गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३५ वा आठवडा

जेव्हा तुम्ही जुळ्या बाळांसह ३५ आठवड्यांच्या गर्भवती असता तेव्हा तुम्ही कदाचित अंतिम रेषेच्या जवळ आहात असे तुम्हाला वाटेल. हा आश्चर्यकारक गर्भधारणा प्रवास शेवटी संपेल आणि मातृत्वाची आणखी एक यात्रा सुरू होईल. जर तुम्ही जुळ्या बाळांची अपेक्षा करीत असला तर ही वेळ तुमच्यासाठी अधिक कठीण आहे कारण ह्या आठवड्यात जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गर्भवती असलेल्या स्त्रिया प्रसूत होऊ शकतात. तुमच्या शरीरात होणाऱ्या सर्वात लहान बदलांबद्दल तुम्ही अचानक अधिक सजग झाल्याचे तुमच्या लक्षात येईल. अत्यंत संवेदनशील माता बाळाने पाय मारल्यास, थोड्याशा वेदना झाल्यास किंवा किरकोळ पेटक्यांनी उत्तेजित होऊ शकतील आणि बाळांचा जन्म आता लगेच होणार आहे असे त्यांना वाटू शकेल. बाळांची वाढ अजूनही होत आहे आणि बाळांचा जन्म आता केव्हाही होऊ शकतो. जर तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह ३५ आठवड्यांच्या गर्भवती असाल तर गरोदरपणाविषयी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत अशा सर्व बाबींविषयी आपण ह्या लेखात चर्चा करणार आहोत.

३५ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या गरोदरपणाच्या ३५व्या आठवड्यात, बाळाची वाढ पूर्ण झाली असेल तर बाळ जन्म कालव्याच्या दिशेने हालचाल सुरू करू शकतात. तुमचे स्त्रीरोगतज्ज्ञ तुम्हाला बाळांची प्रगती, गरोदरपण आणि तुमच्या बाळांच्या वाढीविषयी माहिती देतील. जर तुम्हाला एकसारखे जुळे किंवा तिळे असेल तर गरोदरपणाच्या ह्या टप्प्यावर ते एकसारखे दिसण्यास सुरुवात होईल. जर ह्या टप्प्यावर प्रसूती झाली तर लगेच बाळे तंतोतंत एकसारखी दिसणार नाहीत त्यांना काही आठवडे वेळ द्या. या टप्प्यावर बाळांची बहुतेक प्रगती त्यांच्या हालचाली आणि स्थितीच्या अनुषंगाने असते. या टप्प्यावर हे अत्यंत आवश्यक आहे कारण जन्म कालव्याद्वारे बाळ पुढे सरकणार असते. त्यासाठी बाळाचे डोके खाली आणि पाय वर ही आदर्श स्थिती असते. ह्या स्थितीत येण्यासाठी काही बाळांना वेळ लागू शकतो आणि त्यांच्या आईने बाळांना ह्या स्थितीत येण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न केले पाहिजेत. वैद्यकीयदृष्ट्या परिपूर्ण बाळ म्हणून ओळखले जाण्यासाठी बाळाने एक विशिष्ट वजन आणि उंची गाठणे आवश्यक आहे परंतु जरी बाळांचा जन्म ह्या आठवड्यात झाला तरी सुद्धा वैद्यकीय हस्तक्षेपाशिवाय ते एका चांगल्या स्थितीत असतील. बाळे तुमच्या सोबत तुमच्या खोलीत राहू शकतील आणि त्यांना श्वासोच्छवासासाठी कुठल्याही आधाराची गरज लागणार नाही. तरीसुद्धा, डॉक्टर्स आणि नर्सेस बाहेरच्या जगात बाळाची वाढ कशी होत आहे ह्यावर लक्ष ठेवतील. म्हणूनच वजन आणि उंचीच्या योग्य मूल्यापर्यंत पोचण्यापर्यंत बाळांना गर्भाशयात आणखी एक आठवडा घालवायचा सल्ला डॉक्टर देतात.

बाळांचा आकार केवढा असतो?

गरोदरपणाच्या ३५ व्या आठवड्यापर्यंत, तुमची जुळी किंवा तिळी बाळे खरबुजा एवढी असतील. त्यांचे वजन आणि उंची वाढतच जाईल आणि यामुळेच गर्भाबाहेर जगण्याची त्यांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. जर तुम्ही तुमच्या बाळांची उंची डोक्यापासून पायापर्यंत मोजलीत तर ती ४३ -४५ सेंटीमीटर इतकी असेल. त्याचप्रमाणे, त्यांचे वजन २. -. ५ किलोग्रॅम दरम्यान असते.

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या गरोदरपणाच्या ह्या आठवड्यात तुमच्या शरीरात होणारे बहुतेक बदल म्हणजे केवळ गरोदरपणाचे कायमस्वरूपी परिणाम असतात जे गेलेल्या आठवड्यापासून तीव्र होत असतात आणि त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपणातील ३५ व्या आठवड्यातील लक्षणे

गरोदरपणातील आधीची सर्व लक्षणे लक्षात घ्या आणि त्यांची तीव्रता वाढवा. जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपणाच्या ३५ व्या आठवड्यात तुम्ही नक्कीच ह्याचा अनुभव घेत आहात.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ३५ वा आठवडा - पोटाचा आकार

ह्या आठवड्यात तुमच्या पोटाचा आकार खूप गोलाकार असेल. गर्भाशय अगदी तुमच्या बरगड्यांपर्यंत वर सरकलेले असले तरीसुद्धा बाळे खालच्या भागात सरकलेली असतात. पोटाचा आकार वाढल्यामुळे त्वचा खूप ताणली जाते त्यामुळे त्वचेला खाज सुटते, त्वचेवर रॅश येते आणि त्वचेवर छोटे लाल रंगांचे फोड येतात. हे फोड पूर्णपणे सौम्य असतात आणि त्यामुळे तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांना कुठलीही हानी पोहचत नाही. जर तुम्हाला रॅश सोबत खाज सुटत असेल तर डॉक्टरांची भेट घेणे जरुरी आहे.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ३५ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

या आठवड्यात योगनिमार्गाला कुठल्याही जिवाणूंचा संसर्ग झालेला नाही हे तपासण्यासाठी अल्ट्रासाऊंड केला जातो. तसेच बाळांची बारकाईने तपासणी केली जाते. गर्भाचा आकार, हृदयाच्या ठोक्यांचा दर, गर्भजल पातळी, गर्भाशयाच्या मुखाची स्थिती, नाळेची स्थिती, हे सर्व घटक डॉक्टर्स स्कॅन दरम्यान जवळून पाहतील. ह्या आठवड्यात तुमची बाळे मोठ्या आवाजाला प्रतिसाद देण्यास सुरुवात करतील.

काय खावे?

या आठवड्यात आपले वजन तपासणे अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यानुसार डॉक्टर काही विशिष्ट आहार घेण्याची शिफारस करतील. त्याव्यतिरिक्त, तुम्ही आहारात कर्बोदके, प्रथिने आणि चरबीयुक्त पदार्थ घेणे आवश्यक आहे. तसेच तुमच्या आहारात कॅल्शिअम आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश देखील केला पाहिजे. तुम्ही व्हिटॅमिन पूरक आहार देखील सुरु ठेऊ शकता.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

ह्या टप्पयावर काळजी घेण्यासाठी खालील टिप्स देत आहोत

हे करा

काय टाळावे?

३५ व्या आठवड्यात जन्माला येणारे जुळे

या आठवड्यात जन्मलेल्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांना सहसा कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय मदतीची आवश्यकता नसते. त्यांचे वजन योग्य प्रमाणात वाढत आहे ना ह्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. बाळे लगेच स्तनपान घेण्यास सुरुवात करतात किंवा त्यांना त्यासाठी एक किंवा दोन आठवडे लागू शकतात. अशा परिस्थतीत तुमचे पहिले दूध काढून साठवून ठेवणे हा चांगला निर्णय असू शकतो.

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

तुमच्या बाळांचा जन्म आता कधीही होऊ शकतो म्हणून, त्यांना दुधासाठी बाटल्या, कपडे, डायपर, मऊ टिश्यू आणि इतर नवजात बाळाची काळजी घेणारी उत्पादने यासारख्या गोष्टी आवश्यक असतात. सुरक्षित आणि गुंतागुंतमुक्त प्रसूती सुनिश्चित करण्यासाठी गर्भाशयात जुळ्या मुलांची स्थिती ह्या आठवड्यात महत्वाची भूमिका निभावते. आपल्यासाठी योग्य निर्णय घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवा आणि आपल्या लहान बाळांचे ह्या जगात आनंदाने स्वागत करा.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved