गर्भारपण

गरोदरपणात लाळेचे प्रमाण वाढणे

प्रत्येकाला गरोदरपणाची लक्षणे माहिती आहेत आणि ती म्हणजे पाळी चुकणे, मॉर्निंग सिकनेस, थकवा जाणवणे इत्यादी होत. परंतु काही गर्भवती स्त्रियांना इतरही काही लक्षणे जाणवतात. ती लक्षणे सर्वसामान्य नसतात आणि अपेक्षित सुद्धा नसतात. त्यापैकीच एक लक्षण म्हणजे तोंडात लाळ साठणे. तोंडात जास्त लाळ साठणे हे एक दुर्मिळ लक्षण आहे आणि सामान्यतः ज्या गरोदर स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास आहे त्यांना हे लक्षण जाणवते. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात लाळ वाढणे ह्यास वैद्यकीय भाषेत टायलीझम ग्रॅव्हीडॅरम असे म्हटले जाते.

गरोदरपणात जास्त लाळ येणे सामान्य आहे का?

होय, गरोदरपणात नेहमीपेक्षा खूप जास्त लाळ येणे पूर्णपणे सामान्य आहे. सामान्यत: लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथी संपूर्ण दिवसात अंदाजे ४०० मिली ते १ लिटर लाळ निर्माण करतात. आम्हाला माहित आहे, हे प्रमाण तुम्हाला जास्त वाटते, परंतु आपण दिवसभर सतत लाळ गिळत राहतो म्हणून त्याकडे लक्ष जात नाही. तथापि,गरोदरपणात, जर एखाद्या स्त्रीच्या तोंडात जास्त लाळ असेल तर लाळेचे उत्पादन वाढल्यामुळे किंवा गिळण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे किंवा दोन्हीमुळे असे होऊ शकते. काही गर्भवती महिलांना मळमळ झाल्यास खूप जास्त लाळ येऊ शकते. अशा परिस्थितीत ती लाळ थुंकून टाकावीशी वाटते.

गरोदरपणात जास्त लाळेचे उत्पादन कधी सुरू होते?

जास्त लाळ हे गरोदरपणाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते असे काही स्त्रियांना वाटते. तथापि, लाळेचे जास्त उत्पादन गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होते आणि पहिल्या तिमाहीच्या अखेरीस स्थिर होते. काही स्त्रियांसाठी, ही स्थिती संपूर्ण गरोदरपणात आणि प्रसूतीपर्यंत तशीच राहते. तोंड, घसा आणि दात ह्यांचे पोटातील आम्लाच्या परिणामांपासून संरक्षण करण्याचा हा शरीराचा एक मार्ग आहे असा तज्ञांचा असा विश्वास आहे.

गरोदरपणात लाळेची कारणे

गरोदरपणात जास्त लाळ येण्याची काही संभाव्य कारणे खाली दिली आहेत -

वाढलेल्या लाळेचे फायदे

गरोदरपणात जास्त लाळ निर्मितीचे काही फायदे खाली दिले आहेत -

गर्भवती असताना जास्त लाळेचे उपचार

तोंडात जास्त लाळ येण्याची समस्या गंभीर नाही आणि तुम्हाला याची काळजी करण्याची गरज नाही. तसेच, यासाठी कोणताही ज्ञात उपचार नाही. पण खाली काही गोष्टी आहेत ज्या तोंडात लाळ कमी निर्माण होण्यास मदत करू शकतात.

गरोदरपणात जास्तीच्या लाळेला तुम्ही कसा प्रतिबंध करू शकाल?

गरोदरपणात जास्त गळणारी लाळ कशी थांबवायची हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल, दुर्दैवाने, लाळ उत्पादन कमी करण्यास मदत करणारी कोणतीही ज्ञात तंत्रे आणि खबदारीचे उपाय नाहीत. गरोदरपणाचा हा फक्त एक टप्पा आहे आणि तुमच्या शरीरात होणारे हे सर्व बदल कालांतराने नाहीसे होतात. याबद्दल जास्त विचार करू नका किंवा तुमचा मूड घालवू नका. जे घडते आहे त्याबद्दल वैताग करू नका हे स्वाभाविक आहे. हा एक शारीरिक प्रतिसाद आहे, म्हणून त्याची काळजी करू नका.

जास्त प्रमाणात लाळ गळणे साधारणपणे केव्हा थांबते?

जर गरोदरपणात जास्त प्रमाणात लाळ येत असेल तर तुम्ही नाराज होऊ शकता. परंतु काळजी करू नका, हे फक्त गरोदरपणाचे लक्षण आहे आणि गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीनंतर ते कमी झाले पाहिजे. तथापि, काही स्त्रियांमध्ये हे लक्षण जास्त काळ टिकू शकते. जर तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर घाबरू नका कारण बाळाचा जन्म झाल्यानंतर ते कमी होईल. परंतु जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधू शकता आणि काय करता येईल ह्याबद्दल विचारू शकता.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जास्त प्रमाणात लाळ येत असेल तर ते खूप विचित्र वाटू शकते, परंतु ते मॉर्निंग सिकनेस प्रमाणेच नैसर्गिक आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात जोपर्यंत जास्त गळणाऱ्या लाळेमुळे अडथळा येत नाही किंवा वारंवार उलट्या होण्याचा त्रास होत नाही तो पर्यंत डॉक्टरांकडे जाण्याची गरज नाही. डॉक्टर आपले मन हलके करण्यास मदत करू शकतात परंतु वैद्यकीय दृष्टया, काळजी करण्यासारखे काहीही नाही. गरोदरपणात जास्त प्रमाणात लाळ गळणे थोडे लाजिरवाणे वाटू शकते, परंतु आपल्याला काळजी करण्याची गरज नाही, ते गरोदरपणाचे एक लक्षण आहे. आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांना तो एक नैसर्गिक प्रतिसाद आहे. जास्त लाळ गळण्याचा त्रास हा अगदीच किरकोळ आहे. तुम्ही गरोदरपणातील चांगल्या बाबींवर लक्ष केंद्रित करा. आणखी वाचा: धनुर्वाताची लस (टिटॅनस टॉक्सॉइड – टीटी) – गरोदरपणात कधी आणि का दिली जाते? गरोदरपणातील ट्रान्स्व्हजायनल स्कॅन (टीव्हीएस)
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved