Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home बाळ बाळाच्या झोपेविषयी बाळाला गुंडाळणे – योग्य पद्धतीने ते केव्हा आणि कसे करावे?

बाळाला गुंडाळणे – योग्य पद्धतीने ते केव्हा आणि कसे करावे?

बाळाला गुंडाळणे – योग्य पद्धतीने ते केव्हा आणि कसे करावे?

बाळाला गुंडाळणे ही बाळासाठी अत्यंत फायदेशीर कृती म्हणून ओळखले जाते. तथापि, नीट न केल्यास ती धोकादायक ठरू शकते. साधारणतः, एक महिन्यापेक्षा कमी वयाच्या बाळाला गुंडाळले जाते. त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बाळांना गुंडाळल्यास, बाळाच्या हालचालींवर आणि बाळाच्या वाढीत अडचण येऊ शकते.

बाळाला गुंडाळणे (स्वैडलिंग) म्हणजे काय?

बाळ उबदार आणि आरामदायक राहण्यासाठी बाळाला ब्लँकेटमध्ये गुंडाळून शांत करण्याचे हे तंत्र आहे. ह्या तंत्रामुळे बाळाला उबदार वाटल्यामुळे बाळ शांत होते. बाळाला दोन प्रकारे लपेटता येते. अधिक सुरक्षिततेसाठी बाळाला घट्ट लपेटण्याची एक पद्धत आहे तर दुसऱ्या पद्धतीत हात मुक्त ठेवून बाळाला लपेटले जाते. बाळ एक महिन्याचे झाल्यावरही बाळाला लपेटता येते, परंतु त्यांच्या हालचालीवर येणारा निर्बंध कमी करण्यासाठी बाळ झोपतो तेव्हा हे केले जाऊ शकते

बाळाला का गुंडाळावे?

  • बाळाला चांगली झोप लागावी म्हणून गुंडाळावे
  • सुरुवातीला, हे कदाचित अवघड असेल आणि बाळाला कदाचित ते आवडणार नाही. पण अखेरीस, ह्या प्रक्रियेमुळे बाळ शांत होते आणि त्यामुळे बाळाला चांगली झोप लागते
  • ह्यामुळे बाळाचा मज्जास्नायूंच्या विकास सुधारतो
  • लपेटल्यामुळे बाळ पाठीवर झोपते त्यामुळे एसआयडीएस (SIDS) चा धोका कमी होतो
  • ह्यामुळे बाळास दीर्घकाळ अविरत झोप येण्यास मदत होते
  • बाळाला लपेटल्यामुळे आईच्या पोटात असल्याप्रमाणे उबदार वाटते

नवजात बाळाला कधी गुंडाळावे?

बाळाला कधी गुंडाळावे ही पालकांची वैयक्तिक निवड असते. काहीजण दिवसाच्या कोणत्याही वेळी जेव्हा बाळ चिडचिडे होते तेव्हा त्यास लपेटतात. काहीजण रात्रीच्या वेळीच तसे करतात आणि बाळाला गुंडाळल्यास पटकन झोपी जाण्याची सवय लावतात.

बाळाला कसे गुंडाळायचे?

बाळाला गुंडाळण्याची बरीच तंत्रे पाळली जातात परंतु सर्वात सामान्य प्रक्रिया खाली स्पष्ट केली आहे

  • गुंडाळण्यासाठी, ब्लॅंकेट आडवे ठेवा आणि त्याची एक बाजू दुमडा
  • बाळाचे तोंड वरच्या दिशेने ब्लँकेटवर ठेवा आणि डोके दुमडलेल्या काठावर ठेवा
  • त्याचा डावा हात संरेखित करा आणि ब्लँकेटच्या डाव्या बाजूस त्याच्या शरीरावर गुंडाळा आणि उजव्या खांद्यावर आणि शरीराच्या उजव्या बाजूच्या दरम्यान टक करा
  • मग उजवा हात खाली ठेवा आणि डाव्या बाजूच्या खाली त्याच्या शरीरावर ब्लँकेटची उजवी बाजू लपेटून घ्या
  • दोन्ही बाजू गुंडाळून झाल्यावर ब्लॅंकेटची खालची बाजू फोल्ड करा. बाळाचे कुल्ल्यांची हालचाल होते आहे की नाही हे पहा आणि ब्लँकेट खूप घट्ट नसल्याचे सुनिश्चित करा

बाळाला लपेटण्याचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे ज्यामध्ये बाळाला पाठीवर झोपवले जाते आणि हळुवारपणे ब्लॅंकेट लपेटले जाते. डायमंड स्व्याडल मध्ये बाळाचे दोन्ही पाय ब्लँकेटच्या बाहेर मुक्त आहेत याची खात्री करुन घेऊन ब्लॅंकेटचे किनारे डायगोनली ऑपोसिट लपेटले जातात. इतर स्वॅडलिंग तंत्रांमध्ये स्क्वेअर आणि स्लीप सॅक तंत्रांचा समावेश होतो. स्क्वेअर स्व्याडल एक तंत्र आहे ज्यामध्ये प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी बाळाला एका चौकनी ब्लँकेटवर ठेवले जाते. स्लीप सॅक स्व्याडल हे एक असे उत्पादन आहे ज्यात अ‍ॅडजस्टेबल रॅप असतो ज्याची रचना बाळाला घाबरण्यापासून रोखण्यासाठी केली गेली आहे. तंत्र निवडण्यासाठी बाळाला कुठल्या तंत्राद्वारे आरामदायक वाटते ह्यावर अवलंबून असते. बाळाला लपेटण्याच्या ह्या पद्धती जी बाळे नीट झोपत नाहीत किंवा ज्यांना सतत घेऊन बसावे लागते त्यांच्यासाठी आहेत.

लक्षात घ्या की बाळाला गुंडाळणे हे एक दुधारी शस्त्र आहे आणि तुम्ही कुठले तंत्र वापरता त्यानुसार त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत.

बाळाला गुंडाळण्याच्या प्रक्रियेमुळे बाळ आणि पालक यांच्यातील बंधनामध्ये हस्तक्षेप निर्माण होऊ शकतो. काही सामान्य शारीरिक समस्या देखील लक्षात घेतल्या जातात. चुकीचे गुंडाळल्यामुळे बाळाला शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

. गरम होणे

बाळाला योग्य प्रकारे लपेटले नाही तर बाळाला गरम होऊ शकते. बाळ ब्लॅन्केटच्या आतमध्ये मुक्तपणे हालचाल करू शकत नाही आणि त्यामुळे शरीराच्या तापमानात वाढ होऊ शकते

. हिप डिसप्लेशिया

हिप डिसप्लेसिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे. गुंडाळल्यामुळे हालचाल लॉक झाल्यामुळे नितंबांच्या वाढीस व विकासास अडथळा होतो. जेव्हा बाळे पाय हलवतात तेव्हा सॉकेटच्या आत फीमर हाडांची हालचाल सांध्यांमधील बदलांना प्रोत्साहन देते. हालचाल न झाल्यास सॉकेट प्लेटसारखी रचना विकसित होते ज्यामुळे कुल्ल्यांच्या हालचालीत समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दीर्घकाळापर्यंत सांध्याच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो

. श्वसनमार्गाच्या समस्या

जेव्हा बाळाला घट्ट गुंडाळले जाते तेव्हा त्याच्या श्वास घेण्याच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो आणि अचानक इन्फंट डेथ सिंड्रोम (एसआयडीएस) होऊ शकतो. बाळाला योग्य रित्या लपेटले पाहिजे अन्यथा श्वसनमार्गाच्या वरच्या बाजूस संक्रमण होण्याची शक्यता वाढते.

बाळाला गुंडाळणे केव्हा थांबवावे किंवा टाळावे?

बाळाला गुंडाळणे केव्हा थांबवावे ही चिंता सगळ्या मातांना असते. ते एक तंत्र आहे ज्यामुळे अवयवांच्या हालचालींवर मर्यादा येऊ शकते. स्नायू आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासासाठी शरीराची हालचाल आवश्यक आहे. अमेरिकन अकॅडेमी ऑफ पेडियाट्रिक्स (एएपी) नुसार, जेव्हा बाळ पालथे पडू लागते तेव्हा आपण बाळाला गुंडाळणे थांबवण्याचा विचार केला पाहिजे. बरीचशी बाळे ४६ महिन्यांच्या दरम्यान पालथे पडणे शिकतात.

नवजात बाळाला रात्री तुम्ही गुंडाळू शकता का?

होय रात्री बाळाला गुंडाळून झोपवता येते, परंतु बाळाला चांगली झोप मिळेल याची खात्री करण्यासाठी योग्य पद्धती वापरल्या पाहिजेत. तुम्ही योग्य तंत्र आणि सावधगिरी बाळगून बाळ ४५ महिन्यांचे होईपर्यंत त्याला गुंडाळू शकता.

बाळाला गुंडाळताना घ्यायची खबरदारी

तुम्ही बाळाला गुंडाळताना खालील गोष्टींची खबरदारी घ्या

  • गुंडाळलेल्या बाळाला पोटावर झोपवू नये कारण त्यामुळे सीड्स चा धोका वाढतो. बाळाला गुंडाळून पाठीवर झोपवावे त्यामुळे बाळ गुदमरत नाही तसेच त्याला श्वासोच्छवास त्रासदायक होत नाही
  • बाळाचे आरोग्य आणि त्याचा श्वसनदर ह्याच्या अनुषंगाने बाळाला किती प्रमाणात गुंडाळू शकतो हे ठरवता येते. बाळाला गुंडाळण्यास सुरुवात करण्याआधी बाळाला नियमितपणे तपासणीसाठी घेऊन जात असल्याची खात्री करुन घ्या
  • गुंडाळण्याचे दुष्परिणाम होणार नाहीत असे मटेरियल बाळाला गुंडाळण्यासाठी वापरावे. सामान्यत: हलक्या आणि मऊ ब्लँकेटचा वापर बाळांना लपेटण्यासाठी केला जातो ज्यामुळे बाळाला कोणतीही शारीरिक अस्वस्थता होत नाही
  • बाळांना फार घट्ट गुंडाळू नये. कधीकधी, बाळाला दुखापत होऊ नये किंवा बाळाने गुंडाळलेले ब्लॅंकेट स्वतःचे स्वतः काढून मोकळे होऊ नये म्हणून पालक बाळाला घट्ट गुंडाळतात. पण त्यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होतो आणि डिसप्लेझियाबरोबर डिसलोकेशन देखील होऊ शकते
  • जास्त कालावधीसाठी बाळाला गुंडाळून ठेवलेले असेल तर मुव्हमेंट मॉनिटर बाळाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत करू शकते आणि धोक्याची चिन्हे असल्यास पालकांना त्यामुळे मदत होऊ शकते. जर या छोट्या गोष्टी पाळल्या तर बाळाला किती काळ लपेटू याची काळजी करण्याची पालकांना गरज नाही.

बाळाला गुंडाळल्यामुळे, पालकांना त्यांच्या लहान बाळाला झोपवण्यास मदत होते. बाहेरच्या जगातल्या पहिल्या महिन्यादरम्यान, बाळाला मिळेल तितक्या विश्रांतीची आवश्यकता असते. जरी बाळाला गुंडाळण्याचे काही अंतर्भूत धोके असले तरी, त्याचे योग्य तंत्र वापरल्यास तुमचे बाळ सुरक्षित आणि निरोगी राहील.

आणखी वाचा:

बाळांसाठी झोपताना उशी वापरावी का?
बाळाला रात्री कसे झोपवावे?

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article