दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ४० आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

तुमचे बाळ प्रत्येक आठवड्याला एक नवीन कौशल्य शिकते, त्यामुळे तुम्हाला त्याचा अभिमान वाटतो. तो रांगायला लागलेला असावा (किंवा कदाचित नसेलही). बाळ आता इकडे तिकडे हालचाल करत असेल आणि शारीरिक विकासाशी संबंधित नवीन टप्पे गाठत असेल. तुमचे घर बेबी प्रूफ करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. ४० व्या आठवड्यात, तुमच्या बाळाचा भाषेचा विकास देखील जलद गतीने होईल, म्हणून तुम्ही त्याला बोलायला लावण्यासाठी आणि त्याचा शब्दसंग्रह सुरुवातीपासूनच वाढण्यासाठी संभाषणात गुंतवून ठेवावे. ह्या आठवड्यात बाळाचा खूप विकास होईल. तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचा येथे मागोवा घ्या. तो साध्य करू शकणारे विविध टप्पे जाणून घ्या आणि या काळात तुम्ही त्याची काळजी कशी घ्यावी ते शोधा.

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाचा विकास

४० व्या आठवड्यात, तुम्हाला तुमच्या बाळाच्या व्यक्तिमत्त्वात विकास झालेला दिसून येईल. बाळाचा सामाजिक सहभाग वाढेल आणि तो प्रत्येकाकडे हसून बघेल आणि लाजेल. जेव्हा नवीन लोक त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तो चेहरा लपवेल. लहान बाळे १० महिन्यांची झाल्यावर त्यांच्या आयुष्यात नवीन कोणाला तरी स्वीकारण्यापूर्वी ती परिस्थितीचे आकलन करू लागतात. त्यामुळे बाळाला जलद आणि तीव्र मूड स्विंग देखील होऊ शकतात. बाळ तुमचे लक्ष वेधण्यासाठी हावभाव करू लागेल आणि तुम्ही घर सोडत असल्याचे सूचित करता तेव्हा ते तुम्हाला टाटा देखील करू शकतात. हे असे वय आहे जेव्हा तुमचे बाळ एकटे उभे राहण्यास सक्षम असेल.

आणखी वाचा: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमच्या ४० आठवड्याच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

खाली काही टप्पे आहेत. हे टप्पे तुमच्या बाळाने साध्य केलेले असू शकतात

आणखी वाचा: ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाला आहार देणे

४० आठवड्यांच्या बाळांसाठी पाण्याच्या बाटल्या हे एक अतिशय मोठे आकर्षण बनते. ह्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे त्या बाटलीतले पाणी आणि दुसरे म्हणजे बाटली घरंगळत पुढे सरकते तेव्हा बाळांना खूप कुतूहल वाटते. तुमचे बाळ तुम्हाला पाणी पिताना पाहील आणि तुमचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करेल. जर तुमचे बाळ इतर बाळांसोबत वेळ घालवत असेल तर तुम्हाला त्याच्या हातातून सीपी कप परत घ्यावे लागतील. तुमच्या बाळाला कपमधून पिण्यास शिकवण्यासाठी ४० आठवड्यांचे वय चांगले आहे. बाळाला त्याचे बरेचसे हायड्रेशन स्तनपानातून मिळते. बाळाचे स्तनपान सोडवण्यासाठी आणि त्याला सिपिकपची सवय लावण्यासाठी त्याच्या पाण्याच्या बाटलीच्या आवडीचा उपयोग करून घेतला पाहिजे. तुमच्या बाळाने कप मधून पाणी किंवा दूध पिणे चांगले. खूप जास्त प्रमाणात साखर असलेला ज्यूस बाळाला दिल्यास दातांच्या समस्या आणि लठ्ठपणा वाढू शकतो त्यामुळे तुमच्या बाळाला, स्तनपान सुटल्यानंतर सुद्धा, कपमधून फक्त पाणी दूध पिण्याची सवय लावा. तुमच्या बाळाला प्रत्येक जेवणासोबत एक कप पाणी पिण्यास प्रोत्साहित करा, तसेच पाणी तहान शमवू शकते हे त्याला कळू द्या. दिवसभर तुमच्या बाळासोबत एक सिप्पी कप ठेवा जेणेकरून तो पाहिजे तेव्हा पाणी पिऊ शकेल.

आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

तुमच्या ४० -आठवड्याच्या बाळाला ह्या टप्प्यावर अनेक वेगवेगळ्या आणि एकाच वेळी घडणाऱ्या घडामोडींमुळे झोपेचा त्रास जाणवेल. त्याला वरचे चार दात येऊ लागतील आणि त्यामुळे त्याला अस्वस्थता येईल. बाळाचा मानसिक विकास होत असतो, तसेच बाळ आता इकडे तिकडे फिरू शकते. दात येण्यामुळे होणारी वेदना त्याच्या झोपेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी आणि त्याला रात्री जागे ठेवण्यासाठी पुरेशी असेल. तो रात्री नीट झोपू शकत नसल्यामुळे, दिवसा चिडचिड करतो आणि तुम्हाला चिकटून राहतो. हिरड्यांचे सूज आल्यामुळे घट्ट अन्न खाल्ल्याने किंवा स्तन चोखल्याने दुखापत होऊ शकते त्यामुळे बाळ चिडचिड करू शकते. दात पूर्णपणे बाहेर आल्यानंतरच त्याला आराम मिळेल. तुमच्या बाळाची अस्वस्थता कमी होऊन झोप लागेपर्यंत तुम्ही बाळाला जवळ घेऊन बस. बरीचशी बाळे ह्या टप्प्यावर आईला चिकटून राहतात आणि दुसऱ्या कोणाकडे जाण्यास नकार देतात. त्यामुळे धीर धरा आणि दात येण्याच्या या वेदनादायक अवस्थेतून तुमच्या बाळाला मदत करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकता ते करा.

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी टिपा

तुमच्या ४० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्याचे काही मार्ग येथे आहेत:

चाचण्या आणि लसीकरण

तुमचे बाळ ४० -आठवड्याचे झाल्यावर शारीरिक तपासणी केली जाईल. बाळाच्या वैयक्तिक गरजांवर आधारित तपासणी डॉक्टरांकडून केली जाईल.

. चाचण्या

अशक्तपणा टाळण्यासाठी तुमच्या बाळाच्या रक्तातील लोह, हिमोग्लोबिन आणि शिसे यांची पातळी निश्चित करण्यासाठी डॉक्टर रक्त तपासणी करू शकतात.

. लसीकरण

जर तुमच्या बाळाला नियमितपणे लसींचे डोस दिले जात असतील तर डॉक्टर तुमच्या बाळाला गोवर लस आणि तोंडावाटे पोलिओच्या लसीचे थेंब देतील.

खेळ आणि उपक्रम

येथे काही खेळ आहेत. हे खेळ तुम्ही तुमच्या ४०-आठवड्याच्या बाळासोबत खेळू शकता:

. पीक--बू

हा खेळ तुमच्या बाळाची वेगळे होण्याची चिंता दूर करण्यास मदत करू शकतो. टॉवेलने तुमचा चेहरा लपवा आणि पुन्हा करा. ह्यामुळे ते तुम्हाला पाहू शकत नसले तरीसुद्धा तुम्ही शारीरिक रित्या उपस्थित आहात हे त्यांना समजेल.

. टाळ्या वाजवणे

टाळ्या वाजवण्याचा खेळ खेळा आणि तुमच्या बाळालाही प्रोत्साहन द्या. हा खेळ त्याला हाताच्या हालचालींचे समन्वय साधण्यास मदत करू शकतो.

. डोळे, नाक आणि तोंड

तुम्ही तुमच्या बाळाला त्याचे डोळे, नाक आणि तोंड कुठे आहेत ते दाखवायला सांगा. हा खेळ त्याला शरीराच्या वेगवेगळ्या भागांची नावे शिकण्यास मदत करू शकतो.

. नृत्य आणि गाणे

तुमचे बाळ आता चालण्यास सक्षम होणार असल्याने, तुम्ही त्याच्यासोबत नाचून आणि गाऊन त्याच्या हालचालींना आणखी प्रोत्साहन देऊ शकता.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

तुमच्या ४०-आठवड्याच्या बाळाच्या विकासाबाबत पुढील गोष्टींसाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या:

४० व्या आठवड्यात, तुम्ही तुमच्या बाळामध्ये शारीरिक आणि भाषेचा विकास झालेला पहाल. परंतु, जर तुमचे बाळ इकडे तिकडे हालचाल करत नसेल किंवा काही शब्द बोलत नसेल तर काळजी करू नका. त्याला थोडा वेळ द्या, प्रत्येक बाळाचा त्याच्या स्वतःच्या पद्धतीने विकास होईल. तुमचे बाळ नक्कीच हालचाल करू लागेल आणि तुम्ही जे बोलता त्याची पुनरावृत्ती करू लागेल.

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved