दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ३८ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

३८ आठवडे किंवा ९ महिन्यांच्या बाळाचा विकास होत असताना, त्यामध्ये आयुष्य बदलावणारे विकासाचे टप्पे येत असतात. ह्या टप्प्यांमध्ये बाळाचा होणारा विशिष्ट विकास, स्तनपान आणि इतरही टप्प्यांचा समावेश होतो. येथे आपण ३८ आठवड्याच्या बाळाचा विकास आणि काळजीविषयक टिप्स वर चर्चा करणार आहोत.

३८ आठवड्यांच्या बाळाचा विकास

ह्या टप्प्यावर बाळाचा विकास अगदी स्पष्ट दिसतो. परंतु, ३८-आठवड्याच्या बाळाच्या विकासाचे टप्पे प्रत्येक बाळाच्या वाढीच्या दरानुसार बदलू शकतात. ते काही बाळांमध्ये स्पष्ट दिसू शकतात आणि इतर बाळांमध्ये इतके स्पष्टपणे लक्षात येत नाहीत. बाळाचा विकास ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुमचे बाळ लवकरच किंवा नंतर हे टप्पे गाठेल.

बाळाच्या ह्या वयात होणाऱ्या विकासाच्या गतीबद्दल तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

बाळाचा होणार विकास विविध टप्प्यांमध्ये विभागला जाऊ शकतो. आम्ही त्यापैकी सर्वात लक्षणीय टप्पे इथे दिलेले आहेत.

आणखी वाचा: तुमच्या ९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

३८ आठवड्यांच्या बाळाचे विकासात्मक टप्पे

अडतीस आठवड्यांच्या बाळाच्या विकासाचे टप्पे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि वैद्यकीय गरजांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात:

. शारीरिक आणि मानसिक विकास

. सामाजिक विकास

. वैद्यकीय गरजा

वरील सर्व घडामोडी महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच कालावधीत बाळाचे स्तनपान सोडवण्याची आवश्यकता असते. बाळाच्या वाढीच्या ३८ व्या आठवड्यादरम्यान अन्न आणि झोप हे नेहमीच पालकांचे प्राधान्य असते. सर्वात आधी आहार आणि झोपण्याच्या विकासातील बदलांची चर्चा करूया.

आणखी वाचा: ९ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे टप्पे

बाळाला आहार देणे

ह्या काळात बाळ त्याच्या इवल्याश्या बोटांनी वस्तू पकडू लागेल. सुरुवातील तुम्ही बाळाला फिंगर फूड देऊ शकता. हे पदार्थ खाण्यास आणि पचायला सोपे असतात उदा: मऊ ब्रेडचे तुकडे, अंड्याचा पांढरा भाग, उकडलेले बटाट्याचे तुकडे इ.

केळी, पपई, एवोकॅडो, दात येताना द्यायची बिस्किटे आणि विरघळणारी बिस्किटे ह्यासारखे मऊ पदार्थ तसेच फळांच्या प्युरी, बाळाच्या तोंडात सहज विरघळू शकणारे अन्न सुरू करण्यासाठी देखील ही एक उत्तम वेळ आहे.

बाळांनी अन्नपदार्थ एक्स्प्लोर करण्याची ही वेळ असते. पास्ता, मासे, मांस इत्यादी अन्नपदार्थांचा परिचय करून देण्यासाठी ह्याचा उपयोग करून घ्या. ​​अन्नपदार्थांची ऍलर्जी कमी करण्यासाठी तुम्ही दर ३-५ दिवसांनी बाळाला नवीन अन्नपदार्थ सादर करावे. परंतु, इतर अभ्यासाद्वारे दर १-३ दिवसांनी नवीन अन्न वापरून पहाणे योग्य आहे असे निदर्शनास आलेले आहे.

लहान मुलांनाही तुमच्यासोबत अन्न शेअर करायला आवडेल. बाळाला आता विशिष्ट अन्नपदार्थ आवडू लागतील आणि त्यासाठी तुम्ही तयार रहा.

या सर्व प्रयोगांसह तुम्ही अजूनही स्तनपान करत असाल. परंतु, बाळाची स्तनपानाची गरज आता बदलेल. बाळाचे झोपेचे चक्र सुद्धा आता बदलेल.

आणखी वाचा: ९ महिन्याच्या बाळासाठी अन्नपदार्थांचे विविध पर्याय

बाळाची झोप

बाळ आता नवीन क्रियाकलाप करू लागेल. दिवसा आणि रात्री बाळाची झोप कमी होऊ शकते आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाळाला चिडचिड आणि थकवा येतो. बाळाला रात्रीची भीती वाटू शकते किंवा भयानक स्वप्ने देखील पडू शकतात.

बाळाला असुरक्षिततेची भावना येऊ शकते. बाळाला आई किंवा त्याची काळजी घेणाऱ्यांशिवाय इतर कोणाही सोबत झोपायचे नसते. तुम्ही बिझी असताना तुम्हाला बेबी कॅरियर ची सुद्धा गरज भासू शकते.

एका अभ्यासानुसार, -१२ महिने वयोगटातील ८% बाळे अजूनही रात्री किमान एकदा तरी नियमितपणे जागी होतात आणि ६१ % बाळे रात्री किमान एकदा दूध पितात. आता बाळाला स्तनपानाची फारशी गरज नाही. पुस्तक वाचणे किंवा कथा सांगणे यामुळे झोप येऊ शकते.

हे सर्व अतिशय सामान्य आहे आणि जलद शारीरिक आणि मानसिक विकासामुळे असे होते.

३८ आठवड्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी त्याविषयी काही टिप्स

ह्या टप्प्यावर बाळाची काही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे

ह्या टप्प्यावर बाळाच्या विकासाइतकेच वैद्यकीय गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहे आणि त्या खाली दिलेल्या आहेत.

चाचण्या आणि लसीकरण

आरोग्य मंत्रालय, भारत सरकार, गोवर लसीचा पहिला डोस बाळाच्या वयाच्या नऊ महिन्यांत देण्याची शिफारस करते. ही लस व्हिटॅमिन ए च्या तोंडी लशीसह १२ महिन्यांच्या आत दिली जाते. जपानी एन्सेफलायटीस लस (पहिला डोस) देखील विचाराधीन आहे.

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, बाळाच्या वयाच्या ९ व्या महिन्यात. तोंडी पोलिओव्हायरस लस ओपीव्ही, गोवर, गालगुंड आणि रुबेला लस एमएमआर १ ह्या लशींची शिफारस करते. तसेच टायफॉईड कॉन्जुगेट वॅक्सीन ची शिफारस ९-१२ महिन्यांदरम्यान करते.

डब्ल्यूएचओ मार्गदर्शक तत्त्वे शिफारस करतात की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस (एचपीव्ही) देखील ९ व्या महिन्यापासून शक्य तितक्या लवकर द्यावी. -१२ महिन्यांपासून गोवर लसीसह पिवळ्या तापाची लस द्यावी. मेनिन्गोकोकल एमईएनए कॉन्जुगेट लस ९-१८ महिन्यांपासून आणि कवाड्रिव्हॅलंट लस ९-२३ महिन्यांमध्ये द्यावी.

दुसर्‍या शिफारशीनुसार, बाळाला ६-१८ महिन्यांच्या वयापासून तिसरी हिपॅटायटीस बी लस (एचपीव्ही) आणि तिसरी पोलिओ लस (आयपी व्ही) देखील मिळू शकते आणि फ्लूची लस दरवर्षी दिली पाहिजे.

लसीकरणाचे काही दुष्परिणाम होऊ शकतात; कृपया लसीकरण करण्यापूर्वी तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

चाचण्या आणि तपासण्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे

खेळ आणि उपक्रम

बाळाला काही खेळ आणि क्रियाकलापांची ओळख करून देण्याची हीच वेळ आहे

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

बाळाचे स्तनपान सोडवत असताना, तुम्ही नियमित अंतराने बाळाच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. खालील गोष्टींवर चर्चा करणे आवश्यक आहे

३८ आठवड्यांच्या बाळाचा वेगाने विकास होतो आहे. तुम्‍हाला बाळासोबत राहण्‍याची आवश्‍यकता आहे, म्‍हणून कृपया तुम्‍ही बाळाची काळजी घेत असताना तुमची स्वतःची पण चांगली काळजी घ्या. तुम्हाला सुद्धा खूप ऊर्जेची आणि चांगल्या आरोग्याची गरज आहे!

मागील आठवडा: तुमचे ३७ आठवड्यांचे बाळ: विकास, विकासाचे टप्पे आणि काळजी

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved