गर्भारपण

गरोदरपणात खाज सुटण्यावर १० घरगुती उपचार

गरोदरपणात खाज सुटणे खूप वेदनादायी असू शकते. जसजसे शरीरात बदल होतात आणि आकारात वाढ होते तसे त्वचेवरील ताण वाढतो आणि वजन वाढल्यामुळे शरीरावर एक प्रकारचा घट्टपणा येतो. संप्रेरक पातळीत सतत बदल होत असताना शरीराच्या त्वचेवर सर्वत्र खाज सुटण्यास सुरुवात होते. गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी काही नैसर्गिक उपाय आहेत ज्यामुळे त्वचेची खाज कमी होऊन त्वचेला आराम पडण्यास ते फायदेशीर ठरू शकतात.

गरोदरपणात त्वचेला खाज सुटण्याची कारणे

गरोदरपणात त्वचेला खाज सुटण्याची काही कारणे खाली आहेत

गरोदरपणात खाज सुटणाऱ्या त्वचेसाठी १० घरगुती उपचार

  गर्भावस्थेदरम्यान, विशेषत: तिसऱ्या तिमाहीत उद्भवणार्‍या खाजेपासून स्वत: ला मुक्त करण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत.

. कोल्ड कॉम्प्रेस वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे? तुम्ही हे किती वेळा करावे? ह्या उपायाचे कार्य बर्फाचे पॅक बाधित भागावर लावल्यास त्वचेचा दाह कमी होतो आणि खाज सुटण्यापासून आराम मिळतो. थंड बर्फ त्वरित त्या भागाला आराम देतो.

. जुनिपर बेरी लोशन वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य जुनिपर बेरीमध्ये प्रखर विरोधी दाहक घटक असतात. दुसरीकडे लवंगामध्ये युजेनॉल, हा एक सुगंधित आणि तेलकट पदार्थ असतो. जेव्हा हे पदार्थ एकत्र मिसळले जातात, तेव्हा तयार होणारा पदार्थ खाज सुटण्यावर औषध म्हणून काम करतो.

. काही लिंबाचा रस वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य लिंबाच्या रसामध्ये एक आराम देणारी गुणवत्ता असते जी खाज सुटण्यावर उपयुक्त आहे. यात अँटीमाइक्रोबियल पदार्थ देखील आहेत जे पृष्ठभागावर उपस्थित असलेल्या कोणतेही सूक्ष्मजंतू काढून टाकण्यास मदत करतात.

. हरभरा पिठाची पेस्ट वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य बेसन त्वचेला ताजे आणि मऊ ठेवते. बेसनाच्या पिठामध्ये हे मूलभूत गुणधर्म असल्याने त्याची पेस्ट वापरल्यास त्वचेला आर्द्रता येऊ शकते आणि खाज सुटणे कमी होते.

. रानफुलांचे (Dandelion) मूळ वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य कोलेस्टेसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या यकृताच्या समस्येमुळे त्वचेची समस्या होऊ शकते. रानफुल झाडाच्या मूळांमध्ये पित्त प्रवाह उत्तेजित आणि यकृत कार्यक्षमता सुधारित करणारे गुणधर्म आहेत. परिणामी त्वचेची खाज सुटणे देखील कमी होण्यास मदत होते.

. कॅलामीन लोशन वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य ज्या गरोदर स्त्रियांमध्ये पॉलिमॉर्फिक विस्फोट (पीईपी) समस्या असते त्यांच्या शरीरावर त्वचेची खाज सुटून लाल पुरळ येते. जेव्हा गरोदरपणात पोटावर खाज सुटते तेव्हा कॅलेमाइन लोशन हा एक चांगला पर्याय असतो. त्यामुळे खाज सुटणे कमी होते आणि कोणत्याही प्रकारची होणारी चिडचिड किंवा जळजळ थांबते

. नारळ तेल वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य नारळ तेलाच्या त्वचेमध्ये कोरड्या असलेल्या त्वचेच्या पेशीपर्यंत पोहोचण्याची क्षमता असते. तसेच त्यांना आवश्यक असलेल्या फॅटी ऍसिड्स पुरविणे खाज सुटणे आणि चिडचिड कमी करण्यास मदत करते. तेलाचे प्रतिजैविक गुणधर्म त्वचेच्या कोणत्याही संसर्गास सामोरे जातात ज्यामुळे जळजळ किंवा दाह कमी करण्यास मदत करते.

. आंघोळीदरम्यान बेकिंग सोडा वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य बेकिंग सोडा पेस्ट कोरड्या त्वचेपासून आणि कोणत्याही खाज सुटण्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्वचा खाजवल्यावर उद्भवणारा लालसरपणा किंवा चिडचिड ह्याची सुद्धा सोड्यामुळे काळजी घेतली जाते. ह्या व्यतिरिक्त बेकिंग सोडा त्वचेचा पीएच बॅलन्स नियमित ठेवण्यास सुद्धा मदत करतो.

. कोरफडीचा गर वापरणे

आवश्यक साहित्य: कोरफडीचे पान तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य कोरफड आरोग्यास फायदे प्रदान करण्यासाठी आणि त्वचेच्या विविध परिस्थितींचा उपचार करण्यासाठी खूप परिचित आहे. त्याचे दाहक-विरोधी गुणधर्म आणि त्यातील त्वचेला ओलावा देणारे घटक त्वचेला आवश्यक आर्द्रता देतात, त्यामुळे त्वचा मऊ पडते आणि खाजसुटीपासून आराम पडतो.

१०. आंघोळीदरम्यान ओट्सचे जाडे भरडे पीठ वापरणे

आवश्यक साहित्य: तुम्ही काय करावे तुम्ही हे किती वेळा केले पाहिजे ह्या उपायाचे कार्य ओटमील खाज सुटलेल्या त्वचेच्या उपचारांसाठी अत्यंत उपयुत्क आहे. त्यामध्ये असलेल्या सुखदायक गुणधर्मांमुळे थेट प्रभावित भागात आराम मिळतो. गर्भावस्थेच्या संपूर्ण प्रवासात खाज सुटणे ही एक त्रासदायक समस्या बनू शकते. तथापि, घरी करता येणारे काही नैसर्गिक उपाय वापरून तुम्ही ह्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. आणखी वाचा: गरोदर स्त्रियांसाठी २० आरोग्यविषयक टिप्स गरोदरपणात होणारा ‘मॉर्निंग सिकनेस’
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved