गर्भारपण

गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होणे: कारणे, उपाय आणि प्रतिबंध

गरोदरपणात गरोदर स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यातील एक बदल म्हणजे गरोदरपणात संप्रेरकांची पातळी सतत वर खाली असते, त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य बिघडते आणि त्याचाच परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध होऊ शकतो. आणि गुदद्वाराजवळील भागातील रक्तवाहिन्यांना सूज येऊन रक्तस्त्राव होऊ शकतो.
हा रक्तस्त्राव होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि त्यावर कुठले उपाय तुम्ही करू शकता ह्याविषयीची सगळी माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

गरोदरपणात गुदाशयातून रक्तस्त्राव होतो म्हणजे नक्की काय होते?

गुदाशय रक्तस्त्राव हा सहसा गुदद्वाराला चिरा (फिशर) पडल्यामुळे होतो. गुदद्वाराजवळील ऊतक फाटतात. गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मानंतर शौचास घट्ट झाल्यावर बऱ्याच वेळा रक्तस्त्राव झालेला आढळतो. फिशर मुळे रक्तस्त्राव होतो तसेच शौचास झाल्यानंतर त्या भागात जळजळ सुद्धा होते.

लक्षणे

गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव होण्याची अनेक लक्षणे आहेत, त्यापैकी काही खाली सूचीबद्ध आहेत: आपत्कालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे दर्शविणारी इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत

गर्भवती महिलांमध्ये गुदाशय रक्तस्त्राव होण्याचे कारणे

गुदाशय रक्तस्त्राव बहुतेक वेळा फिशर म्हणजेच गुद्द्वाराकडील भागाला चिरा पडल्याने उद्भवतो. गर्भवती स्त्रियांना बर्‍याचदा बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते त्यामुळे त्यांना शौचास घट्ट होते. त्यामुळे शौचाच्या वेळेला गुदद्वारावर ताण येतो. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन औषधे घेतल्यास स्त्रियांना बद्धकोष्ठता होते आणि शौचास सुद्धा अनियमित होते. आहारात तंतुमय पदार्थांच्या अभावामुळे शौचास होताना समस्या उद्भवू शकते आणि गुदाशय रक्तस्त्राव होण्याची शक्यता वाढते. गुदाशय रक्तस्त्राव होण्याची असामान्य कारणे

गुदाशय रक्तस्रावाचे निदान

गुदाशयातील रक्तस्रावावर उपचार करण्यासाठी आणि ते कशामुळे होते आहे ह्याचे निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी केली जाते. कमी रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढलेले असल्यास ही लक्षणे जास्त प्रमाणात गुदाशय रक्तस्त्राव झाल्याची आहेत आणि अशा वेळी तातडीची वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते. रक्तस्त्राव कशामुळे होतो आहे हे तपासण्यासाठी एक रोगनिदान चाचणी केली जाते आणि त्यासाठी पोटात लवचिक ट्यूब घातली जाते. गुद्द्वारावर काही आघात तर झाला नाही ना ह्याची तपासणी केली जाते. तसेच शौचाची सुद्धा तपासणी केली जाते. ते मऊ आहे का किंवा त्यामध्ये गाठी आहेत का हे बोटानी तपासून पहिले जाते. रक्तस्त्राव किती प्रमाणात झाला हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जातात. तिथे रक्तातील रक्त गोठवणाऱ्या घटकांचे परीक्षण केले जाते आणि संसर्गाची चिन्हे तपासली जातात.
इतर सामान्य डायग्नोस्टिक चाचण्यांमध्ये अनोस्कोपी, फ्लेक्सिबल सिग्मोइडोस्कोपी, बेरियम एनिमा एक्स-रे, सीटी स्कॅन आणि एंजियोग्राफी ह्यांचा समावेश होतो. कोलोनोस्कोपी गुदाशयच्या आतील बाजूस तपासण्यासाठी वापरली जाऊ शकते. या निदानात्मक चाचण्यांमध्ये गुद्द्वार मधील ट्यूमर तपासणे आणि खूप जास्त होणारा / सक्रिय रक्तस्त्राव तपासण्यासाठी कोलनच्या खालच्या बाजूची तपासणी करणे इत्यादी तपासण्या समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, न्यूक्लिअर मेडिसिन अभ्यासाचा उपयोग लाल रक्तपेशी आणि मोठ्या आतड्यामध्ये जिथे अगदी कमी रक्तस्त्राव होतो ती ठिकाणे शोधण्यासाठी होतो.

गरोदरपणातील गुद्द्वार रक्तस्त्राव: उपचार आणि उपाय

किरकोळ रक्तस्रावावर घरगुती उपायांसह उपचार केला जाऊ शकतो तर गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णालयात वैद्यकीय उपचार केले जातात. गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव होण्याचे सर्वात सामान्य उपायः टीपः गरोदरपणात कोणतेही नवीन पदार्थ किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

प्रतिबंध

गरोदरपणात गुदाशय रक्तस्त्राव रोखण्याचे सर्वात सामान्य मार्गः

हा रक्तस्त्राव आपल्या बाळाला हानी पोहचवेल?

नाही. गुद्द्वार रक्तस्त्राव बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यांनंतरसुद्धा होऊ शकतो. ह्या मुळे गरोदरपणात किंवा बाळाच्या जन्मादरम्यान कोणत्याही प्रकारे बाळाचे नुकसान होत नाही.

डॉक्टरांना कधी फोन करावा?

आपल्याला खालील लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांना फोन करावा. या लक्षणांचे मूल्यांकन डॉक्टरांनी केले पाहिजे. तुम्हाला गरोदरपणात रेचक लिहून दिले जाऊ शकते. गुदाशयातील रक्तस्त्रावामुळे होणारी अस्वस्थता नेहमीचे पारंपरिक शौचालय वापरण्याऐवजी सुगंध मुक्त आणि अल्कोहोल-मुक्त पेपरने गुदाशयाजवळील भाग हळुवारपणे पुसल्याने कमी होऊ शकते.
गर्भधारणेनंतर आपोआप फिशर बरे होतात. मूळव्याधीचा अनुभव घेणे हे गरोदरपणात सामान्य आहे, त्यामुळे गुदाशय क्षेत्रावर दबाव वाढतो आणि जळजळ होते. अनेक वेळा शौचास जाऊन आल्यानंतर वेदना कायम राहिल्यास पॅरासिटॅमॉल घेण्याचा विचार करा. गरोदरपणानंतर शरीर स्वतःला बरे करते आणि फिशर व त्यामुळे होणारा रक्तस्त्राव आपोआप बंद होतो. रक्तस्त्राव नक्की कुठून (गुदाशय की योनीमार्ग) होत आहे ह्याबाबत तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही डॉक्टरांना कॉल करू शकता. गुदाशयातील रक्तस्त्राव सहसा गंभीर चिंतेचे कारण नसले तरी आवश्यक खबरदारी घेणे नेहमीच चांगले असते. तसेच, सतत तीव्र लक्षणे दिसत असल्यास डॉक्टरांची भेट घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात लघवीला वास येणे: कारणे आणि उपचार गरोदरपणात योनीला खाज सुटणे
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved