गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – ३२ वा आठवडा

जर तुम्ही जुळ्या बाळांसह ३२ आठवड्यांच्या गर्भवती असाल तर खरोखरच हा साजरा करण्याचा क्षण आहे जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्याची तुलना एका बाळासह गरोदर असतानाच्या ४० व्या आठवड्यासोबत केली जाऊ शकते. पोट आणि गर्भाशयाचे आकार एकमेकांसारखेच असल्याने एकट्या बाळाची आणि जुळ्या मुलांची वाढ आतापर्यंत समान आहे. तथापि आता गोष्टी बदलणार आहेत. गर्भाशयातील जागा आता बाळांसाठी कमी पडणार आहे आणि छोटी बाळे आता बाहेरच्या जगात येण्यास आणि स्वतःचे स्वतः राहण्यास उत्सुक आहेत.

३२ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तुमच्या पोटात वाढणाऱ्या एकाधिक बाळांचा विकास होत आहे आणि पुढचे काही दिवस तो होत राहील. एकट्या बाळाच्या वाढीशी तुलना केल्यास त्यांच्या वाढीचा दर थोडासा कमी होईल, परंतु अजूनही काही विकासात्मक प्रक्रिया घडतील. मुख्यतः बाळाच्या शरीरात चरबी वाढेल आणि आकारात वाढ होत राहील. बाळाचे शरीर आणि अवयव जे आतापर्यंत फक्त हाडांचा सापळा होते ते आता भरले जाईल आणि जसजशी बाळाच्या विकासात प्रगती होईल तसे बाळ नवजात बाळासारखे दिसू लागेल. बाळांचे डोके मोठे असल्याकारणाने ही तुलना केली जाते. तुम्ही तुमच्या बाळांच्या हालचालींचा मागोवा घेत असल्यास, तुम्हाला काळजी वाटू शकेल अशा घटना काही वेळा घडू शकतात. कारण बाळांचे पाय मारणे किंवा इतर हालचाली नेहमीसारख्या नसू शकतात. आहे हे संपूर्णतः सामान्य आहे. प्रसूतीची तारीख जसजशी जवळ येते तसे जुळ्या किंवा तिळ्या बाळांच्या हालचाली मंदावतात. गर्भाशयात असणाऱ्या कमी जागेमुळे बाळांना हालचाल करण्यासाठी पुरेशी जागा उरत नाही. काहीवेळेला बाळे जेव्हा स्थिती बदलतात तेव्हा तुम्हाला फडफड जाणवू शकते. त्यांच्या मुख्य अंतर्गत अवयवांची परिपक्वता या आठवड्यात देखील वेगाने पुढे जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांचे मूत्राशय शारीरिक द्रवपदार्थांवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करते आणि लघवीच्या रूपात ते बाहेर टाकले जाते. शरीराच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूनी बाळाचा मेंदू असंख्य सिग्नल द्वारे उत्तेजित केला जातो, त्यामुळे गर्भाशयात असताना बाळांना वारंवार स्वप्ने पडतात. आपल्या शरीराचे प्रत्येक कार्य सुरळीत सुरु आहे हे सुनिश्चित करण्यासाठी ह्या सर्व प्रक्रिया महत्वाच्या आहेत. ह्या आठवड्यात बहुतेक बाळांच्या शरीरावरील केसांची हलकी लव गळून पडते. तसेच तुमच्या बाळांच्या डोक्यावर दाट केस असू शकतात तर काही बाळांच्या बाबतील हे केस विरळ असू शकतात. केसांचा विकास हा आनुवंशिक असू शकतो. केसांव्यतिरिक्त कवटीचा विकास देखील ह्या टप्प्यावर जवळजवळ पूर्ण झालेला असतो. परंतु अजूनही कवटी पूर्णतः टणक झालेली नसते. कवटीची हाडे अजूनही पूर्णपणे एकत्रित झालेली नसतात. जन्माच्या वेळी बाळाला जन्मकालव्यातून सहजपणे पुढे सरकता यावे म्हणून ही हाडे मऊ राहतात. शरीरातील बाकीची हाडे आवश्यक प्रमाणात कडक होतात.

बाळांचा आकार केवढा असतो?

तुम्ही स्वतः एक मोठा कंद किंवा रताळे किंवा स्क्वॅश धरल्याची कल्पना करा. तुमच्या गर्भाशयात तुमची लहान बाळे अगदी एवढीच मोठी आहेत. तुम्ही जेव्हा गर्भधारणेच्या ३२ व्या आठवड्यात पोहोचता तेव्हा जुळी किंवा एकाधिक बाळे जन्माला आल्यावर जशी दिसतील तशीच असतात. जेव्हा बाळांची उंची डोक्यापासून पायापर्यंत मोजली जाते तेव्हा ती अंदाजे ४० ते ४१ सेंटीमीटर असते आणि प्रत्येक बाळाचे वजन १. ४ ते १. ५ किलोग्रॅम पर्यंत असते. जन्माच्या वेळी प्रत्येक बाळाचे वजन अंदाजे अर्धा किलो असेल.

सामान्य शारीरिक बदल

तुमच्या शरीरात होणारे अंतर्बाह्य बदल हे तुमचे शरीर बाळांना जन्म देण्यास तयार असल्याचे तसेच बाळांच्या जन्मानंतर काळजी घेण्यास तयार असल्याचे दर्शवतात.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यातील लक्षणे

जुळ्या बाळांसह गरोदरपणाची लक्षणे मागील दोन आठवड्यांपूर्वी होती तशीच असतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ३२ वा आठवडा - पोटाचा आकार

आपल्या गर्भाशयात पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात गर्भजल असणे सुरू होते. त्यामुळे पूर्वीपेक्षा बाळाच्या हालचालीसाठी कुशनींग कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला त्या पूर्वीपेक्षा जास्त तपशीलवार जाणवू लागतात. बाळे गर्भाशयातच आपली स्थिती बदलू लागल्यामुळे पोट आणखी खाली सरकू लागते.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - ३२ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

बरेच डॉक्टर प्रत्येक आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्यास सुरवात करतात. ३२ आठवड्यांमध्ये ब्रीच जुळे होण्याची शक्यता बरीच असते आणि शक्य तितक्या आधीच ती शोधणे आवश्यक आहे. जर आपली प्रसूती तारीख जवळ असेल आणि स्कॅनने प्रसूतीसाठी एक आदर्श नसलेली स्थिती दर्शविली तर आपले डॉक्टर कदाचित बाळाला त्यांची स्थिती बदलण्यास भाग पाडतील अशा पद्धती अवलंबू शकतात. तथापि, आजकाल हा सराव केला जात नाही.

काय खावे?

जरी ह्या काळात तुमचे वजन लक्षणीयरित्या वाढलेले असले तरी सुद्धा तुम्ही तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पौष्टिक आहाराकडे दुर्लक्ष करू नये हे आवश्यक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास आहारातील निर्बंधांचा सल्ला दिला जाऊ शकतो, परंतु कमीत कमी ह्या आठवड्यासाठी तुम्ही आहारात मांसाचा समावेश करणे चांगले.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

३२ व्या आठवड्यात आपल्या गरोदरपणाची काळजी घेण्यासाठी फक्त काही महत्वाच्या टिप्स लक्षात ठेवणे आवश्यक आहे:

हे करा

काय टाळावे?

३२ व्या आठवड्यात जन्माला येणारी बाळे

अकाली बाळे जन्माला येण्याच्या अनेक घटना आहेत. सुदैवाने,३२ व्या आठवड्यांत जन्मलेल्या जुळ्या बाळांचा अस्तित्व दर खूपच चांगला आहे, कारण त्यांनी गरोदरपणाचे जवळ जवळ ८ महिने पूर्ण केलेले आहेत. तथापि, गुंतागुंत होण्याचा धोका असतो, म्हणूनच अकाली जुळ्या मुलांसाठी प्री टर्म निओनेटल केअर युनिटस वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर काही मुदतपूर्व कळा सुरु झाल्या आणि बाळांना प्रसूतीसाठी योग्य स्थान नसेल तर काही डॉक्टर सिझेरियन प्रसूती करतात.

आपल्याला काय खरेदी करणे आवश्यक आहे?

आतापासून काही आठवड्यांत तुमचे गरोदरपण हा भूतकाळ झालेला असेल. त्यामुळे तुम्ही खालील गोष्टींची खरेदी करा. ३२ व्या आठवड्यांत, तुमची जुळी बाळे अगदी थोडी विकासाची चिन्हे दर्शवू शकतात कारण लवकरच ती ह्या जगात प्रवेश करणार आहेत. काही आठवड्यांमध्ये तुम्ही बाळांना जन्म देणार आहात आणि त्याची शारीरिक आणि मानसिक तयारी तुम्ही गरोदरपणाच्या ह्या आठवड्यांमध्ये करणे आवश्यक आहे. बाळांचा गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यात अकाली जन्म होणे हे फार काही असामान्य नाही आणि त्यासाठी डॉक्टर आधीच तयार असतात. त्यामुळे त्याविषयी चिंता करण्याची गरज नाही कारण तुम्ही त्याप्रमाणे स्वतःला तयार करू शकता.
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved