अन्य

५ महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त टिप्स

    In this Article

जो पर्यंत तुमचे बाळ मोठे होत नाही तो पर्यंत बाळाची काळजी घेणे त्याच्यासाठी आवश्यक असते. नवजात बाळाची काळजी घेण्याच्या तुलनेत २० आठवड्यांच्या बाळाची काळजी घेणे तसे सोपे असते. परंतु काही वेळेला ते अवघड वाटू शकते. काही गोष्टी मनात ठेवल्यास, हा काळ पटकन निघून जाईल.

तुमच्या ५ महिन्यांच्या बाळाची काळजी कशी घ्यावी?

तुमच्या लहान बाळाची काळजी घेणे अवघड वाटू शकते. परंतु इथे काही टिप्स दिल्या आहेत त्यामुळे गोष्टी सोप्या होतील.

. बाळाच्या भुकेच्या आणि झोपेच्या वेळा सांभाळणे म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे आहे.

ह्या वयात बाळ तुमचे अनुकरण करत असते. तुम्ही चमच्याने काही खात असाल तर बाळाला सुद्धा तसे करून बघायचे असते. तुम्हाला बाळाला घनपदार्थ देण्याचा मोह होईल परंतु हे वय घनपदार्थ सुरु करण्यासाठी योग्य नाही. थोडे फॉर्मुला दूध चमच्याने दिल्यास बाळाला बरे वाटू शकते. बाळाला भूक लागली असल्यास बाळ तसे संकेत देण्यास सुरूवात करेल. त्यामुळे जर तुम्ही स्तनपान देण्याचे अगदी काटेकोर वेळापत्रक तयार केले असेल तर त्यात थोडा बदल केला तरी चालेल, आणि जेव्हा बाळ मागणी करेल तेव्हाच त्यास स्तनपान द्या. जर तुम्ही बाळाला फॉर्मुला देत असाल तर तो योग्य प्रमाणात आहे ना ते पहा. वयानुसार तो कमी जास्त करा. बाळाला स्तनपान सुरु असताना झोप आली तर बऱ्याच माता बाळाला झोपू देतात. ह्या वयात, झोपणे आणि दूध पिणे ह्या दोन्ही क्रिया वेगळ्या करण्यास सुरुवात करा त्यामुळे बाळाला दूध पिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा लक्षात येतील. तसेच, ह्या वयात बाळ पालथे पडण्यास सुद्धा सुरुवात होईल. आणि ते आणखी एक आव्हान आहे. तुम्ही उशांचा वापर करू शकता किंवा बाळासाठी कुठलेही पांघरून न वापरता बाळाला आरामात अवती भोवती फिरू देऊ शकता.

. बाळाच्या आरोग्यासाठी प्रतिक्रियात्मक उपयांऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना करा.

आपल्या बाळाला निरोगी ठेवणे नेहमीच आवश्यक असते आणि ते सुनिश्चित करण्याचा लसीकरण हा एक उत्तम मार्ग आहे. लसीकरण वेळापत्रकाचे नियमित पालन केल्यास, बऱ्याच गोष्टींची काळजी घेतली जाते. जर आपण आपल्या बाळाची आधीच्या महिन्यासाठी लस घेतली नसेल तर आपल्या डॉक्टरांशी बोलून लवकरात लवकर लसीकरणाची वेळ ठरवा. अशा काही विशिष्ट लसी आहेत ज्या आईने सुद्धा घेण्याची गरज असते.
आपले घर स्वच्छ ठेवणे गरजेचे असते, परंतु खूपही जास्त स्वच्छता करू नका. थोडीशी अस्वच्छता आणि धूळ असणे गरजेचे आहे कारण त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

. आपले घर हे आपल्या बाळासाठी सर्वात सुरक्षित स्थान असणे आवश्यक आहे

बाळ आता घरात रांगू लागेल आणि आजूबाजूच्या गोष्टींबद्दल त्यास कुतूहल निर्माण होईल. आता तुमचे बाळ फक्त पाळण्यात किंवा क्रिबमध्ये राहू शकणार नाही हे समजल्यावर घर 'बेबी प्रूफ' करणे जरुरीचे आहे. विजेच्या सॉकेट्सना संरक्षक बसवणे, धोकादायक रसायने जमिनीपासून वर ठेवणे इत्यादी गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या ५ महिन्यांच्या बाळाची काळजी घेण्याबाबतची ही सर्वात महत्वाची टीप आहे.

. आधार घेऊन बाळाला बसण्यास सुरुवात करू द्या

ह्या वयात, बाळ आता मान चांगली धरू लागेल आणि बसण्यास सुरुवात करण्यास शिकवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे .
बाळाला ताठ बसवून त्याच्या पाठीला आधार द्या आणि उशांचा आधार देऊन बाळ जितका वेळ बसेल तितका वेळ बसू द्या. हे पलंगावर करा किंवा जमिनीवर मऊ गोधडी घालून तुम्ही करा, म्हणजे बाळ उत्साहात असताना एका बाजूला पडले तरी त्यास लागणार नाही.

. बाळासाठी कप वापरण्यास सुरुवात करा

बाळाला जसा चमचा वापरून पहावासा वाटतो, तसेच बाळाला कप सुद्धा कसा वापरावा ह्याची ओळख करून द्या. त्यामुळे जरी बाळाला इतक्यात कप वापरता आला नाही तरी बाळाला स्वतःच्या स्वतः वस्तू धरता येऊ लागतील. कपमधून थोडे दूध किंवा पाणी पयायल्यास बाळ आनंदित होईल आणि आपण काही तरी वेगळे करू शकतो ह्या यशाचा बाळाला आनंद होईल. जर बाळ लगेच ह्यासाठी तयार झाले नाही तर बाळाच्या आजूबाजूस कप ठेवा आणि बाळाला त्यासोबत खेळू द्या. हळूहळू, बाळ पुन्हा प्रयत्न करू लागेल.

. तुमच्या बाळाशी खेळत रहा

बाळाला आता तुमचे वेगवेगळे पैलू समजू लागतील. तुम्ही दोघे एकत्र काही खेळ खेळा म्हणजे बाळाला तुमची आणखी जवळून ओळख होईल. बाळाचे मनोरंजन करणे आणि बाळाला आवडणारे मजेदार हावभाव करणे हे बाळाला आनंदी ठेवण्याचे उत्तम मार्ग आहेत. काही मजेदार चित्रांद्वारे बाळाला वेगवेगळ्या रंगांची आणि प्राण्यांची ओळख करून द्या. बाळाचा मेंदू ही सगळी माहिती घेत असतो आणि त्यावर प्रक्रिया करीत असतो.
पाच महिन्यांच्या बाळाची काळजी घेणे ही काही सोपी गोष्ट नाही परंतु वाटते तितकी ती अवघड सुद्धा नाही. जसजसे तुमचे बाळ स्वावलंबी होऊ लागते, तसे तुम्ही त्याच्याशी बंध जुळवू शकता. दररोज बाळाशी संवाद साधा आणि संवादप्रक्रिया मजबूत ठेवा. तुम्हाला समजणार पण नाही की किती पटकन तुमचं छोटंसं बाळ आता ताठ बसू लागलं आहे, आजूबाजूला चालू लागले आहे आणि सगळ्यांना आनंद देणारे पहिले काही शब्द सुद्धा बोलू लागले आहे. आणखी वाचा: ४-६ महिन्यांच्या बाळाची झोप
Published by
मंजिरी एन्डाईत
Last Updated On

Recent Posts

All Rights Reserved