दर महिन्याला होणारा बाळाचा विकास

तुमचे २९ आठवड्यांचे बाळ – विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी

२९ आठवड्यांच्या वयापर्यंत, तुमच्या बाळास तिच्या सभोवतालची माहिती झालेली आहे आणि मूलभूत बाह्य उत्तेजनांना जसे की आवाजाला बाळ प्रतिसाद देऊ लागलेले आहे. इतकेच नाही तर, काही वेळेला बाळ त्याच्या मागण्यांसाठी हट्ट करते. हे सर्व सामान्य आहे का? या लेखाच्या माध्यमातून, तुम्ही २९ आठवड्यांच्या बाळाकडून काय अपेक्षा करू शकता याबद्दल आम्ही मार्गदर्शन करू.

२९ आठवड्यांच्या बाळाचा विकास

तुमच्या २९ आठवड्यांच्या बाळाची वाढ अतिशय वेगाने होत आहे. हि वाढ वेगवेगळ्या स्तरांवर असू शकते. यापैकी सर्वात प्रमुख म्हणजे दुधाचे दात, हे दुधाचे दात आता सगळ्यांना दिसू लागतात. तुमच्या छोट्या बाळाचे जवळजवळ तीन लहान दात बाहेर येऊ शकतात. तुम्हाला लक्षात येईल की बर्‍याचदा हे दात थोडे वाकलेले असतात आणि सरळ नसतात. काळाच्या ओघात ते सरळ होतील त्यामुळे हे चिंतेचे कारण नाही. नियमित सराव केल्यास, तुमच्या बाळाचे हात आणि डोळ्याचे समन्वय सुद्धा लक्षणीयरित्या सुधारित होण्याची शक्यता आहे. तसेच, बाळ आता रांगू लागले आहे आणि बाळाचे पायाचे स्नायू आधीपेक्षा बळकट झालेले आहेत. परंतु या काळात आपण केवळ शारीरिक विकासच लक्षात घेत नाही. तिला 'हो' आणि 'नाही' अशा साध्या शब्दांचा अर्थ समजणे शक्य आहे. तिने तोंडी प्रतिसाद दिल्यास आश्चर्यचकित होऊ नका. तथापि, हा प्रतिसाद काही वेळेला अगदी अचूक किंवा शुद्ध असू शकत नाही. दुसरे म्हणजे, तुम्ही तिच्याकडून परिस्थितीनुसार आनंद आणि दुःख यासारखी मनःस्थिती विकसित करण्याची अपेक्षा करू शकता. शेवटी, तिच्या सभोवतालच्या वातावरणाविषयी तिची जागरूकता वाढलेली असेल आणि तिला दिवस व रात्र यांच्यात फरक लक्षात येऊ लागेल.

२९ आठवड्यांच्या बाळाचे वाढीचे टप्पे

तुमच्या बाळाने पूर्ण केलेले वाढीचे टप्पे खालीलप्रमाणे

बाळाचा आहार

आतापर्यंत, तुमच्या बाळाची पुरेशी वाढ झालेली आहे. तुम्ही आधीच तिला प्युरीचा स्थिर आहार देत आहात जो खायला आणि पचवायला सोपा आहे. तथापि, आता बाळाला फिंगर फूड देण्याची वेळ आलेली आहे. यामध्ये वाफवलेल्या भाज्यांसारखा पोषक आणि वापरण्यास सुलभ पर्यायाचा समावेश आहे. तुम्ही तुमच्या बाळासमोर दोन पदार्थ ठेवू शकता आणि तिला कुठले योग्य आहे ते तिला ठरवू द्या. तसेच आणखी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या वयातल्या मुलांमध्ये अजूनही खूप गॅग रिफ्लेक्स असतो. ही क्रिया कधीकधी गुदमरल्यामुळे गोंधळात टाकू शकते, कृपया आपल्या बाळाला खायला घालत असताना हे लक्षात घ्या

बाळाची झोप

२९ आठवड्यांच्या बाळाची झोप कधीकधी बऱ्याच काळासाठी अखंडित होऊ शकते. तथापि, खाली दिलेल्या कारणांमुळे बाळाच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो.

२९ आठवड्यांच्या बाळाच्या काळजीविषयक टिप्स

चाचण्या आणि लसीकरण

ह्या काळात खालील लसी दिल्या जातात जर घरातील एक किंवा अधिक सदस्यांना सक्रीय क्षयरोग असेल तर आपण क्षयरोगाची चाचणी करुन घेऊ शकता.

खेळ आणि क्रियाकलाप

. पोहणे

बाळांना पोहायला आवडते हे तुम्हाला माहिती आहे का? बाळे ६व्या आठवड्यापासून पोहणे सुरू करू शकतात आणि ते त्यामध्ये पारंगत असतात! पोहण्यामुळे संतुलन, स्नायू समन्वय आणि स्नायूंच्या एकूण विकासास मदत होते. तथापि, पालकांना संकोच वाटू शकतो आणि ते बरोबर सुद्धा आहे. तुम्हाला बरे वाटावे म्हणून काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. प्रथम, हे सुनिश्चित करा की तुम्ही तापमान जास्त असेल त्या दिवशी बाळाला पोहण्यासाठी घेऊन जात आहात. बाळ तापमानास संवेदनशील असते आणि दोन डिग्री अंश सेल्सिअसच्या खाली असलेल्या कोणत्याही तापमानामुळे थरथर जाणवते. दुसरे म्हणजे, बाळाला एकावेळी फक्त १० मिनिटे पाण्यात घाला, नंतर तुम्ही ही वेळ ३० मिनिटांपर्यंत वाढवू शकता. ज्या क्षणी बाळ थरथर कापू लागेल त्या क्षणी बाळाला बाहेर काढा आणि टॉवेलने पुसून घ्या. उबदार दुधाची बाटलीही सोबत ठेवा.

. चेंडू शोधा

हा एक सोपा खेळ आहे जो घरामध्ये खेळला जाऊ शकतो आणि दृश्य ओळख सुधारण्यास मदत करतो. आपल्या बाळाला आवडणारा एक चेंडू घ्या आणि त्यास आसपास लपवा. लपण्याची जागा सोपी असावी आणि जेव्हा ती बॉल शोधेल तेव्हा तिला आनंद होईल!

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

खालील परिस्थितीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत ज्या तुम्हाला २९ आठवड्यांच्या बाळाची वाढ आणि विकासाच्या बाबतीत माहित असणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही तुमच्या लहान बाळासोबत आनंद घ्या आणि तिच्याबरोबरचे सर्वोत्कृष्ट क्षण कॅमेरा किंवा वहीमध्ये टिपून ठेवा! मागील आठवडा: तुमचे २८ आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी पुढील आठवडा: तुमचे ३० आठवड्यांचे बाळ - विकास, वाढीचे टप्पे आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved