गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३३ वा आठवडा

तुम्ही तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात पोहोचला आहात. तुम्ही उत्साहित (आणि चिंताग्रस्त) असणे अगदी साहजिक आहे! अजून काही आठवडे बाकी आहेत आणि तुमच्या हातांमध्ये तुमची पिल्ले असतील. नवीन आई म्हणून तुम्हाला तुमच्या बाळांच्या वाढीबद्दल देखील उत्सुकता असेल. गरोदरपणाच्या प्रत्येक आठवड्यात, तुमची बाळे वाढतील आणि तुम्हाला ती कशी विकसित होत आहे हे जाणून घ्यावे लागेल. या लेखात, आम्ही गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्याविषयी चर्चा करणार आहोत आणि जुळ्या बाळांसह गरोदर असलेल्या स्त्रीला तिच्या बाळांच्या वाढीबद्दल कुठल्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत ह्या बद्दलची सुद्धा सर्व माहिती ह्या लेखामध्ये दिलेली आहे.

३३ व्या आठवड्यात बाळांची वाढ

३३ व्या आठवड्यात, तुमच्या गर्भाशयात तुमच्या जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वाढीचा दर कमी होईल, परंतु बाळे विकसित होत राहतील. जगण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात येते कारण बाहेरच्या जगात जिवंत राहण्यासाठी बाळांच्या शरीराला सर्व आवश्यक क्रियांची तालीम दिली जाते. गर्भजलाचा श्वास घेण्यापासून ते गिळणे तसेच अंगठा चोखणे इत्यादी कृतींमुळेच तुम्हाला तसेच डॉक्टरंसुद्धा बाळे गर्भाशयाच्या बाहेर जिवंत राहण्यास तयार होत आहेत हे लक्षात येते. हाडांचे ओसीफिकेशन आणि कडक होणे आतापर्यंत अंतिम टप्प्यात पोहोचते किंवा पूर्ण होते. बाळाची हाडे टणक होतील. कवटी मऊ असते कारण प्रसूतीचा मार्ग जन्म कालव्यातून असतो. वाढीच्या दरासोबत तुमच्या लहान बाळांचे विविध क्रियाकलाप सुद्धा कमी होताना दिसतील. या लहान बाळांना हालचाल करण्यासाठी आधीसारखी फारशी जागा नसल्यामुळे असे होते. परंतु तरीसुद्धा तुम्हाला बाळाचे पाय मारणे पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे जाणवेल. जर तुम्हाला बाळे पोटात शांत असल्यासारखी वाटली तर तुम्ही थंड पाणी किंवा एखादा कप कोमट दूध पिऊन किंवा त्यांना आवडणारे एखादे गाणे म्हणून त्यांना जागे करू शकता. जर हे सर्व प्रयत्न करून सुद्धा बाळाची हालचाल जाणवली नाही तर तुम्ही ते त्वरित डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले पाहिजे.

३३ व्या आठवड्यात बाळांचा आकार

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमची लहान बाळे आता अननसाइतकी मोठी असतील. त्यांची उंची सुमारे ४१-४३ सेंटीमीटर असेल आणि त्यांचे वजन सुमारे १.६ ते १.८ किलोग्रॅम इतके असे. या आठवड्यापर्यंत, तुमच्या बाळांचे वजन वाढलेले असेल आणि त्यामुळे त्यांची उपस्थिती जाणवेल.

सामान्य शारीरिक बदल

जसजशी तुमची लहान बाळे वाढतात तसतसे तुमच्या गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमचे शरीर काही बदल घडवून आणते.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यातील लक्षणे

गरोदरपणाच्या ३३ व्या आठवड्यात तुमच्या शरीरावर भरपूर भार येईल. जुळ्या किंवा एकाधिक बाळांच्या वाढलेल्या वजनामुळे ह्या आठवड्यात लक्षणे अधिक तीव्र होतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ३३ वा आठवडा - पोटाचा आकार

या आठवड्यापर्यंत, जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह गरोदर राहणे सोपे नाही. प्रसूतीच्या चिन्हांवर आता तुमचे लक्ष केंद्रित होईल. कोणत्या बदलांसाठी तुम्ही तुमच्या पोटाचे निरीक्षण कराल. आतापर्यंत तुमच्या पोटाचा आकार मोठ्या प्रमाणात वाढलेला असेल, तुम्हाला सराव कळा येण्यास सुरुवात झालेली असेल त्यामुळे तुम्ही अधिक सावधगिरी बाळगाल आणि आता प्रसूती केव्हाही होऊ शकेल हे तुमच्या लक्षात येईल.

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण - ३३ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

मागील आठवड्यात घेतलेला अल्ट्रासाऊंड एक गहन असेल जो या नंतरच्या आठवड्यातच पुन्हा केला जाईल. या आठवड्यात जर तुम्ही अल्ट्रासाऊंड केला तर बाळे डोळे उघडे ठेऊन जागी असल्याचे तुम्हाला दिसेल. श्वासोच्छवास आणि अंगठा चोखणे ह्यामध्ये सुद्धा बाळे समन्वय साधू शकत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. एकसारखे जुळे असल्यास किंवा इतर गुंतागुंत तपासण्यासाठी तुमचे डॉक्टर पुन्हा स्कॅन करून बघू शकतील.

काय खावे?

या आठवड्यात तुम्हाला कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थाची तीव्र इच्छा होऊ शकते कारण तुमची बाळे पूर्ण क्षमतेने मजबूत होऊ लागतात . मनुका आणि इतर फळांसारखे तंतुमय पदार्थ आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत. आपण मसालेदार पदार्थ खाणे टाळावे आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी, छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी तसेच पचनक्रिया सुरळीत सुरु राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

गरोदरपणाच्या ह्या आठवड्यात काळजी घेण्यासाठी काही टिप्स खाली दिलेल्या आहेत.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करण्याची आवश्यकता आहे?

आपल्या गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यात खालील गोष्टींची आवश्यकता असेल: तुम्ही जुळ्या बाळांसह ३३ आठवड्यांच्या गर्भवती आहात. तुम्हाला चिंता वाटणे साहजिक आहे आणि ते आम्हाला समजते. परंतु तुम्ही सकारात्मक राहून जीवनातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची निरोगी प्रसूती होईल!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved