In this Article
गर्भपात हा कोणत्याही स्त्रीसाठी एक वाईट अनुभव असतो. गर्भपात झाल्यानंतर बरे होण्यासाठी विश्रांती, भावनिक आधार आणि निरोगी आहाराची आवश्यकता असते. गर्भपात झाल्यानंतर त्वरित बरे होण्यासाठी कुठला आहार घेतला पाहिजे ते ह्या लेखामध्ये दिलेले आहे. गर्भपात झालेल्या स्त्रीसाठी कुठला आहार पोषक आहे आणि कुठला नाही त्याविषयीचे स्पष्टीकरण सुद्धा ह्या लेखाद्वारे केलेले आहे.
गर्भपाताची प्रमुख कारणे
गर्भपात होण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील काही आपल्या नियंत्रणामध्ये आहेत आणि काही नाहीत. जगभरातील गर्भपात होण्याची ही काही सामान्य कारणे आहेत.
१. वैद्यकीय गुंतागुंत
गर्भाशयात फायब्रॉईड असल्यास गरोदरपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात गर्भपाताची शक्यता असते. इतर वैद्यकीय गुंतागुंत म्हणजे गुणसूत्र विकृती, गर्भाशय ग्रीवाची विसंगती, गर्भाशयात सेप्टम इत्यादी असू शकतात.
२. जीवनशैली
गरोदरपणात धूम्रपान किंवा मद्यपान केल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते. तुम्ही गर्भवती असताना पपई आणि अननस ह्यासारखी काही फळे खाल्ल्यास गर्भपात होऊ शकतो. तुम्ही आवश्यक ती पोषणमूल्ये असलेला पौष्टिक आहार घेत आहात ना ह्याची खात्री करा.
३. आधीपासून असलेल्या वैद्यकीय समस्या
ज्या स्त्रियांना आधीपासूनच हायपर किंवा हायपो–थायरॉईडीझम आणि मधुमेह ह्या समस्या असतात त्यांना गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच, गरोदरपणापूर्वी ह्या समस्यांचे निदान केले पाहिजे आणि ते नियंत्रित केले पाहिजे.
गर्भपात झाल्यानंतर त्वरित पुनर्प्राप्तीसाठी कोणते पदार्थ खावे?
गर्भपातानंतर लवकर बरे होण्यासाठी कुठले अन्नपदार्थ खावेत हे माहित असणे सुद्धा महत्वाचे आहे. गर्भपात झाल्यानंतर निरोगी अन्न खाणे शरीरासाठी आवश्यक आहे, कारण शरीराला दुखापतीतून बरे होण्यासाठी पौष्टिक मूल्यांची आवश्यकता असते.
१. लोहयुक्त पदार्थ
गर्भपात केल्याने महिलांना थकवा व अशक्तपणा जाणवू शकतो. गर्भपात झाल्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता उद्भवू शकते. म्हणूनच, शरीरात लोहाची पातळी कायम राहील हे सुनिश्चित करण्यासाठी लोहयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.
लोहाचे हेम आणि नॉन–हेम लोह असे दोन प्रकार आहेत. हेम–लोह हे प्राण्याच्या स्रोतांच्या पदार्थात, जसे की लाल मांस, कोंबडी, आणि सीफूडमध्ये आढळते. हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, मसूर, सोयाबीन, मोड आलेली कडधान्ये, तीळ आणि भोपळ्याच्या बियाण्यासारख्या वनस्पती स्त्रोतांमध्ये हेम–नसलेले लोह आढळते
म्हणून वनस्पती हे स्त्रोत असलेले लोहयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे आणि मांस खाणाऱ्यांनी वनस्पती स्त्रोत आणि प्राण्यांचे स्रोत या दोहोंमधून लोहयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
२. कॅल्शियमयुक्त अन्न
गरोदरपणात, शरीरातील कॅल्शियम साठा वापरला जातो, कारण निरोगी हृदय, मज्जातंतू, स्नायू, हाडे आणि दात तयार करण्यासाठी गर्भाला कॅल्शियमची आवश्यकता असते. जेव्हा गर्भपात होतो तेव्हा शरीरातील सर्व कॅल्शियम गर्भाच्या ऊतींसह काढून टाकले जाते म्हणून शरीरात कॅल्शिअमची कमतरता जाणवते. म्हणूनच, स्त्रियांनी गडद हिरव्या पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, सार्डिन आणि सॅमन सारखे मासे आणि कोरडे अंजीर, खजूर आणि नट्स ह्यासारखा सुकामेवा सुद्धा खाल्ला पाहिजे.
3. फोलेट–समृध्द अन्न
बर्याच स्त्रिया ज्यांना गर्भपात झाला आहे, त्या पुनर्प्राप्तीनंतर पुन्हा गरोदरपणाचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत फोलेट–युक्त पदार्थांचे सेवन करणे चांगले आहे. पालक आणि रोमेन लेट्यूसमध्ये फोलेट आढळते. फोलेट हे शतावरी, ब्रोकोली, लिंबूवर्गीय फळे, मसूर, मटार, एवोकॅडो, भेंडी, स्क्वॅशस, बियाणे आणि नट्स मध्ये देखील आढळते. पालक, भेंडीची भाजी, छोले इत्यादी भारतीय पदार्थ फोलेट–समृद्ध आहेत.
४. प्रथिनेयुक्त पदार्थ
शरीर बरे होण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात, कारण प्रथिनांमधील अमीनो ऍसिड्स पेशींच्या दुरुस्तीस मदत करतात. म्हणून, आपण अंडी, मांस, सीफूड, दूध, चीज, दही, मसूर आणि चिकन ह्यासारखे पदार्थ खावेत. प्रथिनांचे शाकाहारी स्त्रोत म्हणजे मसूर, दुग्धजन्य पदार्थ आणि राजगिरा व शिंगाडा ही धान्ये आहेत. डाळ, छोले आणि पालक पनीर हे पौष्टिक आणि प्रथिनांनी समृद्ध भारतीय पदार्थ आहेत जे तुम्ही खाऊ शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता.
५. उत्साह वर्धक अन्नपदार्थ
गर्भपात झाल्याने येणारी उदासीनता आणि आघात बहुधा नैराश्यास कारणीभूत ठरू शकतात. संशोधनानुसार, मॅग्नेशियमची कमतरता नैराश्याशी निगडित आहे आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने चिंता कमी होते आणि उदासीनता कमी होण्यास मदत होते. मॅग्नेशियम नट्स, बियाणे, तपकिरी तांदूळ आणि गहू, हिरव्या पालेभाज्या, डार्क चॉकलेट, एवोकॅडो आणि मटार, मसूर, छोले इत्यादीसारख्या पदार्थांमध्ये आढळते. काही भारतीय पदार्थांमध्ये मूड चांगला करणारे घटक आहेत आणि ते पदार्थ म्हणजे छोले, कोको मिल्क शेक्स वगैरे.
६. नट्स
नट्स हे अनेक महत्वाच्या पोषक पदार्थांचे स्त्रोत आहेत जे गर्भपात झाल्यानंतर शरीराला लवकर पुनर्प्राप्तीस मदत करतात. नट्स मध्ये व्हिटॅमिन ई, लोह, मॅग्नेशियम, फोलेट, ओमेगा –६ आणि ओमेगा –३ फॅटी ऍसिड्स असतात. ते फायबरचा चांगला स्रोत देखील आहेत. तथापि, ते मध्यम प्रमाणात सेवन केले पाहिजेत कारण त्यात उच्च प्रमाणात चरबी आणि कॅलरी असतात. आपल्या दैनंदिन आहारामध्ये बदाम, पिस्ता, अक्रोड, काजू इत्यादी पदार्थांचा समावेश करा. खीर आणि बिर्याणी सारख्या भारतीय पदार्थांमध्ये देखील तुम्ही काजू वापरू शकता ज्यामुळे तुमचा मूड चांगला होईल.
७. फळे आणि भाज्या
अनेक वैज्ञानिक अभ्यासानुसार, ज्या महिलांनी गर्भपातानंतर आपल्या आहारात, भरपूर फळे आणि भाज्या समाविष्ट केल्या, त्यांना भविष्यात ५० % कमी गर्भपात होण्याचा धोका दर्शविला. लिंबूवर्गीय फळे, हिरव्या पालेभाज्या आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आरोग्यासाठी उत्तम आहेत.
८. व्हिटॅमिन सी समृध्द अन्न
द्राक्षे, संत्री आणि स्ट्रॉबेरी सारखी लिंबूवर्गीय फळे शरीरात लोह शोषण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्रोत आहेत. पुन्हा एकदा, आपण गर्भपातातून बरे होत असताना कोणती फळं तुमच्यासाठी चांगली आहेत आणि कोणती फळे टाळली पाहिजेत ह्यासाठी यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
गर्भपात झाल्यानंतर कोणते खाद्यपदार्थ टाळावेत?
काही पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असतात आणि जास्त प्रमाणात सेवन केल्यास गर्भपातानंतर हानी होऊ शकते. गर्भपात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात काय खाऊ नये ह्याचे संकलन खाली दिलेले आहे.
१. जंक आणि फास्टफूड्
कचोरी, पाणीपुरी, सामोसे, चिप्स, फ्रेंच फ्राईज, ,पिझ्झा, बर्गर, डोनट्स इत्यादींचा जंक आणि फास्ट फूड मध्ये समावेश होतो. ह्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात त्यामुळे लठ्ठपणा वाढतो तसेच जास्त प्रमाणात खाल्ल्याने हृदयरोग होण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्यास स्त्रियांमध्ये गर्भपाताची शक्यता वाढते आणि त्यामुळे नैराश्य देखील येते.
२. उच्च कार्बोहायड्रेट आणि कमी तंतुमय पदार्थ असलेले अन्नपदार्थ
प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये असलेले साधे आणि परिष्कृत कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी हानिकारक असतात, कारण त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते, परंतु तंतुमय पदार्थ कमी प्रमाणात असतात. झटपट नूडल्स, भात, बिस्किटे आणि मुरुक्कू, हलवा, कटलेट तसेच नान आणि मैद्यापासून बनवलेले प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. त्याऐवजी पोळी मध्ये असलेले जटिल कर्बोदके वापरा.
३. मिठाई
मिठाईविषयीचे अति–प्रेम टाळा. भावनिक बाबींमुळे तुम्ही जास्त मिठाई खाऊ शकता. साखरेने भरलेल्या मिठाईतून तुम्हाला कुठलीही पोषणमूल्ये मिळणार नाहीत त्याऐवजी खजूर किंवा अंजीर आधारित मिठाई निवडा.
४. उच्च चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ आणि मांस
दुग्धजन्य पदार्थांमधील आणि मांसातील चरबीमुळे गर्भपातानंतर शरीरात जळजळ होऊ शकते आणि आपली वेदना वाढू शकते. म्हणून, संपूर्ण चरबीयुक्त दूध, लोणी, फॅटी पनीर किंवा चीज, गोमांस आणि डुकराचे मांस यासारखे पदार्थ टाळा. त्याऐवजी मांस आणि दुधाच्या उत्पादनांची निवड करा.
गर्भपात ही कोणत्याही स्त्रीसाठी वेदनादायक घटना असते. गर्भपात झाल्यावर आहारातील बदलांमुळे पुनर्प्राप्तीच्या कालावधीवर प्रभाव पडतो. तुम्ही जो आहार घेता त्याप्रमाणे पुनर्प्राप्तीची प्रक्रिया गतिमान होते किंवा मंदावते. म्हणून, भरपूर फळे आणि भाज्या असलेला पोषक आहार घ्या आणि सगळे काही संयतपणे खा. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आहार ठरवा.
आणखी वाचा:
प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी
प्रसूतीनंतरची मालिश – एक मार्गदर्शिका