आहार आणि पोषण

गरोदरपणात काजू खाणे – फायदे आणि दुष्परिणाम

जर तुम्ही गरोदर असाल, तर तुम्ही काय खाल्ले पाहिजे ह्याविषयी तुम्हाला बरेच सल्ले मिळतील. आणि इतकी सगळी माहिती लक्षात ठेवताना तुम्ही भांबावून जाल! तुम्ही कोणताही पदार्थ खाण्यापूर्वी दोनदा विचार कराल आणि गरोदरपणात तो पदार्थ खाणे सुरक्षित आहे की नाही ह्याची काळजी कराल. परंतु गरोदरपणात टाळले पाहिजे परंतु नंतर तुम्ही खाऊ शकता असे बरेच पदार्थ आहेत! गरोदरपणात तुम्ही संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे खाण्याव्यतिरिक्त, सुकेमेवा आणि नट्स देखील खाऊ शकता.  ह्या लेखात तुम्हाला गरोदरपणात काजू खाण्याबद्दल सर्व माहिती मिळेल. काजू पौष्टिक, कुरकुरीत आणि स्वादिष्ट असतात - परंतु काजू खाणे गर्भवती स्त्रियांसाठी सुरक्षित आहेत का? जाणून घ्या!

गरोदरपणात काजू खाणे सुरक्षित आहे का?

होय, जर तुम्ही योग्य काळजी घेत असाल तर गरोदरपणात काजू खाणे सुरक्षित आहे. चविष्ट काजूला नाही म्हणणे खूप कठीण आहे. काजूमध्ये असलेले पौष्टिक घटक आणि तोंडाला पाणी आणणारी चव यांचे उत्तम मिश्रण म्हणजे काजू. ही वस्तुस्थिती काजूला आणखी मोहक बनवते. गरोदरपणात काजू खाताना योग्य काळजी घेतल्यास, दुष्परिणामांची काळजी न करता काजूचे सुरक्षितपणे सेवन केले जाऊ शकते. बाळाच्या निरोगी विकासासाठी, गर्भवती स्त्रीने कॅल्शियम, जीवनसत्त्वे, जस्त, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, लोह आणि जीवनसत्त्वे यांचे सेवन करणे आवश्यक आहे. काजूमधून ही सर्व आवश्यक पोषक तत्वे तुम्हाला मिळू शकतात. काजू कमी प्रमाणात खा म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.

गरोदरपणात काजू खाण्याचे पोषणविषयक फायदे

काजू म्हणजे नैसर्गिक जीवनसत्वाच्या गोळ्या आहेत कारण प्रत्येक औंस (28 ग्रॅम) काजूमध्ये 9 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 4.3 ग्रॅम प्रथिने आणि 13 ग्रॅम चरबी असते. पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून काजूचे काही फायदे येथे दिलेले आहेत:

गरोदर असताना काजू खाण्याचे फायदे

गरोदरपणात काजू खाण्याचे काही आरोग्यविषयक फायदे येथे दिलेले आहेत:

तुमच्या गरोदरपणाच्या आहारात काजूचा समावेश करण्याचे मार्ग

गरोदरपणात काजू खाल्ल्याने तुमच्या पोषणविषयक गरजा पूर्ण होऊ शकतात. तर मग तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या काजूचा आहारात समावेश कसा करू शकता ते येथे दिलेले आहे!
तुम्ही सिरपमध्ये काजू घालू शकता आणि सकाळच्या नाश्त्याच्या पॅनकेकसाठी ते उत्कृष्ट टॉपिंग बनेल.

गरोदरपणात खाण्यासाठी तुम्ही सेंद्रिय काजू का निवडावे?

ऑरगॅनिक काजू, आकाराने लहान असले तरी ते पौष्टिक आणि चविष्ट देखील आहेत! तणनाशके आणि कीटकनाशके न वापरता ते नैसर्गिक पद्धतीने पिकवले जात असल्याने त्यांची मूळ चव टिकून राहते आणि ते आरोग्यासाठीही चांगले असतात. सेंद्रिय काजू तांबे, मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे इत्यादींनी समृद्ध असतात त्यामुळे ते गर्भवती स्त्रियांसाठी उत्कृष्ट असतात. गर्भाच्या सर्वांगीण वाढीस देखील काजूमुळे मदत होते आणि गरोदरपणातील आवश्यक पोषक तत्वांसह आईच्या शरीरासाठी ते पूरक असतात. हे अष्टपैलू आणि निरोगी अन्न गर्भवती स्त्रियांसाठी आवश्यक आहे.

गरोदरपणात काजू खाण्याचे काही हानिकारक परिणाम होतात का?

काजू पौष्टिक असले तरी सुद्धा ते जास्त प्रमाणात काजू खाल्ल्यास दुष्परिणाम देखील होऊ शकतात. जर तुम्ही शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात काजूचे सेवन करीत असाल, तर तुमचे वजन जास्त वाढू शकते कारण काजूमध्ये कॅलरी  खूप जास्त असतात. जर सेवन सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल तर गर्भवती स्त्रियांना मूत्रपिंड आणि पित्त मूत्राशयाच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. याचे कारण म्हणजे काजूमध्ये ऑक्सलेट्स असतात त्यामुळे गर्भारपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

काजू खाताना घ्यावयाची काळजी

गरोदरपणात काजूचे सेवन करताना काही खबरदारी घ्या कमी प्रमाणात खाल्ल्यास गरोदर स्त्रियांना काजूचे खूप फायदे होऊ शकतात. तुमचा गरोदरपणाचा प्रवास तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक असणार आहे, त्यामुळे तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत सावधगिरी बाळगा. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत आवश्यक ती सर्व काळजी घ्या. तुमच्या बाळाला हानी पोहोचवू शकतात अश्या गोष्टी टाळा. तुम्हाला निरोगी गर्भारपणासाठी शुभेच्छा! आणखी वाचा: गरोदरपणात बदाम खाणे गरोदरपणात अक्रोड खाण्याचे फायदे आणि जोखीम
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved