Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना गर्भधारणेसाठी प्रयत्न करताना वजन जास्त आहे आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात का?

वजन जास्त आहे आणि गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात का?

वजन जास्त आहे आणि गर्भधारणेसाठी  प्रयत्न करत आहात का?

हे सर्वज्ञात आहे की तुम्ही निरोगी असल्यास आणि तुमची जीवनशैली निरोगी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप जास्त असते. वजन जास्त असल्यास गर्भधारणेची शक्यता कमी होते कारण संप्रेरकांची पातळी वर खाली होत असते. ओव्यूलेशन वर त्याचा परिणाम होतो आणि स्त्रीबीजाची गुणवत्ता सुद्धा कमी होते. जास्त वजनामुळे ओव्यूलेशन वर परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. लठ्ठ असूनही औषधांशिवाय गर्भधारणा होत असेल तरी, जास्त वजनामुळे मासिक पाळी अनियमित होते.

लठ्ठपणामुळे स्त्रीच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होतो का?

वजन जास्त असल्यामुळे वंध्यत्व येऊ शकते का? तर, हो येऊ शकते. जी जीवनशैली आपण अवलंबतो आणि ज्या गोष्टींची निवड आपण करतो ते  सर्व घटक आपण निरोगी राहणार आहे किंवा नाही हे ठरवतात. निरोगी गर्भधारणा झाल्यास नवजात बाळ सुद्धा निरोगी असते. वजन जास्त असल्यास निरोगी गर्भधारणेची शक्यता कमी होते. गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास, लठ्ठपणाचा त्यावर कसा परिणाम होतो ते पाहूयात.

१. संप्रेरकांचे असंतुलन

सर्व अवयवांचे कार्य सुरळीत रहावे म्हणून शरीर खूप वेगवेगळ्या संप्रेरकांची निर्मिती करीत असते. जास्त वजनामुळे संप्रेरकांचे असंतुलन होते आणि त्याचा परिणाम शरीराच्या कार्यक्षमतेवर होतो. लठ्ठ स्त्रियांमध्ये ‘लेप्टीन’ संप्रेरक जास्त प्रमाणात असते, हे संप्रेरक शरीरातील चरबीमुळे तयार होते आणि शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनास ते कारणीभूत असते.

संप्रेरकांचे असंतुलन

२. अनियमित मासिक पाळी

संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे, मासिक पाळी अनियमित होते. मनःस्थितीत बदल होतात. तसेच स्त्रीबीज सोडण्याची प्रक्रिया सुद्धा अनियमित होते. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी शारीरिक संबंध केव्हा ठेवावेत ते ठरवणे अवघड होते.

३. स्त्रीबीजांची गुणवत्ता

स्त्रीबीजाची गुणवत्ता स्त्रीच्या आरोग्यावर अवलंबून असते. जर तुमचे शरीर निरोगी असेल तर स्त्रीबीज सुद्धा निरोगी असते. परंतु जर तुमचे वजन जास्त असेल तर स्त्रीबीजाची गुणवत्ता संमिश्र असते. लठ्ठपणाचा ओव्यूलेशनवर परिणाम होतो, म्हणजेच यशस्वी गर्भधारणेसाठी अंडाशयातून गर्भाशयात स्त्रीबीज सोडले जात नाही.

स्त्रीबीजांची गुणवत्ता

४. इन्सुलिन प्रतिरोधक

जास्त वजनामुळे इन्सुलिनला प्रतिरोध होतो, ह्यामध्ये शरीर जास्त इन्सुलिन तयार करते जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहील. ज्या स्त्रियांच्या पोटावर जास्त चरबी असते त्यांच्यामध्ये ही समस्या आढळते. शरीरात इन्सुलिनची पातळी वाढल्यामुळे, ग्लोब्युलीन ह्या प्रथिनाची पातळी कमी होते. ग्लोबुलीन इस्ट्रोजेन आणि अँड्रोजेन ह्या संप्रेरकांची पातळी नियंत्रित ठेवते.

५. प्रजनन क्षमतेवर परिणाम

अनियमित पाळीमुळे, स्त्रीबीज तयार होण्याची प्रक्रिया अनियमित होते आणि त्यामुळे गरोदर राहण्याची शक्यता कमी होते. जास्त वजन असणे किंवा लठ्ठपणामुळे तुमच्या प्रजननक्षमतेवर मोठा परिणाम होतो आणि IVF अयशस्वी होण्याची शक्यता देखील वाढते.

प्रजनन क्षमतेवर परिणाम

वजन जास्त असल्यास, गर्भधारणेसाठी काही टिप्स

वजन जास्त आहे आणि आई व्हायचंय? आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. जरी वजनाच्या काट्यावर तुमचे वजन जास्त दिसत असले तरीही तुम्ही गर्भवती होणे कठीण नाही. आम्ही तुम्हाला यशस्वी गभधारणेसाठी काही टिप्स देत आहोत.

१. आरोग्यपूर्ण जीवन शैली

मद्यपान, धूम्रपान आणि अमली पदार्थांचे सेवन टाळा. पोषक अन्न खा. तुम्ही तुमचे जेवण स्वतः तयार करा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल तुम्ही नक्की काय खात आहात आणि तुम्ही त्यातील घटकांवर नियंत्रण सुद्धा ठेवू शकता.

२. गर्भधारणेच्या आधी तपासणी

ज्या स्त्रियांचे वजन जास्त आहे अशा स्त्रियांमध्ये अंडाशयामध्ये सिस्ट आढळते. ह्या स्थितीला PCOS असे म्हणतात. जास्त वजनामुळे शरीरात संप्रेरकांचे असंतुलन होते आणि त्यामुळे PCOS होतो. वजन कमी करणे आणि योग्य औषधोपचार घेतल्याने PCOS यशस्वीरीत्या कमी होतो.

गर्भधारणेच्या आधी तपासणी

३. योग्य वेळ

जास्त वजनामुळे ओव्यूलेशन अनियमित होते. औषधांच्या दुकानात मिळणारे ओव्यूलेशन किट ची मदत घेऊन तुम्ही शारीरिक संबंध केव्हा ठेवावेत जेणेकरून गर्भधारणेची शक्यता वाढेल हे जाणून घेतले पाहिजे.

४. भरपूर व्यायाम

ज्या स्त्रियांचा बीएमआय ३० किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना गर्भारपणात मधुमेह किंवा उच्चरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. घरी व्यायाम करा किंवा बागेत व्यायामासाठी जा त्यामुळे तुम्ही निरोगी राहून गर्भवती राहण्याची शक्यता वाढते.

भरपूर व्यायाम 

५. संपूर्ण आहार घ्या

संपूर्ण आहार घेतल्याने तुमचे पोट खूप वेळ भरलेले राहते. त्यामुळे तुमची प्रतिकार यंत्रणा मजबूत होते. तुमचे वजन सुद्धा आटोक्यात राहते आणि त्यामुळे गर्भधारणेसाठी मदत होते.

आरोग्यपूर्ण सवयींमुळे निरोगी गर्भधारणा आणि निरोगी बाळ होण्यास मदत होते. तुमच्या जास्त वजनामुळे तुमच्या आई होण्याच्या स्वप्नाला तडा जाऊ नये. जर तुम्ही गर्भधारणेचे योग्य नियोजन केलेत तुमच्या जास्त वजनाच्या प्रश्नावर काम केलेत, तर तुमची गर्भधारणा यशस्वी होऊ शकते.

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article