Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home गर्भधारणा होताना योजना आणि तयारी असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) – वंध्यत्वावरील उपचारपद्धती

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) – वंध्यत्वावरील उपचारपद्धती

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (एआरटी) – वंध्यत्वावरील उपचारपद्धती

आजकाल बरीचशी जोडपी नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नाही ह्या समस्येने ग्रस्त आहेत. त्यास कारणीभूत अनेक घटक आहेत जसे खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, व्यायामाचा अभाव, प्रदूषण आणि मधुमेहासारखे जीवनशैलीमुळे जडलेले रोग इत्यादी. बर्याच स्त्रिया आता करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि नंतर मुलांना जन्म देण्याचा पर्याय निवडतात. पुरुष आणि स्त्रिया दोघांच्याही वंध्यत्वात लक्षणीय वाढ होत आहे. वंध्यत्व देखील आता फक्त शहरी भागापुरते मर्यादित राहिलेले नाही. हे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील महानगरांमध्ये सुद्धा दिसून येते.

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे काय?

ज्या प्रक्रियेमध्ये किंवा उपचारपद्धतीमध्ये स्त्रीबीज, शुक्राणू किंवा भ्रूण शरीराच्या बाहेर हाताळले जातात त्या प्रक्रियेला अस्सिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी किंवा एआरटी असे म्हणतात. गर्भधारणेस अडथळा आणण्यास कारणीभूत असणारे बरेच घटक आहेत. कृत्रिम गर्भधारणेची तीन प्रमुख करणे आहेत.

कृत्रिम गर्भधारणेची कारणे

कृत्रिम गर्भधारणेची कारणे

गर्भधारणा होण्यामागे बरेच घटक कारणीभूत असतात. कृत्रिम गर्भधारणेसाठी खाली तीन कारणे दिली आहेत.

  • ओव्यूलेशन आणि स्त्रीबीज गुणवत्ता: ह्या प्रकारातील स्त्रियांमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, स्त्रीबीजांची गुणवत्ता कमी असणे, अनियमित ओव्यूलेशन किंवा संप्रेरकांमधील असंतुलनामुळे अजिबात ओव्यूलेशन होणे इत्यादी समस्या असतात. ह्या समस्या वयाशी निगडित असतात आणि ३७ वर्षांवरील स्त्रियांवर जास्त परिणाम होतात.

कृत्रिम गर्भधारणेची कारणे

  • अवरोधित (blocked) बीजवाहिन्या: आधीच्या संसर्गामुळे, एन्डोमेट्रिओसिस, टिश्यूला झालेल्या जखमा, फिम्ब्रिया इत्यादी कारणांमुळे बीजवाहिन्या अवरोधित झालेल्या असू शकतात. स्त्रीबीज गर्भाशयापर्यंत पोहचत नसल्यामुळे, शुक्राणू स्त्रीबीजाचे फलन होत नाही.
  • पुरुषांमधील कमतरता: पुरुषांमधील बऱ्याचशा घटकांमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. शुक्राणूंची कमी संख्या, शुक्राणूंची कमी गुणवत्ता, शुक्राणूंची गतिशीलता कमी असणे, शुक्राणूंची कमतरता किंवा एपिडी डायमीस अवरोधित असणे इत्यादी कारणे असू शकतात.

कृत्रिम गर्भधारणेच्या इतर कारणांमध्ये पेल्विक इंफ्लामेंटरी डिसीजेस, इडोमेट्रिओसिस आणि इतर स्थितीचा सुद्धा समावेश होतो.

कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञानाचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत?

कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञानाच्या अंतर्गत वेगवेगळ्या उपचारपद्धती आणि प्रक्रिया आहेत.

  • आयव्हीएफ इन व्हिट्रो फर्टिलायझेशन

आयव्हीएफ - इन व्हिट्रो फर्टिलायझेशन

कृत्रिम प्रजनन उपचारपद्धतीमध्ये ही कदाचित सर्वज्ञात पद्धती आहे. मूलतः, स्त्रीबीज आणि शुक्राणू ह्यांचे फलन प्रयोगशाळेत एका पेट्रीडिशमध्ये केले जाते. एम्ब्रियोलॉजिस्ट फलनाच्या क्रियेवर आणि पेशी विभाजनाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतात. आयव्हीएफ प्रक्रियेच्या दुसऱ्या आणि पाचव्या दिवशी निरोगी गर्भ पुन्हा एकदा गर्भाशयात सोडला जातो. ज्या स्त्रियांच्या बीजवाहिन्या अवरोधित आहेत किंवा खराब झाल्या आहेत त्यांच्यासाठी आयव्हीएफ हा एक उत्तम पर्याय आहे. ही पद्धती वापरण्याची इतर कारणे म्हणजे एन्डोमेट्रिओसिस, ओव्यूलेशनची समस्या आणि समजलेले वंध्यत्वाचे प्रश्न.

आयव्हीएफ करण्याचे अनेक मार्ग आहेत. नैसर्गिक आय. व्ही. एफ. मध्ये स्त्रीला प्रजननासाठी कुठलेही उपचार केले जात नाही. आय. व्ही. एफ चे इतर प्रकार म्हणजे पारंपरिक नेहमीची आय. व्ही. एफ आणि सौम्य आय. व्ही. एफ.

  • आयसीएसआय इन्ट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन

आयसीएसआय - इन्ट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन

ही उपचारपद्धती आयव्हीएफ सारखीच आहे. परंतु, ह्यामध्ये, शुक्रजंतू अंड्याजवळ ठेवण्याऐवजी अंड्यामध्ये सोडले जाते. ज्या जोडप्यांमध्ये, पुरुषाच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असेल किंवा शुक्राणूंची गतिमानता कमी असेल किंवा खूप जास्त प्रमाणात असामान्य शुक्राणू असतील तर ही उपचारपद्धती केली जाते. जेव्हा वीर्यामध्ये शुक्राणू नसतात परंतु अंडकोषात असतात, किंवा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात प्रतिपिंडे असल्यास शुक्रजंतू स्त्रीबीजाचे फलन करू शकत नाही तसेच प्रतिगामी स्खलन म्हणजेच शुक्रजंतूचे पुन्हा अंडाशयात वहन होत असेल तर ही उपचारपद्धती चांगली आहे.

  • आययूआय इंट्रा युटेरिन इन्सेमिनेशन

स्त्रीच्या ओव्यूलेशनच्या कालावधीमध्ये पुरुषाचे शुक्राणू काढून गर्भाशयात सोडले जातात. ह्या पद्धतीसाठी फक्त निरोगी आणि मजबूत शुक्राणूंची निवड केली जाते. जर तुम्हाला संभोगादरम्यान काही समस्या येत असतील किंवा वीर्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल, सौम्य एन्डोमेट्रिओसिस असेल किंवा तुम्ही शुक्राणू दात्यचा पर्याय निवडला असेल तर ही पद्धती चांगली आहे.

  • जीआयएफटी गॅमेंट इंट्राफिलिपियन ट्रान्स्फर

शुक्राणू आणि स्त्रीबीज शरीराबाहेर एकत्र आणले जातात आणि नंतर छोटा छेद घेऊन ते बीजवाहिनी मध्ये सोडले जाते. अशाप्रकारे फलन शरीरात होते.

  • एफईटी फ्रीझिंग एम्ब्रियो ट्रान्स्फर

इतर कृत्रिम उपचारपद्धती वापरताना, एखाद्या जोडप्याकडे एकापेक्षा जास्त चांगल्या प्रतीचे भ्रूण तयार होऊ शकतात. ते फ्रीझ करून नंतर वापरता येऊ शकतात

  • दान केलेले शुक्राणू

जर शुक्राणूंची गुणवत्ता तितकीशी चांगली नसेल तर शुक्राणू दात्याचा पर्याय निवडला जातो. भारतामध्ये शुक्राणू दात्याला काही चाचण्या करून घ्याव्या लागतात, तसेच त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तपासून पहिली जाते, औषधांचा वापर, वीर्याची तपासणी आणि वैद्यकीय जेनेटिक चाचण्या सुद्धा केल्या जातात.

  • दान केलेले स्त्रीबीज

दात्याने दान केलेल्या स्त्रीबीजाचा तुमच्या पतीच्या शुक्राणूशी संयोग घडवून आणला जातो आणि नंतर ते गर्भाशयात सोडले जाते. ज्या चाचण्या शुक्राणू दात्याच्या केल्या जातात तशाच प्रकारच्या चाचण्या स्त्रीबीज दात्याच्या सुद्धा केल्या जातात.

अस्सिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ची तयारी कशी केली पाहिजे?

अस्सिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ची तयारी कशी केली पाहिजे?

एआरटी उपचारपद्धती खूप महाग आहेत. त्यामुळे हा पर्याय निवडण्याचा निर्णय पक्का असला पाहिजे. इथे काही गोष्टी दिल्या आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत

  • अंड्यांची गुणवत्ता, संख्या आणि त्यांची प्रजनन क्षमता तपासून घेतली पाहिजे. पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी वेगवेगळ्या चाचण्या केल्या जातात. पुढील संप्रेरकाची पातळी तपासून पहिली जाते फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (एफएसएच हे संप्रेरक पिट्युटरी ग्रंथींमध्ये असते आणि त्याचा लैंगिक विकासामध्ये महत्वाचा सहभाग असतो), इस्त्राडायोल (हे स्त्री सेक्स हॉर्मोन असून ते अंडाशयात तयार होते), एएमएच (अँटीमुलेरियन हॉर्मोन हे ग्रॅनुलोसा पेशींमध्ये तयार होते.)
  • गर्भाशयात फायब्रॉईडस, पॉलीप्स सारख्या समस्या असतील तर तपासून पहिल्या पाहिजेत
  • लॅप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपी ह्यासारख्या पद्धती वापरून बीजवाहिन्यांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत. काही वेळा सर्जरी सुद्धा केली जाऊ शकते. ह्या समस्या म्हणजे काही वेळा बीजवाहिन्यांमध्ये पाणी होते किंवा त्या अवरोधित असतात
  • वीर्याची गुणवत्ता तपासली पाहिजे
  • एआरटी यशस्वी होण्यासाठी जीवनशैली मध्ये काही बदल केले पाहिजेत आणि ते म्हणजे तुमचे वजन नियंत्रित ठेवणे, धूम्रपान मद्यपान सोडणे तसेच खूप जास्त कॅफेन घेणे टाळावे

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीशी संबंधित गुंतागुंत कुठली असते?

एआरटी वापरल्याने आईच्या तब्येतीवर दूरगामी विपरीत परिणाम झाल्याचे खूप कमी पुरावे आहेत. ह्या उपचारपद्धतिदरम्यान वापरली जाणारी प्रजनन औषधे ही कमी कालावधीसाठी वापरली जातात आणि त्यावर लक्ष ठेवणे जरुरीचे असते.

परंतु, गरोदरपणात गुंतागुंत निर्माण होऊ शकते तसेच प्रसूती आणि बाळाच्या जन्माच्या वेळेस सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ही कृत्रिम प्रजनन उपचारपद्धती जास्त करून वय जास्त असलेल्या महिला निवडतात. तसेच एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता सुद्धा खूप असते. गर्भपात, गरोदरपणात मधुमेह, प्रीइक्लॅम्पसिया ह्या खूप सामान्यपणे आढळणाऱ्या समस्या आहेत आणि बऱ्याच स्त्रियांना सिझेरिअन प्रसूतीची गरज भासू शकते. ऑक्सफर्ड अकॅडेमीने दिलेल्या आकडेवारी नुसार

  • एआरटी गर्भारपणात १८% वेळा गर्भपात होतो
  • ३१% प्रकरणांमध्ये एकापेक्षा जास्त बाळे होतात
  • % प्रकरणांमध्ये एकटोपीक गर्भधारणा होते

इतर गुंतागुंत खालीलप्रमाणे:

  • जन्मतः कमी वजन आणि अकाली प्रसूती
  • जन्मतःच मृत्यू
  • ओवॅरियन हायपरस्टीम्युलेशन सिंड्रोम, ह्यामध्ये पोटाच्या पोकळीमध्ये पाणी होते
  • स्त्रीबीज काढून घेताना मूत्राशय, आतडे किंवा कुठल्याही रक्तवाहिनीला नुकसान पोहचू शकते
  • उपचारपद्धती अयशस्वी होईल का किंवा पैशांचा प्रश्न ह्यामुळे खूप जास्त ताण किंवा चिंता निर्माण होईल

स्त्री वंध्यत्व उपचारपद्धती दरम्यान काय होते?

  • ओव्यूलेशन इंडक्शन

ओव्यूलेशन इंडक्शन

ह्यामध्ये अंडाशयाला स्त्रीबीज निर्मितीसाठी प्रवृत्त केले जाते. ह्यामध्ये स्त्रीला क्लोमिफेन हे औषध दिले जाते. पीसीओडी असलेल्या स्त्रीसाठी हे औषध लिहून दिले जाते. पीसीओडी असलेल्या स्त्रीमध्ये अंडाशयामध्ये स्त्रीबीज तयार होत नाही.

आयव्हीएफ उपचारपद्धतीमध्ये ही स्टेप कॉमन आहे. परिपक्व स्त्रीबीजे तयार होण्यासाठी तीन संप्रेरके स्त्रीच्या शरीरात सोडली जातात. ह्या मध्ये स्त्रीची मासिक पाळी नियंत्रित करणे हा मूळ उद्देश असतो जेणेकरून स्त्रीबीजे एका विशिष्ट दिवशी काढून घेतली जाऊ शकतात. ह्या पद्धतीत एकापेक्षा जास्त स्त्रीबीज मिळते

  • स्त्रीबीज गोळा करणे

जेव्हा स्त्रीबीज परिपक्व होते तेव्हा ते शरीरातून काढून घेतले पाहिजेत. ही प्रक्रिया ऑपरेशन थिएटर मध्ये केली जाते. आणि त्याजागी भूल दिली जाते. योनीमार्गातून सुई लावलेली दुर्बीण घालून परिपक्व स्त्रीबीजे काढून घेतली जातात

  • शरीराच्या बाहेर फलन क्रिया (इन व्हिट्रो फेर्टीलायझेशन)

परिपक्व स्त्रीबीजे तुमच्या पतीच्या शुक्राणूसोबत पेट्रीडिश मध्ये एकाच दिवशी ठेवली जातात. फलन झाले आहे किंवा नाही हे १२१८ तासांनंतर एम्ब्रियोलॉजिस्ट तपासून पाहतात. फलन झाले आहे हे निश्चित झाल्यानंतर भ्रूण गर्भाशयात पुन्हा सोडले जाते. हे फलन क्रियेनंतर ३६ तासांनी केले जाते. १२ दिवसांनंतर गर्भधारणा चाचणी करून गर्भधारणा झाल्याचे निश्चित केले जाते.

पुरुष वंध्यत्व उपचार पद्धतीदरम्यान काय होते?

जर पुरुषामध्ये शुक्राणूंची संख्या कमी असेल किंवा गतिशीलता कमी असेल तर आयसीएसआय उपचारपद्धती त्यांच्यासाठी योग्य आहे. ओव्यूलेशन इंडक्शन आणि स्त्रीबीज काढून घेण्याची प्रक्रिया नेहमीसारखी केली जाते परंतु परिपक्व स्त्रीबीजामध्ये अगदी काचेची अगदी पातळ ट्यूब घालून शुक्राणू सोडले जातात. जर वीर्यामध्ये शुक्राणू नसतील तर भूल देऊन ते अंडाशयामधून काढून घेतले जातात. त्यानंतर हे शुक्राणू आयसीएसआय उपचारपद्धतीद्वारे स्त्रीबीजाचे फलन करण्यासाठी वापरले जातात.

आययुआय किंवा आयव्हीएफ ह्या पद्धती पुरुषांमधील वंध्यत्वावर उपचारांसाठी वापरल्या जातात.

आययुआय मध्ये, शुक्राणू गर्भाशयात सोडले जातात आणि त्यामुळे फलन प्रक्रिया जलद होण्यास मदत होते. ही उपचारपद्धती शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठी केली जाते, त्यामुळे शुक्राणू अखेरीस बीजवाहिन्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते.

आयव्हीएफ मध्ये स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज काढले जाते आणि त्याचे फलन पुरुषाच्या शुक्राणूसोबत होते. हे सगळे प्रयोगशाळेत एका विशिष्ट आणि नियंत्रित स्थितीमध्ये केले जाते. फलित स्त्रीबीज नंतर आईच्या शरीरात सोडले जाते आणि गर्भधारणा प्रवृत्त केली जाते.

जुळी बाळे होण्याची किती शक्यता असते?

ओव्यूलेशन इंडक्शन प्रक्रियेमुळे एकापेक्षा जास्त गर्भराहण्याची शक्यता वाढते. ह्याचे कारण म्हणजे गर्भधारणेची शक्यता वाढवण्यासाठी जास्त स्त्रीबीजे वापरली जातात. परंतु, एक लक्षात घ्या की कृत्रिम प्रजनन उपचार पद्धतीचा उद्धेश एकापेक्षा जास्त गर्भ हा नसतो. ह्या प्रक्रियांचा मूळ उद्धेश हा निरोगी बाळ होणे हा असतो. एकापेक्षा जास्त गर्भधारणा होणे ही गुंतागुंत समजली जाते आणि त्यामुळे आई आणि बाळास धोका पोहचू शकतो.

नैसर्गिक गर्भधारणेमध्ये एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता कमी असते. ६५ मधील एका प्रकरणामध्ये तसे होऊ शकते. परंतु ते कृत्रिम प्रजनन उपचारांपेक्षा बरे असते. पैकी एका आयव्हीएफ उपचारपद्धतीमध्ये एकापेक्षा जास्त गर्भ राहण्याची शक्यता असते.

एआरटी चा यशाचा दर

तुम्ही निवडलेल्या उपचारपद्धतीचा यशाचा दर हा वंध्यत्वाचे कारण आणि स्त्रीचे वय ह्यावर अवलंबून असतो. जर स्त्रीचे वय ४० पेक्षा कमी असेल तर यशाचा दर जास्त असतो. तुमची जीवनशैली निरोगी असेल तर अडथळ्यांची शक्यता कमी असते. जेव्हा तुम्ही फर्टिलिटी क्लिनिकला भेट देता तेव्हा ते तुम्हाला तुमचा यशाचा दर सांगतील ज्याची तुम्ही राष्ट्रीय सरासरी सोबत तुलना करू शकता. परंतु तुमचा निर्णय आकडेवारीवर अवलंबून नसावा. काही क्लिनिक्स ४० पेक्षा जास्त वय असलेल्या स्त्रियांच्या उपचारांवर जास्त लक्ष देतात. तर काही तुमच्या वंध्यत्वाच्या समस्यांवर उपचारपद्धती देतात. दुसरा कुठला पर्याय शोधण्याआधी बरेचसे तज्ञ तीन वेळा कृत्रिम उपचारपद्धतीचा पर्याय करून बघण्यास सांगतात. खचून जाण्याचे काहीच कारण नाही कारण, ३५ वर्षांखालील स्त्रियांना एआरटी द्वारे गर्भधारणा होण्याची शक्यता २५% आणि ३५ ते ३९ वयोगटातील स्त्रियांसाठी ही शक्यता १८% असते.

जेव्हा तुम्ही कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञानाचा पर्याय निवडता तेव्हा तुमच्या दोघांचा वैद्यकीय इतिहास डॉक्टरांना दिल्याची खात्री करा. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा होईल तेव्हा तुमच्या शरीरात होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा आणि डॉक्टरांच्या भेटीच्या वेळा नियमितपणे पाळा.

तुम्हाला कुठले पर्याय उपलब्ध आहेत ते तज्ञांशी आणि वेगवेगळ्या फर्टिलिटी क्लिनिक्स ना भेटी देऊन शोधून काढा. कृत्रिम प्रजनन उपचारपद्धतीमुळे बऱ्याच जोडप्याना त्यांच्या वंध्यत्वाच्या समस्येवर उपाय मिळण्यास मदत होते आणि स्वतःचे छान कुटुंब असावे ह्या त्यांच्या स्वप्नाच्या ते अगदी जवळ पोहोचतात.

आणखी वाचा:

जुळ्या बाळांची गर्भधारणा होण्यासाठी काय करावे?
गर्भनिरोधक गोळ्या घेत असताना गर्भधारणेची शक्यता

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article