Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ अन्न आणि पोषण बाळांसाठी भोपळा – फायदे आणि पाककृती

बाळांसाठी भोपळा – फायदे आणि पाककृती

बाळांसाठी भोपळा – फायदे आणि पाककृती

जेव्हा तुमचे मूल साधारणपणे ६ महिन्यांचे होते, तेव्हा त्याला दात येणे सुरू होते. तुम्ही त्याला दिलेले काही घन पदार्थ चावून खाण्यास ते सक्षम होते. बाळाला पौष्टिक फळे आणि भाज्या देण्यासाठी तसेच त्याच्यासाठी निरोगी आहार तयार करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

भोपळा ही अशीच एक भाजी आहे! भोपळ्यातील पौष्टिक घटकांचे आरोयासाठी फायदे आहेत. भोपळा बीटा कॅरेटिनने समृद्ध आहे. आपल्या बाळासाठी भोपळ्याचे फायदे आणि तो तुम्ही बाळाच्या आहारात कसा वापरू शकता याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

भोपळा बाळांना देता येईल का?

होय, तुम्ही बाळांना भोपळा देऊ शकता. खरं तर, भोपळ्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. ह्या पौष्टिक घटकांमुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. भोपळ्यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत. ते तुमच्या मुलाच्या आतड्यातील हानिकारक जंतू नष्ट करतात. तुमच्या बाळाला निरोगी ठेवण्यासाठी त्याच्या आहारात आवश्यक असणारा हा एक घटक आहे.

लहान मुलांना भोपळ्याची ओळख करून देण्याची उत्तम वेळ

तुमच्या बाळाला जेव्हा दुधाचे दात येऊ लागतात तेव्हा बाळाच्या आहारात भोपळ्याचा समावेश करण्यासाठी तो काळ उत्तम असतो . ही प्रक्रिया बाळाच्या वयाच्या ३ ते १२ महिन्यांच्या दरम्यान केव्हाही सुरू होते, परंतु सामान्यतः बाळ जेव्हा ६ महिन्याचे होते तेव्हा बाळाला भोपळा देण्यास सुरुवात करणे चांगले. बाळ ६ महिन्यांपेक्षा लहान असेल तर बाळाला घनपदार्थ देऊ नये. तुमचे बाळ ६ महिन्यांचे झाल्यानंतर तुम्ही त्याला इतर अर्धघन किंवा घन पदार्थांसोबत भोपळा देऊ शकता.

लहान मुलांना भोपळ्याची ओळख करून देण्याची उत्तम वेळ

लहान मुलांसाठी भोपळ्याचे आरोग्यविषयक फायदे

भोपळ्याचे विविध आरोग्यविषयक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे

. आवश्यक पोषकमूल्ये

भोपळ्यामध्ये अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक घटक असतात. हे पोषक घटक तुमच्या बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्यामध्ये कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम सारखी अनेक खनिजे असतात,ही खनिजे तुमच्या मुलाची हाडे मजबूत होण्यास मदत करतात. भोपळ्यातील फॉस्फरसमुळे मेंदूचे कार्य सुधारते, हार्मोनची पातळी संतुलित राहते आणि पचन सुधारते.

. डोळ्यांचे आरोग्य

भोपळा व्हिटॅमिन ए ने समृद्ध आहे, डोळ्यांच्या आरोग्यासाठी तो एक महत्वाचा पोषक घटक आहे. त्यामुळे दृष्टी चांगली होते. भोपळ्यामध्ये कॅरेटिनॉइड्स देखील भरपूर प्रमाणात असते आणि ते डोळ्यांचे अनेक रोग आणि समस्यांचा धोका कमी करतात. ही कॅरोटीनोईड्स लहान मुलांमध्ये आणि प्रौढांमधील मॅक्युलर डिजनरेशन (डोळ्याच्या पडद्यावर चरबी साठल्यामुळे दृष्टी अंधुक होते) कमी करण्यास मदत करतात. कॅरेटिनॉइड्स मुळे भोपळ्याला केशरी रंग येतो.

. पचन सुधारते

भोपळ्यामध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे पचनास मदत होते. तंतुमय पदार्थ तुमच्या मुलाच्या आतड्यांच्या हालचालींचे नियमन करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करू शकतात.

. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध

भोपळ्यामध्ये बीटाकॅरोटीनचे उच्च प्रमाण असते, आणि ते एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि अनेक अवयवांवरचा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास करते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे तुमच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सच्या निर्मितीमध्ये असंतुलन होणे. कालांतराने, त्यामुळे मधुमेह आणि कर्करोग यासारखे आजार होऊ शकतात. तुमच्या मुलाचे शरीर बीटाकॅरोटीन व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करू शकते, हा त्याचा आणखी एक फायदा!

. त्वचेला चमक येते

कॅरोटीनोईड्स तुमच्या मुलाच्या शरीरातील मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात आणि त्यामुळे तुमच्या मुलाच्या त्वचेचा पृष्ठभाग साफ करण्यास मदत होते आणि त्यामुळे त्वचा चमकदार होते. ते त्वचा रोगांना दूर ठेवू शकते.

त्वचेला चमक येते

. ऊर्जा पातळी वाढते

पोटॅशियम हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे. फक्त एक कप भोपळा पोटॅशियमचा उत्तम स्रोत आहे. पोटॅशिअम रक्तातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन सुधारते आणि स्नायूंची कार्यक्षमता सुधारते.

. रोगप्रतिकारक शक्ती वाढते

भोपळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि बायोकेमिकल्स असतात आणि ते आपल्या मुलाला सर्दी आणि फ्लूपासून वाचवतात. भोपळ्यामध्ये प्रतिजीवाणू गुणधर्म देखील आहेत आणि त्यामुळे तुमच्या मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

. चांगली झोप लागते

भोपळ्यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचा पदार्थ असतो आणि तो आपल्या शरीरात सेरोटोनिन तयार करण्यास मदत करतो. सेरोटोनिन एक अमीनो ऍसिड आहे जे शरीरात शांतता निर्माण करते. त्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते.

. कृमिनाशक गुणधर्म

लहान मुलांची रोगप्रतिकारक प्रणाली अद्याप विकसित होत असते, त्यामुळेच केवळ सूक्ष्मजीवाणू नव्हेत तर जंत आणि इतर परजीवी सुद्धा तिथे वाढत असतात. भोपळ्याचे कृमिनाशक गुणधर्म हे अळी आणि परजीवाणूंपासून आपल्या बाळालादूर ठेवतात.

भोपळ्याचे पौष्टिक मूल्य काय आहे?

खालील तक्त्यामध्ये भोपळ्याचे पौष्टिक मूल्य दिलेले आहे

पौष्टिक सामग्रीचे मूल्य प्रति १०० ग्रॅम
ऊर्जा २६ किलोकॅलरी
पाणी ९१ ग्रॅम
साखर .८ ग्रॅम
कर्बोदके .५ ग्रॅम
प्रथिने १ ग्रॅम
चरबी .१ ग्रॅम
तंतुमय पदार्थ .५ ग्रॅम
लोह .८ मिग्रॅ
कॅल्शियम २१ मिग्रॅ
मॅग्नेशियम १२ मिग्रॅ
पोटॅशियम ३४० मिग्रॅ
फॉस्फरस ४४ मिग्रॅ
व्हिटॅमिन सी ९ मिग्रॅ
व्हिटॅमिन बी ६ .०६ मिग्रॅ
व्हिटॅमिन ए ८५१० आययू
व्हिटॅमिन ई .१ मिग्रॅ
व्हिटॅमिन के १ युजी
फोलेट १६ यूजी
जस्त .३ मिग्रॅ
सोडियम १ मिग्रॅ
थायमिन .०५ मिग्रॅ
नियासिन .६ मिग्रॅ
रिबोफ्लेविन .१ मिग्रॅ

तुमच्या मुलासाठी भोपळा शिजवण्याच्या पद्धती

तुमच्या मुलाला भोपळा देण्यापूर्वी तो शिजवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकी काही मार्ग खाली दिले आहेत.

. बेकिंग पद्धत

भोपळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो अर्धा चिरून घ्या आणि त्याला ब्रशने ऑलिव्ह ऑइल लावा आणि भोपळ्याची साल असलेली बाजू एका बेकिंग ट्रेवर ठेवा. सुमारे ४५ मिनिटे ३७५ फॅरेनहाइटवर किंवा भोपळा मऊ होईपर्यटन बेक करावे. त्यानंतर तो ओव्हनमधून काढून घेऊन त्याचा लगदा एका वाडग्यात काढा. त्यामध्ये तुम्ही थोडे लोणी सुद्धा घालू शकता.

बेकिंग पद्धत

आपण भोपळा कच्च्या प्युरीच्या स्वरूपात खाऊ शकता. एकतर तसाच किंवा काही अन्नधान्य किंवा दही घालून तुम्ही तो खाऊ शकता.

. उकडून घ्या

थोडे पाणी उकळून घ्या. त्यामध्ये चिरलेला भोपळा घाला आणि तो मऊ होईपर्यंत शिजवा. पाणी काढून टाका आणि भोपळा काही मिनिटे थंड होऊ द्या. आपण हे एकतर ताबडतोब वापरू शकता किंवा फ्रीझ करू शकता. शिजवलेला भोपळा फ्रिजमध्ये ठेवू नका कारण तो तपकिरी केशरी रंगाचा होऊ शकतो आणि तो आरोग्यासाठी चांगला नसतो.

तुम्ही भोपळा कच्च्या प्युरीच्या स्वरूपात खाऊ शकता. किंवा सीरिअल आणि दह्यासोबत खाऊ शकता.

लहान मुलांसाठी भोपळ्याच्या सोप्या पाककृती

. बाळासाठी साधी भोपळ्याची प्युरी

मऊ होईपर्यंत भोपळा गरम पाण्यात शिजवून घ्या. भोपळ्याचे तुकडे काढून घ्या. प्युरी तयार करण्यासाठी मिश्रण मिक्सर मधून ब्लेंड करून घ्या. प्युरीची इच्छित सुसंगतता मिळविण्यासाठी तुम्ही त्यामध्ये आईचे दूध किंवा पाणी घालू शकता.

. सफरचंद आणि भोपळा प्युरी

एक भोपळा आणि तीन सोललेली आणि बिया काढून घेतलेली सफरचंद चिरून घ्या. गरम पाण्यात ती शिजवून घ्या. थंड झाल्यावर, प्युरी तयार करण्यासाठी मिश्रण मॅश करा आणि चवीसाठी त्यामध्ये दालचिनी घाला.

सफरचंद आणि भोपळा प्युरी

. भोपळा सूप

बाळाच्या आहारात भोपळ्याचा समावेश करण्यासाठी त्याचे सूप बनवणे चांगले. सूप कसे करायचे ते पाहुयात.

  • एका पॅनमध्ये २ चमचे लोणी गरम करून वितळवा
  • एक चतुर्थांश चिरलेला कांदा घालून परतून घ्या
  • तीन कप लाल भोपळ्याच्या फोडी घाला आणि काही मिनिटे परता
  • तीन कप पाणी आणि मीठ मिरपूड घाला. भोपळा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या
  • हे मिश्रण सुमारे १५ मिनिटे थंड होऊ द्या, नंतर ते ब्लेंडरमध्ये मिसळा
  • सूप परत पॅनमध्ये घाला, एक चतुर्थांश मलई घाला आणि उकळून घ्या
  • सर्व्ह करण्यापूर्वी थोडी चिरलेली कांद्याची पात घालून सजवा

. भोपळा आणि पेअर प्युरी

वर नमूद सफरचंद आणि भोपळा प्युरी सारखीच ही रेसिपी आहे, फक्त सफरचंदाऐवजी चिरलेले पेअर वापरा.

. भोपळा, केळी आणि पीच

एक केळी आणि एक पीच मऊ होईपर्यंत एकत्र वाफवा. मॅश करा आणि त्याचे एकत्र मिश्रण करा. हे ताज्या तयार केलेल्या भोपळ्याच्या प्युरीमध्ये मिसळा आणि सर्व्ह करा.

. ब्राऊन राईस आणि भोपळा लापशी

ब्राऊन राईस पचायला जरा कठीण आहे, म्हणून फक्त अर्धा चमचा तांदूळ वापरा.

  • तांदूळ स्वच्छ करून पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा
  • एक सोललेला आणि चिरलेला भोपळा वाफवून घ्या
  • भोपळ्यामध्ये भिजवलेले तांदूळ घाला आणि दोन मिनिटे मोठ्या आचेवर उकळा, नंतर आणखी पाच मिनिटे उकळून घ्या
  • थंड झाल्यावर सर्व्ह करा

ब्राऊन राईस आणि भोपळा लापशी

भोपळा आणि पालक रोटी

यासाठी तुम्हाला एक कप बारीक किसलेला लाल भोपळा, एक कप चिरलेला पालक, एक वाटी मैदा (शक्यतो संपूर्ण गहू), अर्धा चमचा हळद, थोडे तेल आणि लोणी आणि चवीनुसार मीठ लागेल

  • कढईत तेल गरम करा आणि पालक दोन मिनिटे परतून घ्या. काही वेळ थंड होऊ द्या
  • पीठ, भोपळा आणि हळद पावडर मिक्स करावे आणि मऊ पीठ मळून घ्या
  • रोटी बनवण्यासाठी काही गोळे तयार करा आणि लाटून घ्या
  • बटर लावून रोटी चांगली भाजून घ्या आणि सर्व्ह करा

सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न

1. बाळासाठी हवाबंद डब्यातील भोपळा सुरक्षित आहे का?

हवाबंद डब्यातील शुद्ध भोपळा बाळांना खायला देणे सुरक्षित आहे. काहीवेळा हवाबंद डब्यात पंपकीन पाय मिश्रण सुद्धा असते. त्यामध्ये स्टार्च, शर्करा आणि इतर पदार्थ असतात आणि ते तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळेच हवाबंद डब्यातील अन्न बाळाला देऊ नका असे बरेचसे डॉक्टर सांगतात. तुमच्या बाळासाठी तुम्ही योग्य उत्पादनाची निवड करीत आहात हे सुनिश्चित करण्यासाठी लेबल नीट वाचून पहा.

. आपल्या बाळासाठी भोपळा कसा निवडावा?

भोपळ्यांसाठी साधारणपणे कीटकनाशक वापरलेले नसते म्हणून बहुतेक वेळा ते वापरण्यास सुरक्षित असतात. परंतु, आपण अद्याप आपल्या मुलासाठी सेंद्रिय भोपळा खरेदी करू इच्छित असल्यास, ही आपली वैयक्तिक निवड आहे.

आपल्या मुलासाठी लहान आणि कमी पिकलेले भोपळे निवडा. याला शुगर पंपकीन, कुकिंग पंपकीन किंवा पाय पंपकीन देखील म्हणतात. त्यांच्यामध्ये तुलनेने कमी तंतुमय पदार्थ असतात आणि गोड, घट्ट लगदा देखील असतो. हे सूप आणि भाजलेल्या पदार्थांची चव वाढवतात. तसेच, तुम्ही निवडलेला भोपळा वजनाला जड असेल तर त्याच्या लगद्यामध्ये पाणी जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो.

जर तुम्ही सोललेल्या आणि चिरलेल्या भोपळ्याचा पॅक विकत घेत असाल तर त्याचा रंग गडद केशरी असल्याची खात्री करा. न कापलेला भोपळा खरेदी करताना नारिंगी रंगाचा भोपळा घ्या त्यावर डाग किंवा चिरा नाहीत ह्याची खात्री करा. तसेच तो खूप जास्त पिकलेला नसावा.

. भोपळा कसा शिजवावा?

भोपळ्यांसह कोणतीही रेसिपी तयार करण्यापूर्वी त्याचे साल काढून ब्रशने स्वच्छ करा. भोपळा स्वच्छ धुण्यासाठी थंड पाणी वापरा. नंतर, भोपळा अर्धा कापून घ्या आणि चमच्याच्या मदतीने बिया काढून टाका.

जर तुम्हाला चिरलेला भोपळा आवडत असेल, तर वापरण्यापूर्वी तुम्ही तो थंड पाण्यात स्वच्छ धुवा. यानंतर, तुम्ही तो पदार्थांमध्ये वापरू शकता.

भोपळा कसा शिजवावा?

भोपळा कापल्यानंतर लगेच शिजवा. खूप शिजवू नका, कारण यामुळे भोपळ्याचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते. वर नमूद केलेल्या कोणत्याही पाककृती करा किंवा बाळासाठीची भोपळ्याची पाककृती करून पहा आणि बाळाच्या आहारात त्याचा समावेश करा.

तुमच्या मुलाला नवीन चव आवडेल परंतु कोणत्याही नवीन पदार्थाचा बाळाच्या आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, कोणत्याही पदार्थाची ऍलर्जी किंवा दुष्परिणाम तर नाही ना हे जाणून घेण्यासाठी एका वेळी फक्त एक अन्न पदार्थ देऊन पहा. जर तुमचे मूल अस्वस्थ असेल किंवा औषध घेत असेल तर त्याच्या आहारात नवीन अन्न आणू नका.

भोपळा हे एक बहुमुखी अन्न आहे. तुम्ही भोपळा इतर भाज्या, फळे आणि अगदी मांस, तांदूळ, मसूर, पेअर , ब्रोकोली आणि इतर अनेक पदार्थांमध्ये मिसळू शकता जेणेकरून तुमच्या मुलाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक त्यास मिळतील.

आणखी वाचा:

बाळांसाठी ब्लूबेरी – फायदे, धोके आणि पाककृती
बाळांसाठी ओट्सच्या २५ सोप्या आणि चवदार पाककृती

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article