गर्भधारणेचे आठवडे

गरोदरपणाची पहिली तिमाही: लक्षणे, शारीरिक बदल आणि आहार

गर्भवती असणे ही प्रत्येक स्त्रीसाठी एक अद्भुत भावना असते. तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला कळताच तुम्ही मातृत्वाच्या भावनांनी भारावून जाता. परंतु, त्याच वेळेला तुमच्या मनात बाळाचा विकास कसा होत आहे किंवा तुम्ही कोणता आहार घेतला पाहिजे इत्यादी विविध विचार येऊ लागतात. आणि अशा अनेक प्रश्नांनी तुमचे मन भरून जाते. ह्याचे कारण म्हणजे तुमच्या गरोदरपणाच्या सुरूवातीस किंवा तुमच्या पहिल्या तिमाहीमध्ये, तुम्हाला आणि तुमच्या बाळाला त्रास न होता गरोदरपणाचा प्रवास करण्यासाठी काय करावे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असते.

व्हिडीओ:गरोदरपणाची पहिली तिमाही - काय अपेक्षित आहे?

https://youtu.be/NJZUK2zhS3U

पहिल्या तिमाहीचा कालावधी किती असतो?

ज्या क्षणी तुम्ही बाळाचा विचार करू लागता किंवा तुम्ही गरोदर राहता, तेव्हा तुम्हाला गरोदरपणात वेगवेगळी काळजी घ्यावी लागते. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत तुम्ही काळजी घेणे गरजेचे असते. आता तुम्ही विचार करत असाल कि पहिली तिमाही म्हणजे काय? त्याचा कालावधी किती काळ टिकतो? आमच्याकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत! तुमच्या पहिल्या तिमाहीचा कालावधी हा तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांचा असतो. पहिली तिमाही तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होते. गरोदरपणाच्या तेराव्या आठवड्यात तुम्ही दुसऱ्या तिमाही मध्ये प्रवेश करता. जर तुमची मासिक पाळी नियमित असेल तर तुम्ही गरोदरपणाच्या पहिल्या आठवड्याला सहज सामोरे जाऊ शकता, तथापि, अनियमित मासिक पाळी असलेल्या स्त्रियांसाठी ते थोडे अवघड असू शकते.

पहिल्या तिमाहीतील गरोदरपणाची लक्षणे

जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्ही गर्भारपणाच्या लक्षणांची आतुरतेने वाट पाहत असाल. येथे आपण तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीच्या लक्षणांवर चर्चा करणार आहोत.

1. तुमची पाळी थांबते: तुमच्या लक्षात येणारे गर्भधारणेचे पहिले लक्षण म्हणजे मासिक पाळी येत नाही. ह्याचे कारण म्हणजे तुमचे शरीर प्रोजेस्टेरॉनचे उत्पादन करण्यास सुरुवात करते, त्यामुळे तुम्ही तुमच्या बाळाला जन्म देईपर्यंत तुमची पाळी थांबते.

2. हलके डाग: गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात स्पॉटिंगचा अनुभव येणे खूप सामान्य आहे कारण गर्भाशयात भ्रूणाचे रोपण होत असते. रोपणाच्या प्रक्रियेमुळे स्पॉटिंग होऊ शकते तसेच पोटात पेटके येऊ शकता. परंतु पहिल्या तिमाहीत रक्तस्त्राव होणे सामान्य नाही. रक्तस्त्राव झाल्यास डॉक्टरांना कळवावे.

3. स्तनाची कोमलता: तुमचे स्तन दुखू शकतात आणि कोमल होतात. स्तनाग्रांच्या सभोवतालचा भाग म्हणजेच एरोला आणखी गडद होतो. तुम्हाला तुमच्या स्तनांवर शिरा देखील दिसू शकतात.

4. मनःस्थिती मध्ये बदल: तुम्ही तुमच्या बदलत्या मनःस्थितीशी सामना देत असता आणि ते गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे. गरोदरपणात संप्रेरकांमध्ये बदल होत असतात त्यामुळे मनःस्थितीत बदल होतात.

5. वारंवार लघवीला होणे: तुमच्या बाळाच्या वाढीला आणि विकासाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या ओटीपोटाजवळील भागाकडे रक्ताचा प्रवाह वाढतो. शरीरात वाढलेले द्रव सामावून घेण्यासाठी किडनीला जास्त काम करावे लागते. त्यामुळे मूत्राशयावर दाब पडतो आणि वारंवार बाथरूमला जावे लागते.

6. तुम्हाला थकवा जाणवू शकतो: तुमच्या शरीरात बरेच बदल होत असतात आणि ते सर्व सामावून घेण्यासाठी तुमच्या शरीराला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.

7. तुम्हाला बद्धकोष्ठता जाणवू शकते: बदलत्या हार्मोन्समुळे तुमचे शरीर वेगळ्या पद्धतीने काम करू लागते आणि त्यामुळे तुमच्या स्नायूंच्या कार्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. प्रोजेस्टेरॉन तुमच्या स्नायूंना रिलॅक्स करते आणि प्रसूतीसाठी ते तयार करण्यास सुरुवात करते. त्यामुळे तुमच्या शरीराची इतर कार्ये सुद्धा मंदावतात. अन्न आतड्यांमधून हळूहळू पुढे सरकते आणि त्यामुळे बद्धकोष्ठता होते.

8. अन्नाची लालसा आणि तिरस्कार वाटणे: जे खाद्यपदार्थ तुम्हाला आधी आवडत नसतील त्यांची तुम्हाला लालसा वाटू शकते. ह्याउलट तुमचे आवडते अन्नपदार्थ आता तुम्हाला आवडणार नाहीत. गरोदरपणात अन्नाची लालसा आणि तिरस्कार खूप सामान्य आहे आणि प्रत्येक स्त्रीसाठी ते वेगवेगळे असते.

9. मळमळ आणि उलट्या: गरोदरपणाच्या दोन ते तीन आठवड्यांच्या आत मळमळ आणि उलट्यांचा सुरुवात होऊ शकते. ह्याला मॉर्निंग सिकनेस असेही म्हणतात. तथापि, तुम्हाला ते दिवसाच्या कोणत्याही वेळी जाणवू शकते.

10. छातीत जळजळ होण्याची भावना: तुम्हाला ऍसिड रिफ्लक्स किंवा छातीत जळजळ देखील होऊ शकते. ही तात्पुरती लक्षणे आहेत. शरीरातील संप्रेरकांच्या बदलामुळे अशी लक्षणे उद्भवतात. तुम्ही गरोदरपणाच्या प्रवासात पुढे जाताना ही लक्षणे कमी होऊ शकतात.

वर नमूद केलेल्या लक्षणांव्यतिरिक्त, पहिल्या तिमाहीत पेटके येणे, चक्कर येणे, डोकेदुखी किंवा पाठदुखी जाणवणे खूप सामान्य आहे. ही सर्व सामान्य गर्भधारणेची लक्षणे आहेत. ह्या लक्षणांद्वारे शरीरात बदल होत आहेत हे तुम्हाला समजते.

गर्भाचा विकास

तुमच्या शरीरात काय बदल होत आहेत किंवा तुमचे बाळ कसे विकसित होत आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तुमच्या बाळाची पहिल्या तीन महिन्यांत प्रचंड वाढ होते. एका फलित पेशी (झायगोट) पासून ते प्लमच्या आकाराचे होते. त्यापासून हात, पाय आणि इतर विविध अवयव वाढू लागतात. तुमच्या पहिल्या तिमाहीत बाळाचा विकास कसा होतो ते पाहूयात:

शरीरातील बदल

तुमच्या शरीरात अंतर्गत आणि बाह्य बदल होत असतात. येथे काही बदल दिलेले आहेत. हे बदल तुम्हाला तुमच्या शरीरात आढळू शकतात:

वजन वाढणे

तुमच्या पहिल्या तिमाहीत तुमचे अंदाजे ३ ते ४ चार पौंड वजन वाढू शकते. परंतु, जर तुम्हाला तीव्र मळमळ होत असेल किंवा भूक कमी होत लागत असेल तर तुमचे वजन पुरेसे वाढू शकत नाही. तुम्ही तुमच्या पुढील तिमाहीमध्ये त्याची भरपाई करू शकणार असाल तर कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतु, जर तुमच्या पहिल्या तिमाहीत तुमचे वजन कमी होत असेल किंवा खूप वाढले असेल, तर ह्या दोन्ही परिस्थिती चिंतेचे कारण आहे. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत तुमच्या वजनाच्या समस्यांबाबत तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

व्यायाम

निरोगी शरीर आणि मनासाठी व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि गरोदरपणात सुद्धा व्यायामाचे महत्व कमी केले जाऊ शकत नाही. गरोदरपणात काहीही त्रास होऊ नये तसेच गरोदरपणात निरोगी राहण्यासाठी तुम्ही व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. येथे काही व्यायाम प्रकार दिलेले आहेत ते तुम्हाला गरोदरपणात सक्रिय आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात.

वरील सर्व व्यायाम गरोदरपणात तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यास मदत करू शकतात. तथापि, तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे हे तुमच्या लक्षात येताच, तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी आपल्या व्यायामाच्या पद्धतीबद्दल बोलले पाहिजे. प्रत्येक गर्भारपण वेगळे असते आणि त्यामध्ये काही समस्या किंवा गुंतागुंत असू शकतात किंवा नसू शकतात. तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यायाम सुरू करण्यापूर्वी, तुमच्या डॉक्टरांची संमती घ्यावी.

पहिले तीन महिने तुम्ही कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याची यादी खालीलप्रमाणे:

एक गरोदर स्त्री म्हणून, तुम्ही तुमच्याआणि बाळाच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी योग्य निवड करून निर्णय घेतले पाहिजेत. तुमच्या गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत तुम्ही काय करावे तसेच पहिल्या तिमाहीत तुम्ही कशी काळजी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन करू शकतील अशा काही टिप्स येथे दिलेल्या आहेत.

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीतील आहार

आधी चर्चा केल्याप्रमाणे, तुमच्या गरोदरपणातील आहार आणि पोषणाकडे लक्ष देणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या वाढत्या बाळाला पोषणही देत ​​आहात हे लक्षात ठेवा. तुमच्या बाळाच्या वाढीच्या आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कॅलरीजचे प्रमाण वाढवावे लागेल. तुमच्या गरोदरपणातील अन्न आणि आहाराच्या बाबतीत तुम्ही काय करावे आणि काय करू नये ते येथे दिलेले आहे.

खाण्यासाठी पदार्थ:

निरोगी गरोदरपणासाठी तुम्ही खालील पदार्थांचा आहारात समावेश करू शकता

टाळावेत असे पदार्थ:

तुमच्या गरोदरपणात तुम्ही खालील काही गोष्टी टाळल्या पाहिजेत:

चाचण्या आणि स्क्रीनिंग

जर तुम्ही पहिल्यांदा गरोदर असाल, तर तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या लक्षणांमुळे गोंधळून जाऊ शकता.परंतु घरगुती गरोदर चाचणी किट मुळे तुम्ही गरोदर आहात हे तुम्हाला समजू शकते. परंतु बहुतेक डॉक्टर तुम्हाला गर्भधारणा झालेली आहे ह्याची पुष्टी करण्यासाठी इतर चाचण्या आणि स्क्रीनिंग पद्धती करतील. तुमचे डॉक्टर अवलंबू शकतील अशा काही चाचण्या आणि स्क्रीनिंग पद्धती खाली दिलेल्या आहेत

वर नमूद केलेल्या मार्गांनी, तुमचे डॉक्टर तुमच्या गर्भधारणेची पुष्टी करतात. तसेच तुम्हाला तुमच्या गरोदरपणात उद्भवू शकणार्‍या कोणत्याही गुंतागुंतांबद्दल देखील तुम्हाला ते सांगू शकतात.

पहिल्या तिमाहीत घ्यावयाची खबरदारी

गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये तुम्ही घेतली पाहिजे अशी खबरदारी

  1. गरोदरपणात आहाराची काळजी घ्या. कुपोषण तुमच्यासाठी किंवा तुमच्या बाळासाठी चांगले नाही. म्हणून, अपचनाच्या कोणत्याही लक्षणांपासून दूर राहण्यासाठी नियमित अंतराने चांगले आणि पोषक पदार्थ खा. बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ नये म्हणून तुमच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करा. उत्साही वाटण्यासाठी दिवसभर थोडे थोडे खा.
  2. पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि द्रवपदार्थाचे प्रमाण वाढवा. निर्जलीकरणामुळे गरोदरपणात गुंतागुंत होऊ शकते, म्हणून दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या.
  3. शरीर योग्यरीत्या काम करण्यासाठी व्यायाम करणे महत्वाचे आहे आणि हेच गरोदर असताना देखील लागू होते. गरोदरपणात तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही कोणताही व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर, त्याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला.
  4. गरोदरपणात तुमची मानसिकता सकारात्मक असणे आवश्यक आहे. तुमचे मन आनंदी आणि सकारात्मक ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ध्यानाचा सराव करणे.
  5. गरोदरपणात विश्रांती घेणे खूप महत्वाचे आहे. गरोदरपणात तुमच्या शरीरात बरेच बदल होतात, त्यामुळे तुमचे शरीर योग्य रित्या कार्यरत राहण्यासाठी विश्रांती आणि झोप अनिवार्य आहे. तुम्हाला रात्री ७ ते ८ तासांची अखंड झोप मिळायला हवी आणि दिवसभरात दोन ते तीन वेळा तुम्ही छोटी झोप घेतली पाहिजे.
  6. गर्भधारणेचा तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्हाला विविध संसर्ग आणि इतर आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे स्वच्छता राखा आणि स्वतःची चांगली काळजी घ्या.

खालील लक्षणे आढळ्यास सावध रहा

बहुतेक स्त्रियांना गरोदरपणात काहीही अडचण येत नाही. परंतु, कधीकधी काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्वरीत उपाययोजना करण्यासाठी कोणत्याही समस्येची चिन्हे आणि लक्षणे समजून घेणे फार महत्वाचे आहे. आम्ही काही सावधानतेच्या चिन्हांवर इथे चर्चा करू. अशी चिन्हे लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा,

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीविषयी ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. आता तुमच्याजवळ गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीविषयी सर्व माहिती असल्याने स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा.

आणखी वाचा:

गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये घ्यायची महत्वाची काळजी पहिल्या तिमाहीदरम्यान लैंगिक संबंध – गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळातील प्रणय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved