गर्भारपण

जुळ्या किंवा एकाधिक बाळांसह गरोदरपण – २८वा आठवडा

गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास वेगवेगळ्या टप्प्यांसह पुढे सरकत असतो. हे टप्पे बाळांच्या तसेच आईच्या प्रगतीचा मागोवा ठेवण्याचा एक चांगला मार्ग आहे. जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आहे कारण तेव्हापासून अधिकृतपणे तिसऱ्या तिमाहीची सुरुवात होते. तुमचे डॉक्टरसुद्धा, तुमच्या बाळांच्या विविध पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करतात आणि वास्तविक जगात आल्यानंतर ही बाळे योग्य आणि सर्वोत्तम राहतील हे सुनिश्चित करतात. बाळांची पोटातील स्थिती समजून घेण्यापासून, प्रसूती यशस्वीरीत्या कशी करता येईल इथपर्यंतचे सर्व घटक ह्या शेवटच्या महिन्यांमध्ये बाळांना होणारी कोणतीही जोखीम कमी करण्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यामुळे निरोगी बाळे जन्माला येण्याची शक्यता वाढते.

२८ व्या आठवड्यात बाळांची वाढ

तिसऱ्या तिमाहीची सुरुवात म्हणजे तुमच्या बाळांच्या विकासाचा आणखी एक टप्पा आहे. ह्या टप्प्यावर बाळांच्या लांबीमध्ये काही फरक पडत नाही परंतु त्यांचे वजन आणि विकासामध्ये प्रगती होते. हाडांची संरचना आणखी मजबूत होऊ लागते आणि चरबीचा थर वाढू लागतो आणि तुमचे छोटेसे बाळ आता अगदी गुबगुबीत आणि गोंडस दिसू लागते. तुमच्या बाळांच्या फुफ्फुसांचा अद्याप पूर्ण विकास झालेला नाही आणि दर आठवड्याला त्यांचा टप्प्या टप्प्याने विकास होत जाईल. बाळाच्या वाढीसाठी ज्या नाळेद्वारे पोषण आणि अन्नपदार्थ दिले जातात ती सुद्धा आकाराने वाढते तसेच बाळाच्या मागण्या सुद्धा वाढतात. बाळ स्वतः एक किलोग्रॅम इतके वजनदार असेल. तुमच्या लहान बाळांचे क्रियाकलाप वाढतील. डोळ्यांची हालचाल आणि डोळे मिटणे आणि उघडण्याची वारंवारिता वाढेल, कारण तुमच्या बाळांचे झोपेचे आणि जागे राहण्याचे चक्र नियमित होईल. वेगवेगळ्या उत्तेजनांच्या संवेदनशीलतेसह मेंदूचे विघटन वाढविणे पुढे सुरू राहिल. बाळांभोवतीच्या गर्भजलाचे प्रमाण आता कमी होऊ लागेल. हे असेच सुरू राहील कारण बाळ गर्भाशयाच्या आतील बहुतेक जागा व्यापेल आणि गरोदरपणाच्या अखेरीस फारच कमी गर्भजल शिल्लक राहील.

बाळांचा आकार केवढा असेल?

पुढील वेळी आपण घरासाठी काही भाज्या घेण्यासाठी सुपरमार्केटमध्ये जाल तेव्हा मोठ्या वांग्याकडे नीट लक्ष द्या! तुमच्या आत तुमची बाळं तितकीच मोठी आहेत. ह्या आठवड्यात त्यांची लांबी सहसा जास्त प्रमाणात वाढत नाही. बाळांची लांबी जेव्हा त्यांच्या डोक्यापासून पायाच्या बोटांपर्यंत मोजली जाते तेव्हा ती जवळपास ३७ सेंटीमीटरपर्यंत राहते. तथापि, त्यांचे वजन खूपच जास्त प्रमाणात वाढते, त्यामुळे प्रत्येक बाळ अंदाजे ८५०-९०० ग्रॅम इतके असते.

सामान्य शारीरिक बदल

ह्या आठवड्यात तुमच्या बाळांचे फक्त वजन आणि चरबी वाढत राहते. तुमचे शरीर ह्या बदलांसोबत जुळवून घेत असते आणि स्वतःमध्ये बदल करत असते.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाच्या २८ व्या आठवड्यातील लक्षणे

आपण गर्भधारणेच्या २८ व्या आठवड्यातील विविध लक्षणे तुम्हाला आधीच्या आठवड्यांच्या तुलनेत थोडी तीव्र वाटतील.

जुळ्या बाळांसह गरोदरपण - २८ वा आठवडा - पोटाचा आकार

तुमच्या गरोदरपणाच्या ७ व्या महिन्यात, आधी कधीच नव्हते इतके पोट इतके मोठे होईल. गोलाकार वक्रता अधिक स्पष्टपणे दर्शविली जाईल आणि स्ट्रेच मार्क्स अगदी ठळकपणे दिसू लागतील, त्वचा किती प्रमाणात ताणली जाऊ शकते हे त्यावरून समजते. त्यामुळे त्वचेला खाज सुटू शकते. ठराविक क्रीम, जेल किंवा तेल हे स्ट्रेच मार्क्स कमी आणि खाज कमी करण्यास मदत करते. ही क्रीम्स किंवा तेलं सामान्यत: गरोदरपणात सुरक्षित असतात आणि बाळाला इजा करीत नाहीत.

जुळ्या बाळांसह गरोदरपणाचा २८ वा आठवडा - अल्ट्रासाऊंड

ज्या स्त्रियांचे गरोदरपण सामान्य असते किंवा स्वतंत्र जुळी बाळे असतात त्यांचा स्कॅन केला जात नाही. गर्भावस्थेच्या आधीच्या कोणत्याही टप्प्यावर गुंतागुंत आढळल्यास किंवा एखाद्या स्त्रीच्या गर्भाशयात एकसारखे जुळे असल्यास बहुतेक डॉक्टर गर्भधारणेच्या २८व्या आठवड्यात अल्ट्रासाऊंड स्कॅन करतात. हे स्कॅनसुद्धा गरोदरपणाची आणि बाळांच्या प्रगतीवर नजर ठेवण्यासाठीच्या सामान्य दिनक्रमाचा एक भाग आहे. या टप्प्यातील स्कॅनमध्ये बाळांच्या पापण्यांशिवाय काही दिसत नाही. बाळांच्या पापण्या ह्यापुढील आठवड्यांमध्ये अधिक स्पष्ट दिसू लागतील.

काय खावे?

बहुतेक डॉक्टर तुम्हाला निरोगी ठेवणाऱ्या आणि बाळांचे वजन वाढेल अशा विशेष आहारावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतील. आहारतज्ञांची देखील शिफारस केले जातील. हे आहारतज्ज्ञ तुम्हाला कोणते अन्नपदार्थ किती प्रमाणात खावे ह्याची शिफारस करतील. तसेच ते वारंवार खाणे चांगले. दिवसभरात ६ वेळा खावे. सकाळी शरीरात जास्तीत जास्त कॅलरी जाणे जरुरीचे आहे आणि संध्याकाळपर्यंत त्या कमी केल्या पाहिजेत. मिठाचे प्रमाण कमी केले पाहिजे ज्यामुळे सूज कमी येईल. जर गरोदर स्त्रीला मधुमेह असेल तर त्याप्रमाणे आहार समायोजित करणे आवश्यक आहे.

गरोदरपणातील काळजीविषयक टिप्स

काही मूलभूत सवयी आणि टिप्स पाळल्यास तुमची सुरक्षा आणि आरोग्य पातळी उच्चतम राखण्यास मदत होते.

हे करा

काय टाळावे?

आपल्याला काय खरेदी करणे आवश्यक आहे?

तुम्ही जुळी किंवा एकाधिक बाळे होणार आहेत हे माहिती झाल्यावर तुम्ही त्यांच्यासाठीची खालीलप्रमाणे उत्पादने खरेदी करू शकता. जुळ्या बाळांसह २८ आठवड्यांची गर्भवती स्त्री आतापर्यंत बऱ्याच बदलांमधून गेलेली असते आणि ती तिची मनःस्थिती आणि आरोग्य सर्वोत्तम सांभाळत असते. तिला तुम्ही आधार द्या आणि शक्य तितकी मदत करा त्यामुळे तिचा हा गरोदरपणाचा काळ सुकर आणि सोपा होईल!
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved