In this Article
यशस्वीरित्या निरोगी बाळाला जन्म देणे ही आई आणि बाळ दोघांसाठी एक मोठी कामगिरी आहे. प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया आई आणि बाळ दोघांवर परिणाम करते कारण त्यामुळे दोघांच्या शरीरावर ताण येत असतो. या टप्प्यावर, आई खूप असुरक्षित असते कारण तिची रोगप्रतिकारक शक्ती सर्वात कमकुवत असते आणि तिच्या शरीराची सगळी ऊर्जा बाळाला जन्म देण्यावर केंद्रित असते. दुसरीकडे, बाळाला जास्त धोका असतो कारण ते नुकतेच ह्या जगात आलेले असते आणि जीवनाचे सर्व नवीन पैलू पहिल्यांदाच अनुभवत असते. त्यांना सुरक्षित वातावरणात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणूनच प्रसूतीनंतरच्या बाळंतपणाविषयी अधिक जाणून घ्या.
बाळंतपण म्हणजे काय?
बाळंतपणामध्ये प्रसूतीनंतर आवश्यक त्या सर्व बाबी विचारात घेतल्या जातात. त्यादरम्यान आई आणि बाळ दोघांची काळजी घेतली जाते. त्यासाठी बाळ आणि आईची काळजी घेण्यासाठी घरात कुणीतरी मदतीला असणे आवश्यक आहे. बाळंतपणात आई आणि बाळ दोघांनाही विशिष्ट कालावधीसाठी घरात राहण्याचा सल्ला दिला जातो आणि आईची तब्येत सुधारावी हा त्यामागचा उद्धेश्य असतो. कुटुंबातील सदस्य असंख्य गोष्टींची काळजी घेतात आणि बाळाची काळजी घेण्यासाठी आईला आवश्यक तो पाठिंबा देतात.
बाळाच्या जन्मानंतर बाळंपणाचा कालावधी किती असतो?
बाळंतपणाचा कालावधी सामान्यत: आई आणि बाळाची रिकव्हरी कशी होते यावर अवलंबून असतो. कधीकधी, सिझेरियन प्रसूतीमुळे थोडा वेळ वाढू शकतो. विशेषत: जर दोघांच्याही तब्येतीत जन्मादरम्यान गुंतागुंत झाली असेल तर बरे होण्यासाठी अजून काही काळ हवा असतो आणि आईला स्वत: ची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळण्यासाठी साधारणपणे ४० दिवसांचा कालावधी पुरेसा मानला जातो.
काही भागांमध्ये, बाळंतपणाच्या विशिष्ठ कालावधीवर माता विश्वास ठेवत नाहीत आणि जेव्हा त्यांना बरे वाटू लागते तेव्हा त्या सामान्य जीवन पुन्हा सुरु करतात. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सामान्यत: पुरेशा सुट्ट्या नसल्यास कामावर रुजू व्हावे लागते किंवा शक्य तितक्या लवकर त्यांना पुन्हा कामावर जाण्याची गरज भासते.
भारतात बाळंतपण कसे केले जाते?
देशातील वेगवेगळ्या प्रदेशात मातांसाठी पारंपारिक पद्धती वेगवेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे, स्तनपानास उत्तेजन देणा–या विशेष आहाराद्वारे आई आणि मुलासाठी गमावलेली शक्ती पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. शरीरावर कोणत्याही प्रकारचा अनावश्यक ताण येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
१. प्रसुतीपूर्व मालिश
आईने शारीरिकदृष्ट्या बर्याच गोष्टी केल्या आहेत आणि पुन्हा निरोगी होण्यासाठी तिला काही मदतीची आवश्यकता आहे.
- बहुतेक घरांमध्ये एकतर ज्ञात पारंपारिक मालिश करणारी व्यक्ती किंवा व्यावसायिक मालिश थेरपिस्ट जिला प्रसूतीनंतरच्या मालिशसाठी आवश्यक तंत्रे आहेत त्यांना नियुक्त करतात. आईसाठी काही निरोगी तेले आणि कोमट पाण्याचा वापर करून शरीराची योग्य मालिश करण्याची शिफारस केली जाते. ह्यामुळे शरीरात रक्ताभिसरण उत्तेजित करण्यास मदत होते आणि पोट आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यास देखील मदत करते.
- गरोदरपणात आणि प्रसुतिदरम्यान पाठ, कंबर आणि नितंबांवर खूप ताण येतो आणि त्यांच्यात खूप बदल होतात.
- ज्या स्त्रियांची सिझेरियन प्रसूती झाली असेल त्यांच्यासाठी संपूर्ण शरीरावर मालिश करणे योग्य ठरणार नाही आणि या संदर्भात डॉक्टरांनी काही अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला पाहिजे.
२. बेबी मसाज
आईबरोबरच बाळालाही स्वतः मालिश करण्याची आवश्यकता असते. प्रसूतीनंतर बाळ पहिल्यांदाच गर्भाच्या बाहेर येते आणि बाहेरच्या जगामध्ये टिकण्यासाठी त्याचे शरीर मजबूत होणे आवश्यक असते त्यामुळे बाळाची मालिश सुद्धा तितकीच गरजेची असते.
- प्रसूतीनंतर माता आपल्या बाळांची मालिश करण्यास सुरवात करू शकतात, परंतु काही जणी स्वतःहून बऱ्या झाल्यानंतर हा पर्याय निवडतात. तोपर्यंत कुटुंबातील एखादा सदस्य ही जबाबदारी स्वीकारतो.
- मालिश सहसा बाळाच्या स्नायूंमध्ये शक्ती वाढवण्यासाठी आणि त्याची हाडे निरोगी ठेवण्यासाठी केली जाते. बाळाच्या शरीरात शक्ती येण्यासाठी तसेच बाळाला आरामदायक वाटून त्याला झोप लागण्यासाठी आवश्यक तेलांचा वापर केला जातो.
- अंघोळीआधी दररोज बाळाला दीर्घ कालावधीसाठी मालिश करणे आवश्यक आहे. मसाज घेत असताना तुमचे बाळ कदाचित रडायचे थांबेल. बाळाला मालिश हलक्या हाताने करा.
- पारंपारिक दाईंमध्ये जुन्या काळाची मालिश करण्याची तंत्रे कठोर वाटू शकतात. बहुतेक सुईणी जरी अनुभवी आहेत, परंतु त्यांनी पुरेशी काळजी घेतली नाही तर बाळाला शारीरिक इजा होऊ शकते. म्हणूनच, हळूवारपणे मालिश करण्याचा पर्याय निवडा.
३. बाळंतपणातील भारतीय आहार
प्रसूतीनंतर आईचा आहार पौष्टिक असला पाहिजे यात काही शंका नाही. आईला तिच्या मातृत्वाच्या नवीन टप्प्यात मदत करण्यासाठी आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश केला गेला आहे.
- जिरे आणि बडीशेप प्रसूती नंतरच्या अवस्थेत फायदेशीर ठरतात. बडीशेपमुळे पचन सुधारते आणि आवश्यक शक्ती शरीराला प्रदान करते. त्यामुळे स्तनपानस सुधारण्यास देखील मदत होते. दिवसातून दोनदा जिरे पाणी पिणे देखील त्याच धर्तीवर मदत करते आणि संक्रमण कमी करते.
- प्रसुतिपश्चात आईसाठी सर्वात सोपा पदार्थ म्हणजे खिचडी. खिचडी पचायला हलकी आहे कारण त्यात अर्ध–घन सुसंगतता आहे आणि ती पौष्टिक देखील आहे कारण त्यात बर्याच भाज्यांचा समावेश असतो.
- बाळ आईच्या दुधावर पोषणासाठी अवलंबून असते. आईच्या आहारात पुरेश्या भाज्या, विशेषत: हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असणे आवश्यक आहे. ज्यामुळे आईच्या दुधाद्वारे बाळाला पोषण पुरवण्यास मदत होते.
- हायड्रेटेड राहणे देखील यावेळी महत्वाचे आहे. आईचे दूध तयार करण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी वापरल्यामुळे मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थ शरीराला आवश्यक असतात. गरम दूध आणि सूप पिणे आईसाठी सुखदायक असू शकते. ती अधूनमधून नारळ पाणी सुद्धा घेऊ शकते.
- नवीन मातांसाठी पारंपारिकरित्या बनविलेले निरोगी लाडू देखील महत्त्वपूर्ण आहेत. सहसा, या लाडूंमध्ये बाळाच्या वाढीस मदत करण्यासाठी मेथी असते. डिंकाचे लाडू पुनर्प्राप्तीस मदत करतात म्हणूनच आवश्यक आहेत. इतर असंख्य प्रकारचे निरोगी लाडू शरीराची दुखणी कमी करण्यास देखील मदत करतात.
- बडीशेपचा सुद्धा आहारात समावेश केला जातो. पराठ्यासारख्या भारतीय पदार्थांची चव वाढवण्यासाठी हे घटक म्हणून वापरले जाते. बडीशेप घालून उकळलेले पाणी पिण्यामुळे गर्भाशय शुद्ध होण्यास मदत होते आणि लवकर बरे होण्यास मदत होते.
- आईच्या आहारात तूप असले पाहिजे ह्याकडे बहुतेक घरांमध्ये लक्ष ठेवले जाते कारण त्यामुळे बाळाला भरपूर पोषण मिळते तसेच आईच्या आतड्यांची हालचाल वाढते. परंतु तुपाचे मध्यम प्रमाणात सेवन केले पाहिजे हे लक्षात ठेवा.
४. बाळंतपणादरम्यान आईसाठीचे नियम
काही माता काही विशिष्ट परंपरा पाळू शकतात, जसेः
- केस धुताना धूप वापरणे.
- निश्चित कालावधीसाठी लैंगिक संबंध ठेवण्यापासून परावृत्त राहणे
- उबदार कपडे घालणे आणि संपूर्ण शरीर झाकणे.
- घरातील कामांपासून दूर रहाणे.
- निरर्थक दूरदर्शन प्रोग्राम किंवा संगणकाचा वापर करणे टाळणे.
बाळंतपणामुळे प्रसूतीनंतर आईच्या पुनर्प्राप्तीसाठी मदत होते. अलिकडच्या काळात या प्रक्रियेच्या काही पारंपारिक बाबी बदलल्या गेल्या असतील परंतु आपण शक्य तितक्या लवकर सामान्य स्थितीत परत यावे आणि आपल्या बाळाची काळजी घेण्याचा आनंद घेता यावा यासाठी इतर बर्याच गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.
आणखी वाचा:
गर्भपातानंतरचा भारतीय आहार
सिझेरियन प्रसूती नंतरची पाठदुखी: कारणे आणि उपचार