अन्न आणि पोषण

बाळांसाठी तांदळाची पेज – आरोग्यविषयक फायदे आणि ती कशी तयार करावी?

भात शिजत असताना, तांदळातील पोषक घटक आणि स्टार्च पाण्यामध्ये मिसळतात ह्या पाण्याला भाताची पेज असे म्हणतात. बऱ्याच वेळेला बाळाची आई बाळाला कुस्करलेला भात देण्याऐवजी तांदळाची पेज देण्यास प्राधान्य देते. तांदूळ हे कमी ऍलर्जी निर्माण करणारे अन्न म्हणून ओळखले जात असल्याने, जेव्हा बाळाचे स्तनपान सुटते तेव्हा बाळाला दिला जाणारा हा एक आदर्श घन पदार्थ आहे. तांदूळ पचायला सहज आणि सोपा तसेच पौष्टिक असल्याने, ५ महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांसाठी तांदळाची पेज हे एक उत्तम पेय आहे. तांदळाची पेज दिल्याने बाळाला ऊर्जा तर मिळतेच परंतु अतिसार, इसब आणि तापावर उपचार करण्यासारखे त्याचे इतर सुद्धा फायदे आहेत. तांदळाच्या पेजेचे फायदे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.

व्हिडिओ: बाळांसाठी तांदळाची पेज आरोग्यासाठी फायदे आणि रेसिपी

https://youtu.be/f9oS4gmXIeA

लहान बाळासाठी तांदळाच्या पेजेचे फायदे

तांदळाची पेज तयार करणे सोपे आहे, बाळासाठी त्याचे अनेक पौष्टिक आणि कार्यात्मक फायदे आहेत, त्यापैकी काही फायदे खाली दिलेले आहेत.

. बाळाचे स्तनपान सोडवणे

तांदळाची पेज हे बाळाला स्तनपानापासून मुक्त करण्यासाठी उत्तम स्टार्टर आहे. अनेक आशियाई भागात बाळाच्या आहारात घन पदार्थांचा समावेश करण्यापूर्वी तांदळाची पेज देण्यास सुरुवात करतात. भाताची पेज पौष्टिक असते. बाळाची पचनसंस्था घन पदार्थ पचवण्यास तयार करण्यासाठी बाळाला तांदळाची पेज देणे चांगले. परंतु तांदळाच्या पेजेमध्ये, आईच्या दुधात असलेल्या सर्व आवश्यक पोषक तत्वांचा अभाव आहे आणि म्हणून आईच्या दुधाऐवजी तांदळाची पेज बाळांना देऊ नये.

. व्हिटॅमिन समृद्ध

तांदूळ हा नियासिन, रिबोफ्लेविन, थायमिन आणि व्हिटॅमिन बी ६ सारख्या जीवनसत्त्वांचा चांगला स्रोत आहे. ही आवश्यक जीवनसत्त्वे मज्जासंस्था, दृष्टी, त्वचा, पचनसंस्थेच्या विकासामध्ये आणि सेवन केलेल्या अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वापरली जातात. हे घटक पाण्यात विरघळणारे असल्याने तांदूळ उकळल्यावर ते पाण्यात मिसळतात.

. अतिसारावर उपचार करते

बाळांना अतिसार झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन (ओआरएस) सोबत तांदळाची पेज दिल्यास प्रभावी ठरते. त्यामुळे आतड्याची हालचाल कमी होते आणि पाणी कमी होते. तांदळाच्या पेजेमध्ये ओआरएस पेक्षा जास्त कॅलरीज देखील असतात आणि त्यामुळे आतड्यांमधून हळूहळू कर्बोदके सोडली जातात. बाळ अतिसारापासून बरे होण्यासाठी तांदळाची पेज इतर घन पदार्थ आणि ओ आर एस सोबत वापरली जाऊ शकते. बाळाच्या बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून तांदळाची पेज हा एक दुसरा मार्ग आहे. हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. तांदळाच्या पेजेमध्ये भरपूर पाणी असल्याने बद्धकोष्ठता कमी होते.

. इसब बरे करते

एक्जिमा झाल्यास बाळाच्या कोरड्या आणि खवलेयुक्त त्वचेला शांत करण्यासाठी तांदळाची पेज वापरली जाऊ शकते. तांदळाचे स्टार्च, त्वचेच्या संपर्कात आल्याने त्वचा लक्षणीय रित्या बरी होण्यास मदत होते. ज्या स्त्रियांना आपल्या बाळासाठी खूप जास्त क्रीम आणि मलम वापरण्याची काळजी वाटते त्यांच्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. त्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट्स होत नाही. परंतु पुरळ वाढल्यास ताबडतोब बंद करा.

. ऊर्जा वाढते

हे पेय कार्बोहायड्रेट्सने समृद्ध आहे आणि त्याचे पचन सहज होते. सर्व बाळांसाठी तो ऊर्जेचा एक उत्तम स्रोत आहे. त्यातून हळूहळू कर्बोदके मिळत असल्याने ऊर्जेचा स्रोत कायम राहतो.

. ताप कमी होतो

जेव्हा बाळांना ताप येतो तेव्हा बाळांसाठी हा अन्नपदार्थ ऊर्जा आणि पोषक तत्वांचा एक उत्तम स्रोत आहे. त्यांना शक्ती देण्यासोबतच ताप कमी करण्यासही मदत होऊ शकते.

. आर्थिक

तांदळाची पेज बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या तांदुळाची करता येते, कारण तांदळाच्या जवळजवळ सर्व जातींमध्ये बहुतेक समान पोषक घटक असतात. ह्या प्रक्रियेत काहीही वाया जात नाही, कारण तांदळाची भाताची पेज देऊन आई भात खाऊ शकते.

तांदळाचे पौष्टिक मूल्य

आशियातील अनेक भागांमध्ये तांदूळ हे मुख्य अन्न असल्याने त्यात भरपूर आवश्यक पोषक घटक असतात. तांदळाचे पौष्टिक मूल्य खाली दिलेल्या रकान्यात दिलेले आहे.

पोषण सामग्री मूल्य प्रति १०० ग्रॅम पोषण सामग्री मूल्य प्रति १०० ग्रॅम
पाणी १३.२९ ग्रॅम मॅग्नेशियम २३ मिग्रॅ
कर्बोदके ७९.१५ ग्रॅम पोटॅशियम ७६ मिग्रॅ
प्रथिने ६.५ ग्रॅम सोडियम १ मिग्रॅ
एकूण लिपिड ०.५२ ग्रॅम झिंक ११ मिग्रॅ
ऊर्जा ३५८ कि कॅलरी थायामिन ०.५६५ मिग्रॅ
फायबर २.८ ग्रॅम रिबोफ्लेविन ०.०४८ मिग्रॅ
लोह ४.२३ मिग्रॅ नियासिन ४.११३ मिग्रॅ
कॅल्शियम ३ मिग्रॅ फोलेट ३८९ यूजी
फॉस्फरस ९५ मिग्रॅ व्हिटॅमिन बी-६ ०.१७१ मिग्रॅ

तांदळाच्या पेजेचे काही तोटे आहेत का?

. पुरेशा पोषणाचा अभाव

तांदळाच्या पेजेमध्ये मुख्यतः तांदूळातील विरघळलेले पोषक घटक असल्याने, त्याचे पौष्टिक मूल्य संपूर्ण तांदळाएवढे नसते आणि त्यामुळे अतिसाराच्या वेळी गमावलेल्या कॅलरीज पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. तसेच त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सोडियम आणि पोटॅशियम नसतात. फक्त अतिसारावर उपचार करण्यासाठी ओआरएस सोबत पेज वापरली जाऊ शकते.

. आईच्या दुधाऐवजी पेज दिली जाऊ शकत नाही

भाताची पेज आईच्या दुधाऐवजी किंवा फॉर्मुल्याऐवजी दिली जाऊ शकत नाही कारण त्यात बाळाला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक नसतात.

. ऍलर्जी होऊ शकते

जर मुलांना अन्नाची अ‍ॅलर्जी होत असेल तर त्यांना खायला देण्यापूर्वी तांदळाची पेज त्वचेवर लावावी. जर त्यांना ओट्सची ऍलर्जी असेल तर तांदळाचीही ऍलर्जी असण्याची शक्यता आहे. ऍलर्जीच्या काही लक्षणांमध्ये फुगणे, पोटदुखी, उलट्या, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पुरळ उठणे इ.लक्षणांचा समावेश होतो.

तांदळाची पेज देण्यापूर्वी सावधगिरी बाळगा

भाताची पेज कशी करायची?

भाताची पेज बनवणे ही एक सोपी प्रक्रिया आहे आणि त्यासाठी फक्त दोन घटकांची आवश्यकता असते.

कृती:

भाताची पेज हा बाळाच्या आहारात समाविष्ट करण्यासाठी एक साधा अन्नपदार्थ आहे, बाळ स्तनपान सोडण्याच्या मार्गावर असले तरी किंवा घन पदार्थ खाण्यास त्याने सुरुवात केलेली असली तरीसुद्धा तुमच्या बाळाला पहिल्यांदा भाताची पेज देण्यापूर्वी तुमच्या बाळाच्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा:

बाळांसाठी तूप सुरक्षित आहे का? बाळांसाठी दलिया – आरोग्यविषयक फायदे आणि रेसिपीज

Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved