गर्भारपण

गरोदरपणात डॉक्सीनेटच्या गोळ्या घ्याव्यात का?

आपण सर्वजण आजारी पडल्यावर बरे वाटण्यासाठी गोळ्या औषधे घेत असतो. पण जर तुम्ही गरोदर असाल तर तुम्हाला ही गोळ्या खाण्याची सवय सोडावी लागेल. गरोदरपणात तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, तसेच गरोदरपणात हार्मोनल असंतुलन होत असते, त्यामुळे गरोदरपणात काही औषधे घेतल्याने तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ, बद्धकोष्ठतेसाठी औषधे घेतल्याने तुम्हाला तात्पुरते बरे वाटू शकते, परंतु काहीवेळा त्यामुळे शरीरावर सूज येण्यासारख्या इतर समस्या उद्भवू शकतात. मॉर्निंग सिकनेस आणि मळमळ हे गरोदरपणाचे एक सामान्य लक्षण आहे आणि त्यासाठी तुम्हाला डॉक्सिनेट हे औषध घेण्याचे सुचवले जाऊ शकते. पण हे औषध घ्यावे का? चला अधिक जाणून घेऊयात!

डॉक्सिनेट म्हणजे काय?

डॉक्सिनेट हे एक मुखाद्वारे घेण्याचे औषध आहे आणि ते गोळ्या तसेच कॅप्सुलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. हे औषध बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. सामान्यतः हे औषध 'डॉकुसेट सोडियम' म्हणून ओळखले जाते. हे स्टूल सॉफ्टनर बद्धकोष्ठतेपासून आराम देते तसेच बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. म्हणूनच, अलीकडे, गरोदरपणात डॉक्सिनेटचा वापर वाढला आहे. गरोदरपणात, स्त्रीची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे, बद्धकोष्ठतेसारख्या समस्या नियमितपणे निर्माण होऊ शकतात. डॉक्सिनेट घेतल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासातून आराम मिळू शकतो. डॉक्सिनेट हे औषध मॉर्निंग सिकनेस, छातीत जळजळ आणि ऍसिडिटीचा सामना करण्यास देखील मदत करते. त्यामुळे  डॉक्सिनेट हे औषध अष्टपैलू औषधांपैकी एक आहे आणि ते स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणाच्या कोणत्याही टप्प्यावर लिहून दिले जाते.

गर्भवती स्त्रियांसाठी डॉक्सिनेटचा वापर सुरक्षित आहे काय?

डॉक्टरांच्या मते, गरोदरपणात डॉक्सिनेट वापरण्यास सुरक्षित आहे. अमेरिकन प्रतवारीच्या औषधांच्या प्रणालीनुसार, हे औषध गरोदरपणात घेता येणाऱ्या औषधांच्या श्रेणीमध्ये येते. ह्याचा अर्थ ह्या औषधाचे  कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे, तुमचे किंवा तुमच्या बाळाचे कोणतेही मोठे नुकसान होत नाही. परंतु  हे औषध तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यावरच घ्या. शिवाय, हे औषध घेतल्यानंतर तुम्हाला अस्वस्थता जाणवत असल्यास किंवा त्रास होत असल्यास ते घेणे थांबवा. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, ह्या औषधाचा ओव्हर-द-काउंटर वापर करण्याची शिफारस केलेली नाही.

गरोदरपणात डॉक्सिनेट घेणे कधी सुरू करावे आणि थांबवावे?

डॉक्सिनेट हे औषध सहसा मॉर्निंग सिकनेसची लक्षणे कमी करण्यासाठी लिहून दिले जाते. मॉर्निंग सिकनेस गरोदरपणाच्या दुस-या आठवड्यात होऊ शकतो आणि 12 व्या आठवड्यापर्यंत चालू राहू शकतो. परंतु, कोणतीही दोन गर्भारपणे सारखी नसतात. अनेक स्त्रियांना गरोदरपणाच्या 6 व्या आठवड्यापासून मॉर्निंग सिकनेसचा त्रास होऊ शकतो. तुम्ही किती काळ हे औषध घेणे सुरू ठेवावे हे तुमच्या स्थितीवर अवलंबून असेल. तुम्ही हे औषध घेत असल्यास, तुम्ही ते कसे आणि केव्हा थांबवू शकता तसेच तुम्ही ते औषध घेतल्याशिवाय राहू शकत असाल तर त्याबद्दल सुद्धा तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा.

औषधांची गर्भधारणा श्रेणी काय आहे?

गर्भधारणा श्रेणी म्हणजे गरोदरपणात औषधांच्या सुरक्षिततेच्या क्रमाने त्यांची क्रमवारी लावणे. त्यामुळे गरोदर स्त्रीला गरोदरपणात कोणती औषधे घेणे सुरक्षित आहे आणि कोणती नाही हे समजण्यास मदत होते. विकसनशील बाळाच्या आरोग्यावर आणि आईच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांनुसार औषधांचे वर्गीकरण केले जाते. गरोदरपणात डॉक्सिनेट हे सुरक्षित औषध मानले जाते.

डॉक्सिनेट घेण्याचे दुष्परिणाम

डॉक्सिनेटला सुरक्षित औषध म्हणून वर्गीकृत केले गेले असले तरी त्याचे स्वतःचे दुष्परिणाम आहेत. हे दुष्परिणाम सहसा औषधाच्या पॅकेजिंगवर नमूद केले जातात. तुमच्या दैनंदिन कामात ही औषधे व्यत्यय आणू शकतात. ह्या औषधाचे दुष्परिणाम खालीलप्रमाणे पूर्व-अस्तित्वात असलेल्या परिस्थितींमुळे काही दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास किंवा तुम्ही गोळ्या घेत असताना काही अस्वस्थता जाणवल्यास तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधे घेण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमच्याकडे आधीपासून अस्तित्वात असलेल्या सर्व परिस्थितींबद्दल चर्चा करा जेणेकरून डॉक्टर तुम्हाला माहितीपूर्ण सल्ला देऊ शकतील.

तुम्ही मॉर्निंग सिकनेसवर उपचार केला नाहीत तर काय?

मॉर्निंग सिकनेस ही गरोदरपणातील एक स्थिती आहे आणि ती अत्यंत अस्वस्थ करणारी असू शकते. औषधे आणि विश्रांती घेतल्याशिवाय मॉर्निंग सिकनेसचा सामना करणे कठीण होऊ शकते. उपचार न केल्यास, मॉर्निंग सिकनेसचे खालीलप्रमाणे परिणाम होऊ शकतात: गर्भधारणेच्या नंतरच्या टप्प्यात बद्धकोष्ठतेचा सामना करण्यासाठी डॉक्सिनेट मदत करू शकते. असा अंदाज आहे की 70% पेक्षा जास्त स्त्रियांना गरोदरपणात बद्धकोष्ठता आणि मॉर्निंग सिकनेसची समस्या असते. 10 पैकी 5 स्त्रियांना मॉर्निंग सिकनेसचा त्रास असह्य होतो. त्यातून बरे होण्यासाठी गर्भवती स्त्रिया काही दिवस कामातून ब्रेक घेतात. औषधांचा वापर केल्याने मॉर्निंग सिकनेस आणि बद्धकोष्ठता यावर काही प्रमाणात उपचार करता येतात. परंतु, औषधे तुमच्या डॉक्टरांनी लिहून दिली असतील तरच तुम्ही ती घ्यावीत. स्वत: चे स्वतः औषधोपचार करू नका. तुमची औषधे इतर कोणाशीही सामायिक करू नका. गरोदरपणाच्या नंतरच्या टप्प्यात, डॉक्सिनेट हे औषध बद्धकोष्ठता आणि छातीत जळजळ होणे ह्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत करू शकते. परंतु हे औषध घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुमच्यासाठी ह्या औषधाची गरज आणि वापर समजून घ्या. आणखी वाचा: गरोदरपणात अँटासिड घेणे गरोदरपणातील औषधे: काय सुरक्षित आहे, पर्यायी उपचारपद्धती आणि बरंच काही
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved