अकाली जन्मलेली बाळे

घरी अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यासाठी १० टिप्स

जर तुमच्या बाळाचा जन्म गरोदरपणाच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी झालेला असेल तर तुमचे बाळ अकाली जन्मलेले बाळ असेल. तुमचे बाळ नवजात अतिदक्षता विभागामध्ये (NICU) काही दिवस घालवत असेल, परंतु लवकरच तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकाल. एवढ्या लहान बाळाला कसे सांभाळावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु तुम्ही अजिबात काळजी करू नका, पुढील लेखात आपण विविध टिप्स वर  चर्चा करणार आहोत. ह्या टिप्स तुम्हाला तुमच्या अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यास मदत करू शकतात.

व्हिडिओ: तुमच्या अकाली जन्मलेल्या बाळाची घरी कशी काळजी घ्यावी (10 सर्वोत्तम टिप्स)

https://youtu.be/W4actKVzl_A

अकाली जन्मलेल्या बाळांची बाळांची वैशिष्ट्ये काय आहेत?

अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी घेताना बाळाचा जन्म किती आधी झाला त्यानुसार विशेष काळजी आणि देखरेखीची आवश्यकता असेल. पूर्ण-मुदतीच्या बाळाच्या तुलनेत अकाली जन्मलेल्या बाळामध्ये भिन्न वैशिष्ट्ये असतील, परंतु जसजसा वेळ जातो तसतशी ही वैशिष्ट्ये कमी होत जातात.

अकाली जन्मलेल्या बाळांची विशेष काळजी घेणे का आवश्यक आहे?

अकाली जन्मलेली बाळे ही पूर्ण-मुदतीच्या बाळांसारखी नसतात आणि त्यामुळे त्यांची  विशेष काळजी घेऊन त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्यांचे शरीर पूर्णपणे विकसित नसते त्यामुळे त्यांची आत्यंतिक काळजी घेणे गरजेचे असते. वैद्यकीय तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे आणि अशा बाळाची अतिरिक्त काळजी काही दिवस किंवा महिने किंवा त्यांचे शरीर अतिरिक्त आधाराशिवाय टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे मजबूत होईपर्यंत घेणे गरजेचे आहे.

घरी अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

पालकांसाठी येथे काही टिप्स आहेत. ह्या टिप्स त्यांना घरी त्यांच्या अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी घेण्यास मदत करू शकतात:

१. आपल्या बाळाला स्तनपान देणे

तुम्ही तुमच्या बाळाला स्तनपान दिले पाहिजे, परंतु काहीवेळा तुमच्या बाळाला लॅचिंगमध्ये समस्या निर्माण होऊ शकते किंवा बाळाला ते अजिबात शक्य होत नाही.  अश्या वेळी तुम्ही आईचे दूध पंप करू शकता आणि ते बाळाला बाटलीने पाजू शकता. काही वेळा, तुमचे डॉक्टर बाळाला फॉर्म्युला दूध पाजण्याचा सल्ला देऊ शकतात. अकाली जन्मलेल्या बाळांसाठी हे विशेष फॉर्म्युला दूध असू शकते.

२. बाळाला दूध देण्याच्या वेळा पाळणे

अकाली जन्मलेल्या बाळाला दिवसातून ८ ते १० वेळेला दूध द्यावे लागते. म्हणून, नियमित अंतराने तुमच्या बाळाला दूध द्या. कोणत्याही परिस्थितीत ४ तासांपेक्षा जास्त अंतर ठेऊ नका, कारण डिहायड्रेशनची शक्यता वाढू शकते, आणि ते तुमच्या बाळासाठी धोकादायक असू शकते.

३. तुमच्या बाळाच्या वाढीची नोंद ठेवणे

अकाली जन्मलेली बाळे पूर्ण मुदतीच्या बाळांपेक्षा वेगळ्या पद्धतीने वाढतात. परंतु, नंतर त्यांच्या वाढीचा वेग वाढतो. बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर तुम्हाला वेगळा ग्रोथ चार्ट देऊ शकतात.

४. बाळाच्या दृष्टीचा मागोवा ठेवणे

पूर्ण-मुदतीच्या बाळांपेक्षा अकाली जन्मलेल्या मुलांमध्ये डोळे तिरळे असण्याची समस्या अधिक सामान्य आहे. परंतु जसजशी बाळाची वाढ होते तशी ही समस्या सामान्यतः स्वतःहून नाहीशी होते. तुमच्या बाळाला ही समस्या असल्यास डॉक्टर बाळाला डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेण्यास सांगतील. काही अकाली जन्मलेल्या बाळांना रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी (ROP) नावाची डोळ्यांची समस्या असते – डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या असामान्यपणे वाढतात. आरओपी ही समस्या सामान्यतः गरोदरपणाच्या ३२ व्या आठवड्यांत किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या बाळांमध्ये आढळते. तुमच्या बाळाला आरओपी असण्याची शक्यता असल्यास, तुमचे डॉक्टर त्याला नियमित तपासणीसाठी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे नेण्याचा सल्ला देतील. दृष्टी कमी होण्यापासून रोखण्यासाठी आरओपीचा उपचार केला जाऊ शकतो.

५. बाळाच्या ऐकण्यावर लक्ष ठेवणे

पूर्ण-मुदतीच्या बाळांपेक्षा अकाली जन्मलेल्या बाळांना ऐकू येण्याची समस्या होण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या बाळाला ऐकू येत नसल्याचे तुमच्या लक्षात आल्यास, डॉक्टरांना सांगा. बाळाच्या मागे किंवा बाजूला आवाज करून तुम्ही तुमच्या बाळाला ऐकू येते आहे का हे पाहू शकता. जर बाळ मान फिरवत नसेल किंवा मोठ्या आवाजात प्रतिक्रिया देत नसेल तर तुमच्या डॉक्टरांना सांगा.

६. तुमच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहणे

रुग्णालयातून घरी आल्यानंतर सुद्धा, तुम्ही तुमच्या बाळाच्या डॉक्टरांशी नियमितपणे संपर्कात राहावे आणि बाळाची काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स घेत राहावे. गरज पडल्यास, तुम्ही डॉक्टरांना भेटू सुद्धा शकता.

७. तुमच्या बाळाच्या झोपेच्या गरजांची काळजी घेणे

तुमच्या मुदतपूर्व बाळाला खूप झोपेची गरज असते आणि तो कदाचित त्याचा बहुतेक वेळ झोपण्यात घालवत असेल. बाळाला पक्क्या आणि उशी नसलेल्या गादीवर झोपवले असल्याची खात्री करा. आपल्या बाळाला त्याच्या पोटावर कधीही झोपवू नका. त्याला नेहमी त्याच्या पाठीवर झोपवा.

८. घन अन्नपदार्थ देणे

तुमच्या बाळाला घन अन्न देण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल, कारण अकाली जन्मलेल्या बाळांना अन्न गिळणे कठीण होऊ शकते. तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रसूती तारखेनंतर सुमारे ४ ते ८ महिन्यांत घन पदार्थ देण्याचा सल्ला देऊ शकतात. त्याच्या खऱ्या जन्मतारखेनुसार हे वय मोजले जात नाही.

९. बाळाला बाहेर नेणे टाळावे

डॉक्टरांना भेट देण्याव्यतिरिक्त, तुमच्या बाळाला अनेक आठवडे बाहेर नेण्यापासून परावृत्त करावे लागेल. कारण तुमच्या बाळाला संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो, आणि तो त्याच्यासाठी घातक ठरू शकतो.

१०. कांगारू केअरचा सराव करणे

तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कांगारू केअर बद्दल सांगितले गेले असेल. काही आठवडे घरीही त्याचा सराव करणे ही चांगली कल्पना आहे. तुमच्या बाळासाठी तुमचा स्पर्श होणे चांगले आहे.

११. तुमच्या बाळाचे लसीकरण करून घेणे

तुमच्या बाळाच्या लसीकरणाच्या वेळापत्रकाचा मागोवा ठेवा आणि वेळापत्रकानुसार तुमच्या बाळाला लसीकरण करा.

१२. बाळाला भेटायला येणाऱ्या लोकांना प्रतिबंधित करावे

तुमच्या बाळाची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे. अशा प्रकारे, पाहुण्यांना प्रतिबंधित करणे चांगले, विशेषत: जर कोणी आजारी असेल किंवा कोणी धूम्रपान करत असेल तर ही काळजी घेणे अधिक गरजेचे आहे. बाळाला घेण्यापूर्वी हात स्वच्छ धुतले असल्याची खात्री करा.

अकाली जन्मलेल्या बाळाच्या पालकांसाठी तणावमुक्तीच्या पद्धती

खाली दिलेले काही प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारले पाहिजेत

येथे अकाली जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यावी ह्याविषयी काही प्रश्न दिलेले आहेत आणि हे प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारले पाहिजेत:

१. जर माझे पहिले बाळ अकाली जन्मले असेल, तर दुस-या वेळेला सुद्धा बाळ अकाली जन्माला येण्याचा धोका आहे का?

जर तुमच्या बाळाचा जन्म ३७ व्या ते ४२ व्या आठवड्यात झालेला असेल, तर तुम्ही पुढच्या वेळी पूर्ण-मुदतीच्या बाळाला जन्म देण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, जर तुमच्या बाळाचा जन्म  २०  ते ३१ आठवड्यांच्या दरम्यान झालेला असेल, तर  पुन्हा अकाली प्रसूती होण्याची शक्यता जास्त असते.

२. माझ्या अकाली जन्मलेल्या बाळाला त्याच्या विकासाचे टप्पे गाठण्यासाठी मी काय करावे?

जर बाळाचा जन्म खूप आधी झालेला नसेल किंवा बाळामध्ये काही वैद्यकीय समस्या नसेल बहुतेक वेळा अकाली जन्मलेल्या बाळांची वाढ पूर्ण-मुदतीच्या बाळांप्रमाणेच होऊ शकते. बाळाची  योग्य काळजी घेणे, पुरेशी झोप सुनिश्चित करणे आणि कांगारू केअर चा अवलंब केल्यास  बाळाची वाढ चांगली होण्यास मदत होते.

३. मी माझ्या अकाली जन्मलेल्या बाळाला कुटुंबातील इतर सदस्यांना केव्हा दाखवावे?

तुमच्या अकाली जन्मलेल्या बाळाला संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सर्दी किंवा फ्लू झालेला असेल तर त्याने बरे होईपर्यंत बाळापासून दूर राहिले पाहिजे. बाळाला घेण्याआधी हात स्वच्छ धुण्यास सांगा.

४. अकाली जन्मलेल्या बाळाला (प्रीमी) दीर्घकालीन आरोग्य विषयक समस्यांचा धोका असतो का?

तुमच्या अकाली जन्मलेल्या बाळाला अनेक आरोग्यविषयक समस्या असू शकतात कारण त्याला विकसित होण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. बाळाचा जन्म जितक्या लवकर होईल तितकेच त्याला श्वास घेण्यास त्रास होणे, स्नायू कमकुवत होणे, कमी ऐकू येणे, हृदयाच्या समस्या इत्यादीसारख्या विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अकाली जन्मलेल्या बाळांना अतिरिक्त काळजीची आवश्यकता असली तरी, कालांतराने अशी बाळे  पूर्ण-मुदतीच्या बाळांसारखे विकासाचे सर्व टप्पे गाठू शकतात. तुमच्या बाळाची चांगली वाढ होण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. आणखी वाचा: कमी वजनाची बाळे:कारणे,उपचार आणि काळजी नवजात बाळाची काळजी –पालकांसाठी महत्वाच्या टिप्स
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved