गर्भारपण

गरोदरपणात तोंड येणे (माऊथ अल्सर)

गर्भधारणा हा एक आव्हानात्मक टप्पा आहे. गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आणि संप्रेरकांच्या असंतुलनामुळे गरोदरपणात तोंडात अल्सर येऊ शकतात. परंतु, चांगली गोष्ट म्हणजे ह्या तोंडातील अल्सरमुळे कुठलीही गुंतागुंत निर्माण होत नाही. हे अल्सर सहजपणे व्यवस्थापित केले जाऊ शकतात. तसेच ते बरे होतात.

तोंड येणे (माउथ अल्सर) म्हणजे काय?

तोंडात येणारे हे उघडे फोड असतात. त्याला कोल्ड सोर्स किंवा ऍफथस स्टोमाटायटीस असेही म्हणतात. हे माऊथ अल्सर म्हणजे तोंडात आणि तोंडाभोवती येणारे, लाल रंगाच्या वर्तुळाने वेढलेले छोटे पांढरे किंवा पिवळे ठिपके असतात. आणि ते गरोदरपणात कधीही येऊ शकतात.

माउथ अल्सरचे प्रकार

ह्यामुळे आश्चर्य वाटू शकते, परंतु तोंडाच्या अल्सरचे देखील अनेक प्रकार आहेत:-

1. किरकोळ माउथ अल्सर

हा प्रकार गरोदरपणात खूप सामान्य आहे. तोंडातील किरकोळ व्रण हे साधारणतः 2-9 मिमी असतात. ते तोंडाच्या पायथ्याशी आणि हिरड्या किंवा जिभेवर येऊ शकतात. गरोदर स्त्रियांसाठी, तोंड आणि हिरड्याचे व्रण बरे होण्यासाठी 10 दिवस लागू शकतात, तर जिभेचे व्रण बरे होण्यासाठी 12 दिवसापर्यंतचा कालावधी लागू शकतो. बहुतेक वेळा हे व्रण आपोआप बरे होतात.

2. मोठे माउथ अल्सर

गरोदर स्त्रियांमध्ये तोंडाचे मोठे व्रण फारच असामान्य असतात. त्यांचा व्यास सुमारे 10 मिमी आहे आणि त्यांना बरे होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागू शकतात. हे व्रण जीभेच्या पृष्ठभागावर, हिरड्या, तोंडाच्या खाली आणि घशात देखील दिसू शकतात. ह्या अल्सरचे चट्टे राहू शकतात आणि ते अत्यंत वेदनादायक असू शकतात. या अल्सरवर डॉक्टरांनी उपचार केले पाहिजेत.

3. हर्पेटीफॉर्म अल्सर

या प्रकारच्या अल्सरचा व्यास 1 मिमी इतका लहान असतो. अश्या प्रकारच्या अल्सरचे डाग बहुधा डझनभरांच्या समूहामध्ये अनेक ठिकाणी दिसतात. बरे होण्यासाठी 2 किंवा 3 आठवडे लागतात आणि डाग तसेच राहू शकतात.

कारणे

गरोदरपणामध्ये अल्सर कधीही होऊ शकतो. ते का होतात हे तुम्हाला माहीत असल्यास, प्रतिबंध आणि उपचार सोपे होतात

1. ताण

ताण हा तोंडाच्या अल्सरच्या मुख्य कारणांपैकी एक आहे.

2. आहार

व्हिटॅमिन बी 12 सारखी आवश्यक जीवनसत्त्वे तसेच जस्त किंवा लोह ह्या सारख्या खनिजांची कमतरता आणि असमतोल आहारामुळे देखील तोंडात अल्सर होऊ शकतो.

3. झोप कमी होणे

झोपेची कमतरता आणि तणावामुळे शरीरात हार्मोनल आणि रासायनिक असंतुलन होऊ शकते. त्यामुळे दुष्परिणाम होऊ शकतात. तोंडात अल्सर येणे हा त्यापैकीच एक दुष्परिणाम आहे.

4. रोग प्रतिकारशक्तीमध्ये बदल

कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे तोंडाच्या अल्सरचा उद्रेक होऊ शकतो.

5. संप्रेरकांमधील बदल

संप्रेरकांमध्ये वेगाने होणारा बदल शरीराच्या रासायनिक रचनेत बदल करू शकतो, त्यामुळे तोंडात अल्सर होऊ शकतात.

लक्षणे

तोंडाच्या अल्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे तोंडाच्या आत जखम होणे. खालील लक्षणे दिसत असतील तर तुम्ही तोंडाचा अल्सर ओळखू शकता. गरोदरपणाच्या तिसर्‍या तिमाहीत तोंड आल्याने ऊर्जा कमी होऊन आळस येऊ शकतो.

उपचार

तुम्ही तोंडाचा अल्सर नैसर्गिकरित्या बरा करू शकता किंवा औषधोपचाराने त्यावर उपचार करू शकता. कोणतेही औषध वापरण्यापूर्वी, तुमच्या स्त्रीरोगतज्ञाचा सल्ला घ्या आणि जोखीम असल्यास समजून घ्या. मलम हा अल्सरवर उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे परंतु काहींमध्ये स्टिरॉइड्स असतात त्यामुळे गर्भधारणेवर परिणाम होऊ शकतो.

तोंडाच्या अल्सरवर उपचार करण्याचे नैसर्गिक मार्ग

अ‍ॅलोपॅथिक औषधांव्यतिरिक्त, तोंडाच्या फोडांवर नैसर्गिक उपाय देखील आहेत. 1. हळद - हळद एक उत्तम नैसर्गिक जंतुनाशक आहे आणि दाहक-विरोधी देखील आहे. हा आशियाई पदार्थांमध्ये सामान्यतः वापरला जाणारा घटक आहे. भारत, थायलंड आणि श्रीलंकेच्या काही भागांमध्ये अल्सरवर उपचार करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीचा अल्सरवर कसा परिणाम होतो ह्याचा अभ्यास अद्यापपर्यंत झालेला नाही.
2. ज्येष्ठमध- ज्येष्ठमध मूळ एक प्रभावी नैसर्गिक घटक आहे. ज्येष्ठमधाचे मोठ्या प्रमाणात आरोग्य विषयक फायदे आहेत. नॉर्ड्सचा असा विश्वास आहे की गोड ज्येष्ठमध पचनमार्ग शुद्ध करते आणि खारट  ज्येष्ठमध रक्त शुद्ध करते. आइसलँडर्स आणि नॉर्वेजियन लोकांचा असा विश्वास आहे की खारट जेष्ठमध  तोंडाच्या अल्सरसाठी एक उत्तम उपचार आहे. ह्यास समर्थन देणारे कोणतेही अभ्यास नाहीत.

माऊथ अल्सर कसा टाळाल?

खालील टिप्स अल्सर टाळण्यास मदत करू शकतात.
दातांची स्वच्छता राखून चांगला आहार घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होईल. गरोदर असताना तोंडाच्या अल्सरचा सामना करण्यासाठी ताण तणावाचे व्यवस्थापन करणे देखील महत्वाचं आहे. संप्रेरके संतुलित करण्यासाठी आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रसवपूर्व योग करणे आणि ध्यान करण्यात थोडा वेळ घालवणे हा एक उत्तम मार्ग आहे. नवीन दिनचर्या सुरू करण्यापूर्वी, कोणतेही उपचार करण्यापूर्वी किंवा तुमच्या आहारात नवीन  खाद्यपदार्थांचा समावेश करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला. तुम्ही घेत असलेल्या औषधांचा डोस वाढवू नका किंवा स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. तोंड आल्याने तुमच्या गर्भारपणात आरोग्यावर कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. योग्य उपचाराने, तोंडातील अल्सर बरे होऊ शकतात. आणखी वाचा: गरोदरपणात दातांचे ब्लिचिंग करणे सुरक्षित आहे का? गरोदरपणातील दातदुखी आणि हिरडीतून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved