Firstcry Parenting
Search
Parenting Firstcry
Home टॉडलर (१-३ वर्षे) दर-महिन्याला-होणारा-बाळाचा-विकास २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

तुमचे लहान मूल एक कॉपिंग मशीनबनते आणि २० महिन्यांचे झाल्यावर तुम्ही केलेल्या प्रत्येक हालचालीची तसेच तुमच्या आवाजाची नक्कल करते. ते तुमचे आवडते हावभाव सुद्धा हुबेहूब साकारू लागते. हळूहळू पण स्थिरपणे, नक्कल करून, ऐकू येणारे वेगवेगळे आवाज आणि मोटर कौशल्ये आत्मसात करते.

व्हिडिओ: २० महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

२० महिन्यांच्या लहान मुलाचा विकास

ह्या वयातील लहान मुलांमध्ये वेगळे होण्याच्या चिंतेची काही चिन्हे दिसून येतात. तथापि, तुमच्या लहान मुलाला हळूहळू तुमच्या रोजच्या रुटीनची सवय होईल उदा: कामावर जाणे आणि संध्याकाळी घरी परतणे इत्यादी. बाहेर पडण्यापूर्वी आणि परत आल्यानंतर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करणे महत्वाचे आहे जेणेकरून त्याला सुरक्षित वाटेल आणि त्याला समजेल की घरी थोडासा शांत किंवा एकटा वेळ घालवणे त्यांच्यासाठी चांगले आहे आणि वाईट नाही.

शारीरिक विकास

२० महिन्यांच्या मुलासाठी शारीरिक विकासाचे टप्पे खालीलप्रमाणे आहेत

  • या वयातील मुलांसाठी आदर्श वजन ११.३ किलो आहे तर मुलींसाठी ते १०.७ किलो आहे. डब्ल्यूएचओ मानकांनुसार, मुलांची उंची ८४.२ सेंटीमीटरपर्यंत पोहोचली पाहिजे तर मुलींची उंची ८२. २ सेमी असणे अपेक्षित आहे
  • तुमच्या लहान मुलाने आतापर्यंत २०/२० दृष्टी अनुभवली पाहिजे. त्याच्या सभोवतालच्या परिसराचे निरीक्षण तो करू शकला पाहिजे. ह्या टप्प्यापर्यंत त्याचा हात व डोळ्यांचा समन्वय विकसित होईल तसेच दृष्टीचा सुद्धा विकास होईल. ह्या वयाची मुले ब्लॉक्स एकावर एक रचू शकतात आणि गोष्टी अचूकतेने फेकून देऊ शकतात
  • तुमच्या लहान मुलाला हळूहळू ड्रॉइंग आणि डूडलिंगमध्ये रस वाटू लागेल. रेखांकन आणि डूडलिंग हे त्यांचे मोटर कौशल्य नीट विकसित होत असल्याचे लक्षण आहे. तुमचे मूल रांगायला, बसायला किंवा आजूबाजूला फिरू लागल्यावर त्याचे मोटर स्किल्स अजून विकसित होऊ लागतात.

सामाजिक आणि भावनिक विकास

२० महिन्यांच्या मुलांमध्ये आढळणारे सामाजिक आणि भावनिक टप्पे आहेत

  • एकटेच खेळत बसणे हे ह्या वयातील मुलांसाठी एक सामान्य वैशिष्ट्य आहे. तुमचे लहान मूल इतरांसोबत कदाचित खेळणार नाही परंतु त्याची रूम तो शेअर करू शकेल आणि स्वतःच्याच विश्वात रमेल
  • या वयात लहान मुलांनी इतरांना चावणे आणि दूर ढकलणे हि खूप सामान्य गोष्ट आहे. तुमच्या लहान मुलाची आवेग नियंत्रणाची भावना अद्याप पूर्णतः परिपक्व झालेली नाही त्यामुळे त्याला गोष्टी इतरांशी शेअर करणे आणि इतरांना देणे कठीण होऊ शकते
  • तुमच्या मुलाला तुम्हाला सतत नाहीम्हणायला आवडेल. तुमची अवहेलना व्हावी म्हणून लहान मूल असे करत नाही तर हे कृत्य पुष्टीकारणाचे आहे. तुमचे लहान मूल तुमच्यावर विश्वास ठेवते आणि तुम्ही परीक्षा बघत आहे असा ह्याचा अर्थ होतो
  • तुमचे लहान मूल बाहुलीला आंघोळ घालणे आणि इतरांची नक्कल करणे यासारख्या प्रतीकात्मक खेळाचा आनंद घेईल
  • तुमचे लहान मूल इतरांसोबत खेळण्याचा आनंद घेऊ शकते आणि हळूहळू इतर मुलांशी गोष्टी शेअर करण्याची आणि संवाद साधण्याची चिन्हे दर्शवू शकते. इतर मुलांशी खेळताना तो इतरांशी सामाजिक संबंध कसे ठेवायचे हे शिकू शकतो

सामाजिक आणि भावनिक विकास

संज्ञानात्मक आणि भाषा विकास

तुमचे लहान मूल बौद्धिक आणि भाषिक विकासाची चिन्हे दाखवण्यास सुरवात करेल. खाली २० महिन्यांच्या बाळाची चेकलिस्ट दिलेली आहे.

  • तुमचे लहान मूल बोबडे बोल बोलणे थांबवेल आणि पुन्हा बोलण्यास सुरुवात करेल , त्यामुळे तुम्हाला पुन्हा त्याच्याकडे नीट लक्ष देणे आवश्यक आहे. त्याला शब्द कसे बोलावे किंवा कसे उच्चारायचे हे हळू हळू शिकवण्यास सुरुवात करा. त्याला वेगवेगळ्या वस्तू दाखवून त्यांचे नाव सांगण्यास सांगा
  • तुमच्या लहान मुलाला तुम्ही काय बोलता ते समजेल आणि त्यांचा १२ ते १५ शब्दांचा किंवा त्याहून जास्त शब्दांचा शब्दसंग्रह असेल.
  • तुमचे लहान मूल घरातील रोजच्या कामांबद्दल खूप उत्सुक असेल आणि त्याला सगळ्यांना मदत करावीशी वाटेल. त्याला प्लेटमध्ये चमचा ठेवणे किंवा खेळणी काढणे आणि त्यांना पुन्हा एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणे यासारखी साधी कामे करायला लावा.
  • तुमच्या लहान मुलाला त्याचे विशिष्ट कपडे आणायला सांगा आणि तो नेमके तेच करेल. तुमच्या लहान मुलाला सोप्या सूचना समजतील आणि जसे शब्दसंग्रहाचा विस्तार होईल तसे ते आणखी बरेच शिकेल.

वागणूक

ह्या वयात तो तुमची नक्कल करू लागेल. तो त्याच्या खेळण्यातील प्राण्यांना केळी आणि स्नॅक्स खायला देण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा तुम्ही जसे बूट घालता तशी तुमची नक्कल करू शकतो. ह्या वयात तुम्ही त्याचे आदर्श आहात आणि तुमच्या कृतींचे त्याने अनुकरण केल्यास तुम्ही इतके आश्चर्यचकित होऊ नये. काही मुले अनेकदा मिठी मारण्यासाठी विचारू शकतात आणि ते सामान्य आहे. त्याच्याकडे पुरेसे लक्ष द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. काही मुले जितकी देवासारखी आणि शांत दिसतात शी ती नसतात आणि त्यांना अचानक राग येऊ शकतो. ते टेरिबल टूम्हणून ओळखले जातात आणि त्याचे वर्णन खालच्या परिचछेदात केलेले आहे.

टेरिबल टू

लहान मुलांच्या टेरिबल टूमधून बहुतांश पालक जात असतात. काही वेळा टेरिबल टूह्या टप्प्यातून जात असलेल्या मुलांचे वर्तन हे ठाम आणि वर्चस्वापुर्ण असते . उदाहरणार्थ, जर तुम्ही त्याला आवडणारी खेळणी विकत घेतली नाहीत किंवा तुम्ही जे खात आहात ते त्याला देण्यास नकार दिला तर तुमचे लहान मूल मध्येच रस्त्यात लोळून रडू लागेल. केवळ हट्टापायी किंवा तुमच्या पर्यादा तपासून पाहण्यासाठी तो काही गोष्टी तुम्हाला मागेल.

वागणूक

अन्न आणि पोषण

पालक या नात्याने, तुमच्या लहान मुलाला नेचर डेफिसिट डिसऑर्डरचा त्रास होणार नाही हे बघणे महत्वाचे आहे. घराबाहेर वेळ घालवणे, कॅम्पिंग आणि पिकनिकला जाणे किंवा घराबाहेर व्हेजिटेबल ग्रील करणे ह्यामुळे मूड चांगला होण्यास मदत होते तसेच शिकण्यासाठी हा एक चांगला क्रियाकलाप आहे. भाजी कशी पिकते आणि बियाणे कसे पेरलेजाते /कापणी कशी केली जाते ते त्यांना दाखवा. त्यांना शेतीची ओळख करून द्या आणि त्यांना मासे कसे पकडायचे ते शिकवा. त्यांच्या ताटात असलेले अन्नपदार्थ कुठून येतात त्याविषयीची सर्व माहिती त्यांना सांगा. त्यांना पाण्याबद्दल आणि ते चांगले आहे किंवा नाही हे देखील शिकवा. नळ चालू करणे, ताटात अन्न ठेवणे, पौष्टिक पदार्थ खाणे अश्या चांगल्या सवयी त्यांना लावा. जेणेकरून त्यांना अन्न आणि पोषणाविषयीची मूलभूत माहिती मिळेल. तुमच्या २० महिन्यांच्या मुलाला आहाराचे महत्व थोडेसे समजल्यानंतर तो खाण्यास त्रास देणार नाही.

झोप

२० महिन्यांच्या मुलाचे झोपेचे रुटीन असणे महत्वाचे आहे. तुमच्या मुलाचे झोपेचे रुटीन सुरळीत होण्यास सुरुवात होईल आणि जर ते झालेले नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला लागा. त्याला झुलवून किंवा पाळण्यात झोपवण्याची सवय बंद करा. पांघरूण घातल्यावर आणि अंगाई गीत गाऊन कसे झोपायचे ते त्यांना शिकवा. झोपण्याआधी ३० मिनिटे त्याला टीव्ही पाहू देऊ नका. त्यामुळे त्यांच्या झोपेत अडचण येऊ शकते आणि त्यांना शांत झोप लागणे अवघड होते.

खेळ आणि उपक्रम

तुमच्या २० महिन्यांच्या बाळासाठी काही खेळ आणि क्रियाकलाप खालीलप्रमाणे:-

  • तुम्ही व्हिज्युअल आर्टिस्ट असल्यास, तुम्ही तुमच्या लहान मुलाला स्केच, पेंटिंग आणि डूडल कसे बनवायचे ते शिकवू शकता. तुमचे लहान मूल आता सरळ रेषा काढू लागले असेल. आता चित्र काढणे किंवा पेंटिंग करणे ह्याद्वारे त्यांचे मोटार स्किल नियंत्रण करण्यासाठी हे वय अगदी योग्य आहे
  • तुमच्या लहान मुलाला इतरांसोबत शेअर करणे किंवा खेळणे या संकल्पनेचा तिरस्कार असल्यास, त्याच्यासोबत ‘किक द बॉल’ हा खेळ खेळा किंवा दोन भावंडांना एकत्र खेळायला लावा. तुमच्या मुलाला गेम/ ऍक्टिव्हिटी शेअर करण्याचे फायदे नक्कीच लक्षात येतील आणि त्याला मौजमस्तीमध्ये सहभागी होता येईल
  • आपल्या हातात एखादी वस्तू (किंवा खेळणी) घ्या, हळू हळू मूठ बंद करा आणि आपले हात आपल्या पाठीमागे आणा. आता हात समोर समोर आणा आणि त्यांना विचारा की कोणत्या हातात वस्तू आहे.

पालकांसाठी टिप्स

तुमच्या लहान मुलाच्या वाढीवर आणि विकासावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही या काही टिप्स वापरू शकता.

  • जर एखाद्या मोठ्या भावंडाने तुमच्या लहान मुलासमोर वाईट गोष्टी केल्या आणि धाकट्याने त्याची नक्कल केली, तर तुमच्या मोठ्या मुलाला त्या पुन्हा करण्यापासून परावृत्त करा आणि त्यामुळे इतरांना कशी हानी पोहोचू शकते हे त्याला सांगा. भाऊबहीण नसल्यास, आपल्या लहान मुलाशी प्रेमाने वागा आणि आक्रमक वागणूक असल्यास त्यामुळे इतरांना कशी हानी किंवा नुकसान पोहोचू शकते हे त्याला सांगा.
  • तुमच्या लहान मुलासोबत खेळ खेळा. तुमच्या लहान मुलाला घरामध्ये आणि घराबाहेर खेळ खेळायला शिकवा. ह्यामुळे त्याच्या मेंदूला चालना मिळेल, त्याला नवीन अनुभव मिळेल आणि त्याच्या संज्ञानात्मक आणि भावनिक विकासास प्रोत्साहन मिळेल.
  • तुमच्या लहान मुलाला वेळेवर जेवण द्या आणि त्याच्या जेवणाची कुठलीही वेळ चुकवू नका
  • झोपण्याच्या वेळेची योग्य दिनचर्या तयार करा आणि इतर दैनंदिन दिनचर्या पाळली गेली आहेयाची खात्री करा (जसे की खेळण्याच्या वेळा, डेकेअरला जाणे, उद्यानात जाणे इ.)
  • दिवसाच्या शेवटी एकदाच सगळी स्वच्छता करा. असे करणे जास्त शहाणपणाचे ठरेल आणि सगळा पसारा आवरणे सोपे जाईल
  • तुमचे लहान मूल चांगले वागल्यास त्याचे कौतुक करा त्यामुळे नकारात्मक वर्णन नाहीसे होण्यास मदत होईल.

पालकांसाठी टिप्स

खालील परिस्थतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या

खालील गोष्टी आढळल्यास तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे

  • तुम्हाला बाळामध्ये विकासाच्या विलंबाची काही लक्षणे दिसत असल्यास
  • तुमचे लहान मूल शांत असल्यास किंवा काहीच बोलत नसल्यास
  • तुमचे लहान मूल इतरांसोबत किंवा स्वतःशीच खेळात नसल्यास आणि खेळ किंवा मजेदार क्रियाकलापांमध्ये त्याला रस नसल्यास
  • तुमच्या लहान मुलाला भूक लागत नसल्यास आणि तुम्ही त्याला जे काही खायला देता त्यास नकार देत असल्य्यास किंवा त्याला अन्नपदार्थांची लालसा वाटत नसेल तर
  • तुमचे लहान मूल अजूनही बोबडे बोलत असल्यास किंवा तुम्ही दिलेल्या साध्या सूचना समजू शकत नसल्यास
  • तुमच्या २० महिन्याच्या बाळाचे वजन डब्ल्यूएचओ च्या मार्गदर्शक तत्वानुसार नसेल तर

मुलाचे संगोपन करण्याचे कोणतेही निश्चित मार्ग नाहीत. प्रत्येक लहान मूल अद्वितीय आहे, आणि प्रत्येक मूल त्यांच्या स्वत: च्या गतीने वाढते. परंतु हे एक अतिशय महत्त्वाचे वय आहे कारण लक्षात आलेले कोणतेही धोक्याचे चिन्ह हे काही मोठ्या समस्येचे चिन्ह असू शकते आणि त्या समस्येचे लवकर निदान झाल्यास उपाय करणे सोपे होते. मुख्य म्हणजे सकारात्मक रहाणे, संयम बाळगणे आणि त्यांना भरपूर वेळ, प्रेम आणि पोषण देणे हे महत्वाचे आहे. निरोगी सवयी ठेवा आणि संयम आणि संतुलन राखण्याचे ध्येय ठेवा. तुमच्या लक्षात येईल की तुमच्या लहान मुलाचे आरोग्य चांगले होत आहे. त्याची वाढ आणि विकासाला चालना मिळू लागेल.

मागील आठवडा: १९ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील आठवडा: २१ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास

RELATED ARTICLES
MORE FROM AUTHOR
संपादकांची पसंती
Please Wait Updating Your Article