In this Article
बाळ आनंदाने स्तनपान घेत आहे आणि आई सुद्धा त्याच्याकडे बघून खूप आनंदी आणि समाधानी असलेल्या प्रतिमांचा नव्यानेच आई झालेल्या स्त्रीवर भडीमार केला जातो. स्तनपान हे निश्चितपणे सर्वोत्कृष्ट आणि आवश्यक आहे, परंतु काही वेळा परिस्थिती स्तनपान देण्यास अनुकूल नसते आणि तेव्हा बाळाला पोषण देण्याच्या अतिरिक्त स्रोताची आवश्यकता असू शकते आणि तेव्हा फॉर्मुला फिडींगची गरज भासते.
फॉर्म्युला का वापरायचा?
बाळाला फॉर्मुला देण्याचा निर्णय हा काही सोपा निर्णय नाही, परंतु काही बाबतीत, हा एकमेव पर्याय आहे. जेव्हा आई एकतर मानसिक किंवा शारीरिकरित्या आजारी असेल किंवा एखादी विशिष्ट औषधे घेत असेल तर ते बाळासाठी हानिकारक असू शकते. स्तनपान सुरु असताना एखादी महिला पुन्हा गर्भवती झाल्यास आणि गर्भाच्या आयुष्याला धोका निर्माण होत असेल तर तिला स्तनपान थांबवण्याचा सल्ला देण्यात येईल. कधीकधी खूप प्रयत्न करून सुद्धा आईला बाळासाठी पुरेसे दूध येत नाही. अशा परिस्थितीत, त्यांना स्तनपानासह फॉर्म्युला दूध देण्याचा सल्ला दिला जातो.
जरी आईच्या दुधाचे खूप फायदे असले तरी फॉर्म्युला फीडिंगमध्ये सोयीसुविधा असतात – ते प्रवासासाठी उत्कृष्ट आहे, बाळाला फॉर्म्युला दुधामुळे जास्त वेळ भूक लागत नाही, बाळाला कमी वेळा फॉर्म्युला देण्याची आवश्यकता असते आणि बाळाला फॉर्म्युला दूध कुणीही देऊ शकते – त्यामुळे बाळाचा बाबांसोबत चांगला बंध तयार होतो.
परंतु फॉर्म्युला फीडिंग देखील खूप आव्हानात्मक असते!
फॉर्म्युला फीडिंगसाठी काही टिप्स
- योग्य सूत्र निवडा: बर्याच फॉर्म्युला ब्रँडमध्ये समान घटक असतात, काही फॉर्म्युल्यांमध्ये अतिरिक्त लोह किंवा व्हिटॅमिन के असू शकतात. तुमच्या बाळासाठी सर्वात योग्य फॉर्म्युला माहित करून घेण्यासाठी डॉक्टरांशी बोला. ऍलर्जी असलेल्या बाळांना विशेष विचार करण्याची आवश्यकता असते. पण गाईच्या दुधापासून दूर रहा; १वर्षाखालील मुलासाठी ते पचण्याजोगे नसते.
- योग्य बाटली निवडा: तुम्ही बाळाला दूध पाजण्याची बाटली आणि बाळ स्वतः धरून ठेवू शकेल अशी बाटली वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेल्या असतात. तुमच्या सध्याच्या गरजेनुसार योग्य आकार निवडा. प्रत्येक वेळेला दूध पाजल्यानंतर बाटल्या निर्जंतुकीकरण करण्याचे सुनिश्चित करा. आपण बाटल्या उकळवून घेऊन किंवा योग्य स्टीम निर्जंतुकीकरण वापरू शकता. बाटल्यांचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. केवळ फॉर्म्युला–पोषित बाळांना अधिक बाटल्या लागतात, म्हणून आधीच स्टॉक करून ठेवा.
- योग्य प्रकारे तयार कराः तुम्ही केवळ फॉर्म्युला देत असलात किंवा ते टॉप फीड म्हणून वापरत असलात तरी आपल्या बाळाला किती फॉर्म्युला आवश्यक आहे याबद्दल आपल्या डॉक्टरांना विचारा. बाळाची जसजशी वाढ होत जाईल तशी बाळाला अधिक फॉर्म्युल्याची आवश्यक भासेल, म्हणून त्याच्या भुकेच्या संकेतांवर लक्ष ठेवा. पॅकेजच्या सूचनेनुसार फॉर्म्युला तयार करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तसे न केल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. खूप जाडसर फॉर्म्युला डिहायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेस कारणीभूत ठरू शकतो तर फॉर्म्युला अगदी पातळ केल्यास बाळाची भूक भागत नाही. जर अगदी उलटी होईपर्यंत बाळ फॉर्मुला घेत असेल तर फॉर्मुला थोडा कमी करण्याची गरज आहे आणि तसे केल्याने बाळाला आरामदायक वाटते का ह्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
- बाटली आणि बाळाला एका कोनात धरा: तुम्हाला आणि तुमच्या बाळाला अधिक नैसर्गिक अनुभव येण्यासाठी बाळाला फॉर्मुला फिडींग करताना स्तनपानाच्या स्थितीत घ्यावे. बाळाला एका हाताने आधार देत दुसऱ्या हातात बाटली ४५ अंशाच्या कोनात धरावी. बाळाच्या घशात दूध अडकणे आणि कानाच्या संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी बाळाचे डोके किंचित उंचावर धरले पाहिजे. ह्याच कारणामुळे बाळाच्या हातात बाटली देऊन ठेऊ नका, तसेच खूप काळ बाटलीतून दूध ओढल्यास दात खराब होण्याची सुद्धा शक्यता असते.
- फॉर्म्युला गरम करू नका: फॉर्म्युला दुधाचे शेल्फ लाइफ मर्यादित आहे, त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी फॉर्म्युला पॅकेजिंग तपासा. बरेच फॉर्म्युला ब्रॅण्ड्स फॉर्म्युला पुन्हा गरम करण्यास काटेकोरपणे मनाई करतात आणि दीड ते तीन तासांचे शेल्फ लाइफ देतात. आपल्याकडे निर्धारित शेल्फ लाइफपेक्षा जुना फॉर्म्युला असल्यास तो फेकून द्या आणि एक नवीन मिश्रण तयार करा. प्रवास करताना, पाणी आणि फॉर्मुला स्वतंत्रपणे घेऊन जा आणि आवश्यकतेनुसार तयार करा. हे बाटलीमध्ये पूर्व–मिश्रित फॉर्म्युला ठेवण्यापेक्षा सुरक्षित आहे.
- बाहेरचे दूध देण्यास १२ व्या महिन्यापासून सुरुवात करा: वयाच्या पहिल्या वर्षापासून, आपल्या बाळाचे शरीर गाईचे दूध पचवण्यास तयार होते, परंतु फॉर्मुला बंद करून बाळाला गायीचे दूध देण्यास सुरुवात केल्यास प्रतिकार होऊ शकतो. गायीचे दूध फॉर्मुला दुधात मिसळून देण्यास सुरुवात करा, नंतर हळू हळू गायीच्या दुधाचे प्रमाण वाढवा जेणेकरून तुमच्या बाळाला नवीन चवीची सवय होईल.
फॉर्म्युला पोषित बाळांना स्तनपान घेणाऱ्या बाळांपेक्षा वेगळी शौचास होते तसेच शौचास वास येणे सुद्धा सामान्य आहे; फॉर्म्युला–पोषित बाळांना घट्ट शौचास होते. प्रत्येक वेळेला बाळाला फॉर्म्युला दिल्यावर बाळ रडत असेल किंवा फॉर्म्युला बाहेर काढत असेल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळाला कदाचित ऍलर्जी असू शकते किंवा तुम्ही वापरत असलेल्या ब्रॅण्डमुळे बाळाला गॅस होत असेल. तुमचे डॉक्टर नक्कीच तुम्हाला योग्य पर्याय सुचवतील.
आणखी वाचा: