महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे लोक उपवास करतात. दूध, धोत्र्याची फुले आणि बेलाची पाने वाहून महादेवाच्या पिंडीची पूजा करतात. भारतात मुलांना श्रीशंकराच्या कथा सुद्धा सांगितल्या जातात. त्यामुळेच मुलेसुद्धा हा सण विशेष उत्साहात साजरा करतात.
ह्या वर्षी महाशिवरात्र १ मार्च रोजी आहे. ह्या दिवशी सर्व जण आपल्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देतात. ह्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोक आपल्या प्रियजनांना मेसेजेस , कोट्स आणि शुभेच्छा लिहून पाठवतात. तसेच फेसबुक, व्हाट्सअपवर सुद्धा स्टेटस ठेवतात. जर तुम्हाला सुद्धा तुमच्या प्रियजनांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर ह्या लेखामध्ये कोट्स आणि मेसेजेस दिलेले आहेत. ह्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
महाशिवरात्रीसाठी छान छान कोट्स आणि मेसेजेस
जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना विशेष कोट्स पाठवू इच्छित असाल तर ह्या शिवरात्रीसाठी आम्ही इथे छान छान कोट्सची यादी दिलेली आहे. चला तर मग पाहूयात!
1. श्री शंकर म्हणजे शक्ती, भक्ती, आराधना आणि मुक्तीचे रूप आहे. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
2. शिव आराधना हिच माझी साधना. महाशिवरात्रीच्या अनेक शुभेच्छा!
3. आनंद घेऊन महाशिवरात्री आली. साधना, भक्ती मार्गे सगळ्यांना मिळो मुक्ती. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
4. श्रीशंकराची भक्ती करून सगळी दुःखे दूर झाली, आनंद आणि शांती घेऊन महाशिवरात्री आली. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
5. शिव भक्ती हे जीवनाचे सार आहे. श्रीशंकराच्या भक्तिगीतांचा ऐकू येई सूर, त्यांच्या कृपेने होवोत सर्व चिंता दूर, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
6. श्रीशिवाचे गुणगान, प्राप्त होई वरदान, जीवनात मिळे सन्मान. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
7. श्रीशंकरांची भक्ती, देवी पार्वती म्हणजे शक्ती, जो करी गुणगान तयांचे त्यांना प्राप्त होई मुक्ती, महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
8. महाशिवरात्रीचे आहे हे पर्व, सोडून देऊया अहंकार आणि गर्व
गाऊन शिवस्तुती, जागवूया मनोमनी आनंद आणि भक्ती
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
9. श्रीशंकरांच्या पूजेने जागृत होते शक्ती, करूया त्यांची पवित्र मनाने भक्ती. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
10. महादेवाची पिंड आणि मुखी नाम अखंड, टेकवूया शिवचरणी माथा, भक्तीत पडू नये खंड महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
11. ओंकाराच्या निनादाने मिटू दे सर्व अंधःकार आणि तेजोमय होउदे तुमच्या जीवनाचा प्रवास – महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
12. हर हर महादेवाच्या गजराने निनादून जाऊदे सारा परिसर, होउदे आयुष्यात तुमच्या सुखाचा जागर – महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा
13. शिवकृपेने तुमच्या आयुष्यात आनंदाचा बहर येऊ दे – महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही चांगल्या शब्दांमध्ये छान छान मेसेजेस पाठवू शकता. तुमच्या मदतीसाठी आम्ही काही खास मेसेजेस इथे दिलेले आहेत, कोणते ते पाहूयात!
1. तुमचा प्रत्येक क्षण आनंदात जावो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा २०२२
2. तुम्हाला आणि तुमच्या परिवारास महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. ईश्वर कृपेने तुमची खूप प्रगती होवो. महाशिवरात्रीच्या अनेक शुभेच्छा २०२२
3. श्रीशंकराच्या ऊर्जेने सगळं जग तेजोमय झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा २०२२
4. आनंद आहे, उत्साह आहे, सगळीकडे शिवाचे गुणगान आहे! महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
5. सगळी दुःखे नाहीशी करण्यासाठी आणि धरतीला स्वर्ग करण्यासाठी श्रीशंकरांचे आगमन झालेले आहे. महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप शुभेच्छा!
6. श्रीशंकर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समृद्धी आणि खूप प्रेम मिळो. महाशिवरात्रीच्या अनेक शुभेच्छा!
7. श्रीशंकर चरणी भक्तांचा भोळा भाव, महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊ श्रीशंकराचे नाव महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा
8. श्रीशंकराचा वार सोमवार, महाशिवरात्रीच्या दिवशी नाही आनंदाला पारावार! महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
9. महादेवाच्या पिंडीवर ठेऊ बेलाचे पान, मुखाने गाऊ श्रीशंकर स्तुतीगान. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
10. मन आनंदाने भरून आले, जय जय शिव शंकर भोले! महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!
11. तुझे नाम राहूदे अखंड मुखी, तूच कर्ता आणि करविता, ठेव सगळ्यांना सुखी – महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप शुभेच्छा
12. सर्व दुःखांचा होऊन अस्त, सुखाचा होऊदे उदय, महाशिवरात्रीच्या दिवशी होऊदे तुमचा भाग्योदय – महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा
13. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे – महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा
हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा एक विशेष सण आहे आणि ह्या दिवशी लोक हा सण विशेष उत्साहात साजरा करतात. जर तुम्ही सुद्धा ह्या दिवशी तुमच्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना शिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ इच्छित असाल तर इथे दिलेल्या कोट्स किंवा मेसेजस पैकी तुम्हाला आवडणारा मेसेज निवडून त्यांना पाठवा.
आणखी वाचा: महाशिवरात्री – केव्हा आणि कशी साजरी केली जाते आणि ह्या दिवशी कुठले अन्नपदार्थ खावेत?