आरोग्य

बालदमा: कारणे, लक्षणे आणि उपचार

दमा हा श्वासोच्छवासाचा एक सामान्य आजार आहे. बाळांना आणि छोट्या मुलांना हा त्रास होऊ शकतो. परंतु, योग्य काळजी आणि वैद्यकीय मदत घेतल्यास, तुमच्या बाळाची जीवनशैली निरोगी आणि चांगली होऊ शकते. आपण ह्या लेखामध्ये दम्याची विविध कारणे आणि लक्षणे तसेच त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचार पर्यायांवर चर्चा करणार आहोत.

दमा म्हणजे काय?

श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऍलर्जिक आणि इतर घटकांप्रती संवेदनशीलता वाढते आणि दम्याचा त्रास होतो. दुस-या शब्दात सांगायचे तर, दमा ही एक वैद्यकीय समस्या आहे.  ह्या समस्येमध्ये श्वसनलिकेला सूज येते आणि त्यामुळे आणि फुफ्फुसातील वायुप्रवाहात अडथळा  निर्माण होतो. विविध प्रक्षोभक आणि पर्यावरणीय प्रदूषकांमुळे (परागकण, धूळ, तंबाखूचा धूर इ.) दमा होऊ शकतो. म्हणून, दमा आणि ऍलर्जी यांच्यात संबंध आहे. बहुतेकदा असे दिसून येते की ज्या लोकांना दम्याचा त्रास होतो त्यांचे वायुमार्ग अतिसंवेदनशील असतात.  किरकोळ त्रासदायक घटक किंवा ऍलर्जीमुळे त्यांच्या श्वसनमार्गावर परिणाम होऊ शकतो. मोठी मुले आणि प्रौढांच्या तुलनेत लहान बाळे किंवा लहान मुलांचे वायुमार्ग लहान असतात. विषाणूंचा संसर्ग, श्लेष्मामुळे हे लहान वायुमार्ग सहजपणे अवरोधित होतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दमा ही एक अत्यंत कठीण परिस्थिती असू शकते.

दम्याची समस्या लहान मुलांमध्ये किती सामान्य आहे?

१० ते १२ टक्के लहान मुलांना दम्याचा त्रास होऊ शकतो आणि ही आकडेवारी वाढत आहे. साधारणपणे, एखाद्या मुलास पाच वर्षांचा झाल्यावर किंवा कदाचित बाळ एक वर्षाचे होण्याआधीच दम्याचा पहिला त्रास होऊ शकतो, परंतु त्याचे निदान होऊ शकत नाही. दमा हे लहान मुलांमध्ये दीर्घकालीन आजारांचे प्रमुख कारण बनले आहे.

बाळांना दमा कशामुळे होतो?

दम्याचे नेमके कारण माहित नाही. परंतु, दमा खालीलपैकी कोणत्याही कारणामुळे होऊ शकतो:

1. ऍलर्जीमुळे होणारा दमा

ऍलर्जी -आधारित दम्याचे कारण संवेदनशील रोगप्रतिकार प्रणाली आहे. जर एखाद्या बाळाला ऍलर्जी -आधारित दमा असेल, तर तो काही ऍलर्जीनसाठी संवेदनशील असू शकतो. हे ट्रिगर प्रत्येक लहान मुलासाठी वेगवेगळे असू शकतात. परागकण, धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा लाळ ही त्यामागील काही सामान्य कारणे आहेत.

2. नॉन-अॅलर्जिक दमा

कौटुंबिक इतिहास (अनुवांशिक कारणे) किंवा श्वसन संक्रमणाचा समावेश असलेल्या इतर कारणांमुळे दमा होऊ शकतो

बाळांमध्ये आढळणाऱ्या दम्याची लक्षणे काय आहेत?

आपल्या बाळाला दमा आहे की नाही हे कसे समजेल असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. याचे उत्तर म्हणजे लक्षणे शोधणे. बालदम्याची काही लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

1. वेगवान श्वासोच्छवास

तुमच्या बाळाला दमा असल्यास, तुम्हाला तुमच्या बाळाच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीत बदल आढळू शकतो. तीन महिन्यांच्या बाळाचा श्वासोच्छवासाचा दर ३०  ते ६० श्वास प्रति मिनिट इतका असतो. ही श्वासोच्छवासाची पद्धत तीन महिन्यांपासून बदलते आणि श्वासाचा दर २० ते ४० श्वास प्रति मिनिट होतो. परंतु, दमा असलेल्या बाळाच्या श्वासोच्छवासात प्रति मिनिट ५० टक्के वाढ दिसून येते.

2. छातीत घट्टपणा

स्नायूंच्या ताणामुळे दमा असलेल्या बाळाची छाती ताठ असते.

3. श्वास घेण्यास त्रास होणे

योग्य रीतीने श्वास घेण्यास त्रास होणे, पोटाच्या वेगाने होणाऱ्या हालचाली आणि नाकपुड्यानं सूज येणे ही लक्षणे दिसून येतात.

4. अति खोकला

तुमच्या बाळाला अनियंत्रितपणे खोकला येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हा खोकल्याचा त्रास संध्याकाळी उशिरा किंवा रात्री अधिक जास्त प्रमाणात होऊ शकतो.

5. घरघर आवाज

दम्याचे बाळ श्वास घेत असताना घरघर आवाज करेल. हा घरघर आवाज श्वासोच्छवासाच्या ताणामुळे होतो.

6. खाताना अथवा दूध पिताना त्रास होणे

दमा असलेल्या बाळाला नीट खाणे कठीण होऊ शकते. श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे असे होते.

7. थकवा आणि सुस्ती

तुमच्या बाळाला दमा असल्यास, तुम्हाला तुमचे बाळ नेहमीपेक्षा कमी सक्रिय दिसू शकते.

8. रडण्याचा क्षीण आवाज

दमाग्रस्त बाळांना रडण्याचा क्षीण आवाज येतो किंवा त्यांचे रडणे सामान्य बाळांच्या तुलनेत खूपच क्षीण असते.

9. निळी किंवा फिकट त्वचा आणि नखे

रक्तातील ऑक्सिजनच्या कमी पातळीमुळे तुमच्या बाळाचे ओठ किंवा नखे निळ्या किंवा फिकट रंगाची दिसू शकतात. ही बाळांमध्ये दम्याची काही चिन्हे आहेत. ह्या लक्षणांच्या आधारे तुमच्या बाळाला दमा आहे किंवा नाही हे निश्चित करण्यास मदत होईल.

दम्याची इमर्जन्सी जाणून घेणे

दम्याचा अटॅक सौम्य, मध्यम किंवा गंभीर असू शकतो. दम्याच्या सौम्य झटक्यामध्ये बाळाला सामान्य वाटू शकते आणि बाळ चांगले असते. परंतु, मध्यम किंवा तीव्र दम्याचा झटका आल्यास, तुमच्या बाळाला खालील लक्षणे दिसू शकतात: जर तुम्हाला तुमच्या बाळामध्ये वरील चिन्हे आणि लक्षणे आढळली तर लगेच त्याची काळजी घ्या.

कोणत्या बाळाला दमा होण्याचा सर्वाधिक धोका असतो?

तुमच्या बाळाला खालील परिस्थितीत दमा होण्याची शक्यता असते:

1.अनुवंशिकता

दम्याची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक असतात आणि जर पालकांपैकी एकाला दमा असेल तर बाळालाही तो असण्याची दाट शक्यता असते. जवळच्या रक्ताच्या नातेवाईकांपैकी कोणाला दमा झालेला असेल तर तुमच्या बाळालाही दमा होण्याची शक्यता असते.

2. ऍलर्जी

जर तुमच्या बाळाला हवेतील घटकांपासून (धूळ माइट्स, परागकण, वनस्पतींचे तंतू, बुरशी) ऍलर्जी झालेली असेल तर तुमच्या बाळाला दमा होण्याची दाट शक्यता असते. अस्थमाच्या ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांना ऍलर्जीक दमा असतो. जेव्हा तुमचे बाळ यापैकी कोणतेही ऍलर्जीन श्वासाद्वारे आत घेते तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती जोमाने कार्य करते. यामुळे श्वासनलिका फुगतात, श्लेष्मा वाढतो आणि दम्याचा त्रास होतो.

3. एक्झिमा

एक्झिमा आणि दमा यांच्यातील परस्परसंबंधाला वैज्ञानिक संशोधनाचाही आधार मिळत आहे. याचा अर्थ हे दोन्ही आजार एकाच उत्परिवर्तित जनुकामुळे होतात. अशा प्रकारे, जर तुमच्या बाळाला एक्झिमचा त्रास होत असेल, तर त्यालाही दमा होण्याची शक्यता २० टक्के असते.

4. इओसिनोफिल्सची उच्च संख्या

तुमच्या बाळाला ऍलर्जी होण्याची शक्यता असल्यास तुमच्या बाळाची इओसिनोफिल संख्या (पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार) जास्त होऊ शकते. तुमच्या बाळाच्या रक्तात आणि लाळेमध्ये चार टक्क्यांहून अधिक इओसिनोफिलची संख्या असल्यास बाळाला दम्याचा त्रास होऊ शकतो.

5. घरघर

जर तुम्हाला सर्दी झाल्यावर घरघर आवाज येत असेल तर तुमच्या बाळाची श्वासनलिका संकुचित झाली आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो. या स्थितीमुळे बाळांना दमा होऊ शकतो.

6. अन्नाची ऍलर्जी

अन्नाच्या ऍलर्जीमुळे होणारा दमा फारसा सामान्य नाही. परंतु, काही खाद्यपदार्थांच्या ऍलर्जीमुळे तुमच्या बाळाला दमा होण्याची शक्यता असते.

लहान मुलांमध्ये दम्याचे निदान कसे केले जाते?

तुमच्या बाळाला दमा असल्याची तुमच्या डॉक्टरांना शंका आल्यास, ती शक्यता पडताळून पाहण्यासाठी डॉक्टर खालील उपायांचा अवलंब करू शकतात:

1. लक्षणांबद्दल चौकशी करा

तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळाला दिसणाऱ्या दम्याच्या विविध लक्षणांबद्दल विचारू शकतात.

2. कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास करा

तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल विचारले जाऊ शकते. याआधी कुटुंबात ऍलर्जी, एक्झिमा किंवा दम्याची काही प्रकरणे आहेत का, इत्यादींची डॉक्टर चौकशी करतील.

3. छातीचा एक्स-रे

ब्रॉन्किओल्समधील अडथळे, ऊतींमध्ये सूज किंवा श्लेष्मा जमा झाल्याची तपासणी करण्यासाठी तुमचे डॉक्टर तुमच्या बाळाच्या छातीचा एक्स-रे काढण्यास सांगू शकतात.

4. रक्ताची तपासणी

इओसिनोफिल्सची संख्या तपासण्यासाठी तुमच्या बाळाच्या रक्ताची चाचणी केली जाऊ शकते. वाढलेली संख्या हे दम्याचे सूचक आहे. वर नमूद केलेल्या पॅरामीटर्सची तपासणी केल्यानंतर निदान केले जाते. एकदा निदान पूर्ण झाल्यावर, तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या बाळासाठी सर्वोत्तम आणि योग्य उपचार सांगतील.

बाळांमधील दम्यावर उपचार

दम्यावर इलाज नाही. औषधे केवळ या आजाराची लक्षणे व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. तुमच्या बाळाला औषधे देण्याचे विविध मार्ग खालीलप्रमाणे आहेत:
  1. नेब्युलायझर
  2. ड्राय-पावडर इनहेलर (DPI)
  3. मीटर-डोस इनहेलर (MDI)
  4. इंजेक्शन्स
जर तुम्ही औषधे शोधत असाल, तर तुम्हाला दम्याची औषधे साधारणपणे तीन श्रेणींमध्ये मोडतात हे तुम्हाला माहिती असले पाहिजे. ही औषधे खालीलप्रमाणे आहेत:

दीर्घकालीन नियंत्रण औषधे

नावाप्रमाणेच, दम्याची लक्षणे टाळण्यासाठी लहान मुलांना ही औषधे दीर्घकाळ घेणे आवश्यक ठरू शकते. तुमच्या बाळाच्या स्थितीची तीव्रता तुमच्या बाळाला किती काळ औषधाची गरज भासेल हे ठरविण्यात तुमच्या डॉक्टरांची मदत होऊ शकते.

जलद-निवारण औषधे

ही औषधे श्वासोच्छवास, घरघर आणि छातीच्या स्नायूंमध्ये घट्टपणा यापासून त्वरित आराम देतात. ही औषधे इंट्राव्हेनस किंवा एमडीआयद्वारे दिली जाऊ शकतात. ही औषधे दम्याच्या लक्षणांपासून त्वरित आराम देतात आणि दीर्घकालीन परिणामांसाठी ही औषधे वापरली जात नाहीत.

ऍलर्जी-प्रेरित दम्यासाठी औषधे

जर दम्याचा अटॅक हा ऍलर्जीमुळे आलेला असेल तर तुमचे डॉक्टर औषधांचा वेगळा कोर्स सुचवतील. ऍलर्जी-प्रेरित दम्यासाठीच्या औषधांमुळे लवकर बरे वाटते आणि ही औषधे दीर्घकालीन दम्याच्या औषधांच्या सोबत दिली जातात.

दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी काय केले जाऊ शकते?

एक पालक या नात्याने तुम्हाला प्रश्न पडतो की लहान मुलांमध्ये दमा कसा टाळता येईल किंवा मुलांमध्ये दम्याची लक्षणे कमी करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय करू शकता. काळजी करू नका, तुमच्या समस्येसाठी काही उपाय खाली दिलेले आहेत:

बालदम्याचे व्यवस्थापन कसे करावे?

दम्याचा त्रास फक्त मुलांनाच नाही तर पालकांनाही होऊ शकतो. खाली काही उपाय दिलेले आहेत. हे उपाय तुम्ही लहान मुलांचा दमा व्यवस्थापित करण्यासाठी वापरू शकता:

दमा बरा होऊ शकतो का?

दम्याचा त्रास बाळाला दीर्घकाळ होऊ शकतो. दम्यासाठी कोणतीही उपचार पद्धती उपलब्ध नाही  परंतु काही मुलांची जसजशी वाढ होते तसे  दम्याची लक्षणे कमी होताना दिसून येतात. असे दिसून आले आहे की ५० टक्के मुले पौगंडावस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर दम्याची लक्षणे वाढतात. जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर बाळाची योग्य वाढ आणि विकासात दम्याची समस्या अडथळा आणू शकत नाही हे पालकांनी समजून घेणे फार महत्वाचे आहे. तुमच्या बाळाच्या या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन जरूर घ्या. आणखी वाचा: बाळांच्या सर्दी खोकल्यावर घरगुती उपाय बाळांच्या छातीत कफ होणे: कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved