In this Article
साधारणपणे, गरोदरपणाच्या ३८ आठवड्यांनंतर बाळांचा जन्म होतो. परंतु, काही वेळा, बाळांचा जन्म ३४ आठवड्यांपूर्वीच होतो. ‘प्रीमी‘ म्हणून ओळखल्या जाणार्या, ह्या बाळांची रुग्णालयात आणि घरी दोन्ही ठिकाणी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपण ह्या विषयाची चर्चा करण्यापूर्वी, ३४ व्या आठवड्यात होणाऱ्या प्रसूतीची कारणे शोधूया.
गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात बाळाचा जन्म का होतो?
स्त्रीच्या प्रसूतीचे आणि बाळंतपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी वैद्यकीय शास्त्राची मदत होत आहे, वेळेपूर्वी प्रसूतीसाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
- जननेंद्रियातील संक्रमण आणि जिवाणू स्राव हे गर्भजल पिशवीच्या सभोवतालच्या पडद्याला कमकुवत करतात, त्यामुळे ती लवकर फुटते
- प्लेसेंटा प्रिव्हिया, प्लेसेंटल ऍब्रेशन किंवा प्लेसेंटा ऍक्रिट यासारख्या नाळेशी संबंधित समस्या
- एकाधिक बाळे किंवा जास्त गर्भजल असणे
- गर्भाशयाच्या किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या संरचनेतील विकृती उदा: सर्व्ह्याकल इनसफीशीयनसी
- सिस्ट, अपेंडिक्स किंवा पित्ताशय काढून टाकण्यासाठी गरोदरपणातील ओटीपोटाची शस्त्रक्रिया
३४ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळांना खालील गुंतागुंतीचा सामना करावा लागतो
येथे काही सामान्य समस्या दिलेल्या आहेत. गरोदरपणाच्या ३४ व्या आठवड्यात बाळांना त्याचा सामना करावा लागतो (ह्या समस्या असतीलच असे नाही)
१. कावीळ
अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये पचनसंस्था पूर्णपणे कार्यक्षम नसल्यामुळे त्यांना कावीळ होण्याची प्रवृत्ती असते. रक्ताचे उप–उत्पादन, बिलीरुबिन, शरीरात जमा होते, ज्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होतात.
२. अशक्तपणा
लाल रक्तपेशींच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होतो. ह्या पेशी शरीराच्या वेगवेगळ्या भागात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी जबाबदार असतात. अकाली जन्मलेल्या बाळामध्ये, लाल रक्तपेशींचे उत्पादन पूर्ण–मुदतीच्या बाळाच्या तुलनेत हळू होत असते, त्यामुळे अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये अशक्तपणा होतो.
३. श्वसनक्रिया बंद होणे
लहान मुले झोपेत असताना काही काळ श्वास घेणे थांबवतात ह्या स्थितीस ऍपनिया असे म्हणतात. अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये हे वायुवीजन आणि बाह्य ऑक्सिजन समर्थनासह उपचार केले जाऊ शकतात.
४. संक्रमण
अकाली जन्मलेल्या बाळांची रोगप्रतिकारक प्रणाली कमकुवत असते त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका खूप असतो
५. पेटंट डक्टस आर्टेरिओसस
पेटंट डक्टस आर्टेरिओसस हा हृदयविकार आहे. हा हृदय विकार काली जन्मलेल्या बाळांमध्ये हृदयाच्या विकासातील समस्यांमुळे होतो.
६. ब्रॉन्कोपल्मोनरी डिसप्लेसिया (बीपीडी)
जर तुमच्या बाळामध्ये ही आरोग्य विषयक स्थिती निर्माण झाली तर बाळाला श्वास घेण्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता असू शकते
७. कमी रक्तदाब
‘पेटंट डक्टस आर्टेरिओसस‘ मुळे रक्तदाब कमी होतो कारण अकाली बाळांमध्ये हृदयाचा विकास नीट होत नाही.
८. नेक्रोटाइझिंग एन्टरोकोलायटिस (एनईसी)
एनईसी ह्या आजारामुळे लहान मुलांच्या आतड्यावर परिणाम होतो. आतड्याच्या भिंतीवर जीवाणू आक्रमण करतात, त्यामुळे संसर्ग आणि जळजळ होते. आणि त्यामुळे आतड्यांचे आतील आवरण खराब होते.
३४ व्या आठवड्यात जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी?
३४ व्या आठवड्यांत अकाली जन्मलेल्या बाळाची वेगवेगळ्या टप्प्यांवर विशेष काळजी घेण्याची गरज असते. तसेच बाळाकडे लक्ष द्यावे लागते. जन्मानंतर आपल्या लहान मुलाची काळजी घेण्याचे काही मार्ग येथे आहेत:
१. एनआयसीयू मध्ये
८ व्या महिन्यात जन्मलेल्या बाळांना नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयु) मध्ये हलवले जाते आणि काही आठवडे त्यांचे बारकाईने निरीक्षण केले जाते. लहान मुलांना पारदर्शक घुमट असलेल्या इनक्यूबेटरमध्ये ठेवले जाते आणि तिथे बाळाला योग्य प्रमाणात प्रकाश देतात. तसेच बाळाला आहार देण्यासाठी आणि श्वास घेण्यासाठी नळ्या देखील असतात. एनआयसीयूमधील वातावरण हे तापमान, आर्द्रता आणि वायूच्या आंशिक दाबांच्या योग्य मिश्रणाने काळजीपूर्वक नियंत्रित केले जाते आणि ते बाळाच्या वाढीसाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी योग्य असते.
२. बाळाला दूध देणे
अकाली जन्मलेल्या बाळांना स्तनपान करता येत नाही कारण त्यांची दूध पिण्याची क्षमता जन्मत:च कमी विकसित असते. त्यांना नळीद्वारे दूध दिले जाते आणि ते तोंडातून बाळाच्या पोटात जाते. दूध काढण्यासाठी आणि नंतर ते तुमच्या बाळाला पाजण्यासाठी तुम्हाला ब्रेस्ट पंप वापरण्याची आवश्यकता असू शकते. बाळ बरे झाल्यानंतर आणि एनआयसीयू मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तुम्हाला स्तनपान करण्याची परवानगी दिली जाऊ शकते.
३. आई आणि बाळामधील बंध
आई आणि मूल यांच्यातील नातं महत्त्वाचं आहे. परंतु, बाळाला इनक्यूबेटरमध्ये ठेवल्याने ह्यामध्ये अडथळा येऊ शकतो. परंतु, हे फक्त थोड्या काळासाठीच आहे. बाळाला एकदा डिस्चार्ज मिळाल्यावर बाळ तुमचा आवाज आणि स्पर्श ओळखू शकेल.
३४ आठवड्यात जन्मलेल्या बाळांचा जगण्याचा दर काय आहे?
ह्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे अकाली जन्मलेल्या बाळांचा जगण्याचा दर ९८% पेक्षा जास्त आहे (प्रति १००० बाळांमागे १६.२ मृत्यू). त्यामुळे, जोपर्यंत आणखी गुंतागुंत वाढत नाही तोपर्यंत बाळे जगतात.
तुमच्या बाळाला एनआयसीयूमध्ये किती काळ राहावे लागेल?
सर्व अकाली जन्मलेल्या बाळांनी एनआयसीयू मधून डिस्चार्ज मिळण्यापूर्वी काही टप्पे पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुमच्या बाळाचा जन्म ३४ व्या आठवड्यात झाला असेल, तर बाळ ३६ आठवड्यांचे होईपर्यंत बाळाला एनआयसीयू मध्ये राहावे लागेल. बाळाला श्वास घेता आला पाहिजे, दूध पिणे शक्य झाले पाहिजे तसेच बाळाच्या शरीराचे तापमान नियंत्रित केले पाहिजे (नवजात बाळ दूध घेऊ शकत नाही… तसेच शरीराचे तापमान स्वतःचे स्वतः नियंत्रित करू शकत नाही.) परंतु, ८ व्या महिन्यांपूर्वी जन्मलेली बाळे एनआयसीयूमध्ये ठेवल्यानंतर काही आठवड्यांनंतर बरी होतात.
मागील आठवडा: गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात जन्मलेले बाळ