गर्भारपण

गरोदरपणात शरीराला येणारा दर्प: कारणे आणि उपाय

गरोदरपणात संप्रेरकांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात बदल होतो आणि ही संप्रेरके आपली संवेदनात्मक कार्ये आणि भावनांवर परिणाम करतात. पायाभूत चयापचय दरात बदल होतो आणि आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये म्हणजेच अंडर आर्म्स , योनी, गर्भाशय आणि शरीराच्या सर्व भागात रक्तप्रवाह वाढतो. अचानक तुम्हाला नेहमीसारखे उत्साही वाटेनासे होते. गरोदरपणात तुमची वासाची संवेदना अधिक तीव्र होते आणि तुमच्या शरीरातून येणार उग्र दर्प तुम्हाला नको वाटतो. गरोदरपणात येणाऱ्या ह्या शरीराच्या दर्पामुळे तुम्हाला ओशाळल्यासारखे वाटू शकते. स्तनपान सुरु झाल्यानंतर सुद्धा संप्रेरकांच्या पातळीत खूप बदल होतात आणि त्यामुळे शरीराला वास येतो. हा वास विशेषत: जननेंद्रिय आणि काखेकडील भागात जास्त जाणवतो. परंतु, गरोदर स्त्रियांमध्ये शरीराला दर्प येणे ही खूप सामान्य गोष्ट आहे.

गरोदरपणात शरीराला दर्प कशामुळे येतो?

एस्ट्रॅडिओल एक संप्रेरक आहे. ह्या संप्रेरकाची पातळी गरोदरपणात वाढते. त्यामुळे वास तीव्र होतो. बाहेरच्या गंधांना तोंड देणे सोपे आहे, परंतु आपल्या स्वत: च्या शरीराचा येणारा वास सहन होत नाही. दुर्गंधीयुक्त वासाची मूलभूत कारणं समजून घेतल्यास त्यांचा सामना करण्यात मदत होऊ शकते. गरोदरपणातील शरीराचा दर्प वाढण्यामागील प्राथमिक कारणे शोधण्यासाठी हा लेख वाचा.

. संप्रेरकांमधील बदल

शरीरातील हार्मोनल पातळीत तीव्र बदल झाल्याने, विशेषत: एस्ट्रॅडिओलच्या वाढलेल्या पातळीमुळे आपल्या शरीरात तीव्र वास तयार होतो. हार्मोन्स हे तीव्र गंधाचे मुख्य कारण आहे. संप्रेरकांना प्रभावित करणारे मुख्य भाग जननेंद्रिय आणि काखेचा भाग ही आहेत, म्हणूनच गरोदरपणात काखेमधून वास येणे गर्भवती मातांमध्ये सर्वात सामान्य आहे.

. अत्यधिक घाम येणे

गरोदरपणात, शरीराचे तापमान वाढते आणि गर्भवती स्त्रिया ह्या वाढलेल्या तापमानाप्रती कमी सहनशील असतात. आपल्या वाढलेल्या अतिरिक्त वजनामुळे थंड दिवसातही अधिक घाम येतो. गर्भवती महिलांमध्ये घाम ग्रंथी अतिसक्रिय होतात आणि शरीराचा गंध तीव्र करतात. घाम गंधरहित असतो. तथापि, गरोदरपणात जेव्हा तो त्वचेवर राहतो, तेव्हा जिवाणू वाढतात आणि त्यामुळे शरीराला येणारा वास वाढतो.

. वाढलेली संवेदनशीलता

हार्मोन्सच्या पातळीत वाढ झाल्याने, गर्भवती महिलांमध्ये वेगवेगळ्या लालसा आणि संवेदना अनुभवल्या जातात. तुमची वासाची भावना तीव्र होईल आणि तुम्हाला अगदी थोड्याश्या वासामुळे सुद्धा मळमळ होईल आणि काही वेळेला उलटीची भावना देखील तीव्र होईल. बहुधा आपल्या आसपासच्या लोकांना कदाचित हा वास येणार नाही परंतु तुम्हाला मात्र तो येईल. हे तुमच्या वाढलेल्या संवेदनशीलतेमुळे होते.

. स्तनपान करवण्याची तयारी

तुम्ही गर्भवती असताना, शरीर स्तनपान करवण्याच्या तयारीत असते. लक्षात ठेवा की आपल्या लहान मुलास योग्य श्रवण आणि दृष्टी विकसित होण्यास थोडा वेळ लागेल आणि तोपर्यंत, त्यांच्याकडे गंधाची तीव्र भावना असते ज्यामुळे त्यांना गोष्टी ओळखण्यास मदत होते. तुमच्या शरीराला येणाऱ्या गंधामुळे तुमचे बाळ तुम्हाला ओळखेल, आणि हे स्वाभाविक आहे की हा गंध तीव्र असल्यास बाळ तुमच्या अधिक जवळ येईल. आपल्या दुर्गंधीयुक्त काखांमुळे बाळ स्तनपानाच्या वेळी त्याचे तोंड स्तनांच्या दिशेने नेऊ शकेल जेणेकरून बाळाचे पोषण नैसर्गिक रित्या होईल.

. आहारात बदल

पोषक अन्न हा गरोदरपणाचा अविभाज्य भाग आहे आणि बहुतेक गर्भवती माता विविध प्रकारचे पौष्टिक पदार्थ खातात. ठराविक अन्नामुळे शरीराच्या गंधात बदल होतो. रेड मीटमध्ये अमीनो ऍसिड्स असतात. ज्यामुळे घाम काही तास किंवा काही दिवसांपर्यंत येतो आणि त्यामुळे शरीराला दर्प येतो. सीफूडमुळे केवळ घामाचा वास येत नाही तर योनिमार्गाचा स्त्राव देखील होतो. ब्रोकोली, कोबी आणि फुलकोबीसारख्या भाज्यांमध्ये सल्फर असते जे रक्तप्रवाहामध्ये शोषले जाते. त्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर घाम येतो. तसेच जिवाणूंच्या वाढीला पोषक असे वातावरण तयार होते आणि वास येतो. आपण घेत असलेली काही औषधे देखील शरीराच्या गंधात बदल घडवून आणू शकतात. बहुतेकदा, केवळ आपल्याच वासाची संवेदना वाढल्यामुळे आपल्याला ह्या गंधाची भावना येते. इतरांच्या प्रतिक्रियांबद्दल काळजी करू नका. तथापि, तुम्हाला विचित्र रंग किंवा गंध असलेल्या योनिमार्गाच्या स्राव जाणवत असल्यास, डॉक्टरांशी संपर्क साधा.

गरोदरपणात येणाऱ्या ह्या तीव्र गंधापासून सुटका होण्यासाठी काही टिप्स

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

वैयक्तिक स्वच्छतेचा एक दर्जा कायम ठेवल्यानंतर आणि खाणे अगदी योग्य असूनसुद्धा तुम्हाला शरीराचा तीव्र गंध जाणवू शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमचे डॉक्टर काही औषधी साबण सुचवू शकतात किंवा आपण घेत असलेल्या औषधांमध्ये काही बदल करु शकतात. लक्षात ठेवा की आपल्या शरीराला येणारा वास कधीही आपल्या बाळाला इजा करणार नाही आणि बर्‍याच वेळा तर हा वास, फक्त तुम्हाला येत असतो. शरीराच्या गंधापासून मुक्त होण्याचा आणि वैयक्तिक स्वच्छता राखण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे वर नमूद केलेल्या पद्धती आहेत. तर हे उपाय वापरून पहा, आणि शरीराला येणाऱ्या वासाचा खूप जास्त त्रास करून घेऊ नका कारण तो सुद्धा एक अनुभव आहे. आणखी वाचा: गरोदरपणात स्तनांमध्ये होणारी वेदना: कारणे, परिणाम आणि उपचार गरोदरपणात योनीला खाज सुटणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved