कुटूंबाच्या सोबत रहा.

डॉक्टरांच्या दवाखान्यात काय अपेक्षित आहे?

जर तुम्हाला काही मोठे प्रश्न आणि समस्या नसतील तर आता इथून पुढे तुम्हाला महिन्यातून वेळा डॉक्टरांकडे जावे लागणार आहे. प्रत्येक चेकअप च्या वेळी तुमचे वजन आणि उंची तपासली जाईल. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या सूचना तुम्ही पाळत आहात ना ह्याकडे लक्ष द्या. आर. एच. नेगेटिव्ह मातांना सातव्या महिन्यात आर. एच. इम्यून ग्लोबीन सातव्या महिन्यात दिले जाते. आईच्या अँटीबॉडीज पासून संरक्षण होण्यासाठी ते दिले जाते.

ह्या महिन्यात पोटातील बाळाच्या विकास जाणून घेण्यासाठी आणि जन्माच्या वेळेला काही दोष येऊ नयेत म्हणून होणाऱ्या आईला सोनोग्राफी करून घ्यावी लागते.

जर तुम्ही खालील परिस्थिती अनुभवत असाल तर तुम्ही डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधा.

  • कंबरेत खूप दुखणे आणि दाब जाणवणे
  • ओटीपोटाच्या भागात दाब जाणवणे आणि कंबरेत मांड्यांमध्ये तो पसरणे.
  • जर तुम्हाला लालसर चॉकलेटी स्त्राव होत असेल तर

अफाट आनंद, उत्कंठा आणि भावनिक संवेदना तुम्हाला तिसऱ्या तिमाहीमध्ये अनुभवण्यास मिळतील. वर दिलेल्या टिप्स पाळा आणि आनंदी, आरामदायक स्थितीत रहा. सकारात्मकता आणि आनंद हा आनंदी पालकत्वाची गुरुकिल्ली आहे.

गोंडस बाळाच्या आगमनासाठी स्वतःला तयार करा!

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article