गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २९ वा आठवडा

जेव्हा तुम्ही जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती असाल तेव्हा बाळाचा विकास ही सर्वात गंभीर गोष्ट असेल आणि त्याविषयी तुम्ही आणि तुमचे डॉक्टर चिंतीत असाल. ह्या टप्प्यावर, तुमच्या बाळांना अस्मितेची ओळख निर्माण होण्यास सुरुवात होईल आणि बाळाचे वर्तन फक्त तुम्हीच समजू शकता अशा प्रकारे बाळ वागेल. उदा: बाळ कधी आणि कसे हालचाल करते किंवा पाय मारते हे फक्त तुम्हीच समजू शकता. तसेच ह्याव्यतिरिक्त कुटुंबासाठी आणि तुमच्या बाळांच्या आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या पुढील काही आठवड्यात संपवल्या पाहिजेत कारण पुढील काही महिन्यांमध्ये तुम्ही काम करून स्वतःला ताणतणावात ठेऊ नये.

२९ व्या आठवड्यात बाळाची वाढ

तुमच्या बाळाची वाढ मंदावेल, परंतु हे केवळ त्यांची लांबी आणि आकाराच्या बाबतीत लागू होते. २९ व्या आठवड्यापासून बाळाच्या वाढीचा वेग जरी मंदावलेला असला तरी सुद्धा त्यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढत राहते. बाळाचे वजन जवळजवळ तिप्पट वाढते आणि त्यामुळे तुमच्या पाठीवर त्याचा ताण येऊ शकतो. बाळांच्या त्वचेवर असलेले केस आता गळून पडतील. त्यांच्या त्वचेला झाकणारा व्हर्नीक्सचा थर पातळ होण्यास सुरवात होईल, कारण त्यांच्या त्वचेवर चरबीचा थर साठू लागतो आणि तो त्वचेला सुरक्षित ठेवतो. जर तुमच्या लहान बाळांच्या जन्मानंतर केसांचे लहानसे अवशेष शिल्लक असतील तर ते देखील बाळाच्या जन्मानंतर काही आठवड्यात नष्ट होतील. तुमच्या बाळांच्या हालचालींमध्ये आता एक नवीन उत्साह असेल. बाळाच्या आजूबाजूला आता गर्भजल असते आणि त्यांच्या हालचालींसाठी ते एक नैसर्गिक माध्यम असते. बाळाचे पाय मारणे, स्ट्रेचेस, अंगठा चोखणे, ऍक्रोबॅटीक्स आणि इतर क्रिया खूप वाढतील. ह्या सर्व क्रिया बाळाच्या विकासासाठी खूप गरजेच्या आहेत आणि त्यामुळे बाळाचा विकास कसा होत आहे ह्याची आईला कल्पना येऊ शकेल. तुमचे बाळ ठराविक वेळेला हालचाल करते हे तुम्हाला माहिती असते. बाळ ठीक आहे ह्याची तुम्हाला खात्री पटते आणि जर तुम्हाला काही चुकीचे वाटले तर तुम्ही लगेच त्याविषयी काळजी घेऊ शकता.

बाळांचा आकार केवढा आहे?

गरोदरपणाचा हा टप्पा बाळांच्या शारीरिक गुणधर्मांपेक्षा बाळांच्या वजनावर अधिक लक्ष केंद्रित करतो. जेव्हा त्यांचा आकार किंवा लांबी पाहतो तेव्हा ते आधीच्या आठवड्याएवढेच म्हणजेच ३८ ते ३९ सेंटीमीटरच्या आसपास असेल. तथापि, त्यांचे वजन जवळजवळ एक किलोग्रॅम पेक्षा जास्त असते.

सामान्य शारीरिक बदल

जेव्हा जुळी किंवा एकाधिक बाळे होण्याची अपेक्षा असते तेव्हा गर्भवती स्त्रीच्या शरीरात बदल होतात. काही बदल कदाचित आपणास त्रास देऊ शकतात, तर काहींचा तीव्र परिणाम होऊ शकतो.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २९ व्या आठवड्यातील लक्षणे

वजन वाढवण्याव्यतिरिक्त, गरोदरपणाची इतर लक्षणे ह्या आठवड्यात पुन्हा दिसू लागतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २९ वा आठवडा - पोटाचा आकार

तुमच्या पोटाचा आकार वाढेल आणि तुम्हाला खाज सुटण्याची तीव्र इच्छा होईल. तुमचे पोट खूप मोठे होईल आणि त्यामुळे तुमची बाळे छान वाढत आहेत ह्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. लहान बाळांच्या उचकीमुळे ओटीपोटाकडील भागात थोडी अस्वस्थता जाणवेल. तुमचे गर्भाशय खूप वाढल्यामुळे तुमच्या तुमच्या पोटाच्या वरचा भाग शोधण्यासाठी तुम्ही नाभीच्या वरच्या भागाला स्पर्श करू शकता.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २९ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

एखाद्या गोष्टीची लवकर तपासणी करणे आवश्यक असल्यास तुमचे डॉक्टर २९ व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड करण्यास सांगू शकतात. तुमच्या जुळ्या किंवा तिळ्या बाळांचे शरीर आता वेगाने विकसित होईल आणि वाढणाऱ्या मेंदूला सामावून घेण्यासाठी डोक्याचा आकार वाढेल.

काय खावे?

बाळांना त्यांच्या अबाधित वाढीसाठी संतुलित आणि योग्य आहाराची आवश्यकता असते. काहीही हानिकारक सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम बाळांवर होतो. त्यामुळे तुम्ही काय खात आहात ह्यावर लक्ष ठेवा. ह्या आठवड्यात आपला आहार कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध असावा. आपल्या हिमोग्लोबिनची पातळी राखण्यासाठी भरपूर हिरव्या पालेभाज्या आणि तृणधान्ये ह्यांचा आहारात समावेश करा. बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी तंतुमय फळे खा.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

पुढील आठवड्यात स्वत: ला तयार करा आणि खालील टिप्सद्वारे निरोगी आणि शांत रहा:

हे करा

काय टाळावे?

तुम्हाला काय खरेदी करणे आवश्यक आहे?

तुमच्या बाळाचे काही महिन्यात आगमन होणार आहे तुम्हाला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जुळ्या किंवा तिळ्या बाळांसह २९ आठवड्यांच्या गर्भवती आहात याची काळजी घ्या. लवकरच तुम्ही बाळाला जवळ घेणार आहात आणि तुमचे कुटुंब पूर्ण होणार आहे. तुमचे बाळ तुमच्याकडे प्रेमाने बघून लवकरच तुम्हाला आई म्हणून हाक मारणार आहे!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved