दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे ३० आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

तुमचे लहान बाळ आता ३० आठवड्यांचे झाले आहे! त्याची केवळ शारीरिकरित्या वाढ होत नाही तर तो बौद्धिकदृष्ट्या देखील जागरूक होत आहे. तुमच्या बाळाला तुमचा आणि दररोज नजरेस पडणाऱ्या ओळखीच्या लोकांचा सहवास आवडतो. तो अधिक सामाजिक होत आहे आणि त्याची मोटर कौशल्ये वेगाने विकसित होत आहेत. या लेखात आम्ही तुमच्या ३० आठवड्यांच्या बाळाबद्दल तसेच पालक म्हणून तुम्ही तुमच्या बाळाच्या वाढ आणि विकासासाठी काय करू शकता याबद्दल चर्चा करू.

३० आठवड्यांच्या बाळाचा विकास

सुमारे ३० आठवड्यांत (किंवा सात महिने) तुमच्या बाळामध्ये अधिक चांगली संज्ञानात्मक क्षमता आणि स्मरणशक्ती विकसित झालेली आहे. पुढे काय होणार आहे याची त्याला कल्पना येऊ शकेल. तुम्ही बिस्किटांच्या डब्याचे झाकण उघडल्यास, ट्रीट मिळणार असल्याचे त्याला समजते. संध्याकाळी त्याचे बाबा कामावरुन घरी परत येण्याची तो वाट बघेल . तो स्पर्श, भावना, श्रवण आणि गंध यांच्या संवेदनाक्षम कौशल्यांवर अधिक अवलंबून आहे. आपले बाळ आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या गोष्टींचे बारीक निरीक्षण करते. त्याची उत्तम मोटर कौशल्ये देखील अधिक चांगली विकसित होत आहेत आणि म्हणूनच तो त्याची खेळणी किंवा इतर वस्तू फेकताना, हलवताना आणि आपटताना तुम्ही ऐकू शकाल. बोटानी अन्नपदार्थ उचलण्याची कला देखील त्याने आत्मसात केलेली असेल आणि तो स्वतःच्या हाताने खाऊ शकेल. ३० व्या आठवड्यात बाळाची आकलनक्षमता उत्तम झालेली आहे. आणि जसजशी बाळाची वाढ होईल तशी ती आणखी वाढेल. परंतु ह्या वयात बाळ डावखुरे आहे की सामान्य हे तुम्हाला समजणार नाही. परंतु काही बाळांच्या बाबतीत ते तीन महिन्यांच्या वयामध्ये दिसून येते. तथापि, बहुतेक बाळ जन्मानंतर पहिल्या वर्षामध्ये आपले दोन्ही हात वापरतील.

३० आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

येथे काही टप्पे आहेत जे तुमचे बाळ ३० आठवड्यांचे होईपर्यंत साध्य करू शकतात: तुमच्या लक्षात येतील असे काही वाढीचे टप्पे तुमचे बाळ गाठेल. तथापि, प्रत्येक मूल भिन्न आहे आणि वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे टप्पे साध्य करू शकते

बाळाचा आहार

तुमचे बाळ जवळजवळ आठ महिन्याचे आहे! आता, त्याने कदाचित विविध प्रकारचे घन पदार्थ खाण्यास सुरुवात केली असेल. तुमचे कुटुंब सहसा खात असलेल्या जवळजवळ सर्व खाद्यपदार्थाची तुम्ही त्याची ओळख करुन द्यावी. ऍलर्जीच्या भीतीमुळे एखादा खाद्यपदार्थ वगळू नका. तथापि, तुमच्या बाळाला कोणत्याही कच्च्या स्वरूपात अंडी देणे टाळा. बाळ अन्नपदार्थांना कशी प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी बाळाला एका वेळी एकाच अन्नपदार्थाची ओळख करून द्या. तुम्ही तुमच्या बाळाला घन आहार देताना त्याचे स्तनपान देखील चालू ठेवावे. काही बाळांना लैक्टोज असहिष्णुता वाढू शकते आणि अशा परिस्थितीत, सोया दूध वापरले जाऊ शकते. आपल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत आहे आणि म्हणूनच, बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ देण्यामुळे त्याचा आहारातील संवेदनशीलतेचा धोका कमी होतो. तथापि, तुम्हाला कोणत्याही खाद्यपदार्थामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जिक प्रतिक्रिया आढळल्यास, तुमच्या बाळाला ते देणे टाळा आणि तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

बाळाची झोप

३० व्या आठवड्यात, तुमचे बाळ विकासात्मक आणि वाढीच्या समस्यांशी झुंज देत आहे आणि त्यामुळे तुम्हाला कदाचित एखादे दिवस झोपेचे वेळापत्रक अनियमित झाल्याचे लक्षात येईल आणि ते या वयातील मुलांमध्ये अगदी सामान्य आहे. दिवसा तुमच्या बाळाला दोन ते तीन वेळा छोटी झोप येऊ शकते. या वयात, त्याला तुमच्यासोबत झोपण्याची इच्छा असू शकते कारण त्याला खाटेवर एकटे झोपणे आवडत नाही. हा वर्तणुकीतील बदल विभक्त चिंतेमुळे (separation anxiety) देखील असू शकतो. आपल्याकडे काळजी घेण्यासाठी घरात इतर मुले असल्यास बाळाचे तुम्हाला सतत चिकटून राहणे तुम्हाला त्रासदायक वाटू शकते. काही डॉक्टर बाळासोबत त्याच पलंगावर झोपायची शिफारस करतात कारण यामुळे आई आणि बाळाला शांत झोप घेण्यास मदत होईल. हे देखील लक्षात आले आहे की या वयाच्या आसपासची मुले त्यांचे दिवसा खाणे कमी करतात आणि रात्रीचे दूध पिणे वाढवतात. दैनंदिन कामांमध्ये व्यत्यय न आणता त्यांच्या आहार गरजा व्यवस्थापित करण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. तुमच्या ३० आठवड्यांच्या बाळाची झोप थोडी विस्कळीत वाटू शकते. परंतु लवकरच तो झोपेच्या चांगल्या वेळापत्रकांचे अनुसरण करू शकेल.

३० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

तुमच्या बाळास चांगल्या प्रकारे विकासात्मक टप्पे गाठण्यात मदत करण्यासाठी येथे काही टिप्स आहेतः

चाचण्या आणि लसीकरण

जेव्हा तुम्ही तुमच्या बाळास ३० आठवड्यांच्या आरोग्य तपासणीसाठी घेऊन जाता तेव्हा आपल्या डॉक्टरांना खालील चाचण्या कराव्या लागतात. आपल्या बाळाला खालील लसी लागू होऊ शकतात तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे बाळाच्या लसीकरण वेळापत्रकाची चौकशी करू शकता

खेळ आणि क्रियाकलाप

तुम्ही तुमच्या बाळासोबत विविध प्रकारचे खेळ खेळू शकता आणि चांगल्या प्रकारे संज्ञानात्मक, मोटार, ऐकणे आणि संप्रेषण कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला विविध क्रियांमध्ये गुंतवू शकता. तुमच्या बाळास ध्वनी, गाणे आणि बोलणे अशा क्रियाकलापांमध्ये सहभागी होणे आवडते. तुम्ही गात असताना किंवा गुणगुणत असताना थोडा वेळ थांबलात तर पुढे काय होणार ह्या उत्सुकतेपोटी तुमचे बाळ तुमच्याकडे बघत राहील. येथे काही खेळ आणि क्रियाकलाप आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बाळास गुंतवू शकता: चांगल्या संज्ञानात्मक विकासासाठी: उत्तम मोटर कौशल्ये विकसित करण्यासाठी:

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा

वर नमूद केलेले सर्व टप्पे सहसा ३० आठवड्यांचे बाळ पार करते. तथापि, काही बाळे हे विकासाचे टप्पे ३० आठवड्यांपेक्षा आधी किंवा नंतर गाठू शकतात. हे अगदी सामान्य आहे, कारण प्रत्येक बाळ वेगळे असते. तथापि, जर आपले बाळ खालीलपैकी कोणत्याही लक्षणांचे प्रदर्शन करीत असेल तर आपण शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशी शिफारस केली जाते: तुमच्या बाळामध्ये यापैकी कोणतीही चिन्हे दिसल्यास तुम्ही तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी कारण तुमच्या बाळास विकासाची समस्या उद्भवू शकते. वेळेवर वैद्यकीय हस्तक्षेप आणि काळजी घेऊन, बहुतेक विकासात्मक समस्या हाताळल्या जाऊ शकतात. मागील आठवडा: तुमचे २९ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ३१ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved