बाळ

बाळांसाठी झिंक ऑक्साईड वापरणे सुरक्षित आहे का?

झिंक ऑक्साईड हा एक घटक आहे जो बर्‍याच व्यावसायिक डायपर रॅश क्रीम मध्ये सामान्यपणे आढळतो. परंतु बऱ्याच पालकांना प्रश्न पडू शकतो - ‘झिंक ऑक्साईड माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे का? झिंक ऑक्साईड आपल्या बाळासाठी किती सुरक्षित आहे याबद्दल काही समर्पक तथ्ये आपण खालील प्रमाणे जाणून घेऊयात.

झिंक ऑक्साईड म्हणजे काय?

झिंक ऑक्साईड एक पांढरा खनिज पदार्थ आहे जो पावडरच्या रूपात पाण्यात विरघळत नाही. आपल्या त्वचेवर संरक्षणात्मक थर बनवण्याचा ह्याचा उत्कृष्ट गुणधर्म आहे. ह्या कारणास्तव, बाळाच्या डायपर रॅश क्रीम मध्ये वापरण्यात येणारा हा सक्रिय घटक आहे तसेच सनस्क्रीन आणि इतर प्रकारचे प्रथमोपचार मलम तयार करण्यासाठी वापरला जाणारा हा एक मुख्य घटक आहे.

आपण मुलांसाठी झिंक ऑक्साईड उत्पादने वापरावी का?

झिंक ऑक्साईडच्या सूक्ष्म कणांचा रक्तप्रवाहात प्रवेश झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या जोखमीमुळे लोकांना सहसा झिंक ऑक्साईडची भीती वाटते. परंतु संशोधनानुसार, लोशन किंवा क्रीममध्ये वापरलेल्या झिंक ऑकसाईडचे कण ३० एनएम पेक्षा मोठे असतात आणि ते कण शरीर शोषून घेत नाही. त्यामुळे जेव्हा झिंक ऑकसाईड वैद्यकीय औषधांमध्ये वापरले जाते तेव्हा ते सुरक्षित असते आणि डॉक्टर विशेषतः डायपर रॅश वर वापरण्यासाठी त्याची शिफारस करतात. तसेच मलम तयार करताना झिंक ऑकसाईड इतर घटकांसोबत मिसळले जाते. त्यामध्ये जलविरोधी आणि सुखदायक गुणधर्म असतात. त्यामुळे मुलाच्या नाजूक त्वचेचे संरक्षण होते. परंतु इतर ओव्हर--काउंटर औषधांप्रमाणेच, झिंक ऑक्साईड असलेले मलम काटेकोरपणे सूचित केल्याप्रमाणे वापरत असल्याची खात्री करा.

झिंक ऑक्साईडचे उपयोग

झिंक ऑक्साईडचा उपयोग त्वचेच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. खाली त्याचे काही उपयोग खाली सूचीबद्ध आहेतः

झिंक ऑक्साईड कसे कार्य करते?

जलरोधक मलम तयार करण्यासाठी झिंक ऑक्साईड सहसा इतर पदार्थांसह मिसळले जाते. झिंक ऑक्साईडमध्ये सुखदायक गुणधर्म असल्याने, ते डायपर रॅश वर उपचार करू शकते आणि भविष्यात देखील डायपर रॅशपासून बाळाच्या त्वचेचे संरक्षण करू शकते. झिंक ऑक्साईड असलेली डायपर रॅश क्रीम झिंक ऑक्साईड नसलेल्या क्रीम पेक्षा घट्ट असेल आणि म्हणूनच, ती धुण्यास थोडीशी कठीण होईल.

झिंक ऑक्साईड मलमाच्या मर्यादा काय आहेत?

तरीही, झिंक ऑक्साईड मुलांसाठी वाईट आहे का? उत्तर नाही, परंतु त्यांच्यासुद्धा काही मर्यादा आहेत. प्रथम, ते धुणे कठीण असते आणि दुसरे म्हणजे ते यीस्ट किंवा बॅक्टेरिया नष्ट करत नाहीत. म्हणूनच, जर एका आठवड्यासाठी झिंक ऑक्साईड मलम वापरले गेले, परंतु तरीही बाळाची डायपर रॅश नीट झाली नाही तर, संसर्ग होण्याची शक्यता असू शकते. हे असामान्य नाही कारण मल, आर्द्रता आणि शरीरातील यीस्ट त्वचेच्या डायपर कडील भागाच्या संक्रमणास बळी पडतात.जर जस्त, लॅनोलिन, पेट्रोलियम, वॅक्स किंवा पॅराबेन्स यासारख्या मलमातील कोणत्याही घटकाची मुलांना ऍलर्जी असेल तर झिंक ऑक्साईडचे साइड इफेक्ट्स देखील उद्भवू शकतात.

खबरदारी आणि विचार

झिंक ऑक्साईड मलम वापरताना खालील खबरदारी घ्या:
बाळांसाठी झिंक ऑक्साईड वापरणे सामान्यतः सुरक्षित मानले जाते. तथापि, झिंक ऑक्साईड विषयीच्या चांगल्या वाईट गोष्टी जाणून घेणे नेहमीच चांगले. बाळासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांची निवड तुम्ही जास्त काळजीपूर्वक केली पाहिजे. आणखी वाचा: बाळ रात्री रडत असल्यास काय कराल? कमी वजनाची बाळे: कारणे, उपचार आणि काळजी
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved