Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी

चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी

चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी

संभाव्य गर्भधारणा आनंद किंवा चिंता उत्पन्न करू शकते. त्यामुळे आधी खात्री करणे आवश्यक आहे. गर्भाधारणा झाली आहे किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अगदी सोयीस्कर असणाऱ्या आणि घरी करता येणाऱ्या गर्भधारणा चाचणीवर बऱ्याच स्त्रिया अवलंबून असतात आणि ह्या गरोदर चाचणी किट्स फार्मसी आणि इतर अनेक वैद्यकीय स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असतात. यापैकी बहुतेक किट्स तुमच्या लघवीमध्ये असलेले गर्भधारणा संप्रेरक एचसीजी (मानवी कोरिओनिक गोनाडोट्रोपिन) ची उपस्थिती शोधण्यासाठी डिझाइन केलेले असतात. जरी ह्या चाचण्या ९७% ते ९९% अचूक असल्याचा दावा केला जात असला तरी, क्वचित प्रसंगी तुम्हाला चुकीचेसकारात्मक किंवा नकारात्मक रिझल्ट्स मिळू शकतात.

चुकीची सकारात्मक गर्भधारणा चाचणी म्हणजे काय?

जेव्हा आपली गर्भधारणा चाचणी सकारात्मक परिणाम दर्शविते, परंतु तुम्ही गर्भवती नसता, तेव्हा त्यास चुकीची सकारात्मक (पॉझिटिव्ह) चाचणी म्हणतात.

चुकीच्या सकारात्मक गरोदरपण चाचणी निकालाची कारणे

तुम्ही आश्चर्यचकित आहात की गर्भधारणा चाचणी चुकीची सकारात्मक का असू शकते? कधीकधी, किट कदाचित त्याचे कार्य अगदी योग्य प्रकारे करीत असेल, परंतु परिणाम वेगवेगळ्या कारणांसाठी अपूर्ण असू शकतात, जसे की:

. अलीकडील गर्भपात / प्रसूती

मागील ८ आठवड्यांत जर तुमची प्रसूती झाली असेल किंवा गर्भधारणा संपुष्टात आली असेल (गर्भपात झालेला असेल) तर आपली एचसीजीची पातळी अद्याप तुलनेने जास्त असू शकते. ह्या कारणामुळे चाचणी सकारात्मक येऊ शकते कारण गर्भधारणा संपुष्टात आल्यावर ह्या संप्रेरकाची पातळी हळू हळू कमी होते.

. रासायनिक गर्भधारणा

रासायनिक गर्भधारणा म्हणजे रोपणानंतर फलित अंड्याचा विकास होत नाही आणि त्याचे गर्भात रूपांतर होत नाही. तांत्रिकदृष्ट्या, जरी आपण चाचणी घेता तेव्हा आपण कदाचित गर्भवती असल्याचे निर्देशित केले जात असले तरी ही गर्भधारणा, गर्भपात होऊन संपुष्टात येते. अंदाजे २५४०% गर्भपात झालेले लक्षात येत नाहीत आणि गर्भधारणा संपुष्टात येते.

. एक्टोपिक गर्भधारणा

जेव्हा फलित झालेल्या अंड्याचे गर्भाशयाशिवाय इतर कोठेतरी रोपण होते त्यास एकटोपीक गर्भधारणा म्हणतात. गर्भाशयाच्या बाहेर जागा नसल्यामुळे गर्भ वाढू शकत नाही. चुकीच्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीचे एक कारण म्हणजे एक्टोपिक गर्भधारणा. पण असे झाल्यास ती मेडिकल इमर्जन्सी असते. आपल्याला एखाद्या एक्टोपिक गर्भधारणेबद्दल संशय असल्यास, आपण वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

. संकीर्ण वैद्यकीय समस्या

अंडाशय, मूत्राशय, मूत्रपिंड, फुफ्फुस, स्तन आणि पोटाचे कर्करोग यासारख्या काही वैद्यकीय परिस्थिती; गॅस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज, ओवॅरियन सिस्ट्स, मूत्रपिंडाचा रोग किंवा मूत्रमार्गात संसर्ग, अँडेनोमायसिसमुळे एखाद्या महिलेची एचसीजीची पातळी वाढू शकते आणि चाचणीचा चुकीचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

. रजोनिवृत्ती

जेव्हा स्त्रियांचे रजोनिवृत्तीमध्ये संक्रमण होते तेव्हा त्यांच्यात बहुतेक वेळा एचसीजी जास्त असते. यामुळे काही वृद्ध स्त्रियांमध्ये चाचणीचा परिणाम चुकीचा सकारात्मक येऊ शकतो.

. चाचणीच्या सूचनांचे योग्यरीत्या पालन न करणे

जर आपण निर्मात्याच्या सूचनांचे योग्यरित्या पालन केले नाही तर कदाचित आपणास चाचणीचे परिणाम चुकीचेपॉझिटिव्ह मिळतील. निश्चित केलेल्या चौकटीत निकाल तपासत आहात ना हे पहिले पाहिजे. चाचणी निर्दिष्ट कालावधीपेक्षा जास्त वेळ राहू दिल्यास तुम्हाला सकारात्मक चाचणी रेषेसासारखी, मूत्र बाष्पीभवन रेषा गोंधळात टाकू शकते.

. सदोष गर्भधारणा चाचणी

कालबाह्य झालेली, किंवा सदोष गर्भधारणा चाचणी चुकीचे परिणाम देऊ शकते. वापरण्यापूर्वी चाचणीची वैधता तपासून पहा.

. खूप लवकर चाचणी करणे

काही अत्यंत संवेदनशील चाचण्या ओव्हुलेशननंतर काही दिवस सकारात्मक रिझल्ट्स दाखवू शकतात. म्हणूनच, पाळी चुकल्यावर आपण किमान एक आठवडा थांबून चाचणी करावी. खोट्या सकारात्मक गर्भधारणेच्या चाचणीसाठी सर्वात लवकर चाचणी करणे हे सुद्धा एक सर्वसामान्यपणे आढळणारे कारण आहे.

. दूषित लघवीचा नमुना

जर लघवीच्या नमुन्यामध्ये साबण किंवा रक्तासारख्या कोणत्याही अशुद्धी असतील तर तुम्हाला चाचणीचा निकाल चुकीचा मिळू शकतो.

अशी औषधे जी चुकीच्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीस कारणीभूत ठरू शकतात

जर ओव्हुलेशनसाठी एचसीजी किंवा गोनाडोट्रॉपिनच्या शॉट्सच्या रूपात प्रजनन उपचार घेत असाल तर आपल्याला चुकीचासकारात्मक चाचणी निकाल मिळू शकेल.

त्याशिवाय, अँटीसायकोटिक्स, अँटीहिस्टामाइन्स, चिंताविरोधी औषधे, डाययुरेटिक्स, पार्किन्सन रोगावरील औषधे आणि मेथाडोन, क्लोर्डियाझापोक्साइड किंवा प्रोमेथाझिन यासारखी औषधे चुकीच्या गर्भधारणा चाचणीस कारणीभूत ठरू शकतात.

फॅन्टम एचसीजी चाचणी म्हणजे काय आणि खोट्या सकारात्मक गर्भधारणा चाचणीशी त्याचा कसा संबंध आहे?

फॅन्टम एचसीजी म्हणजे गर्भवती नसलेल्या महिलेची रक्ताची गर्भधारणा चाचणी कारात्मक येणे होय. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील काही विशिष्ट रसायनांमुळे चाचणीचे परिणाम चुकीचे सकारात्मक येतात.

लघवीची चाचणी नकारात्मक असल्यास तुमची फॅन्टम प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह टेस्ट सकारात्मक येते आहे का हे तुम्ही तपासून पाहू शकता.

रक्ताची गरोदर चाचणी चुकीची सकारात्मक येण्याचे कारण काय आहे?

जर तुमची लघवीची गर्भधारणा चाचणी चुकीची पॉझिटिव्ह झाल्याची जाणीव झाल्यास, डॉक्टर रक्ताची गर्भधारणा चाचणी करून बघण्याचा सल्ला देतात. रक्त चाचणी लघवीच्या चाचणीपेक्षा अगदी सूक्ष्म पातळीवर एचसीजी ओळखू शकते आणि म्हणूनच ती चाचणी अधिक विश्वासार्ह असते आणि म्हणून गर्भधारणा झाली आहे किंवा नाही ह्याचे निदान आधी होते.

परंतु काही कारणांमुळे गुणात्मक एचसीजी रक्त तपासणी देखील चुकीची सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकते. लघवी किंवा रक्त चाचणींचे परिणाम चुकीचे पॉझिटिव्ह मिळणे ह्यामागील कारणे सारखीच आहेत.

विशेषत: काही औषधे (वर नमूद केल्याप्रमाणे), ट्यूमर्स, गर्भाशयाच्या कर्करोग, लघवीमध्ये रक्त किंवा प्रथिने आणि एकाधिक गर्भधारणेमुळे एखाद्या महिलेमध्ये एचसीजीची पातळी जास्त असते. याव्यतिरिक्त, रासायनिक गर्भधारणा, रजोनिवृत्ती आणि प्रजनन प्रक्रिया देखील अशी काही कारणे देखील आहेत ज्यामुळे गर्भधारणा चाचणीचे परिणाम खोटे सकारात्मक येण्याची शक्यता असते.

जर तुमचे घरी केलेल्या चाचणीचे परिणाम सकारात्मक आले तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून रक्त तपासणीद्वारे निकालाची पुष्टी करणे चांगले. जर तुम्ही गर्भवती असाल तर नियमितपणे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटले पाहिजे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणे महत्वाचे आहे तसेच निरोगी गर्भारपणासाठी तुम्ही डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसुतीपूर्व काळजी घेण्यास सुरुवात केली पाहिजे.

आणखी वाचा: गरोदर चाचणीवर फिकट रेषा – कारणे आणि मिमांसा

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article