In this Article
तुमच्या छोट्या मुलाचा खूप वेगाने विकास होत आहे आणि तो एक वर्षाहून मोठा कधी झाला हे तुमच्या लक्षात सुद्धा आले नसेल.
१५ महिन्यांच्या बाळाचे विकासाचे अनेक टप्पे आहेत आणि हे टप्पे पार झाल्यावर तुमच्या बाळाचे एका आनंदी आणि निरोगी अशा छोट्या मुलामध्ये रूपांतर होईल. हळूचकन खुद्कन हसणारे बाळ आता खळखळून हसू लागेल आणि तुम्ही एक पालक म्हणून हे सगळे बदल पाहू शकाल.
व्हिडिओ: तुमच्या १५ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास (अॅक्टिव्हिटी आणि काळजी टिप्स देखील जाणून घ्या)
१५ महिन्यांच्या लहान मुलाचा विकास
तुमचे १५ महिन्यांचे लहान मूल आणि त्याची संज्ञानात्मक कौशल्ये, मोटर कौशल्ये आणि भाषा कौशल्ये वेगाने विकसित होत आहेत. १५ व्या महिन्यांपर्यंत तो विकासाचे अनेक टप्पे गाठेल आणि त्याच्या सभोवतालचे जग समजून घेण्यास सुरुवात करेल.
शारीरिक विकास
आपल्या लहान मुलाच्या मागे धावणे हे आरोग्यासाठी चांगले असले तरी कठीण असू शकते, परंतु लवकरच आपल्या बाळाच्या सोबत कसे राहायचे हे आपल्याला शिकावे लागेल. प्रत्येक दिवशी तुमच्या मुलाची आदल्या दिवशीपेक्षा जास्त वाढ झालेली तुमच्या लक्षात येईल. जर तुमच्या बाळाला आईच्या दुधासोबत पौष्टिक आहार मिळाला तर तुमच्या १५ महिन्यांच्या बाळाचे वजन सुमारे २१–२४ पौंड इतके असेल.
तुमचे बाळ खालील गोष्टी करू शकेल –
- कुठल्याही मदतीशिवाय हळू आणि स्थिर पावले चालण्यास बाळ सक्षम होईल
- स्वतःच्या शरीराचा भार बाळ पेलू शकेल आणि कोणत्याही आधाराशिवाय बसू शकेल
- खेळणी आणि इतर वस्तू हाताने घट्ट पकडून ठेऊ शकेल
- एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हात आणि तोंडाचा समन्वय विकसित होईल. म्हणजे अन्न आणि इतर काहीही त्याच्या तोंडात टाकण्याचा प्रयत्न करेल
- तुमचे बाळ वेगवेगळ्या कामांमध्ये सहभाग घेऊन तुम्हाला मदत करू लागेल. फोन उचलून बोलू लागेल किंवा मॉप उचलून फरशी पुसू लागेल
- तुमचे मूल स्पर्श, गंध, परीक्षण, दृष्टी आणि आवाज या पाचही इंद्रियांचा वापर करायला शिकेल आणि समन्वय साधू लागेल.
सामाजिक आणि भावनिक विकास
तुमचे मूल सामाजिक कौशल्ये आणि भावनिक विकासासह भोवतालच्या वातावरणाशी संवाद साधण्यासाठी विविध क्षमता विकसित करत आहे.
तुमच्या बाळाच्या भावनिक विकासाची काही खात्रीशीर चिन्हे येथे आहेत
- स्वतःवर लक्ष केंद्रित करून घेणे बाळाला आवडेल
- आरशात बाळ स्वतःला ओळखू शकते
- आजूबाजूच्या लोकांना ओळखून बाळ त्यांच्याशी हसू लागेल
- स्वतःच्या आवडी–निवडी बाळाला समजू लागतील
- धैर्याने नवीन गोष्टी शोधण्याचा बाळ प्रयत्न करेल
- तुम्हाला मिठी मारून बाळ तुमचे चुंबन घेऊ शकेल
- खेळणी शेअर करायला बाळाला आवडत नाही
- गोष्टींबद्दल चिडचिडेपणा असतो
संज्ञानात्मक आणि भाषा विकास
तुमचे लहान मूल १५ महिन्यांचे झालेले आहे. बाळ ‘मा‘ आणि ‘पा‘ सारखे साधे शब्द बोलू लागते. त्याचा भाषा आणि संज्ञानात्मक क्षमता झपाट्याने विकसित होत असतो. तुमचे बाळ अधिक स्वतंत्र होईल आणि संभाषणात त्याच्या/तिच्या पद्धतीने सहभागी होण्यास इच्छुक असेल.
बहुतेक १५ महिन्यांची बाळे पुढील गोष्टी करण्यास सक्षम असतील
- आवाजाचा टोन बाळ ओळखू लागेल म्हणजेच राग, आनंद इत्यादी
- ‘बॉल’, ‘कुत्रा’ ‘मांजर’ असे साधे शब्द बाळ वापरू लागेल
- तुमचा लहान मुलगा ‘नाही’ हा शब्द समजण्यास सक्षम असेल आणि त्याचा प्रभावीपणे आणि वारंवार वापर करेल
- तुमचे बाळ ‘मला दाखवा’, ‘इकडे पहा’ यांसारखे क्रिया–आधारित शब्द देखील समजून घेऊ शकेल
- तुमचे लहान मूल बोलू शकत असलेल्या शब्दांपेक्षा जास्त शब्द समजण्यास सक्षम असेल
वागणूक
जसजसे तुमचे बाळ वयाची २ वर्षे पूर्ण करेल म्हणजे ते जेव्हा ”टेरिबल टू‘ मध्ये पदार्पण करेल, तेव्हा स्वतःचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास सुरवात करेल आणि त्याला तुमचा काहीवेळा राग सुद्धा येऊ लागेल. तुमचे मूल आजूबाजूच्या वातावरणाबद्दल उत्सुक असेल आणि प्रत्येक गोष्टीत तो सहभागी होईल. तुमचे १५ महिन्यांचे मूल बर्याच गोष्टींच्या बाबतीत थोडे अधिक हट्टी होईल. या टप्प्यावर, पालक या नात्याने तुम्ही ठाम राहणे महत्वाचे आहे आणि बाळाला आधी शांत केले पाहिजे. तसेच बाळाच्या विध्वंसक वर्तनाला प्रोत्साहन देणे टाळले पाहिजे. तुमच्या बाळाचे खूप लाड सुद्धा करू नका आणि त्याच्या बाबतीत खूप कठोर सुद्धा राहू नका. संयम ठेवून बाळाच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
अन्न आणि पोषण
तुमचे लहान मूल वाढत असताना, त्याचा आहार आणि पोषण खूप महत्वाचे असते. त्यांच्या आहारातील प्रमुख घटकांपैकी एक घटक म्हणजे आईचे दूध. आईच्या दुधात १५ महिन्यांच्या बाळाच्या आहारासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक घटक असतात. इतकेच नाही तर बाळाची प्रतिकारशक्ती वाढवण्यासही त्यामुळे मदत होते आणि बाळाचे बहुतेक आजारांपासून संरक्षण होते.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने मूल दोन वर्षांचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवण्याची शिफारस केलेली आहे, परंतु त्यात्यासोबत बाळाला घन पदार्थ देणे सुद्धा आवश्यक आहे. तथापि, आईच्या दुधाऐवजी बाळाला फॉर्मुला देऊ नका. १५ महिन्यांच्या मातांनी कमीतकमी ३–४ वेळा आहार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर हे थोडे कठीण होऊ शकते, त्यामुळे तुमच्या बाळाला पुरेसे आईचे दूध मिळत आहे याची खात्री करण्यासाठी तुम्ही दूध काढून ठेवण्यासाठी वेळापत्रक तयार करू शकता. आपल्या बाळांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्न देणे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून बाळ त्यांच्या दाढांचा वापर करून अन्न पदार्थ खाऊ शकतील. त्यांच्यासाठी जेवणाचे वेळापत्रक तयार करा ज्यामध्ये दिवसभरात तीन योग्य जेवण आणि दोन स्नॅक्स असावेत जेणेकरून त्यांना घन पदार्थाची सवय होऊ शकेल. तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान सोडवण्याचा प्रयत्न करत असल्यास, त्यांना पुढाकार घेऊ द्या आणि त्यांचे त्यांना स्तनपान सोडू द्या.
झोप
तुमच्या बाळाच्या व्यक्तिमत्वाचा आता विकास होत आहे आणि त्याला आवडणाऱ्या आणि नापसंत असलेल्या गोष्टींमध्ये काही बारीकसारीक गोष्टी आहेत. नुकत्याच चालू लागलेल्या लहान मुलाला आता दात येत आहेत आणि कदाचित अस्वस्थ असल्यामुळे त्याला सतत झोप येत आहे. तुमच्या बाळाला तुम्हाला मिठी मारायला आवडेल आणि झोपायलाही आवडेल. दुपारच्या वेळी डुलकी घेणे देखील एक सवय होईल. परंतु बाळाला दुपारी झोपू देऊ नका जेणेकरून त्याला रात्री नीट झोप लागेल. झोपण्याच्या वेळेपूर्वी एक नित्यक्रम तयार करणे आणि ते नियमित करणे सुरू करणे महत्वाचे आहे जेणेकरून तुमचे बाळ दररोज त्याच वेळी झोपू शकेल. तुमच्या बाळाचे झोपेच्या वेळचे वातावरण एकसारखे ठेवा. झोपेची जागा, तापमान, खेळणी एकाच ठेवा जेणेकरून बाळाची भीती दूर होऊन बाळ शांतपणे झोपू शकेल.
खेळ आणि उपक्रम
बाळाची निरोगी पद्धतीने वाढ होण्यासाठी तुमचा बाळाशी नीट बंध जोडला जाणे आवश्यक आहे. तुमचे बाळ तुम्हाला बाहेर घेऊन जाण्यास सांगेल आणि नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करेल. नवीन क्रियाकलाप आणि शिकण्याची ओळख करून देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या १५ महिन्यांच्या मुलासोबत खेळ खेळणे. तुमचे बाळ पीक–ए–बू चांगले खेळत असेल तर ते खेळण्याची सवय ठेवा. प्राण्यांचे वेगवेगळे आवाज काढून नावे ओळखण्याचा खेळ तुम्ही त्यांच्यासोबत खेळू शकता.
तुमच्या बाळासाठी आणखी एक मजेदार क्रियाकलाप म्हणजे लपाछपी खेळणे. या वयाच्या लहान मुलांना हा खेळ आवडत असल्याने तो प्रसिद्ध होईल. तुमच्या बाळांसोबत खेळताना त्यांना खूप थकवा जेणेकरून बाळे शांतपणे रात्री झोपू शकतील.
आंघोळीची वेळ ही तुमच्या मुलासोबत खेळण्याची एक उत्तम संधी आहे. तुमच्या मुलाला खेळणी आणि बबल बाथ द्या त्यामुळे त्याला मजा येईल. तुम्ही तुमच्या लहान मुलाची त्याच्या मित्रांसोबत प्ले डेट ठेवू शकता जेणेकरून ते इतर मुलांसोबत खेळणी कशी शेअर करायची हे शिकू शकेल . बाळे त्यांची सामाजिक कौशल्ये आणखी विकसित करू शकतील
पालकांसाठी टिप्स
- मुलांसोबत खेळा आणि गाणी म्हणा म्हणजे तुमचा त्यांच्याशी चांगला बंध निर्माण होईल
- तुम्ही प्रवास करत असल्यास, तुमच्या मुलासाठी स्वतंत्र बेबी सीट असल्याची खात्री करा जिथे बाळाला सुरक्षितपणे बांधता येईल
- तुमच्याकडे पूर्ण साठा केलेली डायपर बॅग हातात असल्याची खात्री करा ज्यामध्ये जास्तीचे डायपर, बाटल्या, खेळणी, टिश्यू आणि कपडे असतील
- एक स्थिर आणि नियमित दिनचर्या तयार करण्यास सुरुवात करा ज्याची तुमच्या लहान मुलाला सवय होईल. उदाहरणार्थ, तुम्ही झोपायच्या आधी आंघोळीचा नित्यक्रम असावा
- तुमच्या लहान मुलाला दिवसभर खेळांमध्ये व्यस्त ठेवा जेणेकरुन तो थकून जातील आणि रात्री सहज झोपू शकेल
- कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या बालरोगतज्ञांचा नंबर जवळ ठेवा
- धीर धरा आणि लहानपणापासूनच तुमच्या लहान मुलांना शिष्टाचार शिकवण्यास सुरुवात करा कठोर रहा पण बाळाला तुमची त्यामुळे भीती वाटायला नको ह्याची काळजी घ्या
- तुम्ही आणि तुमचे पती दोघेही कामे वाटून घ्या आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढा
- बाळाला पोषक आहार द्या. विविध प्रकारची फळे आणि भाज्यांची ओळख बाळाला करून द्या
पुढील परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्या
तुम्ही तुमच्या मुलाला गोवर आणि गालगुंड आणि हिपॅटायटीस यांसारख्या नियमित लसींसाठी डॉक्टरकडे नेले असेल. तरीही तुमच्या लहान मुलासाठी नियमित तपासणी करून एक चार्ट तयार करणे देखील महत्वाचे आहे. जर तुमच्या मुलाने शौचास केली नसेल किंवा लघवी केलेली नसेल तर त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. पालक या नात्याने डोळ्यांतील लालसरपणा, कानात दुखणे ह्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. तुमचे बाळ अस्वस्थ होऊन रडत असेल किंवा झोपायला त्रास देत असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कानाला संसर्ग झालेला असेल तर तुमचे बाळ वारंवार कानाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते किंवा डोळ्यांच्या संसर्गाच्या बाबतीत वारंवार डोळे चोळण्याचा प्रयत्न करते.
तुमच्या बाळाला ४८ तासांपेक्षा जास्त काळ ताप किंवा सर्दी आणि खोकला असल्यास, तुमच्या डॉक्टरांना फोन करणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला बाळाच्या शौचात किंवा इतर कुठेही रक्त दिसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या मुलाला एखाद्या गोष्टीची ऍलर्जी असल्यास, त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. तुम्हाला असलेले प्रश्न त्यांना विचारा. बाळाचा वैद्यकीय इतिहास दाखवा आणि नियमित तपासणी करा.
तुमच्या बाळाने आतापर्यंत अनेक टप्पे पार केले आहेत आणि १५ महिन्यांचा टप्पा हा त्यापैकी एक आहे. बाळाचा हा प्रवास फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून जपून ठेवा.
मागील आठवडा: १४ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास
पुढील आठवडा: तुमच्या १६ महिन्यांच्या बाळाची वाढ आणि विकास